जीवन संघर्ष भाग 1
जीवन संघर्ष भाग 1
रोहित सैन्यात कर्नल च्या पदावर होता व आज तो सेवेतून मुक्त झाला होता.देहरादून च्या ऑफिस मधील सारे सोपस्कार आटोपून तो गोंडवाना एक्सप्रेस ने घरी जाणार होता.सहकाऱ्यांनी छान विदाई समारोह आयोजित करून काल त्याला निरोप दिला होता .जवळपास पाच वर्षानंतर तो स्वगृही परतत होता.गाडीच्या फर्स्ट क्लासच्या कोच मध्ये आपले सामान ठेवून तो परतीच्या प्रवासाला निघाला विचार चक्र सुरू झाले.---"साठ वर्षाच्या या वयात आता पुढील नवीन जीवनशैली ची सुरुवात करायची होती ,आयुष्यात सीमेवर प्रत्येक वादळाला सामोरे जाणारा रोहित घरातल्या वादळाने पराजित झाला होता.मुलगा अमर व मुलगी अमृता दोघेही लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते.अमर हा इंजिनियर होता व न्यूयार्क ला आपल्या सासऱ्याच्या इंडस्ट्रीमध्ये चे मॅनेजिंग डायरेक्टर होता .त्याची पत्नी नम्रता ही आई-वडिलांची एकुलती कन्या होती.अमृता चा पती राहुल हा पण आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता.दोन्ही मुलांनी आपले लग्न ऑनलाईन फ्रेंडशिप मध्ये जमवले व स्वतःच्या मर्जीने उरकले तीन वर्षापूर्वीच आपल्या आईला कांचनला एकटी सोडून ते निघून गेले.रोहित सीमेवर असल्यामुळे घर पूर्णपणे कांचन लाच सांभाळावे लागत असे.रोहित ने आपली गावातली शेती व घर विकून सातपुड्यातील हिल स्टेशन चिखलदरा जवळ एक एकर जागेत असलेला एका इंग्रजाचा आठ खोल्यांचा मोठा बंगला खरेदी केला होता व कांचनच्या मदतीला आऊट हाऊस मध्ये एक कुटुंब वसंता व निर्मला यांना ठेवले होते.त्यांचा सर्व खर्च रोहितच करायचा .वसंता ड्रायव्हर पण होता व घरची सफारी चालवायचा".
शेजारुन जाणाऱ्या ट्रेन च्या आवाजाने रोहित ची विचारशृंखला तुटली.गोंडवाना एक्सप्रेस वेगाने पुढचा टप्पा गाठत होती.गाडीच्या खिडकीतून वेगाने धावणारी झाडे बघत रोहित पुन्हा इतिहासात शिरला..---"मुलांना सांभाळणे काही कांचनला जमले नाही,की त्यांना पित्याचा धाक दाखवू शकली नाही,त्यामुळे अभ्यासात हुशार असलेल्या दोन्ही मुलांनी शिक्षण संपताच आपले आपले मार्ग निवडले व ते आईपासून वेगळे झाले.या धक्क्यामुळे कांचनला बीपीचा त्रास सुरू झाला.ती आधीच धीरगंभीर शांत स्वभावाची होती.कधीच कुणाशी वाद घालत नव्हती.
कांचनला माहेरचं असं कुणीच नव्हतं कारण ती लहान असतानाच त्याचे वडील जे कलेक्टर होते एका कार एक्सीडेंट मध्ये वारले व त्यांच्या धक्क्याने वर्षभरात आईने पण जगाचा निरोप घेतला.तिच्या मामाने प्रॉपर्टी असल्यामुळे तिचे शिक्षण केले व ती एमबीबीएस डॉक्टर झाली.रोहितला ही कांचन प्रथमदर्शनीच फार आवडली व त्यांचे लग्न झाले.मामांनी मात्र तिची प्रॉपर्टी आधीच ट्रान्सफर करून घेतली होती.काही वर्षे ती रोहित सोबत फिरली पण अमर झाल्यानंतर ती गावाला स्थायिक राहिली व तिथेच आपला दवाखाना थाटला.रोहितला आपल्या पत्नीचा फार अभिमान वाटायचा".
"अरे भोसले तू " आवाज ऐकून रोहित वर्तमान मध्ये आला समोर त्याचा मित्र संजय गुप्ता होता.
"अरे तू कसा काय?" रोहित मी विचारले.
"यार आपण पण रिटायर झालो व घरीच नागपूरला जात आहे".
दोघेही बसून बोलायला लागले.
यातच रोहितला कळले की गुप्ता पण आपला समदुःखी आहे.त्याचा मुलगा उच्चपदावर कनाडा जॉईन झाला व तिथेच लग्न करून रमला होता .दोघेही एकमेकांना धीर देत होते.गुप्ता नागपूरला उतरला व रोहित बडनेरा स्टेशन वर उतरला .समोरच कांचन ला बघून तो अवाक झाला हातात बुके घेऊन ती उभी होती.
तिचा सुंदर चेहरा प्रफुल्लित वाटत होता पण डोळे पाणावलेले होते.मंद स्मित करत तिने बुके रोहितच्या हातात दिला.रोहित ला पण दाटून आले होते थरथरत्या हाताने तिचे दोन्ही हात त्याने घट्ट धरले .नेत्राच्या भाषेतच त्यांनी एकमेकांचे सांत्वन केले.सोबत आलेल्या वसंताने सर्व सामान उचलले व प्लॅटफॉर्मच्या बाहेर सफारी गाडीत ठेवले.
"वसंता तू मागे बस रोहित म्हणाला व ड्रायव्हिंग सीटवर बसला.कांचन त्याच्या बाजूला समोर बसली गेयर टाकून रोहितने सफारी स्टार्ट केली. सफारी अमरावती परतवाडा मार्गे चिखलदरा कडे जाऊ लागली.दुपारचे दोन वाजले होते सफारी चिखलदर्याला पोहोचली.विंडमिल च्या पुढे दोन वळणं घेऊन एका मोठ्या कंपाऊंडच्या गेट समोर थांबली वसंताने उतरून गेट उघडले.लाल मुरुमाच्या रस्त्यावरून धावत सफारी बंगल्याच्या मोठ्या पोर्चमध्ये उभी राहिली.इंग्रजांच्या काळातील हा मोठा बंगला होता तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे संपूर्ण दगडाचे बांधकाम होते रुंद भिंतीवर पंधरा फूट उंचीवर तावदाने होती.त्यामुळे मोकळी हवा खेळायची वर पांढरेशुभ्र सिलिंग होते व त्यावर सागवानी कमानी वर कवेलू रचलेले होते त्यामुळे वातावरण थंड राहायचे.रोहितला बंगल्या सोबतच पुष्कळ सागवानी फर्निचर पण मिळाले होते.
बागेत स्ट्रॉबेरीची झाडे बघून रोहितला आश्चर्य वाटले.
"हे काय ही तर स्ट्रॉबेरी आहे " त्याने एक फळ तोडून तोंडात टाकले.
"हो दोन वर्षांपूर्वी मी नर्सरी मधून रोपे आणली होती व गंमत म्हणून लावली तर त्याला आता फळं आली आणि हो तेथे कॉफी पण होते " कांचन म्हणाली.
"वॉव, म्हणजे हा बंगला घेऊन आपण चूक नाही केली तर." रोहित म्हणाला.
"मुळीच नाही इथले लोक म्हणतात येथे खूप वर्षापासून कोणीच राहत नव्हते व मालकाला पण कोणी पाहिले नाही" कांचन म्हणाली.
"अग माझा मित्र थामस आहे ना तो मध्यस्थ होता त्याने आग्रह केला म्हणून मी घेऊन टाकला त्याने पेपर्स पण ताब्यात दिले याचा मालक एडवर्ड आयर्लंड ला असतो.त्याचे पंजोबा येथे राहायचे " .रोहित म्हणाला
दोघे आत आले.निर्मलाने चहाची व्यवस्था केली होती फ्रेश होऊन रोहित कांचन चा हात धरून पूर्ण भाग फिरायला निघाला पाच वर्षानंतर तो आपला आनंद शोधत होता.
रोहितला येऊन सहा महिने झाले पण बंगल्यात दोघंच दोघं काही काम नाही पैसा मुबलक होता पण मनाला चैन नाही शांती नाही मुलांच्या आठवणीने त्यांचे कंठ दाटून लागले.
तासनतास दोघे जुना फोटोचा अल्बम भगत बसायचे आणि मुख्य भाषेत एकमेकांना धीर द्यायचे.
----------------*-----------------*---------------*------------
(क्रमशः) जीवन संघर्ष भाग-- 1 पूर्ण
