STORYMIRROR

Ashok Ingole

Others

3  

Ashok Ingole

Others

जीवन संघर्ष भाग-- 2

जीवन संघर्ष भाग-- 2

4 mins
148

    रोहितला येऊन सहा महिने झाले पण बंगल्यात दोघंच दोघं काही काम नाही, पैसा मुबलक होता पण मनाला चैन नाही ,शांती नाही, मुलांच्या आठवणीने त्यांचे कंठ दाटू लागले.तासंतास दोघे जुना फोटोचा अल्बम बघत बसायचे आणि मूक भाषेत एकमेकांना धीर द्यायचे .मुलांशी बोलायचा प्रयत्न केला ,तर फोनच बंद द्यायचा.अशा वातावरणात एक दिवस संजय गुप्ता चा फोन आला.तो पण एकटेपणाला फार कंटाळला होता.

"मित्रा आपली परिस्थिती तर फार चांगली आहे पण सक्‍सेना, पाटील ,आणि बर्वे यांची अवस्था फार बिकट आहे. ते सर्व वर्धेला एका वृद्धाश्रमात आहेत.मुलांनी पूर्ण पैसा स्वतःकडे घेतला व पुणे मुंबईला निघून गेले.शेवटी स्वखुषीने तिघे वृद्धाश्रमात राहायला गेले व पेन्शन मधून तिथे पेमेंट करतात.सक्सेना ने नागपूर चे घर भाड्याने दिले आहे",  संजय गुप्ता सांगत होता.

हे सर्व एकूण रोहित चे डोके बधीर झाले.आपल्या वडिलांनी सैन्यात आयुष्य घालवले, याचे या मुलांना काहीही घेणेदेणे नव्हते त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे आपापले मार्ग निवडले होते.

"संजय आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं बसून चालणार नाही तू वहिनीला घेऊन इकडे ये आपण काहीतरी मार्ग नक्की काढू आणि या सफोगेशन मधून बाहेर पडू" रोहित म्हणाला.

  संजय थोडा थांबला,पण लगेच म्हणाला " डन",मी उद्याच मी निघतो आठ दहा दिवसाचे कपडे वगैरे घेऊन येतो".

"परमानेंट आला तरी चालेल इथे सृष्टीसौंदर्य भरपूर आहे", हसत रोहित म्हणाला.


दुसऱ्याच दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत संजय गुप्ता ची झायलो गाडी बंगल्याच्या दारात हजर होती. रोहीतने मोबाईलवर लोकेशन पाठवले होते त्यामुळे संजय सरळ रोहित कडे पोहोचला सोबत त्याची पत्नी अंजली पण होती.

 कांचन ने अंजली ला बघितले नव्हते .पण फोनवर त्यांचे बोलणे झाले होते .त्या कडकडून भेटल्या.

 बरेच वर्षांनी बंगल्यात आनंदी वातावरण झाले होते .तीन दिवस खूप विचार करून त्यांनी एक प्लान आखला व सक्सेना ,पाटील ,आणि बर्वे दाम्पत्यांना पण चिखलदऱ्याला बोलावून घेतले.कमल सक्सेना हा दोन वर्षापूर्वी कॅप्टनच्या पदावरून रिटायर झाला होता .त्याची पत्नी मनीषा ही सिव्हिल इंजिनिअर होती व ती पण शासकीय सेवेतून याच वर्षी रिटायर झाली होती.दोघांनी आपले रिटायरमेंट चे पैसे मुलाला अमितला पुणे येथे घर घ्यायला व व्यवसाय करायला दिले होते .पण तो लग्न करून तिथे सासर्‍याच्या कंपनीत जॉईन झाला पार्टनर म्हणून.नागपूरला त्यांचे घर होते पण सामाजिक बांधिलकी या नात्याने दोघांनी वृद्धाश्रमात जाऊन समाजसेवेचे कार्य स्वीकारले.त्यांच्यामुळे त्या वृद्धाश्रमात एक चैतन्य आलं होतं व त्यांच्या मुळेच पाटील व बर्वे हे त्यांचे सैन्यातले सोबती पण त्यांना जॉईन झाले होते.प्रकाश पाटलांना मूलबाळ नव्हतं व बर्वेच्या मुलींनी लग्नानंतर आईवडिलांशी संबंध ठेवलेच नाही त्यामुळे श्रीकांत बर्वे व सुमन बर्वे एकाकी पडले व पाटलासोबत सक्सेना ला वृद्धाश्रमात जॉईन झाले होते.

 रोहित ने पाठविलेले प्रपोजल तिघांनाही पटले तिघेही आपल्या पत्नीसह रोहित कडे सक्सेना च्या वरसा कार मध्ये निघाले होते.या सर्वांचा एकच प्रश्न होता मुलांचं दुःख व सोबत कोणी नाही.


 आज प्रथमच या मोठ्या बंगल्यात वर्दळ जाणवू लागली पाच खोल्यांमध्ये हे पाचही कुटुंब स्थिरावले भल्यामोठ्या डायनिंग हॉलमध्ये इंग्रज कालीन दहा फुटाचा सागवानी डायनिंग टेबल व खुर्च्या होत्या त्यावर एका वेळेस बारा व्यक्ति जेवण करायचे .बंगल्यामध्ये फर्निचर सोबत कपाट क्राकरी फ्रिज पलंग गाद्या हे सर्व साहित्य या घराचे जुने मालक एडवर्ड ने इथेच सोडून दिले होते.

 सायंकाळी रोहित आपल्या चारही मित्रा सोबत बागेत बसला होता हील स्टेशनचे सुंदर वातावरण वाहणारा गार गार वारा मन प्रफुल्लित करत होता.रोहितला विंडमिल जवळची पाच एकर शेती सरकारकडून मिळाली होती त्याने तिथे स्ट्रॉबेरी व कॉफीची लागवड करण्याचा प्लान आखला होता.पाचही जणांनी पुढील कार्यक्रम पक्का केला.रोहित च्या बंगल्या लगतच एक फ्लॅट स्कीम बनणार होती जिथे पाच मजली इमारतीत तीस प्लेट बनवणार होते.बंगल्याच्या मागील तीन खोल्यांचे रेनोवेशन करून तिथे गृह उद्योग सुरू होणार होता.जिथे पापड लोणची वड्या वगैरे सर्व पदार्थ बनवणार होते.त्याला लागूनच कांचन चा छोटासा दवाखाना बनणार होता.शेतामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणार होते तसेच कॉफीचे ही प्रोसेसिंग युनिट चार वर्षानंतर टाकायचे होते..त्यासाठी शेताजवळील मोकळी जागा घेण्याचे ठरले होते.

 कमल सक्सेना हा नेव्हीमध्ये इंजिनिअर होता त्याने आपले पाच समदुःखी मित्र शोधले होते.त्यांना पण ही स्कीम आवडली होती सर्वच पेन्शनर असल्यामुळे त्यांना पैशाचा प्रश्न नव्हता शिवाय या योजनेत पाचही मित्रांनी आपला शिल्लक पैसा भांडवल म्हणून लावला होता.सर्वांनी भागीदारीमध्ये सैनिक गृह उद्योग व सेवानिवृत्त सैनिक कल्याण संस्था स्थापन केली.पैशाचा पूर्ण व्यवहार रोहित भोसले व संजय गुप्ता बघणार होते.सक्‍सेना संपूर्ण उद्योगाचं व्यवस्थापन तर पाटील व बर्वे पूर्ण मेंटेनेंस व लागणारे साहित्य व विक्रीसाठी बाहेर जाणारा माल हे सर्व पाहणार होते.

 हा प्रकल्प सुरू करणारे सर्व साठ वर्षाहून अधिक वयाचे होते.पण त्यांची जिद्द व कार्याप्रती निष्ठा आणि एकमेका वरील अतूट विश्वास या सर्वांमुळे हा प्रकल्प जोमाने साकार होत होता.पाचही मित्र व त्यांच्या पत्नी दिवसभर कामात दमून जायचे व रात्री निवांत झोपायचे.पाच वर्षात सैनिक प्रतिष्ठानचे नाव सगळीकडे झळकू लागले.स्ट्रॉबेरीचा फार मोठा उद्योग सुरू झाला होता.

    आज येथे दहा एकर जागेमध्ये कृषी प्रयोगशाळा व तज्ञ यांचे वास्तव्य असलेली वसाहत होती.त्याला लागून स्ट्रॉबेरीची शेती होती तिथे काम करणारे अधिकांश सेवानिवृत्त सैनिक किंवा अधिकारी होते.काहींच्या मुलांनाही इथे काम मिळाले होते. शेती लगतच एक दहा हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म होता.तिथेही पोल्ट्री तज्ञ व छोटा दवाखाना होता.लोणचे पापड गृहउद्योग पण सुरू झाला होता.रोहित च्या बंगल्या शेजारीच एका छोट्या इमारतीत कॉफीचे प्रोसेसिंग युनिट सुरू झाले होते व डबाबंद कॉफी बाहेर पाठविली जात होती.फ्लॅट स्कीम मध्ये गरजू लोकांची रहायची व्यवस्था होती. एकंदर दोनशे जणांना येथे रोजगार मिळाला होता.

    आज सैनिक प्रतिष्ठानच्या या प्रकल्पाला पाच वर्ष पूर्ण झालीत.बंगल्याच्या आवारात एक छान समारोह आयोजित करण्यात आला होता व मुख्य अतिथी म्हणून ब्रिगेडीयर दलजीत सिंह अरोरा व अमरावतीचे जिल्हाधिकारी हे आमंत्रित होते.कार्यक्रमात बरेचशे मोठे मोठे व्यापारी सैनिक प्रतिष्ठानचे डिस्ट्रीब्यूटर पण हजर होते.पाचही मित्रांवर बराच कौतुकाचा वर्षाव झाला सरकारतर्फे सैनिक शाळेला ही मंजुरी देण्यात आली.अशाप्रकारे अशांती व दुःखात जगणारे देशभक्त अशाही परिस्थितीतून मार्ग काढून जिद्दीने प्रगतीपथावर कसे जातात हे रोहित व त्याच्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनी जगाला दाखवून दिले.


Rate this content
Log in