झुळूक तिच्या आठवनींची
झुळूक तिच्या आठवनींची
"Wow...you are looking sooo handsome bro😍😍..... आज तर समायरा फुल्ल फ्लॅट होणार आहे...तुला या सूट मध्ये बघून😜😜" दिव्या त्याला ब्लॅक ब्लेझर चढ्वत मस्करीच्या सुरात म्हणाली....
" गप्प बस....काही पण बोलतेस...." तो गालात हसत म्हणाला..
" काही पण काय त्यात?? खरं तेच बोलतेय....आज तुझा स्पेशल डे आहे ना.... And you are the center of attraction today.... And Thanks bro....तु अश्विन दादा सोबत जर्मनी ला आलास आणि समायरा शी लग्न करायला तयार झालास...she is the best choice for you..."
" अच्छा??...आता तुझी बेस्ट फ्रेंड आहे म्हंटल्यावर तुला ती बेस्टच वाटणार ना..."
" नाही रे..ती तुझ्यासाठी बेस्ट चॉइस आहे...कारण तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर....आणि मला विश्वास आहे...कधी तरी तू ही करशील तिच्यावर तेवढंच प्रेम...." दिव्या
" हम्म....बघू...तु जा आता...आवरून घे तुझं...नाहीतर भावाच्या लग्नात अशीच येशील...कामवाली बाई बनून..."
"ऐ... गप रे भावड्या....चल मि आलेच आवरून...मला सुद्धा छान दिसलं पाहिजे हां....afterall आज माझ्या ब्रो चं आणि बेस्ट फ्रेंड चं लग्न आहे....till then you enjoy your freedom...😜 क्या पता फिर मिले ना मिले..." म्हणत ती हसत हसत तिथून बाहेर पळाली...
दिव्या बाहेर जाताच तो फोन काढून फेसबुक उघडून तीचं प्रोफाइल बघत बसला....ती म्हणजे त्याच्या आठवणीतली ती....त्याच पाहिलं प्रेम....तिचा फोटो बघून तो आठवणीत हरवला...
दोन वर्षा आधी तो banglore ला cognizant मध्ये as a सीनियर सॉफ्टवेअर इन्जिनियर म्हणून जॉब करत होता....ऑफिस मध्ये फक्त कामं एके काम एवढच् तो करायचा....कधी कुण्या मुलीसोबत close friendship नाही कि कधीच्या काळात गर्लफ्रेंड बनवली नाही....कॉलेज मध्ये असताना सहज एक मुलगी आवडून गेलेली....पण तिला विचारण्याच्या आधीच ती एका मुलासोबत खूप जवळीक साधताना दिसली....आणि त्यावरून ती ऑलरेडी एंगेज असेल हा अंदाज बांधून त्याने तिला विचारण्याचा निर्णय बदलला...आणि त्यानंतर तर कधी कुण्या हि मुलि कडे त्या नजरेने बघितले सुद्धा नाही....
आज अचानक कामात असताना बॉस ने फोन करून केबिन मध्ये बोलावून घेतले...
" may I come in sir?? "
" yaah arjun.... come in.... "
तो आत येऊन बॉस च्या समोर उभा राहिला...तर बॉस ने त्याला बसण्यास खुणावले....आणि तो थोडा विचार करत खुर्चीत बसला...
" actually अर्जुन....संचित कुछ दिनो के leave पर जा राहा है...सो तुम्हे पुणे जाना होगा...."
" व्हॉट??...पुणे??...for how many days??...सर मै कभी पुणे नही गया हू आजतक....मेरी जगह कोई और नही जा सकता??"
" नो अर्जुन....you will have to go...no arguments...कल शाम कि flight book हो चुकी है...और हा...तुम एक हफ्ते के लिये जा रहे हो..."
" ok sir.... 😔😔" म्हणून तो लहान चेहरा करून तिथून बाहेर पडला....
दुसऱ्या दिवशी रात्रीच्या flight ने तो पुण्याला पोचला....हॉटेल वर चेक इन केलं आणि फ्रेश होऊन शांत झोपी गेला.....दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून ऑफिस ला गेला....तर लक्षात आलं हॉटेल आणि ऑफिस अगदी समोरासमोर च होते....म्हणून जाण्यायेण्याचा काहीच त्रास होणार नव्हता....
ऑफिस ला जाताच tech team कडून त्याचे मस्त स्वागत करण्यात आले....पूर्ण टीम सोबत इंट्रो डक्शन् झाले....सगळे टीम चे लोक चेहऱ्याने नाही पण रोज फोन वर कामा निमित्त बोलणे होत असल्यामुळे नावाने आणि आवाजाने तरी ओळखी चे च होते....त्यामुळे त्याला अजिबात अनोळखी ठिकाणी आल्या सारखे वाटले नाही.... थोडं बोलून झाल्यावर त्याला त्याचा लॅपटॉप आणि कामं करण्याची जागा देण्यात आली....तो हि लगेच कामात लागला... आणि पुढल्या काहीच क्षणात tech रूम च्या door वर ऍक्सेस करण्याचा आवाज आला....आणि ती गडबडीत आत शिरली....चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होत...कारण आज नेहमी पेक्षा थोडा जास्त उशीर झाला होता....नशीब सगळे आपापल्या कामात लागले होते म्हणून कुणी काही बोललं नाही....तिने येताच सर्वात आधी पर्स ठेवली आणि घाईघाईत लॉगिन केलं...
Laptop सुरु करून आऊटलुक उघडून एक एक मेल्स लक्ष देऊन चेक करत बसलेली....कॉफी कलर चा कॉटन चा स्लीव्हलेस पंजाबी ड्रेस घातलेला... अधून् मधून खांद्याहून खालि सरकलेली ओढणी सावरत् होती....केस मोकळे सोडलेले....कुणीतरी नवीन आज आपल्या tech room मध्ये आलय याची कल्पनाही नव्हती तिला....आणि अर्जुन मात्र ती आत आल्या पासून तिची एक एक हालचाल टिपत बसला होता....कधी मुलींकडे इंटरेस्ट घेऊन न बघणारा तो...आज चक्क कामाचं भान नव्हतं त्याला....भारी भारी मुली त्याच्या टीम मध्ये त्याच्या सोबत कामं करत होत्या... पण त्याला कधी कुणाबद्दल साधं attraction सुद्धा वाटलं नाही....आणि आज एक साधारण मुलगी पाहून तो हरवुन गेला होता....
तिला काहीतरी doubt होता...आणि तो मॅनेजर ला विचारण्यासाठी ती बाजुला वळली....तेव्हा तिची नजर त्याच्यावर पडली...तेव्हा कुणी तरी नवीन व्यक्ती तिथे आलाय हे तिच्या लक्षात आलं....दोघांची नजरानजर होताच... त्याची तंद्री तुटली आणि तो गपचुप खाली मान घालून लॅपटॉप मध्ये बघू लागला....तिला हि खूप conscious फील झालं....दोघेही गपचूप कामात मग्न झाले...
दुपारी लंच ब्रेक मध्ये सगळे सोबतच जेवायला बाहेर पडले....तेव्हा टीम च्या एका मुलाने तिची त्याच्याशी ओळख करून दिली...
" प्रीशा तु ओळखलस कि नाही याला??..." रूद्र
" अं?? नाही तर...मी तर पहिल्यांदाच बघतेय....मग कसं ओळखणार??" ती confused होऊन म्हणाली...
" अग हा अर्जुन आहे....बैंगलोर हुन आलाय....संचित सर leave वर गेलेत ना...म्हनुन हा आलाय त्यांच्या जागेवर...काही दिवसांसाठी...."
" ओह्ह....म्हणजे हा तो अर्जुन आहे का ज्याच्याशी आपण फोन वर बोलत असतो....बंगलोर सॉफ्टवेअर डेवेलपमेंट टीम चा...??"ती काही विचार करत म्हणाली...
" हो..मीच तो...actually मी ही तुला आधी ओळखलं नाही...सॉरी😊..." दोघांनी हसत हॅन्ड शेक केला....🤝🏻🤝🏻
आणि गप्पा मारत जेवण केलं आणि परत आपापल्या कामी लागले...अर्जुन तर पूर्ण दिवस संपेपर्यंत अधून मधून तिच्या कडे बघत होता...आता मात्र तिची नजर गेली तर दोघे गालातल्या गालात हसून देत होते...
आता त्याला उलट आपण याआधी इथे का आलो नाही याचे वाईट वाटून गेले...
दुसऱ्या दिवशी तर साहेब सर्वांच्या आधीच ऑफिस ला येऊन हजर होते... आणि तिच्या येण्याची आतुरतेने वाट बघत बसले.....अचानक door वर ऍक्सेस करण्याचा आवाज आला....तसा तो excited होत तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला.....दार उघडून ती आत शिरली...आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड smile आली😇😍.....तिने ही त्याला बघून हसत गुड मॉर्निंग विश केलं....काल जास्तच उशीर झाला होता म्हणून आज ती ही जरा लवकरच आली...
अर्जुन तिला बघून दोन मिनिट हरवुन च गेला....कारण आज तिने फ्रील चा व्हाईट टॉप अँड ब्लू जीन्स घातला होता....केसांचा बन टाकून क्लच लावला होता....आणि गळ्यात मल्टीकलर स्कार्फ बांधला होता.....simple yet classy दिसत होती ती...
घाईघाईत् येत तिने पर्स टेबल वर ठेवली....केसांचा क्लच काढून केस मोकळे सोडले....अर्जुन तिची एक एक movement निरखून बघत आणि एन्जॉय करत होता....बाकी कुणी आले नव्हते....म्हणून तो जागचा उठून तिच्या जवळ च्या खुर्चीवर गप्पा मारायला जाऊन बसला....आणि तेवढ्यात तिने गळ्यातला तिचा स्कार्फ काढून पर्स वर ठेवला....आणि तो शॉक लागल्या सारखा धाडकन उभाच राहिला😳😳....कारण स्कार्फ काढून ठेवताच तिच्या गळ्यातल मंगळसूत्र त्याला दिसलं....जे काल पंजाबी ड्रेस वरच्या ओढणी मुळे दिसलं नव्हतं....
" What the hell....she is married??....ohhh my god..." मनातल्या मनात स्वतःशी बोलत तो तिथुन उठला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला....त्याच हे वागणं प्रिशा ला जरा विचित्र च वाटलं....
" हेय अर्जुन... what happened??"
" अरे nothing.... मला वाटलं... काही कामं नाही म्हणून गप्पा मारूयात् ....पण अचानक एक कामं आठवलं म्हणून उठून आलो..."
" ओके ओके...."
" शीट यार...मी असा कसा विचार करू शकतो....एका married मुली बद्दल..??" तो दोन्ही हाताने डोके घट्ट पकडून्... हताश पणे विचार करत म्हणाला...
" बट ती पाहताच क्षणी मनाला आवडून गेली...त्यात माझी चूक तरी काय आहे...??🤔🤔आणि काल कुठे मला माहीत होतं ती married आहे म्हणून..."
त्याचें स्वतःच्या मनाशी द्वन्द्व सुरु झाले....
" पण ते काहीही असो...हे चुकीचं आहे... मी तिच्या कडे लक्ष नको द्यायला... उगाच गुंतून पडलो तर मलाच त्रास होईल...arjun...stay away from her...." तो स्वतःला समजावत होता..
त्याने स्वतःच्या मनाला खूप समजावलं आणि कामाला लागला....अजूनही कुणी आलेलं नव्हतं....परत त्याने काही विचार केला आणि फेसबुक उघडून तिचे प्रोफाइल ओपन केले....याआधी ऑफिस मूळे जरी ते नावाने एकमेकांना ओळखत असले....तरी फेसबुक फ्रेंड अजून झाले नव्हते....
तिचे प्रोफाइल उघडून सगळे फोटो भराभर बघायला लागला...तिचे लग्ना पासून ते आता पर्यंत चे बरेच फोटो होते....तिच्या फ्रेंड्स सोबतचे आणि नवऱ्या सोबतचे सुद्धा....ते सगळे फोटो पाहून तरी ती happily married आहे असेच त्याला जाणवले.....
काही वेळात बाकीचे आले...सर्वांशी बोलून तो कामी लागला...दुपारी सगळे सोबत जेवायला गेले...पण तो तिच्याशी स्वतःहून एक शब्दही बोलला नाही...आजचा पूर्ण दिवस त्याने तिच्याशी न बोलता घालवला....तिला त्याच वागणं थोडं वेगळं वाटलं...पण कामात असेल म्हणून तिने जास्त विचार केला नाही...
दुसऱ्या दिवशी हि त्याने प्रयत्न केला...पण तिच्या कडे बघण्या पासून स्वतःला रोकु शकला नाही....तिच्याशी मोकळे पणाने बोलत नव्हता पण अधून मधून ती काय करतेय....तिच्या चेहऱ्याचे हावभाव तो कुणाचे लक्ष नसताना टिपत होता....
तो काही दिवसांसाठी आलाय म्हणून सगळे त्याला स्पेशल ट्रीटमेंट देत होते....त्यालाही खूप छान वाटत होतं... सगळ्यांशी एक वेगळीच attachment झाली होती....
पुढल्या दिवशी सगळे लंच ब्रेक मध्ये बाहेर जेवायला जायचा प्लॅन करत होते...अर्जुन बंगलोर चं जेवण मिस करत असेल म्हणून सगळ्यांनी विचार विनिमय करुन south indian हॉटेल मध्ये जायचं ठरवलं...पण अर्जुन मधेच बोलला...
"Guys.... lets go somewhere else.... its my treat... मला साऊथ इंडियन खाऊन कंटाळा आलाय यार...प्लीज काहीतरी नवीन खायचं आहे मला..."
" अरे वाह...we are always ready for treat...😋😋" विशाल मधेच बोलला...
" ये गप् रे भुक्कड....तो आपला गेस्ट आहे ना....मग ट्रीट तो देणार कि आपण द्यायला हवी??..." रुद्र विशाल ला टपली मारत म्हणाला...
" you are right rudra....अर्जुन.. आजची ट्रीट मी आणि रूद्र मिळून देतोय...चला लवकर निघुयात....नाहीतर मॅनेजर ची कटकट सुरु होईल...." प्रिशा
" ओके डन 👍🏻👍🏻...चल मित्रा...आज तुला पुनेरी special काहीतरी खाऊ घालतो..." रुद्र त्याच्या गळ्यात हात् घालून म्हणाला....
" thanks guys 😇😇" तो गालात हसुन् तिच्या कडे बघत म्हणाला.....
सगळे पटपट केबिन च्या बाहेर पडले...सकाळी जोराचा पाऊस पडून गेला होता....म्हणून ऑफिस कॅम्पस मध्ये कुठे कुठे थोडं पाणी साचलं होतं.... सगळे ग्रुप ने एक दोन पावलांच्या अंतराने चालत होते....अर्जुन ची एक नजर अजुनही तिला न्याहाळत होती....आज तिने पिंक ब्रासो चा स्लीवलेस ड्रेस आणि चुडीदार घातलं होत...त्यावर साईड ओढणी घेतलेली....आणि मोकळे केस तिचे हवेने भुरभूर उडत होते....सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या...ती ही अधून मधून बोलत होती...तर बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि पापण्यांची होणारी उघडझाप... हाताचे हातवारे....एक एक गोष्ट बघून मनात साठवत होता....त्याला हे क्षण कधी संपूच नये असे वाटत होते....
तो तीच्यातच हरवलेला होता...की अचानक खाली टाईल्स वर जमलेल्या पावसाच्या पाण्या मुळे तिचा पाय घसरला आणि आता आपण जोरात पडणार या भीतीने तिने घट्ट डोळे मिटून घेतले...तर तेवढ्यातच एका मजबूत हाताने तिला कमरेत पकडून वाचवले....तिने डोळे उघडले तर समोर अर्जुन होता.... तिच्या खूप जवळ....
आपण पडलो नाही आणि आपल्याला कुणीतरी वाचवलं म्हणून तिला खूप हायस वाटलं....दोघांची नजरा नजर झाली...एक क्षण तिला थोडं धडधड झालं...पण आपल्याला कुणीतरी पडण्यापासून वाचवलं...एवढंच तिच्या डोक्यात आलं....म्हणून ती नॉर्मल होती....पण अर्जुन मात्र त्याच्या आयुष्यातली पहिली रोमँटिक मोमेंट जगत होता....त्याच्यासाठी तर आजुबाजूच सगळं जगच थांबलं होतं...जणू कुणीतरी व्हायोलीन वाजवतंय🎶🎶🎻🎻...आणि दोघांवर गुलाबाच्या पाकळ्या पडत आहेत🌹🍁...असच त्याला वाटत होतं.... प्रिशा पडली म्हणून सगळे दचकून तिथेच थांबले....आणि काही वेळ तो प्रसंग पाहून थोडे शॉक झाले....
कारण तो एखादा फिल्मी सीनच वाटतं होता....पण ती married असल्याने त्या अँगल ने कुणी विचार केला नाही.....
अर्जुन एक टक तिच्या डोळ्यात बघत होता...म्हणून् तिला आता अवघडल्यासारखं वाटू लागलं होतं....ती लगेच स्वतःला सावरत् नीट उभी राहिली...आणि "थँक्स अर्जुन" म्हणून बाजूला झाली...ती बाजूला होताच तो भानावर आला....आणि " you are most welcome..😍" म्हणत बाकिच्यान् सोबत जाऊन उभा राहिला....सगळे परत गप्पा मारत ऑफिस च्या बाहेर जायला लागले....
" थॅन्क्स यार... आमचं लक्ष नव्हतं...पण तू प्रीशा ला वाचवलं.... नाहीतर एखादं हाड बीड मोडल असत तीचं...."
" मी असं कसं पडू दिलं असत तिला??"तो नकळत बोलून गेला
" अं??...काही बोललास का??" रूद्र
" नाही नाही....म्हणजे हो ना...बरं झालं माझं लक्ष गेलं....नाहीतर पडली असती बिचारी..." अर्जुन सावरा सावर करत म्हणाला...
खरं तर तीला पडण्या पासून त्याने वाचवले... पण तो मात्र चांगलाच पडला.....तिच्या प्रेमात....😍😍
पण आता त्याला तिला इग्नोर करायचं नव्हतं....एकतर्फी का असेना पण त्याला पहिल्या वहील्यांदा जानवलेली ती सुंदर भावना आता भरभरून जगावीशी वाटत होती...पुण्यातले उरलेले ते काही दिवस कधी संपूच नयेत असे वाटत होते....
सगळे एका मस्त हॉटेल मध्ये जाऊन पोट भरून जेवले...अर्जुन ला सुद्धा ते जेवण खूप आवडलं.....आज तो जरा जास्तच खुशीत होता....काहीतरी खूप अनमोल मिळाल्याची फीलिंग येत होती त्याला...
संध्याकाळी ऑफिस संपल्यावर तो हॉटेल वर जाऊन फ्रेश झाला...आणि रात्रीचे जेवण करून फोन मधले तिचे fb चे आणि त्यांनी ऑफिस मध्ये चोरून काढलेले तिचे फोटो बघत परत तिच्या आठवणीत हरवला....
आता मात्र तो ऑफिस मध्ये अगदी खुश आणि प्रसन्न राहत होता....तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत होता....काधी काही doubts असले तर ती ही काही आढेवेढे न घेता त्याला विचारत होती....आणि तो तर संधीच बघत होता... तिच्या सोबत गप्पा मारण्या साठी आणि वेळ घालवन्या साठी....
आज सगळे मॅनेजर्स एका मीटिंग साठी कॉन्फरेन्स रूम मध्ये गेलेले...आणि बाकीचे तिघे टी ब्रेक साठी cafeteria मध्ये गेले....आणि हे दोघेच tech room मध्ये होते....त्याने संधी साधून बोलायला सुरुवात केली...
" हे...ऐक ना...इथून जवळ काही बघण्या सारखे स्पॉट्स असतील तर सांग ना..."
"जवळ म्हणजे....?? कधी जायचं आहे तुला??"
" अग....खरं तर ऑफिस सुटल्या वर मी हॉटेल वर एकटा खूप बोर होतो....सो...थोडं फिरून येईन म्हणतो....आता कुणाला एवढा वेळ तर नाहीये कि मला पुणे फिरवून आणतील....😔"
"ओह्ह...अरे मग तु सांगायचं ना....रूद्र येईल ना तुझ्या सोबत...आणि तुला पुणे फिरवुन पण आणेल..."
" नको...मी नाही देणार त्रास कुणाला....तु सांग कि..."
"जास्त काही मला सुद्धा नाही माहित....पण सायंकाळी फिरण्यासाठी फिनिक्स मॉल आहे जवळ....तुला फिरता ही येईल आणि शॉपिंग करावीशी वाटली तर ती हि करता येईल...."
" हो का? छानच आहे मग....पण इथून किती दूर आहे तो मॉल??"
" जास्त नाही रे...मी घरी जाते ना...त्याच रूट वर आहे....इथून दहा मिनिट लागेल हार्डली...."
" अरे मग तर फारच छान...तुझ्या रूट वर आहे तर मी तुझ्या सोबतच येऊ शकतो की ऑफिस संपल्या वर...if you dont mind...." तो आतुरतेने तिच्या हो म्हणन्या ची वाट बघत होता....
" 🤔🤔🤔ह्म्म्म्.....ओके...चालेल"
" ओह्ह...थँक्स यार...तुझ्या मूळे निदान आजची इव्हनिंग तरी छान जाईल...."
इकडे तर मनात लड्डू फुटत होते....सोबत थोडा तरी वेळ घालवायला मिळेल म्हणून....
सायंकाळी ती पार्किंग मधून scooty काढून निघणार तोच अर्जुन तिथे हजर होता....
"एकटीच निघालीस??🤔😳😔"
" नाही रे....तुला कॉल करणारच होते आता....बर् झालं आलास लगेच...."
" ओके....may i drive?? "
" sure... 😊👍🏻" म्हणत तिने त्याला गाडी दिली आणि थोडा विचार करत बॅक सीट वर बसली....
त्याने गाडी काढली आणि तिला रस्ता विचारात विचारात....नगर रोड कडे वळवली....तिच्याशी गप्पा मारत् जात त्याला खूप भारी वाटत होत....म्हणून तो खूप हळू ड्राईव्ह करत होता....जेणे करून आणखी थोडा वेळ तिच्या सोबत मिळेल....
15-20 मिनिटात दोघे मॉल समोर होते....नाईलाजाने त्याने गाडी वरून उतरून चावी तिच्या कडे दिली....पण मनात आणखी एक try मारायची इच्छा झाली...
" ऐक ना....तुला उशीर होणार नसेल तर थोडा वेळ थांब ना माझ्या सोबत मॉल मध्ये... प्लीज....तेवढीच मला कंपनी होईल...आणि थोडी शॉपिंग मध्ये मदत ही होईल...."
" अरे पण..."
" प्लीज....प्लीज....प्लीज...🙏🏻🙏🏻🙏🏻😍"
" ह्म्म्म....ओके..."
" ओह्ह थँक्स डिअर....😇😇"
" बरं चाल....पण मी अर्धा तासात निघेल...okay? "
" ok done... 👍🏻👍🏻...I wont force you more than that...I promise..."
दोघे ही मॉल मध्ये शिरले...ती त्याला काही विशेष गोष्टी हातवारे करून दाखवत होती....त्याला खरं तर तिथल्या झगमगातात् काही एक इंटरेस्ट नव्हता...तो फक्त तिलाच observe करत होता....
त्याने सर्वात आधी तिला तिथल्या हॉटेलस् बद्दल विचारल....आणि तसेच दोघेही तिसऱ्या फ्लोअर वर गेले....तिथे चिकन मोमो ज आणि गार्लिक ब्रेड ऑर्डर करून दोघेही गप्पा मारत बसले....ऑर्डर येताच दोघांनी त्यावर मस्त् ताव मारला....आणि शॉपिंग सेकशन कडे वळले....
त्याने बहिणी साठी एक वन पीस घ्यायचा आहे म्हणून तिच्या चॉईस ने खरेदी केली....आणि मम्मी साठी एक साडी घेतली....
आता तिची वेळ संपली होती....
" अर्जुन...मला उशीर होतोय...आता मला निघालं पाहिजे..." म्हणत ती त्याचा निरोप घेऊन जायला लागली....
" हम्म...थँक्स डिअर...तु तुझा वेळातला वेळ काढून मला कंपनी दिलीस....आणि शॉपिंग मधेही हेल्प केलीस...."
" arey....dont thank me....उलट मी तुला थँक्स म्हटल पाहिजे....thanks for your treat arjun😇😇"
" by the way....this was not a treat..this was just a snack...I ll give you guys a special treat....arjun style treat😍😎"
" ओह्ह्ह....बघू....बरं मि निघते आता....see you tomorrow.... Till then you hv a good time...good night..."
" good night Prisha....पोचल्यावर msg कर....go safely..."
(क्रमशः)

