जगता आलं पाहिजे...✍️
जगता आलं पाहिजे...✍️
जीवन म्हणजे काय? ते कसे जगायचे? याचा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस पडतो. आयुष्य जगताना आपल्याला शरीर हे देवाने दिलेले अनमोल वरदान आहे .तर आयुष्याची वाट चालताना शरीररूपी प्रवासाला मन, चेतना, भावना, आत्मीयता असे बरेच वेगळे मानसिक पैलू आहेत. एक सजग आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी कर्म करणे आवश्यक असते. कर्म करताना शारीरिक ऊर्जेचा वापर योग्यरीत्या केला पाहिजे, त्यानुसार आपण वेळेचे नियोजन देखील करणे आवश्यक आहे.
वेळ कशी वापरता येईल...?
वेळ कशी वापरता येईल...? आणि त्याचे नियोजन कसे करावे..? हे बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसते .आपण काय काम करतो... कोणते काम करतो..., आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे...? यावर आपण आपली वेळ कशी वापरतो हे अवलंबून आहे. आपण कोणत्या क्षेत्रात आहोत विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायीक, खेळाडू, कलाकार अशा कितीतरी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. पण वेळेचे नियोजन हे वेगळ्या पद्धतीने व्हायला हवे आहे. "वेळ ही स्थायी स्थिती नाही तर ही एक मनाची अवस्था" आहे म्हणता येईल. ज्याद्वारे आपल्याला सामाजिक आणि कौटुंबिक जीवन जगता येते.
वेळेचे नियोजन...
वेळेचे नियोजन करताना आपल्याला आयुष्य कशा पद्धतीने जगायचे आहे...? ते आपण ठरवले पाहिजे. आनंदी आणि समाधानी आयुष्य प्रत्येकालाच हवे असते. तो आनंद आपल्याला कशातून प्राप्त होईल व कसे वागल्यानंतर सुख मिळेल. याचा विचार सर्वांत आधी झाला पाहिजे.
आयुष्य जगण्यासाठी पुरेसा पैसा, चांगला निवास, चांगले विचार संस्कारित वातावरण हे देखील गरजेचे आहे. त्यासाठी वेळेनुसार आपला दिनक्रम आपण ठरवलं पाहिजे. असे म्हणतात सकाळी लवकर पहाटे उठावे.. आणि रात्री लवकर झोपावे. सकाळच्या शुद्ध हवेमध्ये आपण प्राणायम ,ध्यान धारणा ,व्यायाम असा नित्यक्रम ठेवला की दिवसभर आपले शरीर उत्साहपूर्वक राहते. आणि विचार करून आपल्या कामाचे नियोजन वेळेनुसार ठरवले तर ते वेळेच्या आधीच काम पूर्ण होते. त्यामुळे आपला वेळ वाचतो व मानसिक समाधान ही आपल्या लाभते.
ध्येय निश्चित करणे...
आयुष्य जगताना आपल्याला आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे...? आपले ध्येय काय आहे...? ही आपली इच्छा शक्ती दृढ करून आपण नियोजनबद्द विचार केला पाहिजे. कुठलीच वेळ, कुठला क्षण, कुठला दिवस आपल्या आळसात जाता कामा नये. आळस एकदा शरीरात घुसला आजाराचे रूप धारण करतो आणि मनाला पोखरून काढतो. आणि मानसिक दृष्ट्या आपण दुर्बल होतो. पैसा तर वाया जातोच त्यामुळे आरोग्यही बिघडते.
आपण निरोगी राहण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या सकारात्मक विचाराने तंदुरुस्त रहा...क्षमतवान बना.. मग तुम्ही कुठलेही काम आनंदाने आणि सामर्थ्य पूर्वक करू शकाल.
झोप आणि जेवण हे आपल्या शरीराला स्वास्थ्य मिळवून देतात. तुमच्या झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा यावरून तुमचा उत्साह ठरत असतो .जर तुम्ही चांगले आहार वेळच्यावेळी घेतला तर व्यवस्थित झोप लागेल आणि आपल्या शारीरिक क्रिया सुरळीत होतील भरपूर काम होईल. चांगले सकारात्मक विचारांचा अवलंब केल्यामुळे मन शांत होते मन शांत झाले झोप लागते.
तुमची आवड...
आपल्याला एखादा आवडीचा छंद किंवा खेळ जोपासायला हवा... आपण आपल्या आवडीचा खेळ किंवा छंद जोपासला त्यामुळे सभोवतालचे वातावरणाशी आपण समरस होतो व मन उत्साही होते त्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळते.आपण प्रत्येक जण अर्थार्जनासाठी आपल्या कामाची कारकीर्द सांभाळत असतो ते आपल्या आवडीची जरी काम असले किंवा असले तरी नियोजनपूर्वक केले की ते काम अगदी सोपे होते आणि आयुष्य जगण्याचा आनंद आपण सहजपणे घेता येतो.
मेहनत...
शारीरिक अस्तित्व चालवण्यासाठी कष्ट हे आवश्यकच आहे. पण ते शरीर ऊर्जायुक्त असणे आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळून आयुष्य जगणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण टेंशन नकारात्मक विचार जास्त केल्यामुळे आपण आपला वेळ त्या विचारात खर्च करतो. आपले अस्तित्व नेमकी काय आहे..? हेच विसरून जातो.
या ब्रम्हांडात आयुष्य हे एकदाच मिळते. जन्म ,पुनर्जन्म ह्या सर्व गोष्टी ऐकिवात आहेत ,पण आपण जगत असलेल्या आयुष्य एक वर्तमान आहे. वेळेचं गणित आणि आपल्या आयुष्याचा मृत्यूपर्यंत चाललेला आपला प्रवास हा भीतीदायक आणि त्रासदायक असू नये, म्हणून आपली वेळ व आपले आयुष्य नेहमी सुयोग्य असले पाहिजे.
घड्याळ्याच्या काट्यावर न जगता मनातील आंतरिक प्रेरणेने जगता आले पाहिजे. वेळ ही एक बाह्य गोष्ट आहे आपण भौतिक जीवन उत्तम रित्या जगू शकतो पण वेळ आणि जीवन याचा संबंध म्हणजे मन . मन जर शांत असेल तर वेळ ही आपल्या आयुष्याची गुलाम होते. आपण आपले आयुष्य आपल्याला जसे हवे आहे तसे जगू शकतो.
या पृथ्वीतलावर प्रत्येक जीव जगत आहे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी खूप कष्ट मेहनत करत आहे. आपण आपल्या सकारात्मक विचारांचा विचारांचा पाया मजबूत ठेवला.. कृतज्ञतापूर्वक जीवनाचे आभार मानले... जीवनाचे ध्येय निश्चित केले तर ध्येयप्राप्तीसाठी आयुष्यात येणारे माणसे हीच आपल्या आयुष्यातील खरी कमाई आहे. आयुष्य खूप सुंदर आहे..
आपण आपल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे...
