STORYMIRROR

Swati Jangam

Tragedy Action Inspirational

3  

Swati Jangam

Tragedy Action Inspirational

मायेचा पाझर"... (आई )

मायेचा पाझर"... (आई )

4 mins
20

"मायेचा पाझर"... (आई )


    अनाथांची माय 'सिंधुताई सपकाळ' आज त्यांच्या जाण्याने हजारो मुले पोरकी झाली.अख्खा देश अनाथ झाला. ही अनाथांची माय स्वतःच्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत 'माई'नावाचं बळ घेऊन कित्येकांचे संसार उभे केले.कित्येक बेरोजगारांना रोजगार दिले. दिन -दुबळ्यांना सहाय्य केले. परदेश वारी ही केली .हे फक्त शक्य झाले, तिच्यातील मायेचा ओलाव्यामुळे. 

   माईंच्या प्रोत्साहान पूर्वक प्रेरणेमुळे माझ्या विचारातील माझी आई व माझ्यातली आई जागी झाली.. व माझ्या विचारांना दिशा मिळाली. 

  आईचे प्रेम काय? हे माईचा जाण्याने 'आई' शब्दाचा अर्थ कळला... 

माझी लेखणी "मायेचा 

पाझर"लिहिण्यास वळला...


"जसे जिजाऊंच्या प्रेमाने ,

राजेशिवाजी घडले...

तसे मावळ्यांच्या मदतीने,

मराठी राज्य निर्मिले"...


  किती ताकत असते, बघा आईच्या प्रेमात कित्येक शतके लोटली तरीही आपण नतमस्तक होतो जिजाऊंच्या चरणावरती.

जिजाऊंनी स्वप्न बघितलं आणि शिवरायांनी ते स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले.


कधी मनावर दुःखाचा डोंगर

कोसळला असो ..

 मनाला चिंतेची ग्रहण लागलेलं असो, सुखाचा वर्षाव होत असो किंवा आठवणीतले चमकणारे तारे असोत 

प्रत्येक वेळेस जमिनीवर पाय ठेवण्याचे भान दाखवते ती फक्त आई..

       प्रत्येकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाच्या लढाई आईसारखा मार्गदर्शक कोणीच नाही. आपल्याला लहानपणापासून सवय असते की कळं आली की "आई गं"आपण म्हणतो, कारण की वेदना आईने सोसलेली असते. पण त्या वेदनेवर प्रेमाची फुंकर घालून ती नाहीशी करते ती फक्त आईच!

  'आई' विषयी लिहिण्यासाठी कितीतरी उपमा, अलंकार लावले तरीही ते शब्द अपुरी पडतात. कारण, ती हाक बेंबीच्या देठापासून येते अन् थेट आईच्या हृदयाला जाऊन भिडते. '

माझ्या मते , "गुरुत्वाकर्षण" म्हणजे 'आई'.

  

       एखाद्या मुलीच्या संस्कारांची ओळख 'आई' वरूनच होते. आई आपल्याला आयुष्यात भरपूर काही शिकवत असते. तसचं आपण तिचं अनुकरणही करत असतो. मुलगी सासरी गेली की खरी परीक्षा असते, तिच्या आईची.


 दोन्हीं घरांना सांभाळून ठेवण्याचे काम मुलगीने व्यवस्थित केली पाहिजे.असाच अट्टाहास असतो प्रत्येक आईचा.मी माझ्या संसारात तडजोड करून प्रत्येकाच्या मनाशी जुळवून घ्यावे असे आई नेहमी सांगत असे.तिचे प्रेम व आपुलकी चे शब्द नेहमी कानात घुमत असतात. कारण तिची आठवण प्रत्येक क्षणी हृदयात असते.

 तर 

आई विषयी काही कवितेच्या ओळी सुचल्या..


आभाळासम माया तुझी ,

वात्सल्याचा सागर आई

सगळ्याच भावनांना अर्थ देई |


शब्द तिचे रत्न कांचन मोलाचे 

कधी तप्त लोह रुपी

 कधी चांदणे शितलतेचे|


मम भाषेचे तुल्य ते अमृत 

नाही कोणती प्रशाला भाग्यवंत|


 अवनीवरती उतरून आली

 ग्रहताऱ्यांची एकमते परोकंठी,

 शुद्धमती आईसम कोणी नसे|


  वय वाढत जातं. दिवस सरत जातात. पण सरणाऱ्या दिवसात नवीन माणसं जोडायला शिकवते ती फक्त आई.

  आपला वाढदिवस आला की आपण खूप खूप खुश असतो .आनंदी असतो. आपल्याला सगळ्यांचे प्रेम काळजी, शुभेच्छा ,आशीर्वाद ,सदिच्छा मिळतात ते फक्त आईमुळे. तिने सोसलेल्या वेदनेमुळे. ती वेदना ते उपकार ते कर्ज आपल्यावर नेहमी असतात .त्याचं ऋण कधीच फिटणार नाही,पण मी ते काव्यातून व्यक्त करते.


आई                

 एकाच नाण्याच्या दोन बाजू आई आणि देव, परमेश्वराने दिली सगळ्यांना बिनव्याजी ठेव.


आई असते म्हणून ,आहे घराला घरपण

 तिच्याओंजळीतील माया मुलांसाठी करते ते अर्पण.   

  माता कुराणातलीअसो वा पुराणातली, दिगंबरा ची असो वा पैगंबराची, रामची असो वा शामची, रक्तातली नसो व नाळेची असो, आईच श्रेष्ठ असते कोणतेही नात्यातली.    

    अमृतकुंभ असते आई, तानुल्या साठी रात्रंदिवस गाते अंगाई.  


 बोल तिचे चंदनासम मोलाचे, पण मोल ना त्या वाणीचे . 

   

   रागावली तर कधी तापलेल्या लोहा परी, समजावते कधी शितल चांदण्या परी. 

  

  सागरासारखे वासल्य तुझे, आभाळा सारखी माया मिळते क्षणोक्षणी जगता, शून्य बॅलन्स वापरत उधळलेले अनमोल तुझी ममता.  


     डोळे भरून पाहणारी, तुमची आठवण काढणारी, ऊन ऊन दोन घास वाढणारी तीअन्नपूर्णा माता, नवऱ्यासाठी सुद्धा असते ती क्षणाची पत्नी आयुष्यभराची माता.   

                तीचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षाही भारी, थेट बीजांडातून ब्रह्मांडात पोहोचवणारी अवकाश गंगा माझी आई.   


     डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुक, ही फक्त श्रीमंतीची कागदं नात्यात . आईच कर्ज फेडण्यासाठी इतकं कुठे आहे बॅलन्स त्यात...  


  या कर्जातून मुक्त होण्याचा एकच मार्ग एकच उतराई...... जेव्हा बनाल तुम्ही एका ..... पिल्लाचीआई"


जेव्हा एक बाई (पिलाची आई )होते, तेव्हा कळतात तिला भावना ..आपण (आई) असल्याची जाणीव आयुष्यातील एकमेव सुंदर असेल कलाटणी असते.


संसार करताना पुरुष वर्गावर डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते. डोळे मिटल्यासारखे करते ती मैत्रीण असते. डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी असते. पंछी डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त (आई) असते.

प्रियसी, मैत्रीण ,पत्नी ,मुलगी ,बहीण, नात ही सगळी रूपं शेवटी एका बाईची पण प्रत्येक बाईत आई लपलेली असते.


एखाद्या मुलाला किंवा मुलीला आपली आत्या ,मावशी,काकी आपुलकी ,माया दिसली प्रेमाची हाक मारली की त्या मुलाला आपली आईच वाटते. इतकं सुंदर व निखळ नातं आई आणि बाळाचं.


स्त्रीला देवाने दिलेली एक सुंदर देणगीच नातं म्हणजे (आई)...

आई होताना ... माझ्या भावना मी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करते...



     होताना आई....

गर्भातला आकार साकारताना..

जिवाचा आकांत होताना..

नव्या पुनर्जन्माची कळ

अंतर मनी सोसताना..

नव्याने जन्म पावणाऱ्या वेदना देताना..

वेदनेतून सुख मिळते तेव्हा

 देवाचे आभार मानताना.. 

 नको म्हणून झिडकारत नाही ,

कोणतीही बाई,

मरण यातना भोगून.. 

जिवंतपण मिळतं होताना आई...


सोसत नसली तरी सोसली

किती तरी ती व्याकूळी...

जीवन मरणाचे झुंज देऊन ,

फुटते तिला अनावर किंकाळी...

अंतरीच्या वेदनाला

 सहनशीलतेचा श्वास..

एका जीवा श्वास देऊन,

 सोडते सुटकेचा निश्वास..

म्हणूनच वेदना झिडकारत नाही 

कोणतीही बाई..

पुनर्जन्म मिळतो होताना आई..


विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत

हाडामासाचा रुप साकरणारी..

एक जिवंत साजिवंत..

असा दिव्य पार करते फक्त बाई

इतकं सोपं नाही होणं आई..

नको वेदना म्हणुन झिडकारत नाही कोणतीही बाई 

मरण यातना भोगून,

 पुनर्जन्म मिळतो होताना आई..


अंगावर फुटणारा पान्हा,

छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा..

नात्याचा आहे ना अद्वैत नमुना!

पान्हवणारी, मायनं पोसणारी..

पाझरणारी वाचल्याची तिची काया..

नाही भेद, नाही अंतर,

कुशीत प्रेमाचा ओलावा देते निरंतर..

नको वेदना म्हणून झिडकारत नाही कोणतीही बाई,

मरण यातना भोगून,

 पुनर्जन्म मिळतो होताना आई...


किती ही कसली तरी,

माती सोडत नाही मातीपण..

मुलं कितीही चुकलं तरी,

आई जपते आपलेपण..

निसर्गानं दिलं तिला 

क्षमाशीलतेचे वरदान ,

मुलं कितीही मोठं झालं तरी 

आई पुढं असतं लहान..

मातीसारखा कस लावून

 देह झिजवते बाई,

मायेचा अर्थ कळतो..

 शेवटी होताना आई...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy