हरवलेली ती......!!!
हरवलेली ती......!!!


रोजच्या सारखाच त्या दिवशी पण Whatsapp इचकत बसलो होतो. (लेखाला सुरुवात कशी करतात ते माहीतच नाही न हो😁) एक इमेज कुण्या तरी unknown नंबर वरून आली. एकदम झटकाच बसला, पाहतो तर काय - ती😯. तीच ती जिच्या मागे मी आठ वर्षे घासली.....
आता तुम्ही म्हणाल मग यात झटका बसण्यासारखं काय??😒
जस मी तिला स्वप्नात माझ्या सोबत पाहिलं ना, तशीच होती ती, त्या फोटोमध्ये इतर कुना सोबत तरी...... आता मित्रासोबत आणि त्याच्यासोबत कशे फोटो असतात तितकी समज आहे मला.... थोडं। थोडं नाही खूप वाईट वाटलं ते पाहून.....पण त्या पेक्षा वाईट वाटलं जेंव्हा मी त्याला पाहिलं , तिच्यासोबत..... कारण चांगलं ओळखून होतो मी त्याला . या अशा सारख्याच्या प्रेमात तिनं पडणं , मला फार वेगळं वाटलं........तसा दिसायला माझ्या पेक्षा तर 100× चांगला आहे तो . आणि पैशाच्या बाबतीत तर - " कहा राजा भोज और कहा गंगू तेली " पुन्हा स्वतःलाच वाटलं - ती बरोबर आहे बे त्या बिचारीला काय माहीत या भडव्याचे कारनामे.... याला तर मोठेपणा वाटतो मुलींसोबत अशे फोटो काढून मित्रांना दाखवण्यात.......त्याला बहीण नाही ना!!!
नाही तर असती थोडी तरी अक्कल दुसऱ्याच्या बहिणी सोबत कस वागायचं याची.
वाटलं - सांगावं तिला सगळं त्याच्या बद्दल......पण पुन्हा म्हटलं - ऐकल का ती तुझ ???? काय म्हणून तूझ म्हणणं खर आहे हे गृहीत धरेल ती?? खरंच.... इतर कुणी सांगितले तर तिला खरं वाटेल पण मी सांगितल्या नंतर😊 आता या मागचं कारण😅
Whataupp.!!! आता वाटलं पाठवावेत ते सगळे फोटो तिलाच whatsapp वर......कदाचित पाहून ती असं स्वतःच्या पायावर दगड तरी मारून घेणार नाही...... पण ओळखतो हो मी तिला चांगल्या प्रकारे, ते फोटो पहिल्या नंतर ती तर.................
मग सुचलं...फोन करून सांगावं तिला की " तुझ्या फोटोबाबत माझ्या कानावर उलट सुलट गोष्टी येत आहेत plzzz... ते बंद कर , एकदाची झाली चूक आता पुन्हा याच्या पुढं जाऊ नको......" तिचा नंबर होता माझ्या जवळ.....तसा प्रत्येकच one sided lover कडे असतो असा कधीच dial न झालेला नंबर...
लावला तिला फोन......" हॅलो"
" कोण ?"
"मी"
"मी कोण??"
हिम्मतच होत नव्हती हो....पुढे बोलायची. मग काय ठेवला तसाच.....
पुन्हा केला तिने तिकून, पण माझे हात थरथरत होते.....
इतका पण भित्रा नव्हतो हो मी . पण तिच्या समोर काय माहीत???
दहावी पर्यंत वर्गप्रमुख मीच होतो....कोणत्याही नवीन मुलीशी सर्वात प्रथम ओळख व्हायची ती माझीच . कारण वर्गातले सगळेच मुलींसोबत बोलण्यास भीत होते😀
आता तुम्ही शहरातले असलात तर तुम्हाला हे फार वेगळं वाटेल पण आमच्या गावाकड हे दहावी पर्यंत असंच असत😊
शेवटी थोडा धीर धरून उचललाच मी फोन.
"कोण ??"
" आत्ता तुम्हीच केला होता न फोन या नंबर वरून..."
" Sorry चुकून लागला होता...wrong number"
"अस का"
"हो sorry again"
" तू योगेश आहेस ना??"
" नाही"
" काय काम होतं सांग??"
" अरे सांगितलं ना की चुकून लागला"
" माहीत आहे . तू आता बोलतो की मी ठेवून देऊ फोन"
"तू कस ओळखलं मी आहे म्हणून??"
" आवाज ओळखीचा वाटला"
" बाप्पा ...!!!"
" बापा काय बाप्पा??"
" काही नाही ठेवतो"
"अरे मग ठेवायचाच होता तर लावला कशाला???"
"मी नाही ......पुन्हा तू लावला"
"मग आधी कशाला लावला होता??"
"चुकून लागला"
"Ok....Good Night by"
"By .....Good night"
च्या मायला जे सांगायचं होत ते तर बाजूलाच राहिलं की हो..🙆
म्हटलं ......" जाऊ दे आता असं नाही तरी परवाच्या दिवशी तर गावाकडे जायचंच आहे. तेंव्हा सांगू "
दहावी पासूनच वेगळे झालो होतो आम्ही, म्हणजे शाळेमधून .
ती जवळच्याच शहरात आहे second year ला ....up down करते गावातून....
मी ....दूर आहे तिच्यापासून. जास्त नाही पण, त्याच शहरात नाही.
गावाकडे गेलो, तिचीच वाट पाहत होतो ऑटो स्टँड वर.......
कॉलेज वरून तिच्या मैत्रिणी सोबत येत होती ती माझ्याकडेच (ऑटो स्टँड कडे)..... खूप दिवसा नंतर पाहत होतो तिला...कारण शपथ घेतली होती मी १२ वितच की
" आता काही पण झालं तरी इच थोबाड डायरेक्ट ______ नंतरच पहायचं" पण आज ती तुटली......
कालच फोन आलता एका मित्राचा सांगत होता की, आता तर ती पठाका दिसते....त्यानं अस म्हटल्या नंतर त्या बिचार्याला नको ते बोललो मी......
आज समजलं तो असा का बोलला ...
कारण खूप बदल झाले होते तिच्यात.... डोळ्यावर चष्मा, lip stick , जीन्स,.....आता काय सांगू आणखी....
हातानं तिच्या त्या सौंदर्याचे 12 वाजवले तिने...
खरच हो काय सुंदर दिसायची ती पंजाबी मधेच...तिचे ते ओठ,
.
जाऊद्या मला करता येत नाही सौंदर्यवर्णन.
एवढं मात्र खरं ...ज्या ____च्या प्रेमात मी पडलो होतो ती ही नव्हतीच....
ती ऑटो जवळ आली.
माझ्या कडे पाहताच म्हणाली, " अरे किती बदलला तू"
"मी की तू??" मी हसत बोललो.
आमच्या त्या स्टँड वर दुपारच्या वेळेला जास्त गर्दी नसते तिथे आम्ही तिघेच होतो..बाकीचे आमच्या पासून दूर होते.
चेहऱ्या वर आश्चर्य व्यक्त करत ती म्हणाली , " मी ऐकलं की तू B. A. ला admission घेतलं.
"ते जाऊदे भो__" मी थोडं रागात म्हटलं.
मला काही तरी महत्वाचं सांगायचं तुला.( आता ही हिंमत कुठून आली काय माहित!!!)
"काय???"
" तुझ्या फोटोबाबत माझ्या कानावर उलट सुलट गोष्टी येत आहेत plzzz... ते बंद कर , एकदाची झाली चूक आता पुन्हा याच्या पुढं जाऊ नको......"
हे ऐकताच, तिच्या डोळ्यात पाणि आलं...
खरच.....!!! कधी न रडणारा मी .............
मी तिच्या डोळ्यापासून दूर गेलो तिथल्या एक ओट्यावर बसलो.
ती पुन्हा माझ्या जवळ आली..तीच रडणं थांबत नव्हतं. मला म्हणाली,
" ते आणखी काही करणार तर नाही न"
"त्याची सोय लागते बरोबर . तू आता पुन्हा........" मी तिला धीर देत बोललो.
आता पॅसेंजर ची संख्या वाढत होती....ती ऑटोत जाऊन बसली.....
गावाकडे जातांना मी ऑटोतल्या आरशात तिच्याच चेहऱ्याकडे पाहत होतो....ती हुंदके देत देत रडत होती आणि तिची मैत्रीण तिला सावरत होती....... बाकीचे लोकं तिच्याकडेच पाहत होते.
................ माझ्या या लेखातून तुम्हाला इतकंच सांगणं आहे
प्रेम करा (कराच अस नाही) पण त्याच प्रदर्शन नको......