हॅप्पिली एव्हर आफ्टर
हॅप्पिली एव्हर आफ्टर


मेघनला वाटलं तिला घट्ट मिठी मारावी आणि विचारावं की अगं कुठून येतं बळ, हे असे शब्द उच्चारण्याचं? पण मेघनमध्ये हे म्हणण्याची सुद्धा ताकद नव्हती. एका अनोळखी व्यक्ती पुढे मनातलं सगळं मोकळेपणाने बोलण्यात काहीतरी liberating असणार, हे कळूनही, आपल्याला ते जमणार नाही हे मेघनला माहिती होतं. कॅफेटेरियात पोचेपर्यंत त्या दोघी पुढे काहीच बोलल्या नाहीत. रांगेत उभं राहताना सिंथीयाने मेघनला विचारलं, “ What will you have?”
“ Nothing.” मेघन एकदम वळून कॅफेटेरिया मध्ये त्या दोघींसाठी टेबल शोधायला लागली. सिंथियाकडे पाठ करूनच ती बसली.