मराठी 💀

Fantasy

2  

मराठी 💀

Fantasy

हा जन्म नव्याने जगुया

हा जन्म नव्याने जगुया

8 mins
1.1K


ही कथा आहे 1600 व्या शतकातील. जेंव्हा एक असंघटित संशोधक (पंढरीनाथ) आपल्या विज्ञानाचे प्रात्यक्षिक करत होता. त्याला त्याच्या कामाचे ऐवढे वेड होते कि तो कशाचिही पर्वा करत नव्हता. तो आपल्या दैनिक व्यव्हारात येणार्या अडचणीवर मात करण्यासाठी नवनवी साधनं बनवु लागला ज्याचा फायदा ईतरांना पण होऊ लागला.त्याची सर्व संशोधनं लोकोयोगी होती. त्यामुळे सर्व वसाहत त्याच्या संशोधनाचा वापर करून भरपुर प्रगती करू लागले. त्याच्या प्रेमळ आणि लोकहितवादी तंञज्ञानाचा सर्वदूर पसार पण होऊ लागला. तशी त्याच्या जीवनात बरीच आव्हाने येवु लागली. त्याने बर्यापैकी योगदान आपल्या समुदायाला दिले आणि पुढेही देत राहणार यात धुसूरमाञ शंका नव्हती. पण वाढत्या समस्या आणि त्याच्या संशोनात होणार्या तांञिक तफावतीमुळे तो जास्तीत जास्त आव्हाने स्वीकारू इच्छीत नव्हता.


त्याची यंञं आता चोरी पण होऊ लागली.नंतर नंतर लोक दबाव टाकुन त्याला ती बनवण्यासाठी चेतावणी पण देवु लागली.त्या हट्टी,घमंडी पाखंडी,भुकंडी लोकांनी त्याच्या कौशल्याचे लचके तोडायला चालु केले. तो त्या उन्मत पाखडाचा ऐनास बळी ठरत होता.


ज्यांनी ज्यांनी त्याची चोरी झालेली साधने वापरली त्यांनी त्याचा पुर्ण वापर करून घेतला.पण तेथील ईतर मुळ रहिवाशांनाही याची खबर लागली आणि त्यांना आशा साधनांची आणखी गरज भासु लागली.त्यांनी त्याचे सत्य शोधून पुन्हा त्या संशोधनाचा ठाव घेतला अर्थातच त्यांनी संशोधकाचे घर गाठले. होणी ला कोण टाळू शकतं.


सर्व पाखंडखोर चोरी करण्याच्या उद्दाशाने वसाहतीत शिरले पण मोजके तोडके आणि अपूर्ण अवस्थेतील पुनःनिर्मीतीच्या मार्गावर असलेली साधने पाहून त्यानी आपली पावले संशोधकाकडेच वळवली.


संशोधक आपल्या घरात आपल्या वसाहतीतील माणसांबरोबर गप्पा करीत थकलेल्या अवस्थेत उभा होता. तेवढ्यात त्याला जोरदार गुचांडा मारला गेला तो कोलमडून भुईसपाट झाला. ईतर लोकांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण त्या नियोजित पाखंडापुढे तनचे काही चालले नाही. त्यानी व्हैशी रूप धारण केले.आपल्या हातात येईल त्या वस्तूने लोकांना बदडायला चालु केले त्यांनी संशोधकाला बरोबर ओळखला होता.कारण तो स्वभावाने सूज्ञ होता,ज्याच्या चेहर्यावरचं तेज ईहलोकात नसेल असे होते.अशा प्रामाणिक पणे काम करणार्या शास्ञीय वृत्तीलाच त्या पाखंड्याने आज त्या वृत्ती वरच घणाघाती हल्ला चढवला.पंढरीनाथ आज आपल्या डोळ्यानी आपल्या केलेल्या चांगुलपणावर होणारे अन्यायकारक अत्याचार पाहात होता.त्याने आपल्या जीवनात कधी असे अघटित घडेल असं विचारात सुद्धा आणलं नसेल.आज त्या पाखड्यांनी चालवलेले त्यांचे कटकारस्थान पंढरीनाथाचा आत्मसन्मान त्याने सर्व जीवन ज्या सदकार्यासाठी वाहून घेतले त्यावर पाणी फिरवत होते.


पंढरीनाथ जमीवरून उठला पण आज त्याचे दैव हारला होता,त्याला त्याच्या डोळ्यादेखतच त्या पाखड्यांनी आपल्या अंध लोभाचा घास बनवला.पंढरीनाथाचे सहकारी बेदम मात खात होते.ते टाखंडी आपले पाखंड झाडतच होते झाडतच होते आणि आपल्या मनगटाचा जोर वाढवतच होते.पंढरीनाथ त्यांचा प्रतिकार करण्यास असमर्थ झाला.प्रयत्न केले प्रयत्न केले पण प्रयत्नांनानीही शेवटी घात केले.


त्याचे मन त्याचे अंतकरणात जळफळाट झाला.अशी अवस्था झाली कि तो कृतीशुन्य झाला,हतबल झाला,पाखंडा पुढे त्याचा स्वाभिमान षंड झाला षंड.त्याच्या मनावर तसेच त्याच्या सहकार्यांच्या मनावर गंडातर आले.हा एक दुर्योग त्या पाखंड्यांसाठी सुयोग ठरला.ज्यांनी आपले जीवन पंढरीनाथासाठी आणि त्याच्या भेटवस्तू यांच्याशी अबाधित ठेवले ते बाधित झाले व्यथित झाले जखमी तर झालाच झाले पण चित्त खोर झाले.सर्व वसाहतीला त्या पाखंड्यांनी हतबल करून करून शेवटी पंढरीनाथावर ताबा मिळवला.त्याला जबरण कैद केले गेले.


सर्व लोक त्या घटनास्थळी व्युवळत डोळ्यादेखत माणुकीला चिरडताना पाहात होते.काही आरडा ओरडा करत होते काही रडत होते काही पंढरीनाथाच्या सुटकेसाठी धडपडत होते.काळ गाठता कशी होईल सुटका अशी बेढब भावनेने त्यांना बलहीन केले.वसाहतीचे पाविञ्य मलिन केले.वसाहतीत एकच आक्रोश झाला.पाखंडी पंढरीनाथाला घेवून जाताना पाठमोरे झाले.लोक चिंतातूर झाले.सर्व सौख्य भंगुर झाले.निरव शांततेत लोक विलीन झाले.बरेच दिवस पंढरीनाथाचा ताबा घेवून स्वगृही निघालेलं पाखंड आपल्या पाखंडप्रातांत येवून स्थिर झाले.


त्यांनी आपल्या आपल्या ओळखी पाळखीच्या लोकांसोबत मिळुन जल्लोष सुरू केला.मस्त हुल्लडबाजी आणि नाचगाणे करू लागले.


दारूच्या बाटल्यावर आणि एखाद्या राक्षसासारखे खाद्यावळीवर ताव मारू लागले.जोरात जोरात विचिञ गाणी लागली. त्यांना आपण एखादी खाण लुटण्याचा आनंद व्हावा असा आनंद झाला असावा.


सगळे त्या विद्वानाकडे दुर्लक्ष करून आपली जय्यत करत होते.तो विद्वान पंढरी आपल्या सोबत होत असलेले पाखंड बंदिस्तावस्थेत निपचित पडून पाहात होता. त्याला कळत होतं तो आता काही स्वतंत्र राहिला नव्हता,त्याच्यावर हुकूम चढवणारे आज त्याला कोणत्या पातळीवर घेवून आले आहेत याचं एक संबंध प्रसंग आज तो उघड्या डोळ्यांनी पाहात होता.तो कैदेत होता,पाहात होता ज्या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी विद्वानाच्या स्वराज्यावर प्रहार केला,ते आज आणि उद्या नित्य आपल्या विद्वतेची यथेच्छ पायमल्ली करतील.आपल्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्याच स्वार्थासाठी वापर करून घेतील. जी विद्वता तो आजपर्यंत आपल्या माणसांसाठी वापरत होता ती आता या पाखंड्यांच्या धार्जीनी जाईल. या आणि अशा अनेक विचारांनी तो गांगरून गेला.त्याच्या डोळ्यासमोर त्याने तयार केलीली साधने तिथे पडलेली दिसत लागली. याच पाखंड्यांनी पसार केली होती आणि आज तर त्याचेच अपहरण करून कशाचीच लाज लज्जा ठेवली नव्हती.आता त्याचे हेतु जीवनातील भावनांचे धातु सगळे माती माती झाले.पंढरीनाथ हताश निराश आणि वैतागी वैरागी भावनेने ग्रासला गेला. त्याने स्वतःची समजूत करण्याचे प्रयत्न केले पण आज काळाने आपले हदय पाषाणी बनवले, त्यापुढे तो विद्वविभुषीत कमी पण नाममाञ जीव झाला.तो आपल्याला कुटुंबाच्या आठवणीत रममाण होऊन तिथेच भुईवर निद्रिस्त झाला.


             काही काळाने त्याला जाग आली ती त्या पाखंड्यांनी त्याला उठवल्यावरच. बरेच दिवस कैदेत राहुन तो आपली कार्यउर्जा गमावून बसला होता.त्या पाखंड्यांनी त्याच्या कडून बरीच माहिती काढून घेण्याचे षडयंञ चालु केले पण त्याने आपली ईच्छा शक्ती सोडली नव्हती त्यांचे प्रत्येक षडयंत्र तो मोडीत काढत पण शेवटी त्या निर्लज्यांन पुढे त्याने आपले मन मोठे केले आणि त्यांना तो आपली कौशल्ये शिकवू लागला.त्याचे असणे दिलेले बळ घेवून ते मूर्ख पाखंडी फार फार आनंद मानू लागले म्हणजेच स्वानंद मानु लागले.पंढरीनाथ माञ शुन्य अविरभावात असायचा.त्यांना आनंदात कामं करताना पाहून पंढरीनाथ मनातून त्याच्या वागणुकीला भिकारडेपणाचा दर्जा देवून आपले मन ईतरत रमवत. आता तर त्याने हद्द पार केली तो त्यांना सर्वोच्च उपभोगाचे अवसर देवु लागला.


काही महिने गेले त्या पाखंडप्रांतात उत्साहाचं वातावरण होतं.पण पंढरीनाथ माञ तेथुन पळ काढण्यासाठी प्रयत्न करू ईचछित होता.


तो ना घरचा राहीला होता ना बाहेरचा त्याची अशी अवस्था झाली होती कि जशी उपयोगाची वस्तु भोगावी तसे लोक त्याचा भोग घेत होते. पंढरीनाथाने त्यांना एवढा नादाला लावला कि आता ते विसरत चालले कि तो एक विद्यावुभिषीत माणुस होता. त्या पाखंड्यांना वाटत होते कि आपण याचं अपहरण केले आणि आता तो आपला गुलाम झाला आहे.तो आता आपण सांगेल तीच कामे करेल.पण तो त्यांचा निव्वळ भ्रम होता.पंढरीनाथ त्यांनाही आपले योगदान देवु लागला पण पाखंड्यांन सोबत राहुन तो पण पाखंडी झाला.आपल्या निर्भेळ व्यक्तिमत्वाचा त्याग त्याने तेंव्हाच केला जेंव्हा त्याच्या वसाहतीत त्याच्या डोळ्यादेखत अन्याय झाला.याचं कारण होते ते त्याचच अद्वैत व्यक्तिमत्व.तो तिथे खरोखरच एखाद्या गुलामासारखच त्या पाखंड्यांच्या मागण्या पूर्ण करू लागला.दारात जागाला आणि काय नाही ते सर्व केलं त्या पाखड्यांसाठी.पण जेंवढा मान सन्मान आत्मसन्मान त्याच्या जीवनात पुर्वी होता तो आता राहीला नव्हता.


त्याला बर्याचदा त्या पाखंडप्रांतातून पाळुन जाण्याचे कसले निघुन जाण्याचेही मार्ग भेटले पण त्याने सर्व बाजूंनी विचार केला. जर तो परत गेला तर हे पाखंडी पुन्हा त्यांचा शोध ईथे येतील. जर तो तेथे न जाता ईतर मनुष्य वस्तीत गेला तरी तेथेही त्याला याच प्रसंगांना तोंड द्यावे लागणार. ऐवढ्या विचारसरणीशीच त्याने आपले जीवन निगडीत ठेवले आणि त्याने आता आपली संशोधन कार्यशाळा बनवून घेतली.पण त्याचे मन तेथून खचले होते ईच्छाहीन झालेल्या पंढरीनाथाकडून पाखंडे पाखंड करून घेवु लागली.त्यांची मनमर्जी करू लागले.शस्ञास्ञ पण बनवु लागले. शेजारी राष्ट्राबरोबर होणार्या युद्धात जखमी झालेल्या बिछान्यावर शस्त्रक्रिया पण करून घेवु लागले. रसायनांचे वेगवेगळे प्रयोग करून आपले वर्चस्व सिद्ध करू लागले. जे स्वतःला मानव समजून ईतरांवर म्हणजे  आपापसात कुरघोडी करून श्रेष्ठत्व सिद्ध करू लागले.त्यातूनच आत्मीय आणि सात्विक सुख प्राप्त करू लागले. त्याला अणु रेणुचे सखोल ज्ञान होते तो प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट पद्धतीने भौतिक गुणधर्मामधुन बदलून एक वेगळीच ओळख देवु शकत होता. त्याने आपल्या कार्यशाळेत असे काही उपक्रम राबवले कि तो स्वतःही त्याच्यावर विश्वास ठेवु शकत नव्हता.


आता तर तो त्या पाखंडप्रांतात राञभर बाहेर पटांगणात बसून चंद्र तार्यांचा सखोल अभ्यास करू लागला. त्याची ओढ दिवसागणीक वाढतच गेली. ती कमी होण्याचे नाव घेत नव्हती. त्याची मती त्याला पडणार्या प्रत्येक प्रश्नाची उकल करून देवु लागली.जर भुतलावर मनुष्य राहु शकतो तर त्या तारकांवरतीही मनुष्य आपले अस्तित्व निर्माण करू शकतो अशी भोळी पण भाभडी अशा घेवून त्याने आपले संशोधन चालु केले.


            त्याने अहोराञ प्रयत्न करून त्या पाखंडप्रांतात जवळ लागून असलेल्या डोंगराच्या कुशीत आपल्या कार्यशाळेतून जावून तिथे संशोधन स्थानापन्न केले.तो कोणालाही भनक न होऊ देता तिथे जावून आपले यंञ बनवत आणि नंतर परत येवून दुसरी कामं करत. त्याने ईतर बनवलेली यंञे पण अशी बनवली होती कि त्याच्या डींगरातील कुशीत चाललेल्या संशोधनाच्या कामी पडतील.त्याने त्याचे यंञ बर्याचदा तपासून पाहिले त्यासाठी त्याला परग्रहावर जावून नंतर परत यावे लागले. तिथे गेलेवर त्याला ज्या ज्या कमतरता भासत त्या त्या तो खाली भुलोकावर येवून पुर्णत्वास आणुन नंतर प्रयोग करून पुन्हा आणखी जोर वाढवून आपले संशोधन पुर्ण करत.


आता काही महिने सरले त्याचे संशोधन पुर्ण होण्याच्या मार्गावर आले.


तो आपल्या डोंगरातील संशोधनाचा वापर करून या ईहलोकातून जाण्याचा कट रक्त आला.त्याने मोठ मोठे वर्षानुवर्षे पुरेल ऐवढा पाणी साठा,धनधान्य साठा त्याठिकाणी काही महिन्यांपासून जमा करून ठेवला होता.ते त्याने शेवटच्या टप्प्यात तपासून पाहिले.बर्याच कालावधीपर्यत शाबूत राहावे असे सुब्बध साठे त्याने तयार केले.


काही दिवस त्याला विचार करावा लागला कि तो जे काही करतोय त्यातून त्याला खरोखरच यश येईल कि पुन्हा आणखी एखाद्या समस्येला तोंड द्यावे लागेल ती समस्या म्हणजे त्याचे अस्तित्व जे या भुलोकावर त्याने निर्माण केले.जर तो ईहलोक सोडून गेला सर्व पाखंडी आणि त्याचे लोक त्याला कसं काय स्वीकार करतील म्हणून आपल्यासारखी एक प्रतिभासात्मक प्रतिकृती तयार केली.जी समोरच्या व्यक्तीला स्पर्श करू शकत होती.बोलुन शकत होती ऐवढच काय आदेशाचे पालन सुद्धा करू शकत होती.पण हे सर्व करण्यासाठी पंढरीनाथाला आपले ध्यान त्या ठिकाणी द्यावे लागत होते जिथे त्याला देणे गरजेचे आहे.त्याने आपल्या डोंगर कुशीत असलेल्या प्रयोगशाळेत काम करताना याच प्रतिभासात्मक प्रतिकृतीचा वापर करून आपले संशोधन पुर्ण केले.


         झाली आज पंढरीनाथाच्या प्रस्थानाची वेळ झाली.त्याने आपले परग्रहावर जाणार्या यानाने आज शेवटचे प्रस्थान करण्याचे ठरवले. ठाम निर्णय झाला.आपली प्रतिभासात्मक प्रतिकृतीचा वापर करून त्याने सर्व पाखंड्यांना खेळुन ठेवले अश्या प्रकारेच जश्या प्रकारे त्याने गेली अनेक वर्षे त्या पाखंड्यांना तह दिला.पण आज माञ तांडव होणार होते तांडव.पंढरीनाथाने आपली कार्यशाळा गाडून जवळ जवळ बराच कालावधी आणि बरीच दिवसे झाली होती.त्याने तिथे केलीली सर्व तयारी तपासून घेतली.त्याने काळ आपली प्रतिभासात्मक प्रतिकृती आपल्या मुळ वसाहतीत पाठवली आणि आपल्या कुटुंबीयांना आपल्या सोबत येण्यासाठी आमंञीत केले.तेही आता मार्गस्थ झाले.काही क्षणात पंढरीनाथाने यान सुरू झाले मोठा आवाज झाला सर्व डोंगर त्या आवाजाने पिंजून निघाला आणि लागले पंढरीनाथाचे नवजीवन सुरूवातीला.


पाखंड्यांचे डोळे विस्फारले गेले.काय झाले कसे झाले कोणाला भनक नव्हती.त्यांना पंढरीनाथावरच संशय होता पण तो पण त्यांच्यासोबत जमावातच होता त्यामुळे त्याच्यावर संशय येण्याचा प्रश्नच नव्हता.त्यांनी पंढरीनाथाच्या प्रतिभासात्मक प्रतिकृतीशी चौकशी करणे चालु केली.


पण हाती काहीच लागले नाही.इकडे खरा पंढरीनाथ क्षणार्धात आपल्या कुटूंबापर्यंत पोहचला आणि आपल्या कुटूबिंया सोबत परग्रही स्थित झाला.तिथेच तो आपली दिनचर्या घडवु लागला आणि तेथूनच भुतलावर स्थित असलेल्या आपल्या संबंधितांशी आपल्या प्रतिभासात्मक प्रतिकृतीच्या माध्यमातून संपर्कात राहिला.त्याने परगृहावरही आपले अस्तित्व निर्माण केले.जीवनही ग्रहात सुद्धा जीवन भरले.त्याने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबालाही तारले.त्याची सर्व काया त्याने आपल्या विद्वतेवर अर्पण केली.पंढरीनाथ जन्मोजन्मी अजरामर झाला परलोकी आणि भुलोकी पण...


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy