Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Namdev Powar

Drama


3  

Namdev Powar

Drama


गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड

3 mins 53 3 mins 53

स्वप्निल आज सकाळी ५.०० वाजताचे अलार्म झाल्यावर पटकन उठला. झोपेतच मोबाईलवरील अलार्मचे बटण बंद करून सकाळच्या मॉर्निंग वॉकच्या तयारीला लागला. अन् नेहमीप्रमाणे Walking साठी बाहेर जाण्यासाठी तयारी करत होता. जाता-जाता whats app status मोबाईलवर चाळत होता. स्वप्निलचा जीवलग मित्र प्रितमने Happy anniversary & Miss You अशा आशयाचा स्टेटस अपडेट केला होता. सकाळीच मी विचारचक्रात गुंतून गेलो. नेमकं काय झाले असेल ब्वा! ही दोघेही एकत्र आहेत की नाहीत किंवा कसे? मनात उलटेसुलटे विचारांचे काहूर माजत होते. मग exercise करून घरी परत येत असताना एकदा विचारायला हवं. म्हणून स्वप्निलने पहाटेच प्रितमला call केला.


फोन Receive केल्यानंतर प्रितमला त्याने प्रथमतः Wish केलं. त्याच्या बाळाविषयी विचारणा केली. तो nervous झाल्यासारखे बोलत होता. तो काहीतरी लपवत असल्याचं जाणवत होतं. त्याच्या मनात चाललेली घालमेल त्याच्या बोलीभाषेवर समजत होतं. शेवटी मित्रत्वाच्या नात्याने व हक्काने खडसावून विचारवं लागलं. त्याला बोलतं करावं लागलं.


"बाबा रे, वहिनीसाहेब कुठं आहेत, ते आधी सांग."


" माहेरी गेलीय सोहमला सोबत घेवून." प्रितमने दबक्या स्वरात सांगितलं.

"किती दिवस झाले? मला का तू बोलला नाही. एकदा तरी बोलयचं होतं ना?"


"हो तुला मी बोलायला हव होतं. पण...." प्रितमला काही सुचत नव्हते.


"पण काय बोल रे मित्रा... " स्वप्निल बोलतं करू पाहत होता.


"8 महिने झाले. मी फोन केला तर कुणीही उचलत नाहीत. सासू-सासरे, शितलसुद्धा....! मला खूप आठवण येतेय यार... सोहमची...! त्याच्याशी पण बोलू देत नाहीत. आमच्या किरकोळ वादविवादात त्या चिमुरड्याचा काय दोष? दैवाने खेळ मांडलाय यार..." भावनावश होऊन प्रितम सांगत होता.


"प्लीज प्रितम, तू स्वतःला आवर. तू किती मनाने खचलाय. तुला मी पहिल्यापासून खंबीर असताना पाहिलंय. प्लीज यार, थांबव हे. मला हे सर्व phone वर ऐकावं असं वाटत नाही. मी तुझ्याकडे यावे असे मला वाटत आहे. तुला या दोस्तीची शपथ आहे. मी तुझ्याकडेच आज येतोय. आपण सविस्तर बोलूयात या विषयावर.."


प्रितम थोडंस शांत झाल्यावर... "नको-नको. कशाला? तू office ला जा. आपण पुन्हा भेटूयात."


"मी तुझ्याजवळ असणं खूप महत्त्वाचे आहे. कॉलेजपासून ओळखतो यार. मी येतोय. बाकी काही बोलू नको. ओके. चल Bye."


"ठिक आहे. ओके bye. मला येताना call कर."


"हो नक्की." म्हणून स्वप्निलने फोन बंद केला व घरी पोहोचला.


थोड्या वेळानं boss ला सांगून १ दिवसाची किरकोळ रजा टाकली. सकाळची आवराआवर पाहून अर्चनासुद्धा अवाक् झाली. तिने स्वप्निलला विचारलं.


"अहो, काय गडबड... आज office ला चाललाय की बाहेर? काही कळेल का? डब्याचे नियोजन करायला बरं...!"


"अगं, आज डबा वगैरे काही नको, Casual Leave आहे आजची. प्रितमकडे चाललोय, सांगलीला. खूप महत्त्वाचे काम आहे. सध्या मी त्याच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे."


"का? काही Problem झालाय का?" अर्चनाने प्रश्न केला.


"नाही. तसं काही नाही. मी परत आल्यावर तुझ्याशी बोलतो. चल निघतो. संध्याकाळी वेळ झाला तर सकाळीच येतो." असे सांगून तिच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळण्याचा प्रयत्न करून भरलेली bag हातात धरून स्वप्निल निघाला.

"अहो. पोहचल्यावर फोन करा."


" हो नक्की!


स्वप्निल दरवाज्यातून बाहेर पडला. गाडीला स्टार्टर मारण्या अगोदर एक उच्छ्वास घेवून डोळे झाकले. अन् मनोमन ईश्वराशी एकरूप होवून प्रार्थना केली. "हे, ईश्वरा.. माझ्या गाडीचा चालक तुच आहेस. त्यामुळे मी निश्चिंत आहे. पण माझ्या मित्राच्या संसाराची गाडीसुध्दा व्यवस्थित रूळावर आणून त्याच्यासोबत मलाही खुश ठेव. खुशी निर्माण कर. कारण त्याच्या आनंदात माझं आनंद लपला आहे..." एवढीच इच्छा व्यक्त करून त्याने गाडी Start केली.

         

पुणे-बेंगलोर Nationa Highway ला सुसाट वेगाने गाडी चालवत होता. गाडी चालवताना विचारांचे थैमान काही गप्प बसवत नव्हते म्हणून स्वप्निलला प्रितमच्या लग्नातील प्रसंग आठवायला लागले. चार वर्षापूर्वी आम्ही सर्व मित्र प्रितमच्या लग्नाला गेलो होतो. मी पुण्याहून जळगावला लग्नाला हजर होतो. लग्न समारंभासाठी प्रितमच्या सासरवाडी कडील लोकांनी जय्यत तयारी केली होती. सनई-तुतारी, ऑर्केस्ट्रा, गायक-गायिका, भव्यदिव्य मंडप सजावटीने पूर्ण वातावरण आनंदमय होतं. लग्नात मित्रांनी केलेली मौजमजा अन् प्रितमला हार घालताना सर्वच मित्रांनी उंचावर उचलून पार मंडपाच्या टोकाला भिडले होते. खूपच धमाल मजा केली होती. प्रितमने घेतलेला लग्नात घेतलेला तो उखाणा अजूनही आठवतो.....!


        देश के सरहद्द पर लढता है

        उसे "वीर" कहते है |

        चावल मे दूध मिलाए तो

        उसे "खीर" कहते है |

        शितल जैसी पत्नी मिली है

        उसे तो हम "तकदीर" कहते है |


प्रितमच्या त्या शायरीप्रिय उखाण्याने मंडपातील सर्वच पै-पाहुणे व मित्र-आप्तेष्टांची मनं जिंकली होती.


[ क्रमशः]Rate this content
Log in

More marathi story from Namdev Powar

Similar marathi story from Drama