Hello Dude

Drama Others

3.5  

Hello Dude

Drama Others

👫🏻 गोष्ट लग्नानंतरची - The story is after marriageilovebeed.com

👫🏻 गोष्ट लग्नानंतरची - The story is after marriageilovebeed.com

1 min
4.0K


ती, "कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का, गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईलवर ७०-८० मिस कॉल असतील. तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही. समजतोस तू कोण स्वतःला?”


तो, "अगं हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमलं फोन उचलायला, काही प्रॉब्लेम होता."


ती, "मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रॉब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोटं बोलतोस माझ्याशी. बसला असशील मित्रांबरोबर टवाळगिरी करत. आता लग्न झालंय तुझं लहान नाहीस अजून."


तो, "सोड ना राग आता ये ना मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो... छुमंतर..."


ती, "मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचं मिठीत..."


राम आणि सवी.. एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला, प्रेम खूप होतं दोघांचं एकमेकांवर पण सतत अशीच भांडणं चालू असायची, जास्त गंभीर नसायची. कॉलेजपासून राम सवीवर खूप प्रेम करत होता, तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं, शिक्षण संपल्यावर रामला एक चांगली नोकरी मिळाली, स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सवीला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याला होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama