गंध
गंध


तिला खुप आवडायचा माळायला गजरा, वेणी, दरवळणार प्रत्येकच फुल....
सुगंध घेवून तिही दरवळायची.
एक एक फुल चार चार दिवस दिवस माळायची...
ती.... आणि फुलं.... तिच्या फुलांच्या वेडापाई तिची आई तिला माझी फुलांची माळीन अस म्हणायची लाडाने....
आज तिच्यासाठी फुल घेताना तिच्या आठवणींचा दरवळ स्वस्थ बसुन देत न्हवता....
घर गाठल धावतच... धडधड वाढली होती हृदयाची,
हातात होती फुले माझ्या... तिही दारा समोर.... पण नव्हताच भाव कोणताच चेहर्यावर... गच्च मिटलेले डोळे तिचे... बहुदा राग असेल माझ्यावर
...
मीही माळला गजरा तिच्या केसात आणि चुंबले कपाळाला... घट्टच मिठीत घेतल... अश्रृही ओघळले माझे तिच्या गालांवर... पण....
तिला त्याच काहीच नव्हते... प्रतिसादच नव्हता....
आई तुझ्याचसाठी आणलाय ग... तुला आवडतोना ग खुप.... आई बोलना ग... उठ ना ग... फक्त एकदाच डोळे उघडून बघना ग.... अस रागावलीस का तुझ्या पिलावर....असा दरवळ ठेवून मागे का सोडून जातेस अर्ध्यावर......