ती...
ती...


ती...
जन्माला आली ती मोठी मुलगी म्हणून आणि पाठीमागे बारा भावंडं, अठराविश्व दारिद्र असलेल्या कुटुंबाचा भार वाहता वाहता बालपण कष्टातच संपून गेलेल... स्वतः अशिक्षित राहून भावंडांना शिकवल.
आठवतय मला एकदा कणकेश्वर च्या रस्त्यावरून जाताना पाणावले होते तिचे डोळे आणि म्हणाली होती या रस्त्यावर खडी वाहिलि आहे मी...विटभट्टीवर मुठभर चणे खाऊन दिवसभर राबलेय मी.... कधी शेतात तर कधी कुणाच्या घरात मजुरीही केलेय...
तेव्हा नकळत तिचा त्याग माझ्या हृदयाला जाऊन भिडला होता... आणि मग आठवले तेही कि ज्या भावंडांसाठी तिने हे केलं होतं त्यांना जमिनीचे पैसे आल्यानंतर त्यांची जिवंत असलेली बहिण मेलेली आहे असं कागदोपत्री लिहून दिल होता.... तेव्हाही ती मुकीच होती नाही म्हणाली काहीही.....
आणि आठवते मला तेही कि ती म्हणाली होती की तू फक्त आहेस ते माझ्या मुळेच आहेस...
माफ कर मला... मीपणाच्या अहंकारत मिही दुखावलय तुझ मन, हो असणारच कित्तेकदा....हो मान्य आहे मला आज जे आहे ते तुझ्यामुळेच.... कारण परिस्थिती नाही म्हणून हार न मानता नेटाने जगायच बळ तुच दिलंस... तुझ्यातला सुप्त कलाकार तू मला दिलास, नाहीतर एकही दिवस महाविद्यालयाची पायरी न चढता; परिक्षेत यश मिळवत ही कला माझ्यात रुजलीच नसती... तुझ्यात खुपकाही होत आई जे नकळत देऊन टाकलस मला.... अगदी रिती झालीस तू....तुला वाव मिळाला नाही...
तुझा त्याग तुझ जिवाला जिव लावण... तुझ्या कुशीची उब.... तुझ अचानक जाणही खुपकाही शिकवून गेल गं.... तुझी जिद्द, तुझी मेहनत.... अपमान गिळूनही चेहर्यावर नेहमी हसूच ठेवण....
तू नेहमीच माझ्यात जिवंत राहशील आई...