भेट
भेट


त्या कातरवेळेची त्यांची भेट...
खरतर त्यांचं हे भेटण पहिल अाणि... शेवटचही.... ती संध्याकाळ म्हणजे एक मेकांच्या पुढील आयुष्यातील आठवांच्या गाठोड्यात साठवून सुगंधित करणारी आणि विरहाचे बोचरे काटे भरणारी एक भेटच तर होती....
भेटले होते दोन जिव परत कधीही न भेटण्यासाठी.
तिच्या केसातल्या कुस्करलेल्या मोगर्याचा गंध श्वासां श्वासांत साठवून... पाषाण हृदयाने त्याने विलग केलंच तिला त्याने आपल्या बाहूपाशातुन.
निघाला तो मागे न बघता झपाझप....
ऐकु येत होती त्याला तिच्या हृदयाची आर्त हाक, तिच्या मिलनाची भेट कायम सोबत ठेऊन....
तिला मात्र अश्रूंची दाहक भेट देऊन, तिच्या नकळत तो निघाला होता आपल्या शेवटच्या प्रवासाला......