SANJAY SALVI

Inspirational

3.5  

SANJAY SALVI

Inspirational

घुसमट

घुसमट

14 mins
2.4K


रावसाहेब कोरे-पाटील, खरोखरच नावाप्रमाणे रावसाहेब होते. रुबाबात आणि नोकरी पेश्यातही. चांगली उंची, घवाळवर्ण, मोठेडोळे, मिश्यांची टोकदार ठेवण, भुवया देखील जाडसर आणि भरीव असेहे रावसाहेब सरकारी सेवेत देखील अधिकारपदावर होते. निवृत्त होताना एस.डी. ओ. म्हणून रुबाबात निवृत्ती घेतली. अतिशय शिस्तबद्ध, नीटनेटके, कामसू, सर्वांशीचांगले वागणारे असी त्यांची ओळख होती. सरकारी सेवेत असताना त्यांनी कुणाचीही जाणूनबुजून अडवणूक केली नाही कि पैस्यांसाठी नाडलेनाही. हा आता समोरून चालत आलेल्या लक्ष्मीला त्यांनी नाही म्हटले नाही पण तेदेखील धनदांडगाण्यांकडून आलेल्या. त्यापैशातून त्यांनी थोडी शेती – वाडी घेतली होती पण तीदेखील मुलाच्या वैध्यकीय शिक्षणासाठी विकून टाकली, ठेवून तरी बघणार कोणहोत. बरेचसे ईतर मार्गाने आलेले पैसे त्यांनी एकतर समाज कार्यात वापरले होते किंवा ऑफिस मध्ये नढ असलेल्यांना दिले होते, परतघेणार नाही याबोली वर. तर असे हे रावसाहेब. निवृत्ती घेतल्या नंतर ते पत्नी बरोबर फिरावयास गेले होते. मनालीतील रोहतांग पास येथे गेल्यावर त्यांच्या पत्नीस स्वसनाचा त्रास झाला, म्हणून ते सहल अर्धवट सोडून मुंबईला आले, पण हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यापूर्वी त्यांचा मृतु झाला. रावसाहेबांनी निवृत्ती नंतर साठी काही स्वप्न पहिली होती ती सर्व विरून गेली. तसे रावसाहेब अगदीच एकाकी नव्हते. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा, सून आणि नातूही होता. त्यांच्या बरोबर म्हणालो कारण हे घररावसाहेबांचे होते. सरकारी सेवत असताना त्यांनी हे मुंबईच्या अगदी महत्वाच्या ठिकाणी म्हणजे वरळी सारख्या एरिया मध्ये राखीव कोट्यातून हे घर मिळवले होते. आणि आता हे सर्वजन तिथेच रहात होते.

रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा दिग्विजय त्यांच्या सारखाच दिसायला देखणा, रुबाबदार. रावसाहेबांनी मोठ्या इर्षेने त्याला डॉक्टर केले .

दिग्विजयला सारेजन जयच म्हणत. जयने एम. डी. करून आपल्या काही मित्रांच्या मदतीने मोक्याची जागा मिळवून बांद्रा सारख्या उच्चभ्रू वस्तीत चांगल्या ठिकाणी आपली प्राक्टिस सुरु केली. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे व योग्य हाताळणी मुळे तो अल्पावधीत उत्तम डॉक्टर म्हणून नावारूपाला आला. तसे त्याच्याकडे हाय प्रोफाईल लोक चेकअप साठी येवू लागले त्यामध्ये सिनेमाचे नायक, नायीका, व्यापारी, मोठे सरकारी अधिकारी यांचा जास्त भरणा होवू लागला.

यामध्येच एका वक्तीच येण त्याच्या कडे वाढू लागलं ती म्हणजे मराठी टी.व्ही. इंडस्ट्री गाजवून नुकतीच हिंदी सिनेमा मध्ये जम बसवू पाहणारी नायिका योगीनी दिघे.

योगीनीला वर चे वर बरे वाटूनासे झाले त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे भाग होते. आता आता तर डॉक्टर तिच्याकडे व्हीझीटला जावू लागले. आणि मग डॉक्टर आणि सीनेतारका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले.

रावसाहेबांना हि गोष्ट लांबून लांबून समजली होतीच पण त्यांना आपली होणारी सून हि सिनेतारका आहे याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. काही दिवसांनी रावसाहेबांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी हा विषय काढलाच.

"बेटा जय, आता तू चांगला नावाजलेला डॉक्टर झालास, तुझ सर्व सुरळीत चालू आहे, आता तेवढ लग्नाच बघ म्हणजे मी नातवाच तोंड बघून तुझ्या आईच्या सेवेला जायला मोकळा होईन." रावसाहेब.

"Dad, तुमचा मुलगा डॉक्टर आहे, तुम्हाला असा सहजा सहजी थोडाच जावू देणार आहे? अभी आपको बहोत कूच देखना हए. Now about my marriage, sorry dad but I have already selected my life partner, infact I was suppose to talk to you in these days, but कामाच्या गडबडीत राहून गेलं" जय

"Its okey my son, पण आमची होणारी सुनबाई आहे तरी कोण ? काय नाव काय तीच आणि ती करते तरी काय ?" रावसाहेब

"Dad, तीच नाव आहे योगिनी दिघे, ती मराठी सिनिमातली नायिका आहे आणि सध्या तिचे काही हिन्दीसिनेमासाठी देखील काम चालू होणार आहे "जय

रावसाहेबांना सिनेमा नायिका कळल्यावर थोडस खुपल्या सारख झाल, पण तस न दाखवता तेएवढंच म्हणाले " बघ बाबा जे काही करशील ते नीट आणि भविष्यातल्या गोष्टीचा विचार करून कर". एवढ बोलून ते जेवण आटोपून उठले. पण आत मधून ते थोडेसे अस्वस्थ झाले होते. आज त्यांना आपल्या पत्नीची प्रकर्षाने आठवण येत होती. अंथरुणावर पडल्यावर बराच वेळ ते कूस बदलत पडले होते. जयचं सिनेमा नटीबरोबर जुळलेल सुत काही त्यांना पटत न्हवत. बऱ्याच वेळाने केव्हातरी त्यांचा डोळा लागला.

यथा अवकाश योगिनीच्या सवडी नुसार दोघांच लग्न झालं आणि त्यानंतर जयच्या हट्टामुळे पुढील वर्षातच त्यांना एक मुलगाही झाला. खर म्हणजे मुल होवू द्यायला योगीनी चा ठाम विरोध होता. मुलाच नाव योगिनीच्या इच्ये नुसार विरेंद्र ठेवण्यात आलं.

जयची प्रक्टिस खूप चागली चालली होती. वीरेंद्र मोठा होत होता. योगिनी आता लग्न होवून एका मुलाची आई झाली होती त्यामुळे सिनिमाक्षेत्रात असलेल्या अलिखित नियमानुसार तिला आता काम असे नव्हतेच. पण योगिनीने प्रयत्न पूर्वक आपली फिगर जपली होती आणि आता ते अधिक सुडौल आणि सुंदर दिसू लागली होती.

वीरेंद्र आपल्या आजोबांबरोबर मस्ती करण्यात आणि लाड पुरवून घेण्यात गुंग होता आता तो पाच वर्षाचा होत आला होता. योगीनीला पुन्हा इंडस्ट्रीत परतण्याचे वेध लागले होते. त्यानुसार ती वेग-वेगळ्या निर्मात्यांना, डिरेक्टरना, निर्मिती संस्थाना भेट दिवू लागली. आता तिच्या लक्षात येवू लागले कि आई झालेल्या स्त्रीला मुख्य भूमिका मिळणे खूप कठीण आहे, आणि जर मुल तिच्या बरोबर वाढत असेल तर खूपच कठीण.

आणि मग तिने एके दिवशी जय जवळ विषय काडला.

"हेबघजय, आता मी पुन्हा कामाला सुरुवात करावी अस प्रकर्षाने जाणवायला लागल आहे" - योगिनी.

"योगी डार्लिंग, ठीक आहेना मग, आता विरू अजून दोन तीन वर्षांनी मोठा होवू दे, मग तू कर पुन्हा सुरवात" – जय सहज पणे बोलून गेला.

"नाही तस नाही जय, एकतर आता मला खरंच इंडस्ट्रीत काम करावस वाटायला लागलंय, दुसर म्हणजे अजून दोन तीन वर्षांनी मला तिकडे कोणी विचारणार नाही" - योगिनी.

" OKEY MY GREAT ACTRESS DARLING, AS YOU WISH, नाही तरी आता विरू DAD बरोबर मस्त रमतोच आहे "- जय.

" ते ठीक आहे, आपण त्याला पाचगणीला होस्टेल मध्ये ठेवूया, म्हणजे त्याच्या शिक्षणाची देखील चांगली सोय होईल आणि

ड्य़ाडना सुद्धा यावयात त्रास नोणार नाही" - योगिनी

हि घोष्ट जयाला पटली नाही तो चटकन म्हणाला " THIS WILL NOT DO, अग इथे मुंबईत येवड्या चांगल्या SCHOOL'S आहेत, आणि आपण त्याच्यासाठी चागला HOME SERVANT ठेवूया, म्हणजे काही प्रश्नच राहणार नाही". - जय

हे काही योगीनीला पटले नाही, काही दिवस त्यांच्या मध्ये बेबनाव राहिला. शेवटी योगिनीच्या हट्टापुढे जयचे काहीच चालले नाही, आणि हे सर्व रावसाहेबांना सांगायची जबाबदारी देखील जयवरच होती. याच गोष्टीला जय घाबरत होता पण त्याला दुसरा पर्याय नव्हता.

एके दिवशी लवकर घरी येवून ड्याडीचा चांगला मूड बघून जयने विषय काढला. " ड्याड, तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे, काय आहे, आपला विरू आता शाळेत जायच्या वयात आला आहे, तेव्हा मी आणि योगिनी त्याला पाचगणीला चांगल्या बोर्डिंग कम शाळेत घालायचे ठरवले आहे, त्यानुसार पुढच्या आठवड्यात त्याला SCHOOL आणि जागा दाखवायला आम्ही घेवून जाणार आहोत" - जय.

हे ऐकून रावसाहेब एकदम शांत झाले त्यांना काय बोलावे तेच कळेना.

" ड्य़ाड, ऐकतायना !" - जय

" अहो, हो, ऐकल, ऐकल, आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मी काय बोलणार"? हे बोलत असतानाच आयुष्यात खूप कठीण प्रसंगांना तोंड दिलेल्या रावसाहेबांना अश्रू लपवणे कठीण झाले.

"DAD, PLEASE TRY TO UNDERSTAND THE THINGS, हे सर्व वीरूच्या उच्च शिक्षणासाठी आपण करतोय" - जय

"SORRY BETA, आपण नाही तुम्ही करताय, इथे मुंबईत त्याला उच्च शिक्षण नाही मिळणार ? तू सुद्धा मुंबईत शिकूनच चांगला नामवंत डॉक्टर झालास ना ? तुम्ही का हे अस करताय मला खरच कळत नाही.…. अरे थोडा माझातरी विचार करायचा होता. त्याच्या सानिध्यात माझ सर्व एकटपण मी विसरून जात होतो. आणि मी आयुष्य नव्याने जगायला शिकत होतो" –रावसाहेब

त्या दिवसा पासून खऱ्या अर्थाने रावसाहेबांची घुसमट सुरु झाली. रावसाहेब आता आपला दिवसभरात ला जास्तीत जास्त वेळ विरूबरोबर घालवू लागले पण रात्री त्यांना खूपच एकाकी आणि उदास वाटू लागले. मागील सहा वर्षात त्यांना वीरूचा खूपच लळा लागला होता आणि त्याच्या शिवाय जगण्याची कल्पना देखील त्यांना करवत न्हवती. पुढील पंधरा दिवसातच विरूला घेवून जय आणि योगिनी एके दिवशी सकाळीच निघाले. ज्या अर्थी जय उड्या मारत होता त्याअर्थी पहिले तर खऱ्या गोष्टीची कल्पना विरूला करून देण्यात आली नव्हती. जयने रावसाहेबांना देखील सोबत चलण्याची विनंती केली. पण त्यांना ते शक्यच नव्हते. कारण विरू इथून निघून जात असतानाच त्यांला निरोप देणे त्यांना पेलण्या पलीकडे होते. आणि झालेली तसेच. विरू रावसाहेबांना गुडबाय करण्यासाठी आला" आजो तू नाही येत माझ्या बरोबर फिरायला ?" - विरू.

"नाही माझ्या सोन्या, तुझ्या आजोला थोड बर नाही" – रावसाहेब कसबस स्वतःला सावरत बोलले.

"ठीकआहेमग, मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी भरपूर चोकॅलेत घेवून येतों, तोपर्यंत तू बराहो मग आपण आल्यावर खूप खूप खेळूया, ओके, टाटा आजो." - विरू

रावसाहेबांना आता मात्र अश्रू आवरणे अशक्य झाले. ते एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले.

" आजो काय झाल ? तुला जास्त दुखतंय का ?- विरू.

येवड्यात विरूला शोधत जय तिथे आला. जयला पाहताच रावसाहेबांनी स्वतःला सावरले. अखेरचा प्रयत्न म्हणून ते म्हणाले" जय खरंच असं करण्याची गरज आहेका रे, अजूनही विचार करता येईल"

" ड्य़ाड अस काय करताय लहान मुलासारखं, अहो त्याच्या भविष्या साठीतर आम्ही हे सर्वकरतोय, आणि तुम्हीच अस केलत तर विरू देखील तयार होणार नाही, PLEASE AT LEAST FOR VIRU, U CONTROL YOURSELF FOR FEW MOVEMENT". - जय

"DAD, अजोला बर नाही ना म्हणून तेरडतायत. - विरू

" VIRU, NOW STOP THIS MELODRAMA & COME FAST, WE ARE LATE " - योगिनी

" जा बाळा जा " अस म्हणत रावसाहेबांनी विरूला जवळ घेवून त्याचे खूप पापे घेतले.

विरू आणि जय निघून गेले, गाडी बाहेर गेल्याचा आवाज झाला आणि रावसाहेब एखादा वृक्ष वून्मळून पडावा तसे खाली बसले आणि लहान मुला सारखे रडू लागले. यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीची खूपच आठवण येत होती. राहून राहून विरू बरोबर घालवलेल्या कित्तेक क्षणांची चित्रमाला त्यांच्या डोळ्या समोरून सरकत होती. एक एक आठवण येवून त्यांना आणखीनच भरून येत होते. दिवस भर ते याच मनस्तीतीत होते. त्यांनी ऊठून एकदोन वेळा पाणी घेतलं तेवढेच, अन्यथा त्यांनी दुपारचे जेवण देखील घेतलं नाही. रावासाहेबंसाठी दिवस सरकत नव्हता.रात्री खूप उशिरा जय आणि योगिनी घरी आले. आल्या बरोबर रावसाहेबांनी जयला विचारले" अरे रडला कारे विरू खूप, तुम्ही निघताना काय म्हणाला ?" रावसाहेबांचे डोळे भरून आले होते.

"ड्य़ाड, तसा रडला थोडा, त्याला आमच्या पेक्ष्या तुम्ही हवे होतात, पण होईल सर्व ठीक थोड्या दिवसात" – येवड बोलताना जय देखील खूप गहिवरला होता.

" मी उद्या जातो त्याला भेटायला " रावसाहेब रडवेल्या आवाजात म्हणाले.

"NO DAD IT'S NOT POSSIBLE, त्या बोर्डिंग चे नियम खूप काटेकोर आहेत" - जय

" नाहीरे, I WILL CONVIENCE THEM, माझ ऐकतील ते, एकदा भेटून येतो मी त्याला - रावसाहेब.

"ड्य़ाड, पुढच्या महिन्यात त्याला भेटण्याचा दिवस ठरलेला आहे, तेव्हा आपण सर्व जावूया - जय

रावसाहेब बराच वेळ शून्यात पहात राहिले आणि नंतर हरलेल्या योध्या प्रमाणे खांधे खाली पाडून आपल्या रूम मध्ये गेले. दिवस रात्र नित्य नियमा प्रमाणे येत जात होते. मधल्या काळात रावसाहेब दोन वेळा विरूला भेटून आले. परत निघता ना वीरूचा विदीर्ण झालेला चेहरा बघून त्यांची आतडी पिळवटून आली होति. मोठ्या हिमतीने आणि जड अंत:करणाने त्यांनी तेथून काडता पाय घेतला होता.

हल्ली त्याचं तिघांचं अस घरात भेटण, बोलण कमीच होत असे. विशेष करून योगिनी तर क़्कचितच दिसे.ती कधी सकाळीच बाहेरनिघे ,कधीदुपारी, पण परतून येण हे मध्यरात्री केव्हातरी असे. सुरुवातीला जयने थोड दुर्लक्ष केल पण आत्ताशी हे रोजच व्हायला लागल त्यामुळे जय आणि योगीनि मध्ये थोडी कुरबुर व्हायला लागली होती. हि कुरबुर मध्ये मध्ये रावसाहेबांच्या कानावर देखील जात होती पण त्यांनी दुर्लक्ष केल.

एके दिवसी जय नेहमी प्रमाणे रात्री चे दहा – साडे दहा वाजता घरी आला, योगिनी घरी नव्हतीच. रावसाहेब जेवून आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत पडले होते. जयने त्यांना आल्या बरोबर हाय केल आणि फ्रेश होवून त्याने जेवून घेतलं. आणि तो देखील लिविंग रूममध्ये पुस्तक वाचत योगिनीची वाट पाहत बसला. वाचता वाचता त्याचा डोळा लागला. मध्येच केव्हा तरी त्याला जाग आली तेव्हा नुकतीच योगिनी ल्याच उघडून आत येत होती. जयने घड्याळ पहिले दीड वाजून गेला होता, स्वतःच्या रागावर थोड नियंत्रण ठेवून तो योगिनीसी," योगी काय हे, हि काय येण्याची वेळ झाली ? वाजले बघ किती, रात्रीचा दीड वाजून गेलाय."

" So What ? आमच्या इंडस्ट्री मध्ये वेळच बंधन नसत" हे बोलत असताना दोघ एकमेका जवळ आले, त्याच वेळी जयला योगिनीच्या बाजूने दर्प जाणवला. जय योगिनी जवळ गेला.

" हे काय तू ड्रिंक घेतलस ? जयने चिडून विचारले. योगिनी काहीच बोलली नाही. त्यामुळे जय जास्तच चिडला. त्याने हात पकडून योगीनीला थाबवले." योगी मी काय पाहतोयहे, तू आज ड्रिंक घेवून आलीस, का अस काय घडलं कि तुला दारू प्यावीशी वाटली" जय.

योगिनी तशीच पुढे जावू लागली त्यामुळे जयला राग आवरणे थोड कठीण झाल. त्याने थोडा आवाज चढवून विचारलं "योगी काय हा उर्मटपणा चाललाय मी तुला काही तरी विचारतोय ना ? जयच्या आवाजाने रावसाहेबांच लक्ष विचलित झालं आणि बाहेर काय चालल असेल याचा कानोसा घेवूला गले.

" ओरडू नकोस जय, विश्कीचा चा एक घोट घेतला तर एव्हड मोठ काय पाप केल मी, अरे एका नवीन पिक्चरची lounching party होती, त्यात party एटीकेट्स म्हणून घेतला एक पेग, आणि आता मी खूप दमलेय, या विषयावर आपण नंतर बोलू please. मी काही आता खाणार नाहीय तू जेवून घेतलं असशीलच, good night" अस म्हणून ती सरळ त्यांच्या बेडरूममध्ये गेली.

रावसाहेबाना बाहेरील बोलण सर्व ऐकू आल पण त्यांच्याने बाहेर जायची हिम्मत झाली नाही, आपल्या मुलाची होत असलेली कुचंबणा त्यांना कळत होती आणि त्यांची घुसमट वाढत होती.

योगिनीच हल्ली रात्री लेट आणि अनियमित वेळेत घरी येण वाढत चालल होत. जय थकून आल्यावर जेवून झोपी जात होता.रावसाहेबांची दिनचर्या नेहमी प्रमाणे चालू होती, फिरायला जाणे, मित्राबरोबर गप्पा मारणे, वाचनालयातजाणेई. ई. पण घरीआल्यावर त्यांना अगदी नकोसे होई, सर्व घर खायला उठे.

हल्ली जयला थोडा थोडा स्वंशय यायला लागला होता कि योगिनी बहुतेक करून रोजच दारू पिवून रात्री उशिरा घरी येते म्हणून तो आज मुद्धामच लिविंग रूम मध्ये वाचत बसला होता. योगिनी अंदाजे रात्रीचे साडेबाराच्या नंतर घरी आली. तिच्याकडे पाहिल्यावर असे अज्जिबात वाटत नव्हते ती दारू वगैरे प्यायली असेल.

"अरे तू अजून झोपला नाहीस जय ? तिने विचारले." नाही अग आपण दोघ अस बरेच दिवस एकमेकांशी मोकळेपणाने बोललो नाही आणि पुढच्या आठवड्यात विरूला सुद्धा भेटायला जायचं आहेना, तेव्हा म्हटलं काय ते ठरवूया" जय.

"अरे मी विरूला भेटायला जायचं विसरूनच गेले" sorry हा, आपण दोघं जावूया पुढच्या आठवड्यात".अस म्हणून ती फ्रेश व्हायला गेली. ती फ्रेश होवून येई पर्यंत जयने दोघ्यांच्या प्लेटस जेवणाच्या टेबलावर लावून ठेवल्या होत्या.

"हे काय तू जेवलानाहीस अजून, जय हे काय रे तुला किती वेळा सांगितलं माझी वाट पाहत जावू नकोस म्हणून. मी बाहेरच थोडस खाल्ल आहे. तूघे जेवून" अस म्हणून ती आत जायला वळली.

"योगिनी जेवनाच ठीक आहे पण तुला माझ्या जवळ बसायला देखील थोडा वेळ नाही, आणि त्यावर कडी म्हणजे तू आपल्या मुलाला भेटायला जायचा दिवस देखील विसरलीस".जय

"ओहो जय sorry म्हटलंना !, का तू या गोष्टीचा देखील ईशु करणार आहेस" योगिनी

"या गोष्टीचा देखील म्हणजे" जय

"मला माहिती आहे तू हल्ली माझ्या लेट येण्यावरून नाराज आहेस" योगिनी

"पण त्या गोष्टीचा मी काही ईशु वगैरे केलेला नाही, बर आता तू विषय काढला आहेस तर सांग तुला हल्ली येवढा उशीर का होतो, तुझ्या कडे तर सध्या काहीच काम नाहीय" जय

जयने असे म्हटल्याबरोबर योगीनीचा राग उफाळून आला." म्हणजे तुला सुद्धा हेच म्हणायचे आहेना कि मला काहीच काम नाहीय आणि मिळणार देखील नाही म्हणून" योगिनी.

"हेबघ योगी मी तुला काम मिळणार नाही असं म्हणालो नाही तू उगाच वाकड्यात शिरू नकोस" जय

"तुला काय म्हणायचं आहे हे मला चांगलंच कळतंय" योगिनी.

"मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे कि सध्या तुझ्याकडे काम नसताना उगाच उशीर का होतोय" जय

"काम नसल्यामुळेच उशीर होतोय. I have to meet various people. त्यांच्या वेळेप्रमाणे मला त्यांना भेटावं लागत. पार्टीज् अटेन्ड कराव्या लागतात म्हणून उशीर होतो." योगी

"अग पण हे आता रोजचं झालंय" जय.

"काम मिळे पर्यंत हे चालणारच ना जय" योगी.

"आणि पार्ट्यामधून दारू पिण, हेसुद्धा चालणारच ना" जय थोडस चिडून बोलला, आवाजाची पट्टी देखील थोडीवाढली होती.

"जय आवाज चढवू नकोस, मी तुझ्याशी शांतपणे बोलतेयना, मग तू का आवाज चढवतोस ?योगी.

" हे बघ योगी मला या गोष्टी अज्जिबात चालणार नाहीत" जय

"I dont want to continue this discussion, I am going to my bed " योगी. अस बोलून ती सरळबेडरूम मध्ये निघून गेली. जय अवाक होवून तिच्या मागे पाहत राहिला.

आपल्या बेडरूम मध्ये रावसाहेब हा सर्व संवाद निमुटपणे ऐकत होते, नंतर त्यांनी झोपेचा खूप प्रयत्न केला.

दोघा मधील विसंवाद दिवसेंदिवस वाढतच होता आणि तिघांची घुसमट होत होती. या अश्या एकंदर वातावरणात रावसाहेबांना विरूची खूप आठवण येत असे.

आणि मग दोघांमधील बेबनाव इतका टोकाला गेला कि दोघंही एकमेकांशी बोलेनासे झाले. सुरुवातीला रावसाहेबांना वाटल कि नवराबायकोच भांडण आहे संपेल दोन - चारदिवसात. पण योगिनीच अपरात्री उशिरा येण चालू च राहील त्यात मध्येमध्ये दारू पिवून येण देखील व्हायला लागल. मग कडाक्याची भांडण चालू झाली. या घरात अजून एक तिसरी व्यक्ती राहते हे ती दोघ विसरूनच गेलि.

आताशी विरूला भेटायला देखील ती दोघ एक-एकटे जायला लागले. राव साहेब देखील एक दोन वेळा विरूला भेटायला जावून आले, पण त्यांच्या लक्ष्यात आले की विरूला त्याच्या ममी - पप्पा शिवाय कोणाला भेटू देवू नये म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत . तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा जावून यायचे ठरवले आणि ते झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी रावसाहेब सकाळी लवकरच उठले आणि त्यांनी सरळ पाचगणी गाठली, वाटेत असताना त्यांनी जय ला फोन करून सांगितले कि त्यांना यायला उशीर होणार आहे वगेरे. दुपारच्या दरम्यान ते वीरूच्या होस्टेल वर पोचले, त्यांनी सेकुरीटीला वीरूचे पूर्ण नाव सांगून भेटण्याची इच्या वक्त केली. सेकूरीटी ने आपले रजिस्टर तपासून दिलगिरी वक्त केली. अगदी खोदून विचारल्यावर त्याने मागचेच उत्तर दिले कि विरूला त्याच्या आई वडीलांसिवाय कोणाला भेटू देवू नये, अस्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी खूप विनवण्या केल्या पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी ठरवून आल्याप्रमाणे हुकुमाचा एक्का म्हणून त्यांचे जुने S D O चे कार्ड काडले आणि त्यांना सांगितले के तुमच्या मोठ्या साहेबांना द. ते कार्ड बघून सेकुरीटि वाला हे चपापला आणि सरळ पणे तो आपल्या मोठ्या साहेबाला नव्हे साहेबिनीला घेवून आला. लेडी ऑफिसर त्यांना स्वतः तिच्या केबिन मध्ये घेवून गेली, त्यांची चांगली विचारपूस करून त्यांना चहा पाणी दिले आणि एवडे सर्व झाल्यावर तिने शांतपणे एक पत्र काढून त्यांचा हाती दिले. त्यामध्ये स्पस्ट पणे लिहीते होते कि जयला त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणालाही भेटू देवू नये, त्यांनी पत्र खालील सही पाहीली ती योगिनी ची होती. त्यांनी अतिशय केविलव्यान्या नजरेने समोरील ऑफिसर कडे पहिले. तुम्हीच सांगा साहेब अस रिटन इनस्क्रसन असताना आम्ही कसी काय रिस्क घेणार ते देखील high profile लोकांच्या बाबतीत ? रावसाहेबांनी काहीही न बोलता ते पत्र परत केल. ते अतिशय व्याकूळ मनाने आभार मानून बाहेर पडले. त्यांनी होस्टेल च्या इमारतीकडे पुन्हा पुन्हा पहिले जणू काही विरू त्या इमारतीच्या उंच आणि भक्कम कम्पोउड च्या भिंतीआडून त्यांना आरपार दिसणार होता.

रावसाहेबांना यायला बराच उशीर झाला आणि जवळ जवळ रात्री बाराचे दरम्यान ते घराजवळ आले. खर म्हणजे त्यांना घरी जायची ओढच राहिली नव्हती, कसे तरी पाय ओढत ते दाराजवळ आले, जवळ जाताच त्यांना आतून जय आणि योगिनी जोरजोरात भांडत होते.

"This is too much Yogi, आता आता तू तर दररोज ड्रिंक्स घेवून यायला लागलीस," जय

"So what Jay ? This is part and parcel of my industry, I have to follow all these things" योगिनीने देखील तेवढ्याच जोरात उत्तर दिले.

"हो पण योगी पूर्वी तू याच इंडस्त्रीत राहून देखील या गोष्टी follow करत नव्हतीस" जय

"पूर्वीची आताची गोष्ट वेगळी आहे, जय try to understand the situation "योगी

"हे बघ योगी ते सर्व काहीही असुदे, या घरात हे अस काहीही चालणार नाही, ड्याड नि मोठ्या कष्टानी हे घर उभारलं आहे आणि स्वतःच त्याच बरोबर या घराच नाव जपल आहे, त्यांना त्यांच्या या घरात अस काही चाललेलं खपणार नाही." जय

"ओके, तस असेल तर ठीक आहे, आपण आपल स्वतःच घर घेवू, आणि ते देखील येत्या आठ दहा दिवसात, आणि हो this is my final decision, Good Night, अस म्हणून ती झोकांड्या घेत आत गेली. जय तिच्या मागून गेला.


रावसाहेब हे सर्व ऐकत बाहेर उभे होते, आत जाण्याच त्यांना धाडस होत नव्हत. बऱ्याच वेळाने मनाचा हिय्या करून ते आपल्या कडे असणाऱ्या चावीने दार उघडून आत गेले. हात पाय धुवून ते पलंगावर पडले, पडल्या पडल्या ते विचार करू लागले, खूप विचारा अंती त्यांनी एक ठाम निर्णय घेतला आणि शांत पणे झोपी गेले.

नेहमी प्रमाणे सकाळी जय त्यांना good morning म्हणायला त्यांच्या रूम मध्ये गेला. त्याला रूम नेहमी पेक्ष्या जास्त आवरलेली वाटली, म्हणून तो त्यांना हाक मारत पुढे गेला, त्याच्या हाकेला काहीच प्रतुत्तर आले नाही, पण त्याला त्यांच्या टेबलावर एक कागद हलताना दिसला. पुढे होवून त्याने तो कागद घेतला, ते पत्र होते, त्यात लिहिले होते


 

" जय बेटा या मुंबईच्या वातावरणात आता खूप घुसमट होतेय, मी आज सकाळीच आपल्या गावी निघून जात आहे, याच टेबलाच्या कप्प्यात काही कागद पत्रे आणि दस्तावेज आहेत, माझी मुंबईतील स्तावर मालमत्ता मी तुझ्या नावे केली आहे." सदैव तुमचाच ड्याडी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational