SANJAY SALVI

Tragedy


1  

SANJAY SALVI

Tragedy


असून सारे "एकटी"

असून सारे "एकटी"

30 mins 1.4K 30 mins 1.4K

झेलमचा  आज कॉलेज चा पहिला दिवस. तिला सर्व तयारी करून देता देता अनन्या ची खूप धांदल होत होती. तस पाहिलं तर झेलमला थोडी चीडच आली होती. पण तिला हेही माहित होत कि मम्माला कितीही सांगितलं तरी काहीही फरक पडणार नाही. तरीही ती म्हणालीच,

मम्मा काय हे, माझा ड्रेस पण तूच काढून देणार आहेस का ? म्हणजे तू तो पंजाबी ड्रेस काढून देणार. होना ?

अनन्याने तिच्याकडे फक्त हसून पाहिले. झेलमच्या पापाजीना म्हणजे कैलाशनाथना आपल्या मुलीने कधीकधी पंजाबी ड्रेस देखील घालावा असे वाटत असते, ते त्यांनी कित्येक वेळा अनन्या जवळ बोलून दाखवलेले असते, याची अनन्याला आठवण होते. मम्मा काहीच उत्तर देत नाहीस पाहून झेलमच म्हणाली,

हे बघ मम्मा मी कॉलेज  मध्ये अज्जीबात पंजाबी ड्रेस वगैरे घालूनजाणारनाही. I WILL WEAR ONLY JEANS AND TROUSERS आणित्यावर मस्त वेगवेगळ्या प्रकारचे TOPS, T-SHIRTS आणि SHIRTS, OKEY

आणि तिने चटकन जीन्स आणि टीशर्ट चढवला, पायांत वेगळ्याच रंगाचे बूट घातले, पाठीवर घ्यायची श्याक घेतली. मम्माकडे पाहून जाता - जाता म्हणाली मम्मा मी जाते ग, आणि तू व्यवस्थित जेवून घे माझी काळजी करत बसू नको. अनन्या विचारांच्या गर्तेतून आणि हॉलमधून गडबडीत बाहेर आली. मुन्ना अग डबा घेतलास ना ? आणि मोबाईल ठेवलास का?

झेलम परत फिरली.

मम्मा आज पहिला दिवस आहे ना ग, आज कदाचित लवकरच सोडतील मग डबा कश्याला ? आणि मोबाईल ठेवलाय, तू सांगितल्याप्रमाणे ट्रेन मिळाल्यावर आणि कॉलेजला पोचल्यावर फोन करेन. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर बंद करेन.

'अग मग परत का फिरलीस ? 'अनन्या

झेलम पटकन मम्माच्या पाया पडली. अनन्याच्या डोळ्यात अश्रू तरंगले ते तसेच राहू देता म्हणाली, बेटा देवाच्या पण पाया पड जा बर.

झेलम पटकन म्हणाली “मम्मा तूच माझ्या साठी देव आहेस”, आणि झटकन घरा बाहेर गेलीही. अनन्या आपल्या सुंदर, लहानपणा पासून लाडा–कोडात वाढलेल्या मुलीकडे पहात राहिली अगदी तिची पाठमोरी आकृती समोर दिसणाऱ्या गल्लीच्या टोकापर्यंत. आणि तसे पाहत असतानाच तिच्या डोळ्यासमोर एक धूसर आकृती तयार झाली आणि ती आठवणीच्या वाटेवर चालत चालत खूप खूप वर्ष मागे गेली……………..

अनन्याच्या जन्माचा देखील एक वेगळाच पैलू ती ऐकून होति. तिचे दादा – आई रहायला सायन कोळीवाडा म्हणजे आताचे जेटीबीनगर. दादा, अनन्याचे वडील, कुटुंबामध्ये व आजूबाजूला सर्वजण त्यांना दादाचं म्हणत म्हणून अनन्या व तिची दीदी पण त्यांना दादाचं बोलायला लागल्या. दादा मुंबई नगरपालिकेच्या सरकारी नोकरीत होते. पालिकेतर्फे त्यांना रहायला लहान घर मिळाले होते. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दादाचं आणि अनन्याच्या आईच लग्न लवकरच झाल, आणि वयाच्या अठराव्या वर्षी अनन्याच्या दिदीचा म्हणजे सुकन्याचा जन्म झाला. सुकन्या शिकता शिकता चागली मोठी झाली, बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने परीच्यारीकेचा ( नर्सिंग ) कोर्स केला व वयाच्या सतराव्या  वर्षी ती नोकरी देखील करू लागली. मधल्या काळात दादा आणि आईंची आठ अपत्य काही कारणास्तव जगू शकली नाही. पण दादाना एक मुलगा पाहिजे होता म्हणून त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून अनन्याच्या आईला दहाव्यांदा गळ घातली, अनन्याची आई दहाव्या वेळी गरोदर राहिल्या. त्याच वेळी वयाच्या अठराव्या वर्षी दीदीला म्हणजे सुकन्याला एका चांगल्या मुलाने मागणी घातली. सर्व गोष्टी जुळून आल्या आणि दीदी लग्न होवून आपल्या घरी गेली.

आणि मग व्हायचे तेच घडले. दीदीला देखील दिवस जावून ती देखील गरोदर राहिली. म्हणजे इकडे आई गरोदर आणि तिकडे मुलगी गरोदर.  दीदी नंतर तब्बल अठरा वर्षाने अनन्या चा जन्म झाला. दादा आणि आई दोघंही थोडे हिरमुसले पण मुल जगले म्हणून आनंदही झाला.

इकडे अनन्याच्या जन्मानंतर सहाच महिन्याने दीदीला देखील एक छान मुलगा झाला. तर हि अनन्यच्या जन्माची थोडीसी जगावेगळी जन्म कहाणी.

दादांवर त्यांच्या ऑफिस मधील साहेबांचा खूप पगडा होता. दादांनी त्यांना मुलीचं नाव काय ठेवू असं  विचारलं. त्यांनीही फार आढेवेढे न घेता सांगितलं " अरे तुझी मुल जगत नव्हती ना ! मग या मुलीच तुझ्या आयुष्यात अन्यन साधारण महत्व आहे, तीच नाव अनन्या ठेव.”आणि अनन्या च नामकरण झाल.

अनन्या, आई – दादांची खूप लाडकी होती. एक तर ती खूप वर्षांनी झाली होती आणि दुसर म्हणजे दीदी लग्न होवून सासरी गेली होती. दादा, आई आणि अनन्या छोटंस कुटुंब. दादांचा सरकारी नोकरीचा पगार फार काही नव्हता, पण दिवस मजेत जात होते. दादां अनन्याचे खूप लाडलाड करायचे. तसा त्यांना घरी असा खूप कमी वेळ मिळायचा पण रविवार मात्र दिवसभर ते अनन्याला खेळवण्यात गुंग असायचे. दिवस भराभरा जात होते. अनन्या पाच वर्षाची झाली. दादांनी तिच्यासाठी शाळेची शोधाशोध सुरु केली. आई म्हणाली देखील

"अहो आजुबाजूची सर्व मुल जवळच्या मुनिसिपल शाळेत जातात तिथेच हीच देखील नाव घाला. कश्याला इतकी शोधाशोध करताय".

पण दादांनी या कानांनी ऐकल आणि त्या कानांनी सोडून दिल. शेवटी साहेबांच्या ओळखीने चालत जाण्याच्या अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध अस्या "सरस्वती विद्यालयात" अनन्याच नाव दाखल केल गेल. दादां – आईना खूप आनंद झाला. दादांना थोडा जास्तच, कारण आजूबाजूची सर्व मुल सरकारी शाळेत जात होती. दादा स्वतः फक्त सातवी पर्यंत शिकले होते. सरकारी नोकरीत सतत साहेबांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व कळू लागले होते.

दादा सर्वांना अतिशय आनंदाने अनन्याच्या शाळे विषयी सांगायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्वप्न तरंगायची. अनन्या शाळेत जायला लागली तेव्हा दादांनि नुकतीच पन्नाशी ओलांडली होती. शिशुवर्ग, पहिली झाली आणि आता दादांची लाडकी अनन्या दुसरीत जायला लागली. आताशी दादांची तब्बेत वरचेवर बिघडत होती. जवळजवळ दिवसातले १४ – १५ तास काम त्यांना खूप त्रासदायक होत होते. पण दादांनी कधी तब्बेतीकडे लक्ष दिले नाही. मग सतत खोकला, ताप येणे चालू झाले, तेव्हा कुठे त्यांनी डॉक्टरकडे जायचे ठरवले. तोपर्यंत उशीर झाला होता. दादांच्या थुंकीतून रक्त पडू लागले होते. दादांना तत्काळ हॉस्पिटल मध्ये भरती होण्यास सांगण्यात आल. अनन्याच्या आईची आता खूपच धावपळ सुरु झाली. दुसरीकडे पैशांची ओढाताण सुरु झाली. आईने आणि दीदीने आपल्या परीने जेवढ जमेल ते सर्व केले. आणि एके दिवशी शाळेचा वर्ग चालू असताना अचानक अनन्याला न्यायला त्यांच्या बाजूस राहणारे साने काका आले. अनन्या आपल्या इमारती जवळ आली तेव्हा तिथे खूप गर्दी जमल्याच तिला अंधुकस आठवत होत.

गर्दीतून वाट काढत ती कशीबसी घरात पोचली. घरात सर्वजण रडत होते. आई, दीदी, जीजू, कधीतरी येणारे दूरचे नातेवाईक, बाबांचे मित्र सर्वच अश्रू ढाळीत होते. आईला आणि दीदीला रडताना बघून अनन्यालाही रडू आले. येवड्यात तिचे लक्ष्य दादांकडे गेले . ते खाली शांतपणे झोपले होते. थोड्या वेळाने अजून काही लोक जमल्यावर बाकीचे सर्व सोपस्कार आटोपून बाबांना उचलून ग्यालेरीतल्या बांबुनी बनवलेल्या चटईवर ठेवले. अजून थोडा वेळ जाताच त्यांना उचलून नेण्यात आले. त्यावेळी आई व ताई खूप जोरजोरात रडल्या. मग अनन्यालाही रडू आले. दादांवर असलेल्या अतीव प्रेमामुळे कि काय या गोष्टी तिला बऱ्यापैकी आठवत होत्या. दादा गेल्यावर आईवर जणू आभाळच कोसळले. दादांच्या पगारात घर व्यवस्थित चालू होते पण शिल्लक किंवा गुंतवणूक अशी काही होत न्हवती. त्यामुळे चारपाच महिने कसेतरी निभावता येण्यासारखे होते. आईचाही स्वभाव अतिशय स्वाभिमानी होता, तिने कधी दिदि कडे काही मागितल्याचे किंवा तिची मदत घेतल्याचे देखील आठवत नव्हते. तसी दीदी आणि जीजू अधेमध्ये येवून विचारपूस करून जायचे पण तेवढ्यास तेवढे. तसा दिदीचा स्वभाव शांत आणि आत्मकेंद्रित होता, आपण भले आपलं जग भल. नातेवाईक असे जास्त नव्हतेच. पंधरा एक दिवसांनी दादांचे साहेब, जाधवसाहेब घरी भेटायला आले. त्यांनी आईची आणि अनन्या ची विचारपूस केली. ऑफिसमध्ये येवून काही कागत पत्रांवर सह्या करून जाण्यासाठी सांगितलं. जेणे करून दादांचा भविष्यनिधी व काही पैसे लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल अस ते म्हणाले. जाताजाता त्यांनी आईला विचारलं कि आता पुढ काय आणि कस करायचं ठरवलं आहे ते. आई त्यांना म्हणाली होती “मी बाई माणूस, घरदार सोडून बाहेर कधी गेले नाही ,पण आता घरात बसून जमणार नाही. काही तरी करावच लागेल, साहेब तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा, नन्याचे दादा नेहमी तुमचेच नाव घ्यायचे. तुमचा खूप मोठा आधार होता त्यांना.”

“तुम्ही या पंधरा दिवसांनी, पाहू काय मार्ग सुचतो का ते”, अस म्हणून जाधव साहेब निघून गेले.

आई जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर पंधरा दिवसांनी त्यांना भेटायला गेली. परतून आली तेव्हा चेहऱ्यावरची दुःखाची छटा काहीसी कमी झाली होती. दादांचा भविष्यनिधी व इतर काही पैसे पुढील महिन्याभरात मिळणार होतेच पण त्याही पुढे जावून जाधवसाहेबांनी आईसाठी अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळण्यासंदर्बात मोठ्यासाहेबांकडे शब्द टाकला होता. त्यासाठी लागणारे अर्ज देखील जाधवसाहेबांनी हातोहात भरून घेतले होते. त्या वेळी सरकारी नोकरीत तसी सोय होती. यामध्ये एकच अडचण होती ती म्हणजे आईच्या शिक्षणाची. त्यामुळे आईला नोकरी मिळालीच तर ती चतुर्थ श्रेणीच्या सर्वात खालील थरातील असणार होती.

पुढे दहा बारा दिवसांनी दादांच्या ऑफिस मधून जाधवसाहेबांचा निरोप घेवून शिपाई आला. चार दिवसांनी आई काही कागदपत्रे व तिचा फोटो घेवून साहेबाना भेटायला गेली. साहेबांनी तिला ऑफिस मधल्या दुसऱ्या एका साहेबांबरोबर मुख्यालयात जावून यायला सांगितले. तिथे गेल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आईने त्यांना सर्वकागदपत्रे व आपला फोटो दिला. काही जाब – जबाब घेतले आणि परत जायला सांगितले. आई तसीच घरीन येता पुन्हा जाधवसाहेबांना भेटून आली. जाधव साहेबांनी तिला आश्वासन दिल कि तिच्या नोकरीच काम होणारच होणार फक्त काही सरकारी सोपस्कार बाकी आहेत त्यांना थोडा वेळ लागेल, ते म्हणाले देखील कि मी यात जातीने लक्ष देतोय. आईच्या मनावरच ओझ थोडं कमी झालं आणि ती निश्चिंतपणे घरी आली. अनन्याचा रोज चा दिनक्रम चालू होता पण तिला दादांची खूपखूप आठवण येत होती. विशेषतः संध्याकाळी उशिरा दादा यायचे व आल्या बरोबर आपल्या लाडक्या नन्याशी गप्पा मारायचे. कधी कधी ते खाऊ देखील आणायचे. असेच तीन चार महिने निघून गेले आणि पुन्हा एकदा जाधव साहेबांचा निरोप घेवून शिपाई घरी येवून गेला. आई दुसऱ्याच दिवशी जाधव साहेबाना भेटायला गेली. यावेळी जाधव साहेब स्वतः तिच्या बरोबर मुख्यालयात आले. तिथे तिला नोकरीत ठेवल्याचे पत्र देण्यात आले. सर्वाच्या देखत आईने जाधव साहेबांचे पाय धरले. जाधव साहेबाना संकोचल्या सारखे झाले. ते म्हणाले देखील " अहो अनघाबाई हे काय? अस नसत करायचं.

आई त्यावर म्हणाली " साहेब तुमच्या मुळेच हि नोकरी मला मिळाली, नाहीतर मी आणि माझी मुलगी उघड्यावर पडलो असतो, तुमच्या रुपात आमच्यासाठी देव धावून आला. डोंगरा एवढे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत" जाधव साहेबाना खूप अव्हगडल्यासारख झालं. ते म्हणाले " बाई तुमच्या कामच स्वरूप तुम्हाला माहित आहे का? कारण तुमच्या शिक्षणा नुसार

तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आयाच काम दिल गेल आहे, चांगली गोष्ट एकच आहे कि ते हॉस्पिटल तुमच्या घरापासून अव्हग्या पंधरा – वीस मिनटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्हीही बचत होईल.

आई त्यांना उत्तरा दाखल म्हणाली " साहेब कोणतहि काम मी मनापासून करेन कोणालाही तक्रार करायला जागा ठेवणार नाही" अशा प्रकारे आई जवळच्याच बाई जेरीबाई ठाकरसी रुग्णालयात रुजू झाली. तिला तिन्हीही पाळ्याना जावे लागणार होते.

त्यामुळे आता मोठा प्रश्न होता तो म्हणजे अनन्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीला असताना ठेवायचे कुठे किंवा तिचा सांभाळ कोण करणार. पण तो प्रश्नहि शेजारच्या साने काकुनी सोडवला व अनन्याला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. आई आता निश्चिंतपणे नोकरीवर जायला लागली. तिच्या कामसू वृत्तीमुळे व शांत स्वभावामुळे तिने आपल्या वरिष्टांची मर्जी संपादन करून घेतली. काही महिन्यानंतर तिची रात्र पाळी देखील कमी झाली.

दिवस, महिने, वर्ष पुढे पुढे जात होती. आई घरकाम, अनन्याचा सांभाळ आणि तिची नोकरी यात पूर्णपणे बुडून गेली होती. त्यामुळे कि काय दादांच्या जाण्याचा सल तिच्या मनात खोलवर दबून गेला होता. पण अनन्याला दादांची न चुकता आठवण येत होती. विशेषतः संध्याकाळ झाल्यावर खूपच. दादा जेव्हा केव्हा थोडे लवकर येत तेव्हा तीचाशी खूप वेळ खेळत व गप्पा मारत. त्यामुळे मुळातच कमी बोलणारी नन्या जास्तच अबोल झाली. आपला जास्तीत जास्त वेळ ती माशिके वाचणे व साने काकूंनी सांगितलेली छोटी छोटी कामे करण्यात घालवू लागली.

अनन्याचे शिक्षण यथातथाच चालू होते. ती न चुकता पास होता पुढील वर्गात जात होती. ती आता आठवीच्या वर्गात जायला लागली. वयाबरोबर तिच्या शरीराच्या उभारानी देखील आकार घ्यायला सुरवात केली होती. आधीच वयापेक्षा थोडी मोठी वाटणारी अनन्या चांगलीच उठून दिसायला लागली. आताशी तिला साने काकूंकडेदेखील राहू नये अस वाटू लागल होत कारण ती स्वतःला सांभाळायला शिकू पाहत होती. अस्यातच एके दिवशी ती घटना घडली.

साने काकूंचा एकुलता एक मुलगा राजेश वयात आला होता. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. तो तसा घरात कमीच असे. केव्हातरी जाता येता अनन्याची मस्करी करीत असे. अनन्या देखील त्याला केव्हा केव्हा प्रती उत्तारादाखल चिडवत असे. त्या दिवशी राजेश अचानकपणे लवकरच घरी आला. साने काका काही कामा निमित्त बाहेर गावी गेले होते. सानेकाकू बाजारात गेल्या होत्या. राजेशने आल्याबरोबर कपडे बदलले. अनन्या त्यावेळी त्यांच्याकडेच बाहेरच्या खोलीत मासिक वाचत पडली होती. राजेश बाहेर येवून तीच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता त्याने तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. पण तसे करताना त्याच्या हातांचा स्पर्श सर्व अंगावरून होवू लागला. अनन्याला त्याचा तो स्पर्श वेगळा जाणवला. तिने त्याला लागलीच सुनावले “राजेशदादा अशी अंगाची मस्करी मी खपवून घेणार नाही. आणि यापुढे जर अस वागलास तर काका – काकुना तुझ नाव सांगेन”. हे ऐकल्यावर राजेश खजील होवून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच अनन्याने आईला सांगून टाकल " आई मी आता मोठी झालेय आणि स्वतः चांगल सांभाळू शकते. आणि बाहेर थोडच कुठ जायचं आहे, सानेकाकूंकडे जसी बसते, अभ्यास करते तसीच आपल्या घरात देखील करेन. तू सांग सानेकाकूंना कि आजपासून मी घरीच थांबेन"

आईने तिला समजावण्याचा प्रयन्त केला " नन्या तसं नसत बाळा, दिवसाचं ठीक आहे, पण माझी रात्रपाळी असेल त्याचं काय ?"

"अग आई आताशी तुला रात्रपाळी क्क़चितच असते, आणि असली म्हणून काय झाल मी झोपेन न एकटीच. मी नाही घाबरत कोणाला ! आणि हो आई, इतके दिवस माझ्यासाठी त्यांनी त्रास सहन केला ना, मग अजून किती त्रास द्यायचा त्यांना. ते काही नाही तू आजच सांग काकूंना." अनन्या ठामपणे म्हणाली."बर बाई, तसं तर तसं, होवू दे तुझ्या मनासारख, नाही तरीतू आता जाणती होत चाललीस, तुला सुधा खंबीरपणे या जगात वावरण्यासाठी आतापासूनच तयारी केली पाहिजे. पण आजचा दिवस तू जा त्यांच्याकडे, नाहीतर त्यांना अस तडफा – तडफी सांगितलेलं नाही पटणार आणि उगाचच गैर समज होतील. मी बोलेन आजचं काकुंशी. पण बेटा त्यांचे हे उपकार नाही हो विसरायचे कधी" आईने अनन्याला समजावले.

"नाहीग आई, काकूंना कसी विसरेन मी, ती माझी दुसरी आई आहे, हो कि नाही ?" आईने आपल्या समंजस मुलीकडे कौतुकाने पहिले.

त्या दिवशी ती सानेकाकूंकडे राहिली. आईने जाताना सानेकाकुना पटेल अस्या शब्दात समाजावून सांगितले, त्याच बरोबर तिच्याकडे आणि घरावर लक्षदेखील ठेवायला विनंती केली.

काकू म्हणाल्या देखील "माझी पोर आहे ती, इथे राहिली काय आणि बाजूच्या घरी राहिली काय, माझी नजर तिच्यावर असणारच आहे, तुम्ही काही काळजी करू नका".

त्या दिवशी देखील राजेश नेहमीपेक्षा लवकरच घरी आला. तो आल्याबरोबर अनन्याला थोडं आक्रसल्या सारखं झालं. तो हातपाय धुवून लगेचच बाहेर आला. सानेकाकू किचनमध्ये काम करत होत्या. राजेश अनन्या जवळ आला. अनन्या खाली मान करून बसली होती. राजेशने तिला हाक मारली "नानू", राजेशदादा तिला अशीच हाक मारायचा. "नानू", I am sorry, नानू, मला माफ कर, काल माझ्या हातून चूक घडली, आपल्यातील असलेल्या हळुवार आणि पवित्र नात्याचा मला काल विसर पडला, पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही." राजेशचे डोळे भरून आले होते त्या डोळ्यांमध्ये पश्चाताप पूर्णपणे दिसत होता.

"मी तुला माफ करायचा प्रश्नच येत नाही दादा, तू माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप मोठा आहेस. आणि राहता राहिला प्रश्न पुढे अशी चूक घडण्याचा, ते तर आता शक्य नाही कारण मी उद्यापासून माझ्याच घरी थांबणार आहे" अनन्या शांतपणे म्हणाली.

दुसऱ्या दिवसापासून अनन्या आपल्याच घरी थांबू लागली, अगदी आईची रात्रपाळी असेल तेव्हा देखील. तिच्या आईने तिला कोणासी कस वागावं, बोलाव, कोण आल्यावर दरवाजा उघडावा आणि उघडू नए हे सर्व समजावून सांगितले होते. आता अनन्या आईला घरकामात आणि स्वयंपाक बनवण्यात मदत करू लागली. काही महिन्यातच ती पूर्ण स्वयंपाक बनविण्यास शिकली. आईला आता तेवढाच आराम मिळू लागला.

मधील काळात आईने पुढील राहण्याची तजवीज म्हणून दादांच्या भविष्य निधीतून, तसेच काही दागिने मोडून पैसे एकत्र करून जवळच एका दुमजली चाळी मध्ये घर घेवून ठेवले होते. त्या कामी जाधवसाहेब, जीजू आणि सानेकाकांनी तिला खूप मदत केली होती. आईने आता ठरवले होते कि नन्याची आठवीची परीक्षा झाल्यावर तिकडे राहायला जायचे म्हणून. त्याप्रमाणे अनन्याची परीक्षा आटोपल्या बरोबर आईने जीजू आणि सानेकाकांच्या मदतीने सर्व सामान वगैरे नवीन जागेत हलवून घेतले. या कामी राजेशने देखील खूप धावपळ केली. त्यावेळी साने काकूंना, आईला आणि अनन्याला खूप गहिवरून आले. निरोप घेताना सर्वांचे डोळे पाणावले होते. शेवटी अनन्याच म्हणाली " काकू अहो आम्ही कुठ लांब जात नाही आहोत, एक हाक दिली तर तुमची नानू चटकन धावत येईल." पण अस म्हणताना देखील, अनन्याच्या नकळत तिचा कंठ दाटून आला.

तसं पाहिलं तर तेखरंच होत, अनन्याच नवीन घर अगदी हाकेच्या अंतरावर होत. त्यामुळे कि काय त्यांना काही परकेपणा असा जाणवलाच नाही. नाही म्हणायला नवीन शेजार कसा असेल ते काही दिवसात समजणार होते. नवीन घराच्या आवराआवरी साठी आईने दहा दिवस सुट्टी काढली होती, ती हा हा म्हणता संपली. आई पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू झाली आणि अनन्या एकटी. आता ती आपला जास्तीत जास्त वेळ पुस्तक, मासिक वाचण्यात आणि रेडीओ वरील गाणी ऐकण्यात घालवू लागली. केव्ह्या तरी दोन तीन दिवसांनी साने काकुना भेटून येत असे.

नवीन घरी येवून पंचवीस एक दिवस झाले असतील. आई दुसऱ्या पाळीला गेली होती. दुसरी पाळी दहा वाजता सुटे, आणि आई चालत चालत वीस मिनिटांत घरी पोहचे. त्या दिवशी अनन्या अशीच आईची वाट पाहत बसली होती. अकरा वाजत आले तरी आई आली नाही म्हणून तिला थोडी काळजी वाटू लागली, तसा कधी कधी तिला उशीर होत असे. अजून दहा पंधरा मिनिटे वाट पाहून तिने साने काकूंकडे जायचे ठरवले. तेवढ्यात एक गृहस्त धावत धावत त्यांचा पत्ता शोधात त्यांच्या घरी आला, त्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्येच यायला सांगितले, बाकी तो काही सांगण्यास तयार नव्हता. तो अनन्याच्या अजिबात ओळखीचा नव्हता त्यामुळे आईने सांगितल्याप्रमाणे अनन्या त्याला म्हणाली "आपण आधी इथे जवळच आमच्या काकू राहतात त्यांच्याकडे जावून त्यांनापण बरोबर घेवू ". त्याप्रमाणे अनन्या प्रथम त्या माणसा बरोबर सानेकाकूंकडे गेली. तिथून त्यांच्या बरोबर सानेकाका आणि राजेश देखील आले. सानेकाकांनी खोदून विचारल्यावर त्या माणसाने चालता चालता सांगितले.

अनन्याची आई नेहमी प्रमाणे दहा वाजता सुटली. हॉस्पिटलच्या समोरून रस्ता ओलांडताना एका वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांना जोराची धडक मारली आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली, हॉस्पिटलच्या समोरच अपघात झाल्यामुळे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि निरोप द्यायचं काम त्या माणसावर आल. तो तिथेच नोकरीस होता. त्यान हेही सांगितलं कि अनन्याच्या मोठ्या बहिणीलासुद्धा बोलवायला माणूस पाठवला आहे. हे ऐकल्या बरोबर अनन्याला तर सर्व विश्व फिरल्याचा भास झाला, तिची पावलं जिद्दीने आणि वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने पढू लागली. तिच्या अगोदरच तिथे दीदी आणि जीजू आले होते. आईच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी जीजुना सांगितले कि ति कोणत्याही औषधांना प्रतिक्रिया देत नाही आणि आता सर्व भरवसा पूर्णपणे देवावर आहे. हे ऐकल्याबरोबर अनन्या तीरासारखी आईच्या बेडकडे धावली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या पण तोंडावाटे अज्जिबात आवाज येत नव्हता. ती आपल्या आईकडे असह्हाय नजरेने पाहत होती. सर्व लोक शांतपने एकटक आईकडे पाहत होते. जवळ जवळ तासाभराने आईने डोळे उघडल्यासारखे केले. तिने नजरेनेच दीदी आणि अनन्याकडे पहिले. पुन्हा दीदीकडे आर्त नजरेने पाहत असतानाच तिने आपले प्राण सोडले. आता मात्र अनन्याने जीव फोडून टाकेल असा हंबरडा फोडला. तीच एकुलत एक अस माणूस तिची आई देखील या जगातून निघून गेली होती. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ती अनाथ, पोरकी आणि सर्वस्वी एकटी झाली होती.

काही केल्या आई गेल्याची वस्तुस्तिथी अनन्याला स्वीकारताच येत नव्हती. तिची आई तिच्या साठी फक्त आईच नव्हती, तर ती तिची आई, बाबा, मैत्रीण सर्व काही होती. त्या पेक्षा ही ज्यास्त भयानक जाणीव तिला एकाकी पणाची होत होती. आणि त्या जाणीवेने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिने अन्न – पाणी जवळजवळ वर्ज केले होते आणि तिच्या डोळ्यातून पुढील दहा – बारा दिवस सतत पाणी ओसंडत होते. साने काकू आणि दीदीने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. सानेकाकू तिला म्हणाल्या देखील "नानूबेटा, अग मी आहेना तुझी दुसरी आई, तू माझ्याकडेच रहा. जीवात जीव असेपर्यंत मी तुला कधी अंतर देणार नाही. जसा राजेश माझा मुलगा तसी तू माझी मुलगी"

हे ऐकून अनन्याला खूप मोठा उमाळा फुटला आणि ती काकूंच्या गळ्यात गळा घालून हमसुन हमसुन रडू लागली. या गोष्टीला बारा – पंधरा दिवस झाले. दीदी एवडे दिवस अनन्या बरोबरच होती. रात्री साने काकू येत असत. पंधराव्या दिवशी रात्री काकू आल्यावर काकुनीच विषय काढला " सुकन्या आता तू तरी असी किती दिवस इथे काढणार, तुझी सुद्धा नोकरी आहे, घर – कुटुंब आहे. अनन्या तयार असेल तर ती आमच्या बरोबरच राहील, तेव्हा तीचाशी बोलून काय ते ठरवूया"

"नाही काकू तसं नको, नन्या माझी सख्खी बहिण आहे, ती माझ्या बरोबरच राहील, मी बोललेय तिच्या जीजुंशी, आणि हो नन्याने जरी तुमच्याकडे राहायचं ठरवलं तर लोक काय म्हणतील, ते तर आम्हालाच दोष देतील ना ? मी उद्याच तिच्याशी बोलून कदाचित उद्याच आम्ही आमच्या घरी जावू. तुम्ही सुद्धा येत जा आम्हाला भेटायला अधून मधून." दीदी म्हणाली. दुसऱ्या दिवशी दीदी अनन्याला म्हणाली " नन्या मला आता इथे थांबणे शक्य नाही, अमोघ आणि अमोलची शाळा, माझी नोकरी आणि त्यांच्या जेवणाच येवड सर्व इथे राहून करण शक्य नाही, तेव्हा तू आज पासून आमच्या बरोबरच रहा, आपण आजच तिकडे जावूया." अनन्या काही विचारच करू शकत नव्हती व तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

अनन्या दीदीच्या घरी रहायला आली. तिच्या मनाची खूपच घालमेल चालली होती. एकीकडे पूर्णपणे एकटेपणा, भविष्यात पुढे काय याचा काहीच ठाव ठिकाणा नाही, दिदिकडे राहण्याचा परकेपणा, तिच्यावर आपला विनाकारण पडलेला बोजा हेसर्व विचार तिच्या डोक्यात काहूर माजवत होते. तसी दिदिकडे ती केव्हातरी येवून जावून असे पण आतापर्यंत कधी राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याच हेही कारण असेल कि दीदी त्यांच्या पासून जवळच राहायला होती. अनन्याच्या घरी ईन मीन तीन व नंतर तर दोनच माणस होती. इथे तर तिला एकदम मोठ्या कुटुंबात आल्या सारखं वाटल. दीदी, जीजू, त्यांची दोन मोठी मुल अमोघ आणि अमोल व जीजुंची आई असि एकूण पाच मानस आणि त्यात अनन्या सहावी. अनन्याला पहिला महिनाभर खूपच त्रासदायक गेला. आई गेलेल्याच दुखः, परकेपणा यात तिची कुचंबना होत होती. त्यात घरी बोला चालायला संध्याकाळी उशिरा पर्यंत कोणीच नसे फक्त एका मोठ्या बाईं शीवाय. जीजुंच्या आईना जीजू सोडून सर्व मोठ्या बाई असंच हक मारत अगदी दीदी सुद्धा. का कुणास ठावूक पण मोठ्या बाई अनन्याशी तुटकपणे वागत. अनन्याला या महिन्याभरात कित्येक वेळा वाटून गेल कि दीदीला सांगून सानेकाकूंकडे राहायला जावे. पण तिला बोलायची हिम्मतच झाली नाही. पुढील पंधरा दिवसात अनन्याची शाळा सुरु झाली. दीदीच्या घरापासून अनन्याची शाळा चालत जाण्याच्या अंतरावरच पण पूर्वीच्या घरापेक्षा लांब होती.

अमोघ आणि अमोलची शाळा सुद्धा सुट्टीनंतर पुन्हा सुरु झाली. अमोघ दहावीत तर अमोल सातवित होता. ते दोघंही जवळच्याच इंग्रजी शाळेत जात होते. हळूहळू अमोघ, अमोल आणि अनन्याची चांगली गट्टी जमली. अमोघ तिला चिडवायचा तर अमोल सतत तिच्या मागे मागे असायचा.

अनन्या आता हळूहळू रुळू लागली होती नव्हे तिला रुळणे भागच होते. आता ती दीदीला एकएका कामात मदत करू लागली व आपल्या अभ्यासावर देखील लक्ष देवू लागली. दीदी नोकरीला गेल्यावर तिला सर्व कामे करणे भाग होते त्यात मोठ्या बाईचं तिच्यावर बारीक लक्ष होत. अस करता करता घरातील सर्व कामे ती आता करू लागली होती. दीदी तिला तस पाहिलं तर तू हे काम करच अस काही सांगत नव्हती पण त्याच बरोबर तू हे सर्व करत बसू नकोस अस देखील सांगत नव्हती. अनन्याने प्राप्त परिस्थिती ओळखून सर्व काही करायचे ठरवले होते. अनन्या कसी तरी नववी पास झाली. अमोघ बऱ्या पैकी मार्काने पास होवून कॉलेजला जायला लागला. अनन्याचे आता दहावीचे महत्वाचे वर्ष सुरु झाले. कामाच्या व्यापात आणि विशेष करून एकंदर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिचा अभ्यासातील रस नाहीसा झाला होता. ती स्वतःला अतिशय एकाकी व एकटी समजू लागली होती. त्यामुळे होवू न तेच झाले दहावीत ती नापास झाली. जीजू आणि अमोघने तिला दिलासा देवून सांगितले देखील "तू पुन्हा जोरात तयारी करून परत दहावी दे म्हणून". पण अनन्या त्यावर काही बोलली नाही. आता दिवसभर काम करणे, दुपारी आराम करणे किंवा रेडीओ ऐकणे हा तिचा दिनक्रम होवून गेला. एकदा जीजू दुपारी तीनचारच्या सुमारास घरी आले, त्यावेळी अनन्या आळसावून एकटक शून्यात नजर लावून बसली होती. जीजुनी तिला जवळ बोलावून विचारपूस केली आणि तिला सल्ला दिला कि तिने फावल्या वेळात कोणता तरी कोर्स करावा. अनन्या देखील त्या गोष्टीचा विचार करू लागली. तिला लहान पणापासून वेग-वेगळ्या कपड्यांच्या डिझाइनचे खूप आकर्षण आणि अप्रूप वाटे. तिने विचार केला कि आपण दीदीला विचारून टेलरिंग, डिझायनिग शिकावे. अस्या प्रकारे ती दुपारी टेलरिंग क्लासला जावू लागली. टेलरिंग क्लास सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी एक तास असे. त्यासाठी तिला बसने जवळजवळ वीस एक मिनिटे प्रवास करावा लागे. तीन चार दिवस झाले आणि एके दिवशी तिला एका तरुण स्त्रीने विचारले "तुम्ही प्रतीक्षा नगर मध्ये राहता ना ? मी दररोज तुम्हाला बसने येताना पाहते, मी देखील जवळच गुरुगोविंद कॉलनीत राहते". अनन्याने तिला होकार दिला. पुढे तीच म्हणाली "माझं नाव प्रीतकौर, आज पासूनआपण एकत्र येवू – जावूया म्हणजे सोबत होईल आणि गप्पादेखील मारता येतील. अनन्याला थोड अव्हगडल्या सारख झाल.

ती मानेनेच हो म्हणाली. तिला पहिली मैत्रीण मिळाली. त्या दोघी दररोज एकत्र जावू – येवू लागल्या. प्रीत कौर एकोणीस वर्षाची होती. सहा महिन्यापूर्वी ती लग्न होवून उल्हासनगर हून जीटीबी नगरला आली होती. बघता बघता दोघींची मैत्री घट्ट झाली. बसच्या प्रवासामध्ये दोघींची एकमेकांच्या आयुष्याबद्दल, सुख –दुखाबद्दल देवाणघेवाण झाली आणि त्यामनाने अजून जवळ आल्या.

एके दिवशी प्रीतने अनन्याला आपल्या घरी एका कार्यक्रमाला बोलावले, सणावाराचे दिवस होते त्यातलाच एक सण साजरा करण्यासाठी खास मैत्रीण म्हणून प्रीतने तिला आमंत्रण दिले. अनन्या शोधात शोधत तिच्या इमारती जवळ गेली, व खात्री करण्यासाठी तिने जवळूनच जाणाऱ्या एका तरुण मुलाला पत्ता विचारला. त्याने देखील “मी तिकडेच चाललोय तुम्ही माझ्या बरोबर या” असे तिला सांगितले. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर त्याने एका घराच्या दरवाज्या समोर उभे राहून सांगितले, “भाभीजी देखो कोई आपको मिलने आया हें.” प्रीत बाहेर आली आणि हसून तिचे स्वागत करून ती म्हणाली " नन्या तू तर घरच्या माणसाची सोबत घेवून आलीस, हा माझा धाकटा देवर, कैलाशनाथ." अनन्याने त्यांना नमस्कार म्हटले. हि होती अनन्या व नाथची पहिली ओळख.

त्या संध्याकाळी व रात्री उशिरापर्यंत प्रीतच्या घरी खूप मौज – मस्ती चालू होती, अनन्या परकेपणाने पाहत होती. प्रीत अधून मधून तिला बळे-बळे खेळण्यात थट्टा-मस्करी करण्यात ओढून न्हेत होती, तेवढ्या वेळेत तिच्या लक्षात आल कि कैलाशनाथ तिच्याकडे बरेच वेळा पहात होता. जवळ-जवळ नऊ वाजत आले तेव्हा अनन्या जाण्यासाठी निघाली, पण प्रीत तिला सोडेचना. ती म्हणाली " अरे तू पंज्याब्यांच्या सणाला आली आहेस, आत्ता-आत्ता तर कुठ सुरुवात झाली आहे पुढे-पुढे बघ काय मज्जा असते ती !!"

"अग प्रीत खूप रात्र झाली, आता मला जायला पाहिजे" - अनन्या

अनन्याची घालमेल ओळखून प्रीत म्हणाली " आता फक्त तास भर थांब, मग मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यानंतर तू जेव आणि तुला नाथ सोडून येईल, ओके."

अनन्याला नाही म्हणवले नाही. त्यानंतर तिला कैलाशनाथ घरापर्यंत सोडायला आला. वाटेत त्याने तिला काही जुजबी प्रश्न विचारले. त्याच्या विचारण्यात एक प्रकारची अधीरता होती. तिने जेवढ्यास तेवढी उत्तरे दिली. आपल्या घराजवळ येताच आभार मानून तिने त्याचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी क्लास वरून येताना प्रीत आणि अनन्या गप्पा मारत येत होत्या. पण प्रीत थोडी गंभीर होती. अनन्याने तिला याबद्दल दोन तीन वेळा विचारल्यावर प्रीत म्हणाली "नन्या खर म्हणजे तुला कस सांगू अस झालंय, विचित्र पेच पडलाय मला".

"अग सांग तर खर काय झालंय ते, हा आता तुझा अत्यंत खाजगी प्रश्न असेल तर गोष्ट वेगळी" अनन्या.

"नन्या माझ्या बाबतीत काही नाही, जे काही आहे ते तुझ्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे माझी असी कोंडी झालीय" प्रीत.

"माझ्या संबंधित असेल तर मग तुला सांगावेच लागेल त्याशिवाय ती कोंडी सुटणार कसी ?" अनन्या.

तरी देखील प्रीत पुढे काही बोलेना. तेव्हा अनन्याच म्हणाली.

"हे बघ प्रीत आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत ना ? मग त्यात काय येवड, आणि मला सांगितलेलं आवडलं नाही तरी राग नाही येणार, माझ काही चुकल असेल तर मीत्यावर विचार करेन आणि पुन्हा ती चूक होवू देणार नाही, समजल" अनन्या.

"नन्या अग तुझी काहीच चूक नाही, तसं पाहिलं तर चूक कुणाचीच नाही, चूक असेल तर ती तारुण्याची, तरुण वयाची" प्रीत.

" ए बाई अस कोड्यात बोलू नको, काय असेल ते सांगना लवकर" अनन्या .

" हे बघ काल तुला घरी सोडायला आलेला मुलगा तुला आठवतो" प्रीत.

" हो ! तूच तर त्याला सांगितलं होतस ना मला सोडून यायला" अनन्या.

" हं ! तोच, तो माझा धाकटा दीर आहे, आणि…. आणि … तुला पाहताच तो तुझ्या प्रेमात पडलाय" अस बोलून प्रीत अनन्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली, पण अनन्या अतिशय शांत होती. मग प्रीतच पुढे म्हणाली.

"त्याने मला चक्क सांगितलं कि अनन्या मला खूप आवडली आहे आणि मी लग्न करेन तर तिच्याशीच" एवढे बोलून प्रीत गप्प झाली आणि ती अनन्याची प्रतिक्रिया पाहू लागली. अनन्या शांत होती.

"नन्या तू काहीच का बोलत नाहीस ? प्रीत. अनन्या शांतच.

"मला माहित आहे अनन्या कैलाशनाथ तुझ्या पुढे दिसण्या पासून सर्वबाबतीत डावा आहे, पण तो मनाने अतिशय चांगला आणि प्रेमळ आहे, म्हणजे मी तुला काहीच सुचवत नाहीय, तुझा निर्णय तूच घ्यायचा आहे, मला एकाच गोष्टीचा आनंद होईल तो म्हणजे माझी खास मैत्रीण माझी जाऊ होईल, बघ तू विचार कर आणि तुला नाथ बद्दल जी काही माहिती हवी असेल ती मला विचार" प्रीत.

त्या दिवशी अनन्या एका वेगळ्या आणि विचित्र मनस्थितीत घरी गेली. तिला समजेना हे काय चाललय. काल ती मैत्रिणीकडे जाते काय, तिचा दीर तिथे तिला पाहतो काय, घरी सोबत म्हणून सोडायला येतो काय, एवड्या वेळेत ती त्याला आवडते काय आणि तिची मैत्रीण तिला त्याच्याबरोबर लग्नासाठी म्हणून सुचवते काय. तिच्यासाठी सर्वच गोंधळून टाकणारे होते. एकतर ती नुकतीच तारुण्यात प्रवेष करत होती आणि स्वतःबद्दल तिने अस्याप्रकारे काही विचारच केला नव्हता. पण आज तिने संपूर्ण रात्रभर काही विचार करून ठेवला व पहाटे-पहाटे तिचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी तिने प्रितला सांगितले कि तिने उद्या अनन्याच्या घरी दुपारी क्लासला जायच्या आधी लवकर यायचे तिला हवी असलेली माहिती द्यायची आणि नंतर दोघींनी क्लासला जायचे. ठरल्या प्रमाणे प्रीत अनन्याच्या घरी आली, अनन्याने काहीही आढेवेढे न घेता सरळ विषयाला हात घातला आणि प्रीतला तिच्या दिराबद्दल सर्व खरीखरी आणि पूर्ण माहिती सांगण्यास सांगितले.

प्रितने तिला सर्व माहिती पुरवली ती असी. नाथ २१ वर्षाचा आहे. त्याच शिक्षण बारावी पर्यंत झालेले आहे. घरच्या व्यवसायात मधून मधून लक्ष घालत असतो पण त्याला स्वतःचा असा काही व्यवसाय करायचा आहे. त्याला नोकरी करण्यात अज्जिबात रस नाही. सध्या तो एक लॉटरी सेंटर चालवण्याच्या गडबडीत आहे. त्याला कोणत्याही प्रकारच व्यसन असे नाही पण कधीकधी पान खातो. स्वभावाने थोडा मुडी आहे पण चांगला आहे. दुसऱ्याना मदत करण्यात त्याला आनंद मिळतो इ. इ.

अनन्याने ते सर्व शांतपणे एकूण घेतलं आणि त्यादो घीक्लास ला निघाल्या. प्रितने देखील तिला कोणतीही प्रतिक्रिया विचारली नाही. त्या जश्या शांतपणे क्लासला गेल्या तश्या परत आल्या. त्या रात्री अनन्याने एक ठोस निर्णय घेतला. तिने दुसऱ्या दिवशी प्रितला सांगितले " मला तुझ्या दिरास म्हणजे कैलाशनाथांशी बोलायचे आहे".

प्रीत तिच्या या अचानक बोलण्याने चपापली म्हणाली " नन्या तुला काय वाटत ते मला सांग, अजून काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला विचार".

"मला वाटलच तू चपापशिल म्हणून, माझी देखील अशीच अवस्था झाली होती तू मला विचारलस तेव्हा. ते ठीक आहे मला कैलाशनाथांसीच बोलायचं आहे" अनन्या.

"ठीकआहे, मी उद्या त्याच्याशी बोलते मग तुम्ही दोघ एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये भेटा". प्रीत

"नाही प्रीत, हॉटेलमध्ये नाही तुमच्या घरी आणि ते देखील तू आणि मां असताना" अनन्या.

चार दिवसानंतर त्यांच्या भेटीचा दिवस ठरला त्याप्रमाणे अनन्या प्रितच्या घरी गेली. आज तिथे फक्त मां, कैलाशनाथ, प्रीत आणि अनन्या असे चारचजण होते. अनन्याने मांना नमस्कार केला, आणि तिनेच मांची परवानगी घेवून बोलायला सुरवात केली.

"कैलाशजी, आपने मेरे साथ शादीका मन बनाया हे, ये बात पक्की हॆ." अनन्या

"अनन्या तुम्ही माझ्या बरोबर मराठी बोलू शकता, आमच्याकडे मां सोडून सर्वाना मराठी बोलत येत, आणि हो मला तुम्ही पाहताच आवडलात म्हणून तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे." नाथ.

"तुम्हाला माझ्या बद्दल काय माहिती आहे ?" अनन्या

"मला तुमची संपूर्ण माहिती प्रीतभाभि कडून कळली आहे" नाथ.

"तरी देखील तुम्हाला अजून काहीही माहिती हवी असल्यास मला विचारा म्हणजे तुम्हाला जर पुनर्विचार करायचा असेल तर करू शकता" अनन्या.

"मला तुझ्याबद्दल मिळालेली माहिती माझ्यासाठी पुरेशी आहे आणि माझा निर्णय पक्का आहे." नाथ.

"ठीक आहे, जसी तुमची ईच्छा, पण मला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत". अनन्या.

"नन्या तुला जे काही बोलायचं आहे ते अगदी खुशाल बोल, कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट विचार" प्रीत.

मध्येमध्ये मां सर्व समजत असल्याप्रमाणे हं हं अस करत होत्या. अनन्याला थोडं बर वाटल, कारण ती एखाद्या पोक्त, वडीलधारया माणसा प्रमाणे सर्व गोष्टी एकटीच विचारत होति. ती थोडीसी खाकारली आणि पुन्हा विचारांची जुळवा जुळव करत बोलू लागली.

" हे पहा मी वयाने लहान आहे, नुकतीच सज्ञान झालीय. माझ सख्ख अस बहिण सोडली तर कोणीच नाहीय, त्या मुळे लग्नाचा कोणताही खर्च आमच्या कडून करता येणार नाही, अगदी दीदी – जीजुनी करायचं म्हटलं तरी मी तो करू देणार नाही ". अनन्या येवड बोलून उत्तरासाठी थांबली.

नाथ नि एकदा मां आणि नंतर प्रीतकडे पाहिलं. प्रितने मां ना ते बोलण हिंदीत सांगितले. मां नि हिंदीत उत्तर दिल " मुलगी चांगली आहे ना, प्रीतची ओळखीची आणि मैत्रीण पणआहे, नाथला आवडलेली आहे मग आम्हाला दुसर काही नको जो काही खर्च होईल तो आम्ही करू, पण लग्नाला तुझ्या दिदीची आणि जीजुंची समंती हवी" अनन्याने मा मां डोलाविली आणि ती पुढे बोलू लागली.

"तुमची स्वतःची असी काहीच मिळकत नाहीय अस मला वाटत, मग आपला संसार कसा चालणार ?" अनन्या.

"मी घरच्या व्यवसायात मदत करतो त्याचा काही हिस्सा मला मिळतो आणि मी स्वतःचा स्वतंत्रपणे व्यवसाय करायचादेखील प्लान आखतोय जो नक्कीच काही महिन्यात तडीस जाईल, आपला दोघांचा संसार आणि हे घर संभाळण्यासाठी लागणारा पैसा मी नक्कीच कमवू शकतो" नाथ.

"ते तुम्ही कराल असा मला विश्वास वाटतो, दुसरी गोष्ट असि कि आपलं लग्न झाल्यावर ईतकी माणस या घरात एकत्र राहाण खूप कठीण जाणार आहे, मला एकत्र राहण्याबद्दल ना नाहीच, पण नंतर येणाऱ्या एकंदर परिस्थितीचा विचार करता आपण स्वतःच्या घराचा काही विचार केला आहे का ? कारण तो तुम्हालाच कराव लागणार, बडे भैया आणि प्रीत हे ईथे व्यव्यस्थित स्तीरावलेत आणि त्यांना त्रास देण मला अज्जिबात आवडणार नाही" अनन्या.

अनन्याच्या या अतिशय स्पठ बोलण्याने प्रीत आणि नाथने एकमेकांकडे पहिले. प्रीतला खरोखरच अनन्याचा अभिमान वाटला, तिचे विचार अतिशय रोकठोक आणि परिस्थिती जन्य होते.

"नाही तसा काहीच विचार केला नव्हता, खर म्हणजे मी लग्नाचा देखील विचार केला नव्हता, तुम्हाला पाहिलं आणि तोच विचार डोक्यात राहिला, पण मी या विषयावर बडे भैयाशी बोलेन आणि पुढच्या गोष्टी ठरवता येतील" नाथ.

"ठीकआहे, मी माझ्या दिदिशी बोलेन व त्यानंतर तुम्ही माझ्या घरी रीतसर येवून बोलणी करा. हे बोलताना मात्र नन्याचे गाल आरक्त झाले होते आणि हि गोष्ट प्रीतच्यादेखील नजरेतून सुटली नाही. प्रितने कैलाशनाथकडे पहिले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून जात होता.

"अजून काही विचारायचं असेल तर मी थांबतो, नसेल तर तुम्ही भाभिसी बोलत बसा." नाथ. यावर अनन्या काही न बोलत लाजली मात्र मग प्रीतच म्हणाली.

"कैलाश तू आता निघ आणि बाकीच्या तयारीला लाग आम्हाला आता दोघींना बोलायचं आहे, आतापर्यंत आम्ही फक्त मैत्रिणी होतो आता यापुढे आम्ही जावा – जावा होणार आहोत समजल." प्रीत.

कैलाशनाथ आनंदात निघून गेला. त्या नंतर त्या दोघी खूप वेळ गप्पा मारत होत्या, संद्याकाळ होता होता अनन्या मांना नमस्कार करून आपल्या घरीगेली.

तिकडून आल्यापासून अनन्या सारखा विचार करत होती. आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबर कि चूक ? तसं पाहिलं तर ती कैलाश्नाथांच्या मानाने दिसायला अतिशय उजवी होती. पण का कोण जाने तिला आता स्वतःच अस आपल माणूस पाहिजे होत. दिदिकडे राहाण तिला सारख उपऱ्या सारखं जाणवत होत. मोठ्या बाईंचा तिरकस स्वभाव, दीदींच आपल्या पुरत वागण या सर्वांचा आता तिला मनस्वी कंटाळा आला होता. म्हणूनच कि काय तिने प्रथम आणि स्वतःहून मागणी घालणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय लागलीच घेवून टाकला. आता तिला या सर्व गोष्टी दीदीला सांगून तिची काय प्रतिक्रिया आहे ते पाहायचे होते. दुसऱ्या दिवशी दिदीचा फावला वेळ बघून अनन्याने सर्व घडलेल्या गोष्टी दीदीला सांगितल्या, दीदीने फक्त तो वेगळ्या धर्माचा असल्या बद्दलचा आक्षेप नोंदवला व त्यामुळे तुझ त्याच्या घरी कस निभावणार याबद्दल अनन्याला विचारलं. पण अनन्या आपल्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे दीदीने तिला जीजुंशी बोलून पुढील गोष्ठी ठरवूया असे सांगितले. पाच सहा दिवसांनी दीदीने अनन्याला सांगितले कि कैलाशनाथांना येत्या रविवारी संध्याकाळी घरी बोलावलंय म्हणून सांग. तो निरोप तिने प्रीतला सांगितला.

रविवारी कैलाशनाथ, त्याचा मोठा भाउ आणि प्रीत असे तीन जन अनन्याच्या घरी आले. अनन्यानेच सर्वांची ओळख करून दिली. दीदीने कैलाशला पहिल्या बरोबर नन्याच्या पसंतीचे खूप आश्चर्य वाटले आणि तिला रागही आला तिने हळूच जीजुना आतमध्ये बोलावून घेतले आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर जीजू बाहेर जावून बसले. औपचारिकता पूर्ण झाल्यावर जीजु बोलले " हे पहा मुलगा मुलगी दोघ एकमेकांना ओळखतात व त्यांनीच हे लग्न ठरवलं आहे त्यामुळे तसं पाहिलं तर आमच आता बोलण्या सारख काहीच शिल्लक नाही, पण थोडा अनुभव गाठीशी आहे म्हणून विनंतीवजा सांगतो कि कैलाशनाथानी आपल्या राहण्याचा व्यवस्थित बंदोबस्त करावा मग लग्नाचा मुहूर्त वगैरे ठरविता येईल, बाकी लग्न झाल्यानंतर सर्व एकत्र राहण्यास आमची किंवा आमच्या मुलीची हरकत नाही, पण पुढची तजवीज असावी व घोटाळा होवू नये म्हणून काळजी घेतलेली बरी" जीजू.

कैलाश्नाथांच्या मोठ्या भावाने त्याबद्दल आमची तजवीज चालू आहे असे सांगितले. पण जीजुनी आपली बाजू ठामपणे लावून धरली व राहायचा स्वतंत्र बंदोबस्त झाल्यानंतरच लग्नाची तारीख ठरवता येईल अस सांगितलं.

हे ऐकल्यानंतर कैलाश थोडा खट्टू झाला पण त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. कैलाशला आता अनन्याला पाहिल्या शिवाय, भेटल्या शिवाय अज्जिबात राहवत नव्हते, त्यामुळे त्याने प्रित करवि अनन्याला भेटण्यासाठी व फिरायला जाण्यासाठी निरोप पाठविला. अनन्याने हि गोष्ट दीदीला सांगितली. दीदीने दुसऱ्या दिवशी तिला सांगितले कि आपण तुझा साखरपुडा लगेचच उरकून घेवू मग तुम्ही भेटू व फिरू शकता म्हणजे आजूबाजूच्या लोकांना काही चर्चेचा विषय राहणार नाही. त्यानंतर अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा समारंभ उरकून अनन्या व कैलाश अधेमध्ये भेटू लागले. कैलाश तिची खूप काळजी घेत असे व बोलता बोलता सुखी संसारची स्वप्ने दाखवत असे. अनन्या त्याला घराच कुठपर्यंत आलंय, नोकरीच आणि धंद्याच कस काय चाललय याबद्दल विचारत असे.

शेवटी एकदाच कैलाशने त्याच्या वडिलांच्या व मोठ्या भावाच्या मदतीने ठाण्याच्या पुढे असणाऱ्या कळवा, ठिकाणी एक वन रूम किचन घर घेतलं. आणि त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात त्या दोघांच लग्न झाल.

लग्न अगदी छोटेखानी समारंभात झालं. त्यानंतर कैलाशच्या घरी पंजाबी पद्धतीन स्वागत समारंभ झाला. त्यावेळी मात्र अनन्याची खूपच तारांबळ उडाली. सर्व वयस्कर माणस त्यांच्या बोली भाषेत बोलत होती व तिला देखील त्याच भाषेत काही प्रश्न विचारात होती. त्यावेळी प्रीत किंवा तिच्या सासूबाई मदतीला धावून येत होत्या. त्यांच्या पाहुणचाराच्या पद्धती, रिती सर्व काही सांभाळता सांभाळता अनन्याला अगदी नको जीव झाला. तरी पण पतीसुखाच्या आणि संसाराच्या कल्पनेने अनन्या अतिशय आनंदित झाली होती.

सुरवातीचे काही दिवस व महिने खूप घाई गडबडीचे, आनंदाचे गेले. नातेवाईकांच्या गाठी-भेटी, लग्नानंतरचे रिती रिवाज, पाहुणे रावले त्यांची उठबस, त्याचा पद्धती, जेवण खाण शिकणयात सुरुवातीचे पाच सहा महिने कसे गेले ते कळलंच नाही. या दिवसांमध्ये प्रीतची तिला सख्या: बहिणी पेक्ष्या जास्त मदत झाली. येवड्या दिवसांमध्ये तिला कैलाश देखील खूप जपायचा व समजावून घ्यायचा. पण सर्वात तिला कुतूहल आणि आनंद वाटल ते कैलाशच्या आईच म्हणजे तिच्या सासूबाईनच, त्या अतिशय प्रेमळ आणि समुजुतदार होत्या. त्यादेखील अनन्याला खूप गोष्टी आपल्या मुलीप्रमाणे समजून सांगायच्या. विशेषत: त्यांच्या पद्दतीच सर्व प्रकारच जेवण बनवायला त्यांनी अनन्याला शिकवलं.

आणि तिला एक गोष्ट खटकणारी आढळली ती म्हणजे कैलाशनाथांचे मित्रांमध्ये जास्त रमणे. जेव्हा जेव्हा विशिष्ट काम नसेल, दुपारी जेवण झाल्यावर, रात्री जेवण झाल्यावर कैलाश तासंतास मित्रांबरोबर गप्पामारत, विनोदकरत, सिनेमावर चर्चा करत बसलेला असे.

याच दिवसांत एक आनंदाची बातमी सगळ्यांना समजली. प्रीत ला दिवस जावून आता चार महिने होत होते. अनन्याला देखील खूप आनंद झाला. पण त्याच बरोबर ती सध्यस्तीतीचा देखील विचार करू लागली. अगोदरच घर लहान, त्यात हि सर्व मिळून पाच मोठी माणसे अतिशय दाटीवाटीने राहत होती. दिवसाच काही विशेष जाणवायच नाही, पण रात्री खूप त्रास व नवीन जोडप्याला तर जास्त मनस्ताप व्हायचा. मग अनन्याने पहिल्यांदा प्रीतसी सविस्तर चर्चा केली नंतर ती त्याच दिवशी रात्री कैलाशशी बोलली. तिच्या मते आता त्यांनी त्यांच्या नवीन घरी रहायला जायला पाहिजे जेणे करून प्रितला व नवीन बाळाला या घरात त्रास होणार नाही. सुरीवातीला कैलाशने खूप आढेवेडे घेतले व प्रश्न उपस्तीत केले पण त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अनन्याने दिल्यामुळे त्याला काही पर्यायच उरला नाही. सरते शेवटी हि गोष्ट मां च्या कानावर घालायची वेळ देखील अनन्यावरच आली. त्यानंतर पुढील महिन्यात चांगला दिवस पाहून कैलाश व अनन्या आपल्या कळवा येथील नवीन घरी राहायला गेले.

नवीन घराची घडी बसवण्यात सुरुवातीचे दिवस कसे गेले ते अनन्याला कळलेच नाही. त्यात कैलाशचा हातभार नाममात्र होता. बरेच वेळा तो जो सकाळी बाहेर निघे ते सायंकाळी उशिरा घरी परते. या वेळेत अनन्याला सर्व घर अगदी खायला उठे. ती केव्हातरी आठवड्यातून एकदोन वेळा प्रितला भेटून येत असे.

त्या दरम्यान तिला कळले कि कैलाश जास्त वेळ त्याच्या मित्रां बरोबर गप्पा – टप्पा आणि सिनेमे पाहण्यात घालवत असतो. हळूहळू तिला कैलाशच्या स्वभावाचा अंदाज यायला लागला. तो अतिशय एककल्ली आणि स्वतःपुरत पाहणारा मनुष्य होता. पुढील चारपाच महिन्यात अनन्याला या सर्व

गोष्टींची पुरेपूर जाण झाली. आणि याच दरम्यान केव्हा तरी घरात आनंदी आनंद झाला. प्रीतने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला. मा ना विशेष करून खूपच आनंद झाला. पुढील तीन चार महिने या सर्व गडबडीत कसे गेले ते कळलेच नाही, या दिवसात अनन्याच्या देखील खूप फेऱ्या मुंबईला झाल्या. सर्व काही सुरळीत झाल्यावर पुन्हा अनन्याला एकट एकट वाटू लागलं. कैलाश जो सकाळी बाहेर पढे तो रात्री दहा – अकरा ला पुन्हा घरी येत असे. अस्याप्रकारे कसे तरी वर्ष सरले.

आणि एके दिवसी अनन्याला त्या गोड क्षणांची चाहूल लागली. अनन्याला पोटात ढवळल्यासारख होवू लागलं आणि कोरड्या ओकाऱ्या सुरु झाल्या. त्याच दिवशी रात्री तिने हि गोड बातमी नाथला सांगितली. नाथला देखील आनंद झाला, त्याने तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जावून ये म्हणून सांगितलं. त्याच क्षणी अनन्याच मन खटू झालं तिची अपेक्षा होती कि नाथ देखील तिच्या बरोबर दवाखान्यात येईल म्हणून. दुसऱ्यादिवसी नाथ उठून मुंबईला निघून गेला आणि नंतर अनन्या सर्वघर आवरून जवळच्या स्त्रीरोगतज्ञाकडे जावूनआली. आता तरतिच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. तिनेहि गोड बातमी दुसर्या दिवसी माहेरी जावून सर्वात प्रथम प्रितला सांगितली, ती देखील खूपआनंदी झाली दोघी मैत्रिणी खूप खूष झाल्या. आता अनन्याला स्वतःबरोबर पोटात वाडणाऱ्या बाळाचीदेखील काळजी घ्यायचीहोती. .रात्री नाथ आल्यानंतर जेवणखान झाल्यावर तिने नाथला सरळ सांगून टाकल.

मी माझ्या बाळाला घेवून अशा जागी राहणार नाही. , इथे न चांगली शाळा, न खेळाला मैदान ना चांगली वस्ती आपण परत मुंबईला जावूया. तिचा थोडा कणखर स्वर ऐकून नाथ हो बघूया, उद्यापासून सुरुवात करतो घर बघायला अस म्हणाला.

आणि खरोखरच नाथानेपुढील पंधरादिवसात प्रीतच्याइमारती शेजारी म्हणजेच जुन्या ठिकाणी एक छोटेसे घर नक्की केले.

दिवस, महिने भरभर जावू लागले. प्रीत, मांजी तिचे जास्तीत जास्त लाड पुरवू लागले. अधेमध्ये दीदी देखील येवून जात होती. दीदीने अनन्याचे नाव तिच्याच इस्पितळात दाखल केले. आणि एके दिवशी भल्या पहाटे अनन्याला खूप वेदना होवू लागल्या. नाथाने प्रितला बोलावून आणले आणी दोघांनी मिळून तिला इस्पितळात भरती केले. सकाळी आठच्या सुमारास एका सुंदर गोंडस बाळाला अनन्याने जन्म दिला. प्रितने हि बातमी बाहेर येवून नाथना सांगितली. त्याला खूपच आनंद झाला. त्या दिवशी सर्व घर आनंदाने नाचले. इकडे अनन्या आपल्या इवल्याश्या बाळाकडे टक लावून पाहत होती.

झेलम तासा भरातच घरी आली, पाहते तर काय मम्मी तसीच दारात उंबरठ्याला टेकून उभी आहे.

"अग मम्मा हे काय तू अजून तसीच उभी आहेस, एक तास उलटून गेला आणि मी परत आले सुद्धा".

अनन्या क्षणात भानावर आली, एका तासात तिच्या डोळ्या समोरून मागील पंचेचाळीस वर्षाचा काळ उलगडून गेला होता. पुन्हा ती वर्तमान काळात आली आणि तिला उमगले कि आता तिच्या झेलमचे ही स्वतःचे असे आयुष्य सुरु होणार आणि ती पुनः राहणार एकटी … एकटी …Rate this content
Log in

More marathi story from SANJAY SALVI

Similar marathi story from Tragedy