STORYMIRROR

Nitin Jadhav

Drama Inspirational Others

4  

Nitin Jadhav

Drama Inspirational Others

एक रुपयाची जबाबदारी

एक रुपयाची जबाबदारी

1 min
1

“एक रुपयाची जबाबदारी”

संध्याकाळची बस पाथर्डी आगारातून नगरकडे निघाली होती. गर्दीत वाहक राजेश भो*ले नेहमीसारखं प्रामाणिकपणे काम करत होता.
प्रवासी सुमनताई पा*ल आपल्या आसनावर बसल्या होत्या.

राजेशने विचारलं, “कुठवरचं तिकीट मॅडम?”
त्या म्हणाल्या, “नगर.”

तिकीट दर ₹41 होता.
सुमनताईने फक्त ₹40 दिले आणि म्हणाल्या,
“माझ्याकडे आता एक रुपया नाही, आणि तुम्ही लोक आमचे उरलेले पैसे परत करत नाही.”

राजेशने शांत पण ठाम आवाजात विचारलं,
“मॅडम, तुमच्यासोबत असं किती वेळा झालंय की वाहकाने पैसे परत दिले नाहीत?
किंवा मी कधी तिकिटाच्या दरापेक्षा जास्त रक्कम मागितली आहे का? किंवा बस स्थानकावर उतरल्यावर तुम्ही उरलेले पैसे मागितले आणि वाहकाने दिले नाहीत ❓
बसमधले प्रवासी सगळं ऐकत होते. 
काही क्षण शांततेनंतर सुमनताईने आपल्या पर्समधून तो एक रुपया काढला आणि राजेशकडे दिला.
राजेशने तिकीट देत हसून म्हटलं,

“मॅडम, एक रुपया म्हणजे पैसे नाहीत — पण आमच्यासाठी ती मोठी जबाबदारी आहे.
प्रत्येक रुपया आमच्यासाठी महत्वाचा आहे.
एक रुपयांसाठी माझ्या सहकाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. आम्ही फक्त तिकिटाचे मोजकेच आणि नेमके पैसे मागतो इतर विभागात बघा 20 रुपये झाले की 200 मागतात आणि तुमच्याकडे तेही सुट्टे नसतात तुम्ही त्याला 500 देता आणि वरून बोलता राहुड्या तुम्ही माझं न होणार काम करून दिलं .
मॅडम तुम्हीच सांगा नियम आणि कायद्या पेक्षा कुणी मोठा नाही त्यानुसार न होणार काम होऊच शकत नाही हे तुम्हाला आणि त्यालाही माहिती असत तरीही ❓
वाहक बस मधील प्रवाशांना हात जोडून विनंती करतो कृपया एक रुपया सुट्टे द्या....
निशब्द......
समाप्त.....
कथा काल्पनिक पण सत्य वास्तव...
✍️नितीन जाधव 
वाहक पाथर्डी आगार 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama