एक प्रेम कथा
एक प्रेम कथा
एक प्रेम कथा
कॉलेजचा ट्रॅडिशनल डे सोनमनी छान पैकी साडी नेसली होती. छान हिरव्या रंगाची काठ पदाराची रेशमी साडी , तिच्या गव्हाळ वर्णाला उठून दिसत होती.कमरे पर्यंत मोकळे सोडलेले काळेभोर केस, फिकट गुलाबी रंगाची ओठांना लावलेली लिपस्टिक,पण टपोऱ्या डोळ्यात लावलेलं जाडसर काजळ तिची सुंदरता असजूनच वाढवत होत.नाजूक दागिने तिने परिधान केले होते. इतका हलका मेकअप करून सुद्धा ती सगळ्यात उठून दिसत होती. कॉलेज मध्ये मस्त फोटो शूट चाललं होतं. सोनमसुद्धा आपल्या मैत्रिणीसोबत फोटो काढण्यात दंग झाली होती.आधीच कॉलेजचं ते तीच शेवटचं वर्ष होत मस्त एन्जॉय करत होती. कॉलेज मध्ये मुलांनी तिला आग्रह केला मॅडम एक फोटो तरी काढाल का आमच्यासोबत? थोडीशी भांबावत होती ती पण, शेवटी कोणीच कोणाला भेटणार नव्हतं शेवट वर्ष होत.त्याच्या आग्रहास्तव काढला तीन फोटो. सोनमला फक्त मैत्रिणीच, मुलांशी तिचा दूरदूर पर्यंत बोलण्याचा संबंध येत नसे. फक्त एकाच वर्गात असल्यामुळं नॉर्मल हाय हॅलो, किंवा कधी नोट्स देण्याघेणं एवढाच काय तो त्यांच्याशी संबंध यायचा.
थोडीशी बुजरीच होती ती, त्यात मुलखाचा भित्रा आणि लाजरा स्वभाव. आज मस्त मज्जा करत होती सोनम, मैत्रिणीसोबत वेगवेगळे पोज देत फोटो काढत होती.अचानक सोनमचा मोबाईल वाजला, हॅलो जरा दबक्या आवाजातच सोनम बोलत होती, मैत्रिणी तिच्या कडे बघत काहीतरी हावभाव करत चिडवत होत्या.तीच अर्ध लक्ष फोन मध्ये न अर्ध मैत्रिणीकडे होत. जरा लांब जाऊन सोनम बोलायला लागली, हहह हॅलो बोल ना काय? अगदी हळू आवाजात हम्म हो एवढाच काय ते बोलत होती.फोन ठेवून सोनम मैत्रिणीकडे वळली. ग्रुप मधून आता बॉय फ्रेंड चा कॉल का?कोण होता?असे ध्वनी ऐकू येत होते. राधाने हसत ,चिडवतच विचारलं कोणाचा ग सोनम कॉल होता? अग त्याचा होता, प्रसादचा. काय म्हणत होता ग सोनम तो? अग काही नाही , आता भेटायचं म्हणतोय, काय करू काळातच नाही?जाऊ की नको?आणि तुम्ही म्हणताय तस तो काही माझा बॉयफ्रेंड नाही, साधा फ्रेंड पण नाहीये तो माझा.
अग आधी भेटून बघ तू ? कश्यासाठी बोलावत आहे. बरं भेटून बघते मी, मैत्रिणींचा निरोप घेऊन सोनम लगबगीनं गेली. कॉलेजच्या जवळच्या बस स्टॉप वर त्याची वाट बघत उभी होती. प्रसाद आणि सोनमची पहिली भेट एका लग्नात झाली. तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा होता तो. देखणा, रुबाबदार, गोरापान ,उंच तितकाच हसरा आणि बोलका. सोनमच्या बाबांनी दोघांची ओळख करून दिली,लहानपणी दोघेही एकत्र खेळलेले पण तरीही सोनमला त्याच्याशी बोलताना अवघडायला झाल होत. तरीही तो तिला बोलकं करत होता, अबोल व्यक्ती पण त्याच्याशी बोलेल असाच होता तो.त्या दिवशी चक्क त्यानं तिच्याशी मैत्रीचं केली, मैत्रीचा हात पुढे करताना सुद्धा सोनम चाचरत होती. शेवटी न राहवून सोनमच्या बाबांनीच त्यांची मैत्री करून दिली, एवढच काय तर तिचा नंबर सुद्धा त्याला दिला.
त्या दिवशीची सगळी घटना सोनम आठवत होती, आज अचानक प्रसादने का भेटायला बोलावलं असेल?ह्याचाच ती विचार करत होती.एक तास होऊन गेला तरी हा अजून कसा आला नाही? ह्याचाच ती विचार करत होती.कॉल करावा तर तो फोन उचलत नव्हता, बहुतेक गाडी वर असेन. विचारात सोनम पूर्ण गढून गेली होती,अचानक गाडीच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाने ती भानावर आली. कुठं हरवली होतीस सोनम. कुठे नाही?अरे ,असं अचानक भेटायला आलास काही काम होत का? अग सहज आलो भेटायला ,यायला नको का? अरे तस काहीही नाही मी सहजच विचारलं.
आज मी भेटायला येतोय म्हणून साडी घातलीस की काय? बाय द वे छान दिसतेस साडीत. मला तर तू पसंत आहेस. प्रसादच्या बोलण्यानं सोनमला जरा अवघडल्यासारखाच झालं. अरे तस काही नाही आज कॉलेज मध्ये ट्रॅडिशनल डे होता म्हणून तुला वाटतंय तसं काहीही नाही. अग सोनम मी गंमत करतोय, किती बावरतेस. बरं बस मागे कुठेतरी कॉफी प्यायला जाऊ. नको नको इथे आमच्या कॉलेज जवळ कॉफी शॉप आहे, तिथेच जाऊ आपण.प्रसादने तिचं म्हणणं मान्य केलं, तिला बहुदा ओकवर्ड वाटतं असेल. चला मॅडम दाखवा तुमचं फेमस कॉफी शॉप. दोघांचीही पाऊलं कॉफी शॉप कडे वळली. कॉफी ऑर्डर करून सुद्धा सोनम बराच वेळ शांत होती.प्रसाद एकटाच बडबड करत होता. त्याच्या बोलण्यात सोनम जणू गुंगच झाली, त्याची बडबड तिलाही आवडू लागली. अग केव्हाच मीच बोलतोय , तुही बोल काहीतरी? अरे तू इतका छान बोलतोयस की ऐकत राहावंसं वाटतंय. सोनमच हे उत्तर जणू त्याला अपेक्षितच होत. त्याला पुढे काय बोलावं सुचेना? खूप उशीर झालाय मला निघायला हवं प्रसाद, अग मी सोडतो ना तुला. नको जाते मी , आणि खूप छान वाटलं प्रसाद तुला भेटून. मला सुद्धा छान वाटलं आणि सोनम निघताना नेहमी येते म्हणावं जाते नाही. सोनमच्या चेहऱ्यावर आता हसू होत, बरं तर येते मी प्रसाद. दोघांनाही एकमेकांना निरोप दिला,सोनमची पाऊलं घराकडे निघाली.
रोजच्यापेक्षा सोनमला घरी जायला उशीरच झाला होता. तरीही आज कसलीही चिंता तिला नव्हती, आज का कोणास ठाऊक तीच मन आनंदी होत. आई उशीर झाला म्हणून रागवेल हा सुद्धा विचार तिच्या मनात नव्हता. सोनम घरी पोहचताच आईने प्रश्न केला, सोनम आज लेट का ग झाला? मित्र मैत्रिणीसोबत कुठे बाहेर गेली होतीस का? अग तस असेल तर फोन करून कळवायच ना.अग आई आज कॉलेज मध्ये प्रसाद आला होता,सहज म्हणून भेटायला. म्हणुन उशीर झाला. आणि तो घरी सोडतो म्हणाला पण मीच म्हणाले नको म्हणून.ओहह प्रसाद आला होता का?म्हणून मॅडम खूष आहेत वाटतं. काय ग आई काहीतरीच असतं तुझं?तस काहीही नाही. बर फ्रेश हो मी काहीतरी खायला करते. सोनम आपल्या खोलीच्या दिशेनी वळली. मनातल्या मनात आई सुद्धा ना , काहीही वाटत तिला.
आजचा दिवस खूप छान होता, प्रसादशी बोलून खूप छान वाटतय. पण मी आज अस नव्हतं भेटायला पाहिजे होत त्याला, त्याला वाटलं असेन तो भेटायला येणार म्हणून मी साडी घातली असेल.सोनमच्या डोक्यातून काही केल्या ही गोष्ट जात नव्हती.रात्रभर नुसता तोच विचार तिच्या मनात घोळत होता. सकाळी फोनच्या अलार्म ने सोनमला जाग आली.सकाळी गुड मॉर्निंगचा प्रसादचा मेसेज आला होता, अपेक्षितच होत तिच्यासाठी ते. न राहून तिने सुद्धा लगेच रिप्लाय दिला.असे आता रोजच त्यांचं मेसेज वर बोलणं होत होत.कधी कधी भेटणं सुद्धा होत होत.त्यांच्यातील मैत्री आता वाढत होती. सोनमला आता एक मित्र मिळाला होता, त्याच्याशी बोलताना ती सगळं टेन्शन विसरून जात होती. त्याच्याशी बोललं की तिला एकदम रिलॅक्स वाटायचं.तो होता सुद्धा तसाच अगदी बोलका, मनमोकळा, निखळ, आनंदी. तिच्या मनात काय चाललंय तो एक क्षणात ओळखायचा. मैत्रिणीपुढे पण सतत सोनमच्या मुखी प्रसादच नाव असायचं. तिचं ते बदलेल वागणं सगळ्यांच्या लक्षात येत होतं. कधी कधी तर तिला तिच्या मैत्रिणी प्रसादच्या नावाने चिडवत. तिला राग यायचा त्यांचा, अग तो माझा फक्त चांगला मित्र आहे बाकी काहीही नाही. तुम्हाला काहीही वाटतंय. सोनमच्या नजरेत मैत्री होती ही गोष्ट ठीक होती, पण हे नातं मैत्रिपेक्षा जास्त आहे हे तिला समजत नव्हतं. तिच्या आजूबाजूला असणाऱ्यांना मात्र ते जाणवत होतं. प्रसादच्या मनात पण सोनम बाबतीत मैत्रिपेक्षा जास्त काहीतरी होत, कधी कधी तर कळत नकळत ते तो बोलून ही दाखवायचा. तिला राग येईल म्हणून अग मी गंमत करतोय म्हणून ती गोष्ट टाळून द्यायचा. त्याला सोनम तर अगदी पहिल्या भेटीतच भावली होती, तीच अस अबोल,अव्यक्त स्वभाव त्याला खूप आवडायचा. तिचा तो लाजराबुजरा चेहरा,तिच ते साध राहणीमान, मेकअप विना चेहरा फक्त तिच्या त्या कामलाक्षी डोळ्यांना लावलेलं ते जाडसर काजळ त्याला खूप भावायच. कधी कधी तर तिच्या डोळ्यात तो बुडून जायचा पण लगेच स्वतःला सवारायचा.
एके दिवशी अशीच सोनम आपल्या खोलीत रंगीत खडू, वॉटर कलर सगळं समान घेऊन काहीतरी करत बसली होती.आपली ताई केव्हाची घरी आली ह्याकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं. आई आज किती दिवसांनी मी माहेरी आले आहे, सोनम कुठे गेली का? अग ती तिच्या खोलीतच आहे . मग एव्हाना बाहेर कशी नाही आली अजून, नेहमी मी येताच ताई ताई करणारी सोनम आज बाहेरच आली नाही. आई मीच जाते तिच्या खोलीत बघते मॅडम एवढ्या बिझी कशात आहेत. ताई सोनमच्या खोलीकडे वळली, सोनमच्या पाठमोरी जाऊन उभी राहिली. सोनमची इतकी तंद्री लागली होती की मागे कोणी तरी आहे ये सुद्धा तिच्या लक्षात नव्हतं.
ताई नक्की सोनम काय करते? हे पाहत उभी होती. छान पैंटिंग काढलं होत सोनमने ,ग्रीटिंग बनवत होती ती. ते स्वहस्ताने बनवण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. अगदी मन लावून, प्रेमाने ती बनवत होती. अग सोनम किती छान ग्रीटिंग बनवल आहे तू.ताईच्या आवाजाने सोनम एकदम भानावर आली. अग ताई तू केव्हा आलीस? अग ते जाऊ दे ग सोनम, मला सांग कोणासाठी एवढ मन लावून ग्रीटिंग बनवत आहेस? मी आले हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही ह्या ग्रीटिंगमुळे. अग ताई खरच सॉरी तुला वाईट वाटलं का? नाही ग तू आधी मला सांग ना कोणासाठी ग्रीटिंग? सम वन स्पेसिल का ? अग तस काहीही नाही ग, फ्रेंडशिप डे जवळ येतोय ना म्हणून केलाय ग्रीटिंग,प्रसादला देण्यासाठी. ओह ओह प्रसादसाठी का? वा वा मस्त खूप. सोनम खरं सांग "यु आर फोलिन इन लव्ह" नाही ग ताई तस काहीही नाही.तुम्हाला सगळ्यांना उगाचच अस वाटतंय. अग सोनम मला आई बाबांनी प्रसाद बद्दल सांगितलं आहे.त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ,तू सांग तुला बरं तुला खरच काही वाटतं नाही का? तुला समजत नाही पण सगळ्यांना कळतंय सोनम. तुझ्या मनात त्याच्या बद्दल जे भाव आहेत, ते मैत्रीच्या पलीकडचे आहेत.ताई बर सोड, मला असं वाटलं तर मी नक्की तुला सांगते. ताईला नक्की काय बोलावं सुचेना? फक्त सोनमकडे पाहत होती,तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला,तिच्याकडे बघून हसली न खोलीतून निघून गेली.
असाच एकदा प्रसाद सोनमच्या घरी आला. सोनमच्या आईने त्याचा छान पाहुणचार केला. सोनमच्या बाबांशी त्यानं मनमुराद गप्पा मारल्या. काका काकू मी मुद्दामच आज येथे येन केलं आहे.मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, माझं सोनमवर खूप प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे अर्थात तुमची परवानगी असेल तर. आम्हा दोघांची काहीही हरकत नाही प्रसाद, तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करत असाल तर. खर तर काका मला तिच्या मनातलं नक्की काय चालू तेच कळत नाही. तिच्या मनात माझ्या बद्दल काही भावना आहेत की नाही? उगाच तिला माझ्यामुळे त्रास नको व्हायला.आमची मैत्री नको तुटायला, मला माझी मैत्रीण गमवायची नाही. अरे प्रसाद गेल्या काही महिन्यांपासून सोनमच्या स्वभावात खूप फरक पडला आहे.तिच्या मुखात नेहमी तुझंच नाव असत, तिचंही प्रेम आहे तुझ्यावर पण तिला ते कळत नाहीये. खरतर ह्यालाच प्रेम म्हणतात हे तिला कळत नाहीये. ती मान्य करेल एक ना एक दिवस. काकू मी तिच्यासाठी आयुष्य भर थांबेन, मी तिच्या होकाराची अखेर पर्यंत वाट बघेन. हे बघ प्रसाद तू उद्या तिला विचारून घे,तुझ्या मनातील भाव तिला सांग. आम्ही आहोत तुझ्या सोबत.
प्रसादला आता सोनमच्या आई वडिलांची साथ मिळाली होती. काहीही झालं तरी उद्या तो सोनमला त्याच्या मनातील भाव सांगणार होता, होता नव्हता तेवढा आत्मविश्वास त्यानं एकवटला होता. सकाळी सकाळी त्यानं सोनमला कॉल केला, आज वेळ आहे का तुला? भेटायचं का आपण? हो भेटू आपण प्रसाद, पण संध्याकाळी चार वाजता आमच्या कॉलेज जवळच्या कॉफे मध्ये. ओके सोनम, मी येतो त्या वेळेत तुला भेटायला.आज प्रसादला कधी चार वाजतात अस झालं होतं.त्याच्या मनात थोडे रोमांच , थोडी भीती होती. छातीत खूप धडधड होत होती, कपाळावर घामाचे बिंदू जमा होत होते, पोटात गोळाच आला होता.सोनमला भेटण्यासाठी तो वेळेच्या आधीच घराबाहेर पडला. वेळेच्या एक तास आधी तो कॅफे मध्ये येऊन बसला , थोडीशी धाकधूक होती मनात, कुठून सुरुवात करायची?कशी करायची?ह्याचाच तो विचार करत होता.
त्याचे डोळे आता फक्त सोनमची वाट बघत होते, एव्हाना चार वाजले सोनम कॅफे मध्ये पोहचली.जसजशी सोनम टेबल जवळ येत होती, तसतशी त्याची भीती आणखी वादात होती.खिशातला रुमाल काढून त्यानं कपाळावर आलेला घाम टिपला. सोनम अग ये बस, आज एवढा लवकर कसा काय आलास तू? अग आताच तर आलो मी, अरे एवढ्या थंडीत किती घाम आलाय तुला? बर वाटत आहे ना तुला? अग प्रवास करून आलो आहे म्हणून घाम येतोय बाकी काहीही नाही.अग तू बस ना , काय ऑर्डर करायचं सांग. कॉफी ..... वेटर दोन कॉफी. अग सोनम कॉलेज कस चालय? अरे आज असा काय प्रश्न विचारत आहेस ठीक चालू आहे कॉलेज. प्रसादमुद्द्याच सोडून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला. दोघांची कॉफी पण आता संपली होती, तरीही तो अजून सोनमला काहीच बोलू शकला नाही. अरे प्रसाद खूप उशीर होतोय निघते मी , सोनम घरी जाण्यासाठी उठली. प्रसादने सोनमचा हात पकडत तिला अडवलं, मला तुला काहीतरी सांगायचं आहे .प्लीज बस ना , सोनमसुद्धा तो काय म्हणतोय ते ऐकायला बसली.
सोनम मी आता तुला जे सांगणार आहे, त्यामुळे सहजच तुला खूप राग येईल माझा.पण तू मला प्रॉमिस कर काहीही झालं तरी तू माझ्यासोबतची मैत्री तोडणार नाही. प्लीज प्रॉमिस कर मला, अरे अस मधेच काय लावलंय तू, ठीक आहे. मी नाही राग मानणार तुझ्या गोष्टीचा, तुझ्यासोबतची मैत्री नाही तोडणार. आता सांग पाहू सगळं.सोनम तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो , तुझं ते गोड हसणं, लाजन, अबोल राहणं ह्याच्या प्रेमातच मी पडलो. तुझं साधं राहणं, तुझ्या गहिऱ्या डोळ्यात मी बुडतच राहिलो. आधी वाटलं हे सगळं आकर्षण आहे का काय? हे कळत नव्हतं. म्हणून मी तुला सतत भेटत राहिलो.जेवढा वेळ मी तुझ्यासोबत घालवला त्या त्या वेळी मी आणखीन तुझ्या प्रेमात पडलो.सोनम खूप वेळ त्याच म्हणणं शांतपणे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. आज पण मसकीरी करतोयस का माझी? नेहमीचंच आहे तुझं? चल गंमत आता पुरे झाली, मी निघते. आग सोनम शपथ मी खर्च सांगतोय गंमत नाही करत मी.तुला काय वाटत आहे माझ्याबद्दल प्लीज सांग? तुला मी नसेल आवडत तरी तू मला सांग? सोनमला मात्र काय बोलावं ते कळतंच नव्हतं , तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षितच होत. तिच्या हातापायाची शक्तीच नाहीशी झाली, हृदयाची धडधड वाढत होती.शेवटी काहीच न बोलता ती निघून गेली.
त्या दिवसानंतर दोघांचा संवादच नव्हता, किती तरी दिवस दोघे बोललेच नव्हते. सोनमला राग आला होता त्याचा पण तसा तो रागही नव्हता. त्याच्याशी बोलल्या शिवाय तिला करमत ही नव्हतं, पण त्याच्याशी काय बोलायचं तेच तिला सुचत नव्हतं. तिच्या मनात नक्की काय चालू हे सुद्धा तिला काळत नव्हतं. तिला नक्की प्रसाद विषयी मैत्रीचे का मैत्रिपलीकडचे भाव आहेत हेच तील काळत नव्हतं. एक महिन्याचा अबोला होता, इतक्या दिवसात तिला कळत होतं , ती त्याच्याशिवाय नाही राहू शकत. पण कसं बोलावं कुठून सुरुवात करावी हेच तिला कळत नव्हतं. असाच एक दिवस प्रसादाचा तिला फोन आला, तिने तो उचलला नाही.खूप सारे फोन कॉल्स, मेसेजेस ह्याचाही उत्तर तीन दिल नाही. त्या दिवशी रात्री तिच्या बाबांनी तिला सांगितलं अग सोनम प्रसाद उद्या हे शहर सोडून जातोय. त्याला नोकरी लागली दुसऱ्या शहरात, तुला त्याला सोडायला स्टेशन वर जावं लागेल. अहो बाबा पण तुम्हाला कसं कळलं? अग त्याचा फोन आला होता .तुला नाही आला का फोन? सोनमला स्वतःचा खूप राग येत होता, मी खूप उशीर तर केला नाही ना? मलाच मेली ला समजलं नाही माझं त्याच्यावर प्रेम ते.कस कळलं नाही मला. सोनमने धीर एकवटून प्रसादला कॉल केला , मला भेटायचं तुला? तुला वेळ आहे का रे? अग सोनम खूप लवकर वेळ मिळाला तुला,बाय द वे मला पॅकिंग करायची उद्या सी ऑफ करतेस ना तेव्हा भेट होईलच की.ओके बाय मला खूप काम आहेत.उद्या भेटू आपण.
प्रसादच असं वागणं तिला अपेक्षितच होत, बरोबरचे म्हणा माझच चुकलं.मी त्याला एवढ इग्नोर नव्हतं करायला हवं होतं.सकाळी सोनम लगबगीनं उठली, न थेट प्रसादाच्या घराकडे निघाली.प्रसादसोबत स्टेशनच्या रस्त्यानं दोघे जाऊ लागले. गाडी स्टेशनच्या दिशेने वळत होती,दोघांचा अबोला मात्र कायम होता. दोघांचे डोळे मात्र एकमेकांशी खूप बोलत होते.जसजसं स्टेशन जवळ येत होतं, तसतसं दोघांच्या मनात काहूर माजत होत.गाडी स्टेशन जवळ आली,प्रसाद आपलं समान गाडीच्या डीक्कीतून बाहेर काढत होता.सोनम मात्र गाडीतच बसली होती,आता तरी मॅडम बोलणारेस की नाही माझ्याशी ऍट लीस्ट एक मित्र म्हणून तरी बोलणार नाहीस का? आता मी या शहरात कधी परत येईन हे पण मला ठाऊक नाही. सोनम गाडीच्या बाहेर आली, मोजक्याच शब्दात त्याच्याशी बोलत होती.प्रसाद काळजी घे, नीट जा. बोलता बोलता त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली काळजी घे.तू सुद्धा सोनम काळजी घे,म्हणत प्रसादने आपला हात तिच्या हातावर ठेवला. निरोप देताना एकमेकांचा हात हातातून सुटत होता.प्रसादचा हात निसटत असताना सोनमला कळलं आपल्या हातातून काहीतरी निसटून जात आहे,तिला ते पकडायचं.जणू शरीरातून प्राणच निघून जात आहे.तिला आतापूर्ण कळलं होतं त्याच्याशिवाय ती राहूचं शकत नव्हती. तीच खूप प्रेम आहे त्याच्यावर पण ते उमगायला खूप उशीर झाला तिला. प्रसाद बाय म्हणताच ती भानावर आली, तिच्या डोळ्यातील अश्रू आता अनावर होत होते.पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रसादकडे ती एकटक बघत होती. अचानक तिच्या मध्ये एक जणू एक अनुभूतीचा संचारली. सगळा धीर एकवटून ती जोरात प्रसादाच्या दिशेने धावत सुटली. पाठमोऱ्या प्रसादाचा हात तिने पटकन पकडला, प्रसाद प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नकोस. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, मला समजायला खूप वेळ लागला. प्लीज ह्याची शिक्षा मला तू देऊ नकोस. माझ खरचं खूप प्रेम तुझ्यावर,मी तुझ्याशीवाय नाही राहू शकत. मला अंतर देऊ नकोस.बोलता बोलता त्याच्या मिठीत शिरली आणि खूप रडली.प्रसाद मात्र शांत धीरगंभीर होता. त्यानं सोनमच्या डोक्यावर हात ठेवतं, तिला शांत केलं.अग वेडाबाई तुला हे उशिरा का होईना कळलं हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी.माझही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि शेवट पर्यंत तुझ्यावरच राहणार.आणि सोनम तुला एक गोष्ट सांगू का? मी कुठेही जात नाहीये, तुझ्या मनातलं ओठावर आणण्यासाठी मी हे नाटक केलंत. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुझं तुलाच कळावं .सोनम हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती,तिला तीच पाहिलं प्रेम आज मिळालं होतं. दोघंही हातात हात घेऊन सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायला घराच्या दिशेने वळाले.

