Sudarshan Suryatal

Romance

3.6  

Sudarshan Suryatal

Romance

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा

3 mins
3.3K


आज मी एका गडबडीत आहे,कारण माझा आज वाढदिवस आहे,मी कामावरुन आज थोडं लवकरच आलोय। रोज ती मला CST वर मला भेटते ना.आणि मग आम्ही तेथुन मुंबईच्या एका समुद्रकिनार्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो... ती एक अकांउटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मॅकेनिकल इंजिनियर असल्याने मी ही याच वेळेत रीकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो तेव्हापासुन आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी CST वर पोहोचलोय,रेल्वे अशी समोर येऊन थांबली,आज तिला प्रपोझ करायचं हे आधीच ठरवलं होतं मी,रेल्वेतुन उतरताना मी तिला पाहीलं आज तिला पाहताच जीव खालवर होत होता भीतीने,तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छ आणला होता,ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छ देत म्हणाली, Many many happy Returns of the day Mahadev.... मी तिला म्हणालो,थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं त्यात,आपण कॉलेज फ्रेंडस आहोत ना,मग असं थँक्स म्हणायचं नाही हं ...

मीः हो....मला तुला काही विचाराचंय.....

तीः हो मग विचार ना...

तोः पण मला पहीला तु वचन दे की काही झालं तरी तु माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तु जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील,अरे आज तु असं का बोलतोयस....

तोः ते कळेल तुला पण पहीला मला वचन दे....

तीः बरं दिलं वचन.... मी काही झालं तरी भेटत राहीन तुला

तोः ठीक आहे,विचारतो हा गुच्छ तुझ्या हातात धर,मी गुच्छ तिच्या हातात दिला आणि,मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला,आणि तो दोन्ही हातात धरुन मी पुढे केला आणि म्हणालो,तु मला कॉलेजमध्ये असल्यापासुनच आवडायचीस,पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगु शकलो पण आता सांगतोय,माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे,काय तु माझं प्रेम स्वीकारशील त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला,अरे महादेव हे फुल घेऊन तु ईथे काय करतोयस...? माझा 3rd year मधला एक क्लासमेट सतीश तिथे आला होता,कदाचित तो खुपवेळ आमच्याकडे बघत असावा,अरे मी तर ईथे हिला.... (मी जिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हतं)अरे ईथेच होती ती कुठे गेली...... माहीत नाही रे... तो म्हणाला OK ठीके ठीके ठीके... शांत हो बस इथे...

मीः का..?

तोः सांगितलं ना एकदा मी बस म्हणुन...

आलोच मी, (तो थोडा वेळ कुठेतरी गेला,माझी नजर तिलाच शोधत होती,ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो,त्याने मला CST च्या एका कोपर्याला नेलं,तो म्हणाला हे समोर जे लिहीलंय ते एकदा वाच,तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांची लिस्ट होती,आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचुन माझे डोळे पाणावले,मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं,यांवर माझा विश्वासच बसत नव्हता,मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन रडु लागलो त्याने मला सावरलं आणि तो बोलु लागला.. मी एक प्सायकॅट्रीस्ट आहे महादेव,आणि मघाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघुन मला तु मनोरोगी असल्याचा संशय आला... म्हणुनच तर तुला मी तिथे बसवुन,इथल्या काही अधिकर्याँकडेतुझी चौकशी केली,त्यांनी मला सांगितलं कि तो वेडा आहे,आणि रोज ईथे येत असतो... त्या बाजुच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं कि तीन वर्षापुर्वि तु जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास,तेव्हा अचानक एका मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटुन,भिंतीत घुसली,त्यातुन रक्ताच्या एका थेँबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरुन(its written by ek priyakar)कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटुन न जाता त्या मुलीच्या हृदयातुन आरपार गेली होती,तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता,दहशतवाद्यांनी CST वर केलेल्या हल्यात तुझ्या समोर,तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले... याचा तुला मोठा धक्का बसला,आणि तेव्हापासुनच तुला वाटतंय की ती जीवंत आहे,आणि तुला दिलेलं वचन ती ईथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटतंय.... सतीशने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो... जेव्हा मला जाग आली,..तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो,सतीश तिथे आला आणि त्याने मला बेड टी देऊन मॉर्निँग विश केलं अण तो म्हणाला आजपासुन तु वर्षभर ईथेच राहुन माझी ट्रिटमेँट घेशील,पुर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथुन जाऊ देणार नाही मित्रा मी होकारार्थी मान हलवली,कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातुन बरं करु शकतो.... आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे... तेच गुलाबाचं फुल घेऊन..,नाही तसं काही नाहीये मी पुर्ण बरा झालोय ....नाही मला माहीती आहे ती आज येणार नाही.... आज तिचा स्मृतीदिनआहे, हे फुलतर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलंय एक आठवण(१८1) म्हणुन......


◆ स्वलिखित: सुदर्शन सूर्यतळ ◆



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance