Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Aniket Kotkar

Tragedy

5.0  

Aniket Kotkar

Tragedy

दुष्काळ एक मोठी समस्या

दुष्काळ एक मोठी समस्या

1 min
4.1K


 दुष्काळ आज आपल्यासमोर एक भीषण समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केले पाहिजे. दुष्काळ म्हणजे काय - दुष्काळ म्हणजे खूप जास्त पाऊस पडणे,पाऊस न पडणे,पावसाची कमतरता,पाण्याचा तुटवडा किव्वा एकदमच खूप जास्त पाऊस पडून धरणे,नद्या अतिप्रमाणात वाहने यालाच दुष्काळ म्हणतात.

  दुष्काळाचे दोन प्रकार पडतात - मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित.

  मानव निर्मित दुष्काळात पाण्याचा अतिवापर,झाडे कापणे ही भूमिका मानव निर्मित दुष्काळात येते.तसेच निसर्ग निर्मित दुष्काळाचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगितले जाते.पण दुष्काळाचे मुख्य कारण नैसर्गिक आहे हा आपला चुकीचा समज आहे.आजसुद्धा आपल्याला दुष्काळा सारख्या संकटाशी झगडावे लागत असेल तर हे चुकीचे आहे.

  ही एक मोठी समस्या असून ती आपल्यालाच घालवायची आहे हे लक्षात घेऊन आपण पुढचे पाऊल टाकले पाहिजे. प्राचीन काळात ही अनेकवेळा दुष्काळ पडले.सतत ३ वर्षांपासून १२वर्षापर्यंत दुष्काळ पडलेल्या नोंदी आहेत.दुष्काळ नैसर्गिक आहे पण त्यापासून पोहोचणारी झळ मानवनिर्मित आहे.त्यामुळे माणसानेच जपून पाऊल उचलले पाहिजे.तसेच २०१६ मधे लातूर महानगरपालिका असलेल्या शहराला सुद्धा रेल्वेने पाणी आणावे लागले यालाच दुष्काळ म्हणतात.

  दुष्काळ असलेल्या भागात शेती सोडून दुसरा कोणताही व्यवसाय नाही आणि तेथेच दुष्काळ आला म्हणजे त्यांचे खूप गोष्टींचे तुटवडे भासू लागतात.

  त्यात ओल्या दुष्काळात खूप पाऊस तर कोरड्या दुष्काळात खूप तापमान. सद्ध्या परतीच्या पावसामुळे यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांत पिके अक्षरशः वाहून गेले आहेत.यात शेतकरी राजाची चूक तरी काय.पण तरी सर्व समस्या त्यालाच सोसाव्या लागतात. म्हणून दुष्काळ ही एक मोठी समस्या आहे.

    


Rate this content
Log in