माझे बालपण
माझे बालपण


सध्याच्या परिस्थतीत सुखाचे कारण शोधायचे असेल तर फक्त कष्ट आणि जिद्द असावी लागते पण माझ्या लहानपणी मी सुखाचे कारण कशातही शोधायचो.लहानपण किती छान होत ना.हा प्रश्न करताच मनात एक ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा आपल्याला त्या लहानपणा कडे ओढून घेऊन जाते.असेच होते माझे बालपण.
मी ही सगळ्यां सारखा शाळेत जायचो पण मी घरात एकुलता अक असल्यामुळे मला गावाच्या शाळेत टाकले नाही तर मोठ्या उम्मिदिने तालुक्याच्या शाळेत टाकले मी रोज प्रवास करायचो.ईयत्ता १ ली ते ५ वी मी रिक्षांवर जायचो जशी जशी समज आली तशी तशी मग बस ने जायला लागलो कारण फक्त एक,की बस ने पैसे कमी लागायचे आणि महिन्याचा पास असायचा.पण ते दिवस खूप छान होते.ना कसले टेन्शन असायचे,ना कसले समजूतदारपणा मनाला आले ते वागायचे चुकलो की घरचे हात धरून मागे लागायचे त्या हात धरून मागे लागण्यात पण एक वेगळीच मज्जा होती.त्यातूनच खूप काही शिकायला भेटलं.त्यात बालपणात आई हा शब्द मनात एवढं कोरला गेला होता की आई म्हणतात सर्व दुःख नाहीसे व्हायचे. शाळेत पण खूप मज्जा यायची.ती मित्रांची जुगलबंदी, हसवने,हसतमुख राहणे एकमेकांना मदत,खोडकरपणा हे सर्व एकमेकांना आम्ही बघायचो त्यातूनच आम्ही खूप शिकलो. शाळेतून घरी जायचो तेव्हा आई आयता जेवण तयार करून ताट तयार असायचे.आणि मी ज्या वेळेस शाळेतून यायचो त्याच वेळेस माझी आईच्या हातच चविष्ट जेवण तयार असायचे. काय ते बालपणा चे वेळ नीटनेटकेपणा,ना टेन्शन कशाचे खूप छान होते ते दिवस.
आता कोणी विचारले ना की तुमचे बालपण कसे होते तर आनंदात सांगतो आईविना अशक्य होते!