स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा


स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून - स्त्री ही तेवढीच साहसी आहे जेवढे की पुरुष. स्त्री हा एक खूप मोठा प्रवास आहे. स्त्री या विषयावर बोलायचे ठरल्यास कोणीही पूर्णपणे बोलू शकत नाही. नऊ महिने पोटात ठेवणे, त्याची काळजी घेणे त्याला शिकवणे त्याच्यासाठी पैसे जपून त्याला कधीही काहीही कमी पडू नये म्हणून धडपड करणे तसेच हेच नाही तर ती घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते. कोणी रुसणार नाही ह्यावर लक्ष ठेवते कधी स्वतःला कमी पडलं तर बोलणार नाही पण कधीच दुसऱ्याला कमी पडू देणार नाही, अर्थात स्वतः अर्धी भाकरी कमी खाईन पण घरच्यांना पोटभर जेऊ घालेन, असे व्यक्तिमत्व म्हणजेच स्त्री.
सध्याच्या जगात पुरुष जेवढं काम करतो तेवढंच डोक्याला डोकं लावून काम करणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. आज
कुठल्याही क्षेत्रात जा त्या ठिकाणी स्त्री उत्साहात काम करताना दिसेल.
राणी लक्ष्मीबाईच्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व खजिना लुटला होता. याच कारणामुळे राणी लक्ष्मीबाई झासीचा किल्ला सोडून झासीच्या राणीमहालात जावं लागलं. त्याचवेळेस राणी लक्ष्मीबाईंनी हिम्मत न सोडता कोणत्याही परिस्थितीत झासीची रक्षा करण्याचा निर्णय घेतला. तसेच कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, कमला नेहरू,
कल्पना चावला, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, चांदबिबी, कॅप्टन प्रेरणा माथुर, सावित्रीबाई फुले, ताराबाई अशा अनेक थोर महिला झाल्यात त्या आपल्या जगाला खूप काही देऊन गेल्यात.
अशा थोर प्रेरणादायी स्त्रियांना माझा शतशः प्रणाम!!!