Aniket Kotkar

Others

3  

Aniket Kotkar

Others

नातं मैत्रीचं.

नातं मैत्रीचं.

2 mins
1.0K


 नात म्हटलं,की जाणीव आलीच. या नात्याला अगदी झाडासारख जपावं लागतं त्याची काळजी घ्यावी लागते.पण ती एकदा बहरली की आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत ते आपल्याला सावली देतात तसेच नात्याचे ही असते त्यामधले महत्वाचे अद्भुत नाते म्हणजे मैत्री.

     मैत्री ही जीवनातली फार मोठी भूमिका आहे.  नात म्हंटल्यावर त्यात देखील अनेक रूपे असतात काही खूप जवळची,काही बोलकी, अबोलकी,काही परिचित, अपरिचित. नाते हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात .तसेच मैत्री हे नाते आपल्याला सर्व काही शिकवून जाते.

     मैत्री हे असं एक नात आहे की त्यात मी पणा नसतो तर आपुलकी असते,संकटाच्या काळात एकटे न सोडता सोबती असते, मदतीच्या काळात स्वार्थपणा नसून काळजी असते म्हणून मैत्री ही प्रत्येक नात्यात लागू होऊ शकते हीच तर खरी मैत्रीची आपुलकी असते.

    मैत्री या शब्दातच सगळं काही आल. मैत्री आपण किती सहजतेने करतो पण तशीच टिकवून ठेवणे सगळ्यांनाच जमते असे नाही. मैत्रीमध्ये गैरसमज नावाचा मूळ प्राणी असतो तो कधी डीवचला तर मैत्री तुटायला क्षणही लागत नाही पण तीच मैत्री आपुलकीची असेल तर गैरसमज सारख्या प्राण्याला आपण कधी डीवचवूच देत नाही. कारण भावनेशी जोडलेलं नाते म्हणजे मैत्री.

     मैत्री च्या आठवणींमध्ये आपण असे काही रमून जातो काहीच कळत नाही. मैत्रीला कोणत्याही धाग्याची गरज नाही कारण ते बंधन नसून अतूट नात्याची शिदोरी आहे.

   माझ्या मते मैत्रीची व्याख्या द्यायची ठरली तर ती अशी असेल - नात्याची सुंदर झालर ती अगदी कलाकुसरीने विणलेली,कौतकाच आभाळ ते पण पाखरांनी गजबजलेलं, कधी रुसव्याचा काळोख तो पण आपलेपणाचा भाव, सोबत असणारी ..पण आसव पुसनारी, उन्हात पण सावली देणारी. यालाच म्हणतात खरी मैत्री. 

   पण शेवटी मैत्रीची व्याख्या कोणालाच व्यवस्थित मांडता येत नाही,हे मात्र तितकेच खरे!!    

             


Rate this content
Log in