STORYMIRROR

Aniket Kotkar

Others

2  

Aniket Kotkar

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
931


  महाराष्ट्रात,छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शिवबा , शिवबाराजे,शिवराय आणि जाणता राजा अशा अनेक नावांनी ओळखले जातात.महाराजांचा म्हणजेच आमच्या जाणता राजाचा जन्मदिवस हा 'शिवजयंती' म्हणून साजरा होतो. शिवकाल म्हणजेच महाराजांनी ज्या कारकिर्दी लढवल्या त्या काळाला शिवकाल म्हणतात.

  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या गडावर इ.स.१६३० मधे महाराजांचा जन्म झाला.त्यांचे वडील शहाजीराजे आणि आई जिजाबाई.महाराज लहानाचे मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी महाराजांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले.महाराजांच्या त्या आद्यगुरु होत.तसेच युद्धाभ्यास,रणनीती,राजकारभार हे प्रार्थमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून तसेच न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादाजी कोंडदेव देत असत.तसेच जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यास युध्यकला,राजनीती शास्त्र,रामायण इ. माध्यमातून बाल शिवाजींना मार्गदर्शनही केले.  स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी महराजांना आपल्या सहकाऱ्यांमधे आत्मविश्वास निर्माण करावा लागला.इतर राज्यांपेक्षा आपले स्वराज्य रयतेच्या हितासाठी ,सौरक्षणासाठी आहे हा नवा आदर्श सर्वांसमोर ठेवावा लागला शत्रूच्या हल्ल्याची चाहूलही रयतेला लागू नये म्हणून महाराज नेहमी दक्ष असत.तसेच गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा न देता समज दिली,सर्व धर्मांना समान लेखले,साधुसंतांचा आदर केला.

   महाराजांनी पारतंत्र्यात असलेल्या महाराष्ट्र देशात स्वराज्याची स्थापना करून त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विस्तार केला.त्यांनी नेमलेले अष्टप्रधान मंडळ हे कर्तृत्ववान होते. महाराज त्यांच्या राज्यातील गडकिल्ल्यांची पाहणी स्वतः करत असत. रयतेची सुरक्षा हाच महाराजांचा सिद्धांत होता अश्या पराक्रमी राजाला मनाचा मुजरा!



Rate this content
Log in