दिवाळी फराळ
दिवाळी फराळ
दिवाळीचा फराळ घरीच केलेला हवा का?
मनवा ने जोडून आलेल्या विक एंडचा फायदा घेत दिवाळीची तयारी सुरू केली ..ती, नवरा राजेश आणि तिची मुलगी असे शहरात राहत होते आणि सासू सासरे मूळ गावी होते..
राजेश मनवाला म्हणत होता , अग कुठच्या जमान्यात आहेस तू? अग सगळ आता मार्केट मधे गेलं की विकत मिळत तर दोन दिवसाच्या सुट्टीत रोजची कामं करून शिवाय हे जास्तीच फराळ करण्याचं कामही घरीच करण्याचा आटापिटा कशाला करतेस तू?
हे बघ राजेश मला घरगुतीच आवडत सगळ..आणि तसही किती महाग असतं विकतच घ्यायला गेलं की..त्यापेक्षा तु ही सगळी यादी देते ते जिन्नस आणून दे उद्या आणि परवा दोन दिवसात मोठे सगळे पदार्थ मी करून घेते आणि मग चिवडा वगेरे होईल पटकन पुढच्या शनिवार ,रविवारी..
हे बघ माझं ऐक इतका हट्ट करू नको ..अग तू केलास काय आणि विकत आणलं काय एकूण एकच ..आणि पैशाचं म्हणशील तर थोडा फार फरक असेलही पण अग तुझी मेहनत ती तू काउन्ट करत नाहीस आणि तेही महत्वाचं आहेच की ...तू ते सगळ तळण वगेरे करणार, आणि मग आधीच असलेलं पित्त उफाळून येणार मग कशाला हे सगळं?
तरीही मनवाचे चालूच..अहो मला घरी केल्याशिवाय बर वाटत नाही हो ..आपण करून सगळ्या घरच्यांना देण्यात जो आनंद आहे ना तो विकतच्या गोष्टीत कसा येणार?
पण ऐकेल तर राकेश कसला ..तोही म्हणाला हे बघ, तू घरी करावं लागते म्हणतेस ना तर फक्त सोप काय आहे ते कर तू घरी...बाकी सगळ मी बाहेर ऑर्डर करतो...वाटल्यास तूही चल.. आपण टेस्ट करू आणि मग ऑर्डर करून टाकू..कारण अग आता आठवडा राहिला फक्त नंतर ऑर्डर ही कोणी घेणार नाही...चल आवर तू आपण आत्ताच जातोय बाहेर..
अहो आई बाबा पण येतील त्यांनाही माझ्या सारखं हे पटणार नाही...नका तुम्ही काहीतरी सांगू मला ..
अग आईबाबा काहीही म्हणणार नाहीत..तुझाच हट्ट आहे सगळा...
इतक्यात आईचं कॉल आला म्हणून राजेश ने घेतला ...आई बाबा दिवाळी आधी चार दिवस येणार होते राजेशकडे म्हणून फोन केला होता ..सगळ बोलून झाल्यावर आईने सूनेकडे फोन दे सांगितल आणि म्हणाली मनवा, अग किती सुट्टी आहे तुला दिवाळीची? मनवा
म्हणाली नाही हो आई सुट्टी मला फक्त दिवाळी पाडव्याची सुट्टी आहे...पण अहो दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या दिवशी मी घेईन सुट्टी...
अग ती घे सुट्टी तू पण मी तुला काय सांगते ऐक आता...
हे बघ मी इकडून आपल्या शेजारच्या वहिनी आहेत ना त्यांच्याकडून चिवडा, करंजी आणि चकल्या करून घेणार आहे..तसही त्या आता सगळा फराळ करून विकतात पण मी सांगितलं आहे त्यांना घरी येऊन करा अस आणि आपल्याकडे येऊनच त्या करतील सगळ ..त्यांच्या जोडीला त्यांची जाऊही असते...म्हणजे सगळ घरगुती आणि मला आपल्याकडे हवं तस करून घेता येईल घरी आल्या की म्हणून बोलवलं आहे ...
अहो आई कशाला? मी करेन हो नेहमी करतेच की..अग नेहमी करतेस ना म्हणून आता थोडी विश्रांती ..आणि अग त्यांनाही मदत थोडी...शिवाय तुझी दगदग कमी होईल कारण नोकरी करून घरातील सगळचं आवरून तू फराळ करणार म्हणजे उगाच दमणूक करून घेतेस तू...त्यापेक्षा हे बर...आणि अग आता मलाही तुला फार मदत करवत नाही पूर्वीसारखी..तेव्हा आपण दोघी करायचो...आता तेही नाही वयामुळे मदत करू शकत...
आणि हे बघ तू घरी फक्त लाडू कर आणि ओल्या नारळाच्या करंज्या करू त्या दिवशी... बाकी मी करंज्या, चकल्या, बुंदीचे लाडू सगळ करून आणते इकडून...तिथे त्या छोट्या जागेत परत तू इतका घाट घालणार आणि बाकी तुला सजावट, स्वच्छ्ता हेही कराच आहेच की..तू ते कर..तुला आवडत ना सगळ छान डेकोरेट करायला ते तू कर कारण तू मनापासून करतेस सगळ पण मग तुलाच पित्त होत आणि इतकं करतेस पण मग धड तुला खाताही नाही येत त्यादिवशी पित्त झाल की...फराळाचं मी बघते यावर्षी...
आता सासूबाई घरगुतीच फराळ आणते म्हणाल्या म्हटल्यावर मनवा काहीच बोलू शकली नाही...कारण तिच्या आवडी प्रमाणे घरगुती फराळाचं तर आणत होत्या...शिवाय सासूबाई म्हणतील त्यात पुढे काय बोलणार अस वाटल तिला आणि तिने बर हो चालेल आई असे सांगितले...आणि गप्पा झाल्यावर फोन ठेवला...
राजेशला बोलण्यातून अंदाज आला होताच. तो म्हणाला चल यादी देतेस ना आणतो जिन्नस मी तू उद्या फराळ करायला घे...
मनवा म्हणाली तुम्हाला कळलं ना आई काय म्हणत आहे ते माझ्या बोलण्यातून म्हणून तुम्ही म्हणत आहात यादी दे अस....
राजेश हसू लागला आणि म्हणाला अग मी ऐकलं आणि आई मला आधीच बोलली होती की यावर्षी मी इकडून करून आणते सगळ फक्त थोड घरी गोड करू आपण...मला म्हणाली होती आधी बोलू नको शेजारच्या वहिनी काय म्हणतात विचारते मग मीच बोलेन सूनबाईला...
मग काय सूनबाई ,मजा आहे तुमची यावर्षी ...सासूबाई स्वतः देखरेखीखाली करून घेऊन येणार फराळ...काय..
हो मग माझ्या सासूबाई आहेतच चांगल्या...मला घरचं आवडत सगळ माहीत आहे ना म्हणून तर आणत आहेत सगळ आणि त्यांच्या मुलालाही घरचं हवं असत खर म्हणजे दिवाळीत...
चला आता मी घर आवरायला घेते आणि पुढच्या आठवड्यात पार्लर ची अपॉइंटमेंट घेऊन ठेवते...या वर्षी घरगुती गावी केलेला फराळ आणि मस्त माझाही मेक ओव्हर...छान मस्त घर आवरते त्याला सजवते, नटवते आणि मीही छान तयार होते...
मनवा मनातून खूप खुश होत होती ..चला या वर्षी किती सोपं केलं काम आईनी..जरा स्वतः कडेही जास्त लक्ष देता येईल आणि घराकडेही ..आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करत राहणेही नको..किती हलक हलक वाटत आहे आज... तिने मनातल्या मनात सासूबाईंचे आभार मानले...सासूबाई खूप खूप धन्यवाद हो ..खूप चांगल्या आहात तुम्ही...कोण इतका विचार करतेय नाहीतर आजकाल ...पण तुम्ही केलात माझा विचार...
खर आहे ना , प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या घरातील व्यक्तीचा विचार केला पाहिजे आणि समजून उमजून वागल पाहिजे म्हणजे मग कुटुंब अगदी छान एकमेकांना जपत आनंदाने सण उत्सव याचा मनमुराद आनंद घेऊन साजरे होतील....कारण आनंद उत्साह असेल तरच तर सणांची गंमत आहे ना!!
काय बरोबर ना माझं..पटतय तुम्हालाही...
चला तर आपणही जमेल तितकं घरी करू, पण आटापिटा नको छान आरोग्य सांभाळून सगळ करू आणि दिवाळीचा आनंद आपल्या माणसांसोबत साजरा करू.
