vinit Dhanawade

Fantasy Inspirational

0.8  

vinit Dhanawade

Fantasy Inspirational

" धुक्यातलं चांदणं " ( भाग 1)

" धुक्यातलं चांदणं " ( भाग 1)

31 mins
1.7K


"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , 

" का गं ? " , 

" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. ",

" मी तर दर रविवारी जातो. ",

" तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … एकत्र गेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला. 

" अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तुही येऊ शकतेस. " ,

" OK , नको तू एकटाच जा. " ,

" बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कुठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,

"त्या जंगलात वगैरे मला आवडत नाही. तुला काय आवडते तिथे कळत नाही मला. ", सुवर्णा बोलली. 

" तुला नाही कळणार ते, चल … निघतो मी… तुझ्यासोबत नंतर कधीतरी. " ,

" नेहमी असंच बोलतोस…. चल , Bye… उद्या भेटूया. ऑफिस मध्ये. " , 

" Ok… Bye ,Bye… " म्हणत विवेकने फोन कट्ट केला. 


            विवेक , एक " खुशाल चेंडू " स्वभावाचा मुलगा. जॉबला होता एका कंपनीत, designer होता तो. पण त्याची ओळख एक "All Rounder" म्हणून होती. जास्त लोकं त्याला " लेखक" म्हणून ओळखायचे. त्याची लेखनशैली लोकांना खूप आवडायची. कविता , गोष्टी लिहायचा छान. ;सुरुवातीला त्याच्या मित्रांनाच त्याची लेखनकला माहित होती. त्यापैकी एकाने " स्वतःचा ब्लॉग तयार कर " अशी कल्पना दिली. आणि विवेकचा ब्लॉग अल्पावधीत फ़ेमस झाला. Fan's ची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. रोज कोणाचे ना कोणाचे call यायचे त्याला, अर्थातच Fan's चे. प्रवासात सुद्धा कितीतरी मुलं, मुली त्याच्याकडून सही घ्यायचे, त्याच्यासोबत फोटो काढायचे. 


            विवेक आता celebrity झाला होता, तरी त्याला तसं राहणं जमायचं नाही. सिंपल राहायचा अगदी. रोज सकाळी ऑफिसला जायचा, संद्याकाळी घरी आला कि वेळात वेळ काढून लेखन करायचा. आणि वेळ मिळेल तेव्हा ब्लॉग टाकायचा. Soft Music ऐकायचा , शांत राहायचा आणि दर रविवारी, कॅमेरा घेऊन कूठेतरी निघून जायचा फोटोग्राफीसाठी. खूप आवड होती त्याला फोटोग्राफीची. महत्वाचं म्हणजे त्याला निसर्गाची आवड होती. शहरातल्या गर्दी पेक्षा विवेक निसर्गात जास्त रमायचा. शिवाय चित्रसुद्धा चांगली रेखाटायचा. मस्त एकदम. इतकं सगळं करून सुद्धा मित्रांसाठी वेळ तर नक्की द्यायचा. मित्रांचा ग्रुप तर केवढा मोठा होता. एवढे छंद असलेला , दिसायला एवढा Handsome नसला तरी कोणालाही सहज आवडणारा होता विवेक. 


           सुवर्णाची ओळख ऑफिस मधली. शेजारीच बसायचे ना दोघे. शिवाय घरी जाण्याची आणि येण्याची वाट एकच. त्यामुळे Friendship झाली दोघांमध्ये लगेच. सुवर्णा जरा चंचल होती, फुलपाखरासारखी. एका गोष्टी वर तिचं मन जास्त रमायचं नाही. कामात सुद्धा धांदरट पणा करायची. बॉस तरी किती वेळा ओरडला असेल तिला. विवेक मग सांभाळून घ्यायचा. ती मात्र बिनधास्त होती. दिसायला छान होती. त्यामुळे ऑफिस मधली बरीच मुले तिच्या " मागे " होती. सुवर्णा त्यांच्याकडे पहायची सुद्धा नाही. तिचा खऱ्या प्रेमावर विश्वास होता आणि विवेककडे तसं सगळं होतं,जे तिने मनात ठरवलं होतं. म्हणून सुवर्णाला विवेक जरा जास्तच आवडायचा. Friendship होऊन २ वर्ष झाली होती. परंतु विवेक आता जरा जास्तच बिझी होऊ लागला होता, कामात आणि लेखनात सुद्धा. शिवाय , त्याला येणारे त्याच्या Fan's चे call, specially… मुलींचे call तिला आवडायचे नाहीत. 


           त्यादिवशी, असाच call आला आणि विवेक मोबाईल घेऊन बाहेर गेला. १०-१५ मिनिटांनी जागेवर आला. 

" जा … बसू नकोस, सरांनी बोलावलं आहे तुला." ," Thanks ", म्हणत विवेक पळतच बॉसच्या केबिन मध्ये गेला. थोडयावेळाने आला जागेवर.

" ओरडले ना सर… " सुवर्णा बोलली.

" कशाला ? ",

" आजकाल तू खूप वेळ बाहेरच असतोस . फोनवर, म्हणून. " ते ऐकून विवेक हसायला लागला. त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली.

 " पागल… त्यासाठी नाही बोलावलं होतं, त्याचं काम होतं म्हणून बोलावलं होतं जरा." सुवर्णाचा तोंड एवढसं झालं.

"आणि सर माझ्यावर रागावणारचं नाही…. " ,

" तू काय त्यांचा लाडका आहेस वाटते. " ,

" आहेच मुळी !! ". सुवर्णाने तोंड फिरवलं आणि कामात गुंतून गेली. विवेक सुद्धा जागेवर बसला. ५ मिनिटे गेली असतील. 

" कोणाचा call होता रे ? " , सुवर्णाचा प्रश्न. 

" अगं, हि Fan मंडळी असतात ना, ते सारखं विचारत असतात, Next story कधी, कोणती , विषय काय ? मग सांगावं लागते काहीतरी. त्यात जर Fan , मुलगी असेल तर विचारू नकोस. कुठे राहता , काय करता , single or married…. बापरे ! या मुलींचे प्रश्नचं संपत नाहीत. " ,

" म्हणजे आता मुलीसोबत बोलत होतास … " ,

" अगं , Fan होती माझी. " ,

" तरी पण…. एका अनोळखी मुलीसोबत एवढा बोलतोस . माझ्या सोबत तरी बोलतोस का कधी फोन वर एवढा.",

" तू तर रोज भेटतेस ना ऑफिसमध्ये, मग कशाला पाहिजे फोन वर बोलायला. हम्म… कूठेतरी जळण्याचा वास येतोय मला. " म्हणत विवेक हसायला लागला. 

" एक फाईट मारीन तुला. गप बस्स. मला काय करायचंय … कोणाबरोबर पण बोल , नाहीतर त्यांना घेऊन फिरायला जा. फक्त वाटलं म्हणून बोलले. तर म्हणे जळण्याचा वास येतोय. मी कशाला जळू ? " , रागात बोलली सुवर्णा, फुगून बसली. 

" काय हे सुवर्णा … जरा मस्करी केली तरी चालत नाही का तुला, पागल कूठली " ,

" पागल नको बोलूस … समजलं ना. " ,

" बोलणार मी… पागल… पागल… पागल… " ,

"थांब हा … मारतेच तुला." म्हणत ती त्याच्या मागे धावत गेली. विवेक आणि सुवर्णाची मैत्री famous होती ऑफिसमध्ये. 


          दिवस जात होते, विवेक आणि सुवर्णाची मैत्री अजून घट्ट झाली होती. एक दिवस,विवेक त्याला आलेले e-mail चेक करत होता. तेव्हाचं chatting चा box open झाला, " Hi ", त्याला एक message आला होता. " पूजा " नावं होतं तिचं. पहिल्यांदा कोणीतरी chatting करत होतं, विवेक बरोबर. विवेकला जरा आश्चर्य वाटलं. त्यानेही Reply दिला मग. 

" Hi ". ,

" How R U ? " , 

" I'm fine , what about you ? " ,

"Same Here ." ,

" OK , then " ,

" I'm big fan of your's. " , 

"can i ask you something ? " विवेकने प्रश्न केला.

 " Yes " ," R U Marathi ? " ,

" Yes " ,

" मग मराठी मध्ये बोला ना, इंग्लिश मध्ये कशाला ? " ,

" OK… OK चालेल. ",

" मी तुमची खूप मोठ्ठी Fan आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी , कविता मी खूप वेळेला वाचल्या आहेत. खूप छान लिहिता तुम्ही. " विवेकला जरा हसू आलं. 

" Thanks Ma'am… मला खूप आनंद झाला ,तुम्ही माझा ब्लॉग वाचता त्याबद्दल. Thanks again , पण मला 'तुंम्ही',' तुम्हाला' वगैरे म्हणू नका, मी काही एवढा मोठा नाही. एकेरी नावाने बोललात तरी चालेल मला." , 

" आणि मीही 'madam' वगैरे नाही. मी तर तुमच्यापेक्षा , sorry … तुझ्यापेक्षा लहान आहे. तीन वर्षांनी.",

"चालेल … चालेल, मग तुम्हाला … I mean … तुला माझा mail ID कसा मिळाला ? आणि माझी birth date कशी माहित तुला ? " ,

" तू विसरलास वाटते… तुझ्या Profile मध्ये आहे ना, तिकडून mail ID मिळाला आणि birth date सुद्धा कळली तुझी." , 

" OK. विसरलोच मी.… हा… हो, आठवलं मला. मीचं टाकलं होतं profile मध्ये. " विवेकलाही chatting मध्ये मजा वाटत होती आता. तेवढयात सरांचा call आला, सुवर्णा आणि त्याला एकत्र केबीन मध्ये बोलावलं होतं. त्याने लगेच पूजाला message टाकला, " हे पूजा, मला जरा बॉसने बोलावलं आहे. जरा जाऊन येतो मी… Bye." , " OK , खूप दिवसांपासून तुझ्या बरोबर बोलायची इच्छा होती, छान वाटलं बोलून." , " same here " ," Bye" ,"Bye" . विवेकने chatting बंद केली आणि बॉसच्या केबीनमध्ये गेला. दुसरा दिवस, विवेकचं काम चालू होतं, पुन्हा पूजाचा MSG आला," Good Morning", विवेकला आठवण झाली… हि तर कालचीच. त्यानेही reply केला, " शुभ प्रभात ! " ," हो . विसरले मी, शुभ प्रभात ! कसा आहेस ? " , " एकदम छान… तू कशी आहेस ? " ," मी पण छान … " आणि त्यांची chatting सुरु झाली. दिवस भर ते chatting करत होते. विवेक प्रथमच कोणा अनोळखी मुलीशी chatting करत होता, तीही छान बोलत होती. संध्याकाळी तो ऑफिसमधून निघाला तेव्हा chatting थांबली त्यांची. मस्त वाटत होतं विवेकला.   


              Next day, विवेकला तसं काही काम नव्हतं. तो असंच time pass करत बसला होता. पूजा online दिसली त्याला. त्यानेच MSG केला तिला आणि त्यांचं बोलणं means chanting सुरु झाली पुन्हा. छान पैकी एकदम. तिचं बोलणं विवेकला खूप आवडत होतं. तीही अगदी त्याच्यासारखीच बोलायची. छान गट्टी जमली होती. सुवर्णाला हे माहित नव्हतं. हल्ली, रोजच विवेक , पुजाबरोबर गप्पा मारायचा. कामाबरोबरच दोघंही chatting करत असायचे. पूजा बँक मध्ये जॉबला होती. सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर " Good Morning " ने बोलणं सुरु व्हायचे आणि संद्याकाळी " Good Bye " ने निरोप व्हायचा. हळूहळू सुवर्णाला विवेक मधला बदल कळायला लागला होता. 


             याला काय झालंय ? …. आजकाल फोन घेत नाही कोणाचे , सकाळी आल्या पासून त्या PC लाच चिकटून असतो. एकेदिवशी, न राहवून सुवर्णा गुपचूप विवेकच्या मागे जाऊन उभी राहिली. बघते तर chatting चालू होती. हे सुवर्णासाठी नवीन होतं. 


" तू chatting कधीपासून करायला लागलास रे… " , ते ऐकून विवेक दचकला . लगेच त्याने chatting चा box बंद केला. 

" बंद कशाला करतोस…. दाखव तरी कोणाबरोबर बोलतोस ते. " ,

" राहू दे गं ", विवेक बोलला. 

" OK .... , आता मला समजली कारणं सगळी. ऑफिसमध्ये आल्या आल्या PC च्या मागे लागणं, माझ्याकडे कमी आणि PC वर जास्त लक्ष असणं, lunch भरभर करणं आणि Fan's चे फोन कमी अटेंड करणं." ,

" ह्या… तसं काही नाही आहे." .

" तसच आहे, आणि हो… काल किती धावत होतास … त्या IT department कडे. इंटरनेट बंद होतं म्हणून. पहिलं कधी तुला गरज सुद्धा नसायची इंटरनेटची. काल तर कावराबावरा झाला होतास. साहेबांना chatting करायची असते ना. " ,

" सांगतोस का आता …. कोणाबरोबर बोलत होतास ते… " विवेक गप्प. 

" सांग लवकर ,नाहीतर सरांना सांगेन.".

" थांब थांब सांगतो. " सुवर्णा बसली खुर्चीवर ऐकायला. विवेक तरी तसाच बसून. 

" आता काय भटजीला बोलावून मुहूर्त काढणार आहेस का ? ",

" थांब गं, किती घाई " ,

" ठीक आहे नको सांगूस ", सुवर्णाने तोंड वाकडं केलं. आणि ती काम करायला लागली. 


" ये पागल… ऐक सांगतो. " ,

" सांग … " ,

" पूजा …",

" पूजा काय ? " ,

"पूजा नावं आहे तिचं… " 

," पुढे… ",

" माझ्या ब्लॉगची fan आहे ती. सगळ्या स्टोरी, कविता तिने खूप वेळा वाचल्या आहेत. म्हणून तिच्या सोबत chatting करतो मी ",

" आधी कधी मी तुला कोणासोबत chatting करताना पाहिलं नाही, ती काय एवढी special आहे का ? " ,

"special नाही गं . पण तिच्या सोबत बोलताना छान वाटते एकदम. मनातलं बोलते ती, असं म्हणालीस तरी चालेल. शिवाय माझ्या आणि तिच्या आवडी-निवडी same आहेत जवळपास. फिरायला आवडते, फोटोग्राफी आवडते, Soft music, वाचन…. सगळ्या काही माझ्याच सवयी, छंद आहेत. " , 

" म्हणजे खूप मोठी fan आहे तर…. आणि हि chatting कधीपासून चालू आहे ? ",

" झाला असेल एक महिना ." ,

" १ महिना !! चांगलीच friendship झाली आहे दोघांची. " ,

" असंच गं, चालता हैं " ,

" तरी मी बघायचे तुला. मीही विचार करायचे , एकटाच हसतो आहे काम करताना, कशाला हसायचास रे ? " , 

"अगं , ती एवढं छान बोलते ना, मज्जा वाटते. मग येते हसायला कधी कधी. " ,

" आणि त्या दिवशी उभा राहून टाळ्या कशाला वाजवत होतास ? " ,

" पूजा सांगत होती, ती गरीब मुलांना मदत करते, म्हणून तिला ' 'standing ovation ' दिलं मी. " ,

" बरा आहेस ना तू " ,

" असचं गं, मज्जा " ,

" ठीक आहे , कर chatting तू, पण सांभाळून, जास्त गुंतून जाऊ नकोस.",

" नाही गं. माझा माझ्या मनावर पूर्ण कंट्रोल आहे." , 

" ते दिसतेच आहे , एकंदरीत. " तसा विवेक हसला थोडासा. 

" माझं नावं ठेवलं आहे तिने " गोलू " म्हणून." ,

" का ? ",


" मला बघून … ",

" तिला कसं माहित तू कसा दिसतोस ते. " ,

" माझ्या profile वर माझा फोटो आहे ना, परत अजून एक फोटो send केला तिला मी.",

" म्हणजे…. फोटो वगैरे सुद्धा share झाले तर. " ,

" हो…. तीही छान आहे दिसायला आणि मी पण तिचं नावं ठेवलं आहे.… " पूजू "… म्हणून." ,

" चांगलं चाललं आहे तुमचं , दोघांचं. मला तरी कधी प्रेमाने हाक मारलीस का कधी.",

" बोलतो तर तुला राग येतो." ,

" काय ? " ," पागल " विवेकला हसायला आलं. 

" गप रे… " ," Sorry …. Sorry , पण छान आहे ती. दिसायला तर आहेच, त्याहीपेक्षा मनाने जास्त सुंदर आहे." " OK , ठीक आहे. पण पुन्हा सवय झाली तर बघ. सांभाळ… " म्हणत सुवर्णा कामाला लागली. 


           विवेक chatting मध्ये पुन्हा गुंतून गेला. सुवर्णासुद्धा कामात होती, डोक्यात मात्र विवेकचे विचार. याला कळत कसं नाही माझ्या मनात काय आहे ते, कि तो मुद्दाम असं वागतो. कळत नाही त्याच्या मनात नक्की काय आहे ते.


           अजून काही दिवस गेले. जून महिना सुरु झाला. सगळीकडे पावसाळी वातावरण तयार होत होते. मुंबईत अजून पाऊस सुरु झाला नव्हता. विवेक आणि सुवर्णाच्या friendship मध्ये थोडी कमी निर्माण झाली होती, असं सुवर्णाला जाणवू लागलं होतं.एक दिवस, सुवर्णा तशीच कामात बिझी होती. 

विवेक आला," ये पागल… " ,

" काय रे ? " ,

" अगं पूजू…. I mean… पूजा , इकडेच आहे जॉबला. " ,

" इकडे ? म्हणजे कूठे नेमकं ? " ,

" ती बँक आहे ना पुढे. तिथे ती accountant आहे. मस्त ना. " ,

" हम्म… " , सुवर्णा परत कामाला लागली. 

" अरे… मी काहीतरी सांगतो आहे तुला. " ,

"सांगितलस ते ऐकलं मी. " ,

" पुढची गोष्ट main आहे. ती सुद्धा आपल्याच रस्त्याने, म्हणजे ट्रेनने जाते. In fact , ती सुद्धा C.S.T ला राहते… तू राहतेस तिथेच.",

"means what ? ",

"means आज तुला वेळ आहे का जरा ? " ,

" आता हे कूठे आलं मधेच ? ",

" अगं , तिने भेटायला बोलावलं आहे." ,

"तिने ? " ,

"तसं … म्हणजे… मीच बोललो तिला. भेटूया म्हणून . ती तयार झाली आहे. ",

" OK , मग मी कशाला ? मी बोलले कधी जाऊया का फिरायला तर तुला वेळ नसतो. आज ती बोलली तर लगेच …. तुला बोलावलं आहे ना , मग तूच जा… मी नाही येत आहे." ,

" काय गं सुवर्णा…. चल ना, please, माझ्यासाठी." , सुवर्णा विचार करू लागली.

" सरांची परवानगी नाही मिळणार. " ,

" त्यांना मी मघाशीच सांगितलं. तू चल पटकन. " म्हणत विवेक तिला ओढतच बाहेर घेऊन गेला.  


             धावतच ते ऑफिसच्या बाहेर आले. " कूठे भेटणार आहात ? " ," स्टेशनला ",

" किती वेडा आहेस रे तू , स्टेशनला कोणी बोलावते का भेटायला. " , सुवर्णा हसत म्हणाली. 

" अरे , तिला घरी जायला लेट होईल ना मग, म्हणून स्टेशनला बोलावलं " ,

" ठीक आहे मग ." विवेक आनंदात होता आज, चेहरा तर किती खुलला होता. 

" विवेक विचारू का एक ." ,

" विचार." ,

" अगदी सहजच ना भेटायला चालला आहेस " ,

" का गं ? " ,

" तुझ्यात खूप बदल अनुभवते आहे मी. नक्कीच काही नाही ना." विवेक जरा बावरला.

" नाही, असं का वाटतं तुला ? " ,

" नाही , मला तसं वाटलं म्हणून. " . थोडावेळ कूणीच काही बोललं नाही. स्टेशनला पोहोचले ते.

" तू कसा ओळखणार तिला. ? " ,

" तिचा फोटो बघितला होता ना मी, नाहीतरी ती ओळखेल मला." ते दोघे बोलत होते, तेव्हाच मागून आवाज आला , " विवेक … " ,विवेकने वळून पाहिलं. पूजा … विवेक तिच्याकडे बघत राहिला. average उंची, जराशी मध्यम अंगाची, गोऱ्या रंगाची , केस मागे बांधलेले, डोळे काळेभोर असले तरी त्यावर चष्मा, गोबरे गाल आणि चेहऱ्यावर किंचितशी smile, अगदी फोटोत होती तशिच पूजा ,विवेकच्या समोर उभी होती. दोघे एकमेकांकडे कधीचे बघत होते. सुवर्णानेही पूजाचा फोटो पाहिला होता. शिवाय विवेक तिच्या संबंधी रोज काहीना काही सांगायचा. आज तिला प्रत्यक्षात बघत होती. हळूच तिने हाताच्या कोपराने विवेकला धक्का दिला. विवेकची तंद्री भंग झाली. " Hi …. Hi पूजा ", " Hi विवेक ." ," तू… तुला कसं कळलं मी आहे ते , मागून कसं ओळखलस मला… " विवेकने चाचरत प्रश्न केला. 


               पूजाला जरा हसू आलं. chatting करताना कसा मोकळेपणाने बोलतो, आता कसा घाबरत बोलत आहे.

" तू काय मला घाबरतोस का ? असा का झालाय आवाज तुला ? ",

" हा… जरा excitement होती ना म्हणून, बाकी काही नाही. " ,

" OK … OK …. actually, मी तुमच्या अगोदर आली आहे स्टेशनला. तुला नाही, मी सुवर्णाला बघितलं पहिल. नंतर तू दिसलास. १० मिनिटांपासून तुम्हा दोघांना पाहते आहे मी." पूजा बोलली. 

" मला कसं ओळखलस ? " ," सुवर्णाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. 

" तुझा एक फोटो विवेकने मला mail केला होता, तेव्हा तुला ओळखलं. " , सुवर्णाने विवेककडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली. सुवर्णाला राग आला त्याचा. मला न विचारता , याने माझे फोटो तिला दाखवले. अक्कल नावाची गोष्टच नाही याच्याकडे. तिघेही तसेच उभे. 

सुवर्णाच बोलली मग," काय करायचे आहे आता , नाहीतर मी घरी निघते. माझी ट्रेन येईल आता.",

" हो… हो…, चल कॉफी घेऊया. तुला आवडते ना पूजा. " ,

" आवडते, पण आता नको, ट्रेन गेली तर पुन्हा उशीर होईल घरी जायला. पुन्हा कधीतरी." विवेकचा जरा हिरमोड झाला.

" OK , No problem. तुझी ट्रेन येईल ना आता, जा तू पूजा… हि सुवर्णा देखील C.S.T. ला राहते. तुमचा छान वेळ जाईल. Bye.",

"Bye विवेक." म्हणत पूजा धावतच गेली ट्रेनसाठी. सुवर्णाने विवेकला नेहमी सारखं "Bye " केलं, त्याचं कूठे लक्ष होतं पण,तो कसल्याशा विचारात गुंतला होता. सुवर्णा त्याचाकडे पाहत होती. ट्रेन आली, एकाच ट्रेनचे तिन्ही प्रवासी. विवेक त्याच्या डब्यात चढला. पूजा आधीच जाऊन बसली होती, ladies compartment मध्ये. सुवर्णाने विवेकला डब्यात जाताना पाहिलं आणि तीही ladies compartment मध्ये आली. पूजाने सुवर्णाला " Hi " केलं. सुवर्णाने Reply दिला. आणि तिने मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. तिला काही interest नव्हता , पूजाशी बोलायला. ती तिचे song's ऐकू लागली. पूजाला जरा विचित्र वाटली सुवर्णा, परंतू असते एकेकाला सवय… प्रवासात गाणी ऐकण्याची, असं स्वतःलाच म्हणत तिने दुर्लक्ष केलं तिकडे.


           विवेक दादरला राहायचा. तो First class मधून प्रवास करायचा. त्यामुळे एवढी जास्त गर्दी नसायची डब्यात.तसा विवेकला गर्दीचा त्रास व्हायचा, अगदी रोज. पण आज त्याचा मूड चांगला होता. त्याला पूजा भेटली होती प्रत्यक्षात. मजा आली. विवेक मनातच हसत होता. पूजाचेच विचार त्याच्या मनात. छान मुलगी आहे एकदम. विचारसुद्धा जुळतात आमचे. मस्त मैत्री झाली आहे. friendship वरून त्याला सुवर्णाची आठवण झाली अचानक. सुवर्णाला तर विसरूनच गेलो. तिला तर Bye पण केलं नाही आपण आज. तिला काय वाटलं असेल, आणि ती काय बोलत होती रिक्ष्यात…. काही special आहे का, असं का विचारत होती ती… विवेक विचार करू लागला. त्याला आठवलं काहीतरी.आणि त्याचा सगळा मूड बदलला. 


           ट्रेन दादर स्टेशनला पोहोचली. विवेक स्टेशनला उतरला आणि घरी न जाता तसाच तो स्टेशनच्या पुलावर जाऊन उभा राहिला, येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघत. आज वारा वाहत होता. त्यात पावसाळी वातावरण. परंतू पाऊस मात्र पडणार नव्हता. काळवंडलेला आभाळ जरासं.विवेकला आठवण झाली ती त्याच्या पहिल्या प्रेमाची. कॉलेज मधलं प्रेम, ४ वर्ष ते एकत्र होते. इकडे जॉबला लागला तेव्हा सुद्धा ते एकत्र होते. छान जोडी होती दोघांची. लग्नाची गोष्ट केली तेव्हा समोर आला तो धर्म. विवेक मराठी तर ती गुजराथी होती. दोघांच्याही घरी ते चालणार नव्हतं. त्यामुळे ते relation पुढे वाढवण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. विवेकला ते पटत नव्हतं. तिनेच पुढाकार घेऊन " Break-up" केला आणि ती निघून गेली. विवेकला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. ढेपाळला होता अगदी. सुवर्णाने त्यावेळी त्याला सावरायला खूप मदत केली होती. तेव्हाचं त्याने ठरवलं होतं, कि पुन्हा कधी कुणाच्या प्रेमात पडायचं नाही. 


          विवेक तसाच उभा होता तिथे कितीतरी वेळ. म्हणून सुवर्णा सांगत होती, जास्त गुंतू नकोस कोणामध्ये… नाहीच गुंतणार कोणामध्ये. तेव्हडा कंट्रोल आहे माझा माझ्या मनावर. Thanks सुवर्णा, मला आठवण करून दिल्याबद्दल. विवेकने मनातच सुवर्णाचे आभार मानले आणि ती घरी आला.     


          पुढच्या दिवशीही तसंच, सकाळपासून chatting सुरु झाली ते संध्याकाळी ऑफिस सुटेपर्यंत. सुवर्णाला ते माहित होतं म्हणून तिने विवेकला disturb नाही केलं. ऑफिस सुटलं तसे विवेक आणि सुवर्णा निघाले घरी जाण्यासाठी. गेटजवळ येऊन विवेक थांबला. सुवर्णा बोलण्याच्या नादात तशीच पुढे चालत चालत गेली. पुढे गेल्यावर विवेक बाजूला नाही बघून ती थांबली. अरे !! हा गेटजवळ काय करतोय… तिने लांबूनच विवेकला " चल " म्हणून खुणावलं. विवेकनेच तिला " इकडे ये " असा हाताने इशारा केला. वैतागतच सुवर्णा परत आली. " अबे , काय time pass करत आहेस … चल ना. " ," थांब गं ." ," कशाला पण ? "," पूजा येते आहे." ," means ? "," अगं, तिचा आणि आपला रस्ता same आहे ना म्हणून मीच तिला बोललो कि आमच्या सोबत ये. " सुवर्णा त्याच्या बाजूला उभी राहिली. ५ मिनिटांनी पूजा आली. " Hi पूजा , कशी आहेस ? ", विवेकने विचारलं. जसे काय सकाळ पासून बोललेच नाहीत दोघे, सुवर्णा मनातल्या मनात. " Hi , मी बरी आहे, तू कसा आहेस ? "," मी पण मजेत. " … बापरे !! यांच सुरु झालं वाटते पुन्हा. " Excuse me, मला वाटते आपण बाकीच्या गप्पा रिक्षात करूया का ? " . तसे दोघे तयार झाले. रिक्षात बसून गप्पा सुरु झाल्या ते स्टेशन येईपर्यंत. ट्रेनमध्ये गेले सगळे, आजही विवेक सुवर्णाला " Bye " करायला विसरला. 


         आता रोजचं ते एकत्र घरी जाऊ लागले होते. सुवर्णा , विवेक आणि पूजा. पूजाने , सुवर्णाशी मैत्री केली होती दरम्यान. परंतु त्या इतक्या बोलायच्या नाहीत, एकमेकिंसोबत. विवेक तर जाम खुश असायचा आजकाल. त्याचं वागणं update झालं होते. कपडे टापटीप झाले होते, hair style बदलली होती. 

          सगळं पूजा आल्यापासून. पूजा होतीच तशी मनमिळावू एकदम. शिवाय आता chatting बंद झालं होतं त्यांचं. फोन करायचे आता. शिवाय whats app तर होतंच ना. msgs चालू असायचे सारखे. सुवर्णाला राग यायचा कधी कधी पूजाचा. विवेकची "Friend" होती म्हणून ती काही बोलायची नाही तिला. विवेक तिला कमी आणि पूजाला जास्त वेळ देत होता , तिला ते आवडायचं नाही. घरी जाताना सुद्धा तेच दोघे बोलत असायचे. सुवर्णा आपली गाणी ऐकत असायची.   


          काही दिवसांनी, सुवर्णाला ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला पाठवले गेले. विवेक, पूजाबरोबर जरी बोलत असला तरी त्याला सुवर्णा जवळ हवी असायची. त्यामुळे आता ती नसल्याने त्याला खूप boring वाटत होतं. सारखी बडबड चालू असायची ना तिची, म्हणून त्याला करमत नव्हतं. काय करू… काय करू… त्याने पूजाला फोन लावला. 

" Hello… पूजू " ,

" बोल… " , 

" काहीनाही असाच फोन केला. " ,

" OK, ठीक आहे. ",

" Boring झालं आहे गं. " , 

" का रे … काय झालं " ,

" सुवर्णा नाही आहे ना इकडे, तुला बोललो होते ते. ", 

" मग आता काय ? " .

" काही नाही, विचार करत होतो, बाहेर जाऊया का कॉफ्फी घेयाला ? I mean…. तुला चालत असेल तर. ",

" हो ना… आणि का नाही चालणार मला. " ,

" मग तुला सोडतील का बँक मधून लवकर ? ",

" अरे, आज शनिवार ना, नाहीतरी हाफ- डे असतो आम्हाला. भेटूया आपण. " विवेकला ते ऐकून आनंद झाला. 

" चालेल , चालेल… मी निघतो थोड्यावेळाने , आणि तुझ्या बँकच्या बाहेर तुझी वाट बघतो मी.",

" चालेल… तू बाहेर आलास कि call कर. " ," OK. bye. " म्हणत विवेकने फोन कट्ट केला आणि त्याचं काम आवरायला सुरुवात केली. 


             थोडयावेळाने दोघे भेटले आणि एका coffee shop मध्ये गेले. रोज सुवर्णा असताना ते गप्पा मारायचे. आज दोघेच होते तरी कोणीच बोलत नव्हते. विवेकला काय बोलावं ते सुचत नव्हते. पूजा त्याच्याकडे पाहत होती. कॉफी सुद्धा आली. शेवटी न राहवून पूजानेच विषय काढला. 

" तुला काही विचारू का ? ",

"हं…. हो , चालेल ना… ",

" खूप दिवस मनात राहिलं होतं माझ्या, विसरायची मी सारखी, आज आठवलं म्हणून विचारते. तुझ्या ब्लॉगचं नावं " धुक्यातलं चांदणं " अस आहे ना, मग त्याचा अर्थ काय ?… म्हणजे धुक्यात चांदणं कसं दिसू शकते ना… धुकं पहाटे असते. आणि चांदणं तर रात्री. मग " धुक्यातलं चांदणं " means ? " . विवेकला गंमत वाटली. 

" तसं मला हा प्रश्न जास्त कोणी विचारत नाही आणि ज्यांनी विचारलं त्यांना , ते असंच लिहिलं आहे अस म्हणलो. आता तू माझी चांगली friend आहेस म्हणून तुला सांगतो. " ,

" सांग ना मग ",

" त्याचे actually दोन अर्थ आहेत. एकदा , जेव्हा मी लहानपणी गावाला गेलेलो ना, तेव्हाची गोष्ट आहे, गावातून फिरता फिरता हातातले २ रुपये कधी पडले ते कळलंच नाही मला. ते कितीतरी वेळ मी शोधत होतो, सापडलेच नाहीत.तेव्हा तिकडून एक साधू जात होते. त्यांनी मला विचारलं, काय शोधतोस ? मी सांगितलं त्यांना, तेव्हा ते बोलले कि , त्यापेक्षा तुझा " तारा " शोध… मला तेव्हा ते कळलं नव्हतं. मी घरी येऊन माझ्या आजीला विचारलं होतं. तिने सांगितलं कि " जशी आपली माणस असतात ना जमिनीवर, तसा आपला एक तारा असतो आभाळात. तो जर आपल्याला भेटला तर आपण खूप सुखी होऊन जातो. "…तर तेव्हा पासून मी तो तारा शोधत आहे. मी जेव्हा जेव्हा तो शोधायचा प्रयन्त करतो ना, तेव्हा तेव्हा आभाळ ढगाळलेल असते. धुक्याचं जसं आपल्याला काही दिसत नाही, अगदी तसंच काहीसं. चांदण्या रात्री म्हणजे जेव्हा चंद्र आकाशात नसतो तेव्हा आभाळ भरून येते त्याला मी " धुक्यातलं चांदणं " म्हणतो. ",

" अच्च्या… अच्च्या, मग भेटला कि नाही तारा तुझा. " ,

" नाही अजून, पण भेटेल कधीतरी." ,

" आणि दुसरा अर्थ ? " , पूजा बोलली आणि बाहेर पावसाने सुरुवात केली. " मस्त…. पहिला पाऊस… " विवेक तसाच उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. पूजाही त्याच्या मागोमाग तिथे येऊन उभी राहिली. 

" छान ना… मला एवढा आवडायचा नाही पाऊस पहिला… तुझा ब्लॉग वाचून तो आवडायला लागला." ,

" कधी भिजली आहेस का ,… पावसात ? ".

" नाही , भिजायला नाही आवडत, फक्त बघायला आवडतो पाऊस. "  

" भिजायचं असते गं, मजा येते." ,

" तुम्हा मुलांचं ठीक असते, मुलींना कुठे तेव्हढ freedom असते. शिवाय आमच्या घरी चालत नाही अस काही.",

"अरे हो, तुझ्या घरचं विचारलंच नाही मी कधी .",

" घरी… भाऊ , आहे मोठा… आई- बाबा .",

" आणि बाबा कडक स्वभावाचे आहेत." विवेकने पूजाचं वाक्य मध्ये तोडलं. 

" हो ना , तसे कडक नाहीत पण जुन्या विचारांचे आहेत. मुलांसोबत बोललेलं त्यांना आवडत नाही. " ,

" अच्च्या, म्हणून तू घरी असलीस कि फोन उचलत नाहीस ते. एवढं काय घाबरायचं त्यांना.",

" नको तरी सुद्धा, त्यांना आवडत नाही त्या गोष्टी मी नाही करत कधी.",

" OK बाबा, मग आता माझ्या सोबत आली आहेस ती. ",

" त्यांना माहित नाही म्हणून." विवेकला हसायला आलं. ते बघून पूजाने त्याच्या पाठीवर दोन-तीन चापट्या मारल्या. " गप रे ." विवेक हसत होता, मग तीही हसायला लागली. बाहेर पाऊस कोसळत होता. 

" किती छान पाऊस आहे." ,

" तुला आवडतो ना पाऊस खूप.",

" खूप… जो गंध येतो ना मातीचा, तो माझ्या शरीरात भिनला कि वेडा होतो मी. भिजलो कि मन शांत होते माझं. पण एक मजा असते पावसात भिजण्याची. लोकं बघत असतात , हसत असतात. त्यांना कुठे ठाऊक , पावसात काय असते ते.",

" काय ? " ,

"पावसात खूप गोष्टी असतात, प्रत्येकाने ठरवायचं असते… कि कोसळणाऱ्या पावसातून काय घ्यायचं स्वतः साठी, आठवणी कि अनुभव… " दोघेही पावसाकडे पाहत होते,


" किती छान बोलतोस रे तू , मला नाही येत असं बोलता.",

" छान बोलायला कशाला पाहिजे ? तू आहेसच छान. ", पूजा लाजली. 

" गप काहीही बोलतोस.".

 "काहीही का… खर ते खर… मला वाटलं म्हणून बोललो.", 

" हो का … बर … चल निघूया का घरी " ,

" हो… नाहीतर तुझ्या घरी राग येईल कोणाला तरी. " ,

"बघ… मस्करी करतोस ना. " ," sorry… असंच गं. ", पूजाने smile दिली हलकीशी. coffee shop मधून बाहेर आले दोघेही. पाऊस अजूनही पडत होता. पूजाला आठवण झाली. " अरे… तू दुसरा अर्थ सांगितला नाहीस." विवेकने शांत नजरेने पूजाकडे पाहिलं. 

" तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का ? " , 

" नाही , आणि कुणाच्या प्रेमात सुद्धा पडायचं नाही मला. " ,

" का ? " , 

" त्या गोष्टींवर माझा विश्वास नाही आणि घरचे सांगतील त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. मग उगाच कोणाच्या प्रेमात कशाला पडायचं? " पूजा बोलली. विवेक हसला. 

" तू जर कोणावर प्रेम केलं असतंस ना , तर तुला दुसरा अर्थ कळला असता. " ,.

" तो कसा ? " , 

" प्रेमसुद्धा तसंच असते… धुक्यातल्या चांदण्या सारखं. समोर असलं तरी कधी स्पष्ट दिसत नाही . आणि दिसते तेव्हा ते खूप दूर असते , त्या चांदण्यासारखं . " विवेक पावसाकडे पाहत म्हणाला,

" चल निघूया.",

" चालेल.",

" तू जा घरी. मी जरा पहिल्या पावसाचा आनंद घेतो." ,

" अरे पण सामान आहे तुझं , ते भिजेल ना.",

" काहीच tension नाही, सगळ waterproof आहे , मी सोडलो तर. तू जा …. Bye " म्हणत विवेक पावसात चालत गेला , भिजायला. पूजा त्याच्याकडे पाहत होती कधीची. तो गेला पुढे भिजत , तरी पूजा तशीच उभी अजून त्याला पाहत. 


              पूजा घरी आली. आणि विचार करू लागली. पाऊस थांबला होता, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. खरंच , आपला तारा असतो का आकाशात ? तिने वर पाहिलं. आभाळात अजूनही ढग होते. विवेक बोलला तसं, " धुक्यातलं चांदणं " … आणि दुसरा अर्थ काय बोलला तो , प्रेम केलं असतंस तर कळलं असत , म्हणाला. म्हणजे विवेकने कोणावर प्रेम केलं होतं का ? त्याला विचारूया का … नको … राहू दे. आता नको. मी पण कोणावर प्रेम केल नाही का कधी. स्वतःलाच प्रश्न केला तिने. पूजाला सुद्धा एक मुलगा आवडायचा. परंतु तिने ते "नात" मैत्री पुढे जाऊ दिलं नाही कधी. घरी तसं चालणार नाही म्हणून. खरंच , आपण प्रेम काय आहे ते विसरून गेलो आहोत कि मी मुद्धाम समजून घेत नाही. पूजा विचारात गढून गेली. 


             अजून दोन दिवस गेले. सुवर्णा अजूनही मुंबईला आली नव्हती. आज सुट्टीचा दिवस, रविवार. त्यात पावसाळा सुरु झालेला. मग विवेकने कॅमेरा घेतला आणि तयारी केली निघायची. तेवढयात त्याचा मोबाईल वाजला.… पूजाचा फोन… कमाल आहे. त्याने उचलला… 

" शुभ प्रभात पूजू… आज कशी काय आठवण झाली माझी. तीही सुट्टीच्या दिवशी, सकाळी ७.३० ला, ते सुद्धा घरून. " ,

" हो का… गप." ,

" ठीक आहे . बसतो गप्प.",

" गप… बोल सरळ." विवेकला हसू आलं.

" अगं, तू घरी असलीस कि कधी call करत नाहीस ना. म्हणून जरा मस्करी केली. बोल. काय काम होतं madam चं. ", 

" तसं काही नाही. असाच लावला call, तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून. " , 

" अरे बापरे !! " आणि विवेक हसायला लागला. 

" हसतोस काय असा ? " ,

" नाही , काही नाही असंच. हसायला आलं जरा.… बर…. आज घरातून कसा फोन केलास ? … तुझे बाबा ओरडतील ना तुला. " ,

" गप्प रे, माझ्या बाबांना काय वेड लागलाय, सारखं ओरडायला. …अरे, ते सगळे म्हणजे भाऊ, आई , बाबा… सकाळीच फिरायला गेले.", " मग तू का नाही गेलीस ? " , 

" मला नाही आवडत पावसात फिरायला. ",

" OK " ,

" तू काय करतो आहेस ? ",

" तेच… जे तुला आवडत नाही ते." ,

" म्हणजे ? ",

" मी चाललो आहे , बाहेर … फोटोग्राफीसाठी." , 

" wow !! फोटोग्राफी मला सुद्धा आवडते. " ,

" मग येतेस का माझ्या सोबत. ",

" नको… पाऊस आला तर. " ,

" आज नाही येणार. " ,

" तुला काय पावसाने सांगितलं आहे वाटते. " ,

" मला कळते पावसाबद्दल थोडाफार. म्हणून बोललो तुला ",

" आणि आला तर… " ,

" नाही येणार बोललो ना… विश्वास ठेव." पूजा पुढे काही बोलली नाही. 

" Hello …. पूजा …. येते आहेस का… नाहीतर मी निघतो. ",

" शी… बाबा, तू विचारसुद्धा करू देत नाहीस. थांब.… येते मी. " , विवेक आनंदला. " ये लवकर… दादर स्टेशनला वाट पाहतो आहे मी. " 


पूजा आली स्टेशनला. विवेक तर तयारीतच होता. 

" बंर लवकर आलीस. मला वाटलं कि एक - दोन तास तरी येत नाहीस. " ,

" आणि असं का वाटलं तुला ? " , 

" मुलींना वेळ लागतो ना तयारी करायला म्हणून. " , पूजाने त्याच्या पोटात गुच्च्या मारला. 

" बाकीच्या मुलींना लागत असतील , दोन - तीन तास , मला नाही . कळलं. ", बोलता बोलता विवेकने तिचा फोटो काढला पटकन. 

" माझेच फोटो काढणार आहेस का ? ". 

"जमल तर काढणार ना . " ,

" OK . छान. आता कुठे जायचे आहे.",

" कर्नाळा… " ,

" नावं ऐकलं आहे मी… " ,

" पक्षी अभयारण्य आहे." ,

" चल जाऊया पटकन. " दोघे निघाले. वेळेवर पोहोचले. 

" छान वाटते इकडे. ",

" मस्त आहे ठिकाण…मी येतो इकडे पाऊस सुरु झाला कि. " ,

" हो का … बर. " ,

" तुला तुझ्याबद्दल एक गोष्ट माहित आहे का ? " ,

" कोणती रे ? " ,

" तू दोन शब्द जास्त बोलतेस , बोलताना. ' हो का ' आणि ' बर '. " , 

" हो का. " , " बघ बोललीस ना." विवेक हसत म्हणाला. पूजाही हसली. 


 दोघेही फिरत फिरत , फोटोग्राफी करत खूप आत मध्ये आले. गप्पा तर चालूच होत्या.

 " तुला काय आवडते रे एवढं इकडे ? " ,

" थोडावेळ थांब जरा.… दाखवतो तुला. " ,

" काय… आणि तू काय रोज फिरत असतोस का ? ",

" रोज म्हणजे कधी वेळ मिळेल तेव्हा. रविवारचा तर बाहेरच असतो मी. " , 

" एकटाच … ? " , 

" एकटा नाही… आम्ही दोघे. " .

" दोघे ? " , 

" मी आणि कॅमेरा " ,

" तू ना खरंच वेडा आहे . " ,

" तुला आता कळलं का… माझी आई ना मला कधी कधी वेडा म्हणूनच हाक मारते. " , 

"चांगल आहे , आईंना पण माहित आहे ते. " पूजा हसत म्हणाली. 

" हा निसर्ग आहे ना… त्याने मला वेडा केलं आहे लहानपणापासून. म्हणून बाहेर फिरत असतो मी. शिवाय कधी घरी लवकर गेलो ना, तर घरापासून थोडयाच अंतरावर समुद्र आहे… तिकडे जाऊन बसतो मग. छान वाटते.… तू फिरतेस का कधी ? " .

" नाही रे. आज पहिल्यांदा मी कोणाबरोबर बाहेर फिरायला आले आहे ."

" म्हणजे ' Date' वर आली आहेस माझ्याबरोबर . "

" गप रे … काहीही. " , पूजा लाजत म्हणाली. 

" त्यात काय लाजायचं ? ", 

" आमच्या घरी चालत नाही असं " ," बर बाबा… " विवेक बोलला आणि बोलता बोलता थांबला. 


" एक गोष्ट करशील का ? ",विवेक पूजाला बोलला . 

" कोणती ? ", 

" तुला डोळे बंद करून चालता येते का ? " ,

" तू तरी चालशील का…. काही सुद्धा बोलतोस … आणि इकडे पडायला नाही होणार का, डोळे बंद करून चाललं तर. " ,

" पण पुढे जायचे असेल तर तुला डोळे बंद करून यावं लागेल… surprise आहे.",

" मी चालू कशी पण… " ,

" माझा हात पकडून चाल. ", 

" नको. " ,

" का नको ? " ,

" नको, माझ्या घरी आवडणार नाही ते. " ,

" अगं, पण त्यांना कसं कळणार आहे , तू माझा हात पकडलास ते. " ,

" तरी सुद्धा नको. ", 

" OK, ठीक आहे. तुला मी बाहेर सोडतो, तिथून तू घरी जा. मी थांबतो इथे. " विवेक नाराज झाला. 

" Sorry , राग आला का तुला ? " , 

" राग कशाला येणार ? आणि मला राग नाही येत कधी. तुझं सुद्धा बरोबर आहे. मी तसा अनोळखी आहे तसा तुझासाठी. मी उगाच जबरदस्ती करत होतो." विवेक हळू आवाजात म्हणाला. 

" Sorry ना, एवढं काय मनाला लावून घेतोस… चल जाऊया आपण, मी करते डोळे बंद… पण हात सोडू नकोस हा, नाहीतर पडेन मी. " ,

" एकदा हात पकडून तर बघ… कधीच नाही सोडणार, विश्वास ठेव माझ्यावर. " पूजा हसून त्याचाकडे पाहत होती.           


            तिने डोळे मिटले आणि विवेकच्या हातात हात दिला. पहिल्यांदा ती कोणा मुलाच्या हाताला स्पर्श करत होती. त्याच्या हाताचा उबदारपणा तिला जाणवला. एक थंड लहर तिच्या पूर्ण शरीरातून फिरली. वेगळाच अनुभव. विवेकने ही तिचा हात घट्ट पकडला होता. त्यालाही जरा वेगळा अनुभव आला. तरी त्याने तिचा हात सोडला नाही आणि पूजाला घेऊन तो एका उंच जागी आला. हळूच तिचा हात सोडला. " विवेक … विवेक…. ये गोलू… कूठे आहेस… सोडलास ना हात… ", पूजाचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. " मी तुझ्या पाठीशीच आहे… फक्त आता काही बोलू नकोस… पहिली शांत हो… दीर्घ श्वास घे आणि हळू हळू डोळे उघड. " 


           पूजा शांत झाली. दीर्घ श्वास घेतला आणि हलकेसे डोळे उघडले. हळू हळू तिच्या डोळ्यासमोर हिरवा रंग पसरत जात होता. समोर झाडेच झाडे हिरवीगार, वरती निळाशार आभाळ, थंड वारा.… पूजा वेडीच झाली ते पाहून. " WOW !!! " पूजा ओरडली. विवेक हळूच तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. पूजाच्या नजरेतला आनंद त्याला दिसत होता. पूजाही सगळं कसं डोळ्यात भरून घेत होती. एक थंड हवेचा झोत आला , तसा तिने विवेकचा हात गच्च पकडला. विवेकला ते अपेक्षित नव्हतं. पूजा तशीच त्याचा हात पकडून होती, विवेकच्या अंगावर शहारा उठला. 


थोडयावेळाने पूजा भानावर आली. " खाली बसूया का ? " पूजाने विचारलं. तसे दोघे तिथेच बसले.

" तुला काय सांगू विवेक … एवढा हिरवा रंग मी पहिल्यांदा पाहत आहे… आणि हे आभाळ … इतकं मोठ्ठ असते, ते आज कळते आहे मला.… मला …. मला ना… शब्दच नाही आहेत माझ्याकडे आज. " ,

" तू विचारलं होतंस ना… एवढं काय आवडते, उत्तर मिळालं का ? " ,

" हो… नक्कीच मिळालं. " ,

" हा निसर्ग आहे ना, तो विविधतेने भरलेला आहे. आपल्याला तो वेगळेपणा असा शोधावा लागतो. " विवेक छान बोलत होता आणि पूजा ऐकत होती. 

" तुला भीती नाही वाटत का , इकडे एकटा येतोस ते ? " ,

" एकटा नसतो मी…हि झाडं आहेत ना , ते माझे मित्र आहेत… त्यांच्याशी मी बोलत असतो, तेही मग माझ्याशी बोलतात. " ,

" खरंच बोलतात का ? " ,

" बोलतात … मनातून आणि मनापासून बोललं कि बोलतात ती. ऐकायचं असेल ना तर आताही ते काहीतरी सांगत असतील. ऐक… " आणि दोघेही शांत बसून निसर्गाकडे पाहत बसले. 


खूप वेळानंतर, विवेक बोलला," चला madam , निघूया आता. ", 

" एवढया लवकर, थांब ना जरा… " ,

" पूजू… ४.३० वाजले आहेत. तुला घरी नाही जायचे का ? ",

" अरे… एवढा वेळ झाला…!! कळलंच नाही मला. चालेल निघूया आता. " तसे दोघे निघाले आणि थोड्यावेळात स्टेशनला पोहोचले. निघायची वेळ झाली. 

" छान वेळ गेला ना… " ,

" आणि तू घाबरत होतीस. पाऊस येईल म्हणून. " ,

" हा पण आता नाही घाबरणार , पुन्हा कधी गेलास तर मला सांग, मी येईन. " , 

" हो का … आणि बाबांना काय सांगशील ? ",

" त्यांना सांगीन काहीतरी. पण बोलावशील ना मला… असशील ना माझ्यासोबत. " विवेक हसला, 

" हो… next time पासून , तुला नेईन माझ्याबरोबर नेहमी. " ,

" Thanks … गोलू, खरंच … आजचा दिवस किती छान होता… ",

" पुढचे दिवससुद्धा असेच असतील. " पूजाही खुश होती. 

" बर… आता तू जा घरी, ट्रेन येते आहे. मी थोडयावेळाने निघेन. ",

" चालेल… Bye विवेक… उद्या भेटू … ऑफिस नंतर. " पूजा गेली ट्रेन मधून. विवेक तर जाम खुश होता. अरे… हो, घरी सांगतो, जरा उशीर होईल म्हणून. त्याने त्याच्या Bag मधून मोबाईल बाहेर काढला. बघतो तर १५ miss call , सुवर्णाचे.… बापरे !!. सुवर्णाला तर विसरूनच गेलो. सकाळी पूजा स्टेशनला भेटली तेव्हा bag मध्ये टाकला मोबाईल , तो दिवसभर बाहेरच काढला नाही. एवढं हरवून गेलो होतो आपण, कि मोबाईल किती वेळ वाजला असेल त्याची शुद्धच नाही राहिली. त्याने लगेच सुवर्णाला call लावला. तिने तो उचललाच नाही. राग आला असेल तिला. आपण Friend ला कसे विसरलो आज ? अस पहिलं कधी झालं नाही. मग आज काय झालं आपल्याला … विवेक तिथे न थांबता , आलेल्या ट्रेनमध्ये चढला. 


             दुसऱ्या दिवशी, विवेक ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याला सुवर्णा आलेली दिसली. अरे… बापरे … म्हणजे हि काल आली मुंबईला , म्हणून call करत असणार ती. विवेक आता आला तशी सुवर्णा , Boss च्या कॅबिनमध्ये गेलेली. विवेक गप्पपणे कामाला लागला. सुवर्णा कॅबिन मधून बाहेर आली आणि तिची नजर विवेकवर पडली. हातातली फाईल तिने विवेकच्या डोक्यावर मारली. " काय रे गधड्या… किती call करायचे तुला… एकदाही उचलता नाही आला तुला ." ,

" आणि मी नंतर call केला तेव्हा तू कूठे उचललास .", विवेक डोकं चोळत म्हणाला. 

" मला राग आला होता तेव्हा… " ,

" Sorry…. कधी आलीस मुंबईत ? ",

" काल सकाळी ६ वाजता. वेळ होता आणि तुला भेटले सुद्धा नाही खूप दिवस म्हणून तुला भेटायला येणार होते. तर तू call उचलला नाहीस." विवेक हसला फक्त.

 " का उचलला नाहीस call ? कूठे होतास ? " ,

" अगं … बाहेर फिरत होतो … फोटोग्राफी… " ,

" मग call का नाही उचललास ? आधी कुठे फिरायला गेलास तरी असं नाही केलंस कधी. ", 

" लक्षात नाही राहिलं. " ,

" कोण होतं सोबत ? " विवेक गप्प. 

" आता सांगतोस का ? " , 

" पूजा होती बरोबर… " पुजाचं नावं ऐकल आणि सुवर्णा त्याच्याकडे बघत राहिली, काहीही न बोलता. तशीच गुपचूप जाऊन बसली जागेवर. विवेकला काय झालं ते कळलं नाही. आता तर ओरडत होती, गप्प का झाली अचानक. विवेक सुवर्णाच्या बाजूला जाऊन बसला. 

" ये पागल… राग आला का ? ", 

" मला कशाला राग येईल… " ,

" पूजाला सोबत घेऊन गेलो म्हणून … ", 

" कोणासोबत जायचे आणि कोणाला नाही सांगायचे, ते तुझ्यावर आहे. मी कोण आहे सांगणारी. " ,

" Come on … सुवर्णा, अशी का वागतेस… एक दिवस तर गेलो ना… " ,

" जा ना मग, मी बोलले तर तुला वेळ नसतो … आणि आता पूजा आली तर… " ,

" सुवर्णा …. तुला काय झालं आहे ? माझी Best friend आहेस ना तू ",

" Best friend … मी आठवडाभर नव्हते मुंबईत… एकदातरी call करावासा वाटला का तुला… मी केला तर तू बिझी असायचास… म्हणे Best friend… " ,

" Sorry बाबा, चल आज जाऊया फिरायला… ",

" तूच जा एकटा… मला नाही यायचं… " ,

" काय गं… अशी करतेस… sorry म्हटलं ना… " . सुवर्णाचा काहीच response नाही. विवेक हिरमुसला आणि कामाला लागला. Lunch time झाला. विवेकच्या चेहऱ्यासमोर एक डब्बा आला. सुवर्णाने त्याच्यासमोर डब्बा धरला होता. 

" आता कशाला … रागावली आहेस ना माझ्यावर… " विवेक बोलला. 

" गप्पपणे खा… तुझ्यासाठी आणलं आहे. आणि जास्त नाटकं करू नकोस. मला पण भूक लागली आहे. समजलं ना. " विवेक हसला आणि दोघेही जेवू लागले.

" काय रे … ती पूजा… तुला कधीपासून ओळखते. ती असताना माझी आठवणच राहत नाही तुला. ",

" असं काही नाही गं. " ,

" मग कसं ? ".

" अगं ती बोलायला लागली ना… कि कसं छान वाटते एकदम… मस्त… हसली कि गालावरची खळी बघायला पाहिजे तू… एकदम हरवून जातो मी." सुवर्णा जेवता जेवता थांबली. 

" काय झालं ? ",

" तुझ्या मनात काही आहे का पूजा बाबत. " विवेकने smile दिली फक्त. 

" पागल… तू कशी friend आहेस, तशी तीही माझी friend च आहे." ,

" नाही … इतकी स्तुती करतोस तिची. ",

" कसं माहितेय , पहिली अशी कोणी मुलगी भेटलीच नाही मला कधी. same to same अगदी… माझंच प्रतिबिंब आहे ती. त्यामुळे मला आवडते ती खूप." ,

" आवडते कि प्रेमात आहेस तिच्या. " विवेकने तिच्या डोक्यावर टपली मारली. 

" फक्त आवडते ती… आवडणे आणि प्रेमात असणे यात खूप फरक आहे. " ,

" आणि तो फरक खूप लहान असतो , ते तुलाही चांगलं माहित आहे … विवेक. ". सुवर्णा बोलली. 

" Thanks सुवर्णा, पण मी पुन्हा कोणाच्या प्रेमात नाही पडणार कधी. " ," OK " सुवर्णा बोलली. जेवण झालं तशी सुवर्णा पुन्हा बॉस बरोबर मिटिंगला गेली. 


            निघायची वेळ झाली ऑफिस मधून. विवेक तर कधीच बाहेर पडला होता. आज विवेक फिरायला घेऊन जात आहे, म्हणून सुवर्णा निघताना खुश होती. तिला जरा वेळ लागला निघताना. गेट जवळ पोहोचली ती धावतच, विवेक नव्हताच तिथे… ती बाहेर रस्त्यावर आली… तेव्हा तिला पूजा आणि विवेक पुढे चालत जाताना दिसले. कालच्या गप्पा चालू होत्या त्यांच्या. सुवर्णाला जरा वाईट वाटलं. तिने तिथूनच रिक्षा पकडली आणि ती स्टेशनला गेली. ते दोघे बोलत बोलत स्टेशनला आले. पूजा ट्रेन पकडून गेली तशी विवेकला सुवर्णाची आठवण झाली. विसरलो… तिला घेऊन बाहेर जायचे होते… त्याने लगेच तिला call लावला. तिने कट्ट केला. पुन्हा लावला, पुन्हा कट्ट. विवेक नाराज झाला स्वतःवर. 


रात्री त्याने सुवर्णाला call केला. यावेळी तिने उचलला. 

" Hello… " ,

" Hello… सुवर्णा… Sorry यार. विसरलो मी पुन्हा. " ,

" Sorry का बोलतोस सारखं सारखं… " ,

" तुला राग आला ना माझा. " ,

" नाही. " सुवर्णा शांतपणे म्हणाली. 

" मग call का नाही घेतलास माझा. " ,

" असंच. ". विवेक पुढे काही बोलला नाही.

" विवेक, तू गुंतत चालला आहेस पुन्हा. ",

" नाही गं पूजा… ", 

" विवेक… मी सुवर्णा आहे. पूजा नाही. " विवेक बावरला. 

" Sorry… Sorry, चुकून नावं आलं तोंडावर. " ,

" बघ विवेक, तू तुझ्या मनावर कंट्रोल आहे असं म्हणतोस आणि आता हे… " विवेक काही बोलला नाही. 

" मी एक मैत्रीण म्हणून सांगितलं तुला… बाकी तुझ्या मनावर आहे " म्हणत तिने call कट्ट केला. विवेक तसाच गच्चीवर आला. आज तशी अमावस्या होती. परंतु पावसाळा असल्याने आभाळ थोडं ढगाळलेलं होते. खरंच का… आपण गुंतंत चाललो आहे का पूजात… नाही… माझा कंट्रोल आहे मनावर. तसं नाही होणार कधी. मला पुन्हा प्रेम नको आहे कोणाचं. नाहीच पडणार प्रेमात… मग सुवर्णा असं का बोलते… मस्त थंड हवा आली, विवेकने वर पाहिलं… पाऊस तर नाही पडणार आज.… आज धुकं मात्र राहील आकाशात… आणि खूप साऱ्या चांदण्या चमकत असतील स्वतंत्रपणे, चंद्र नाही म्हणून. आज आपला " तारा " नाहीच दिसणार पुन्हा…. धुकं दाटलाय म्हणून … पुन्हा एकदा " धुक्यातलं चांदणं " ……. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy