Varsha Pannase

Tragedy

4.5  

Varsha Pannase

Tragedy

देहदान

देहदान

2 mins
229


शेजारी एक सधन कुटुंब राहतं. चार मुले तिनं मुली असे मोठे कुटूंब होते ते .प्रत्येक मुला जवळ गाडी, बंगला ,नोकर चाकर ,दोन मोठी मुले अधिकारी,तिसरा राजकारणी चौथ्याचा व्यवसाय होता.बस वाघीणीच्या दुधाचीच कमी होती तिथल्या मावशी हृदय विकाराच्या झटक्याने वारल्या. धक्काच बसला मनमिळावू ,सुस्वभावी, इतरांना मदत करणे, सर्वांच्या दुःखात सहभागी होत होत्या .अहो एवढेच काय एकदा आम्ही बाहेर फिरण्यासाठी गेलो रस्त्यात एक रिक्षावाला रिक्षा चालवत होता उन्हाळ्याचे दिवस होते ते त्याच्या पायात चप्पल नव्हती मावशीने स्वतःची चप्पल काढून रिक्षावाल्याला दिली विचार करा कशा स्वभावाच्या असतील मावशी. राजकारणात त्यांना रुची होती. वर्ग चौथा एवढच शिकलेल्या. पण रोज वर्तमानपत्र वाचत उंचपुऱ्या हसरा चेहरा कपाळी मोठे कुंकू घरंदाज होत्या गौर वर्ण एखाद्या राजकन्येला ही लाजवेल अशी कांती..

आम्ही सहकुटुंब त्यांच्याकडे गेलो उच्च विचारसरणीच्या मावशी आता अनंतात विलीन झाल्या होत्या. आम्ही त्यांच्या शेजारी बसलेलो होतो मुले मुली नातलग त्यांचा आक्रोश चालू होता. तितक्यात एक ॲम्बुलन्स आली आणि मावशीला ॲम्बुलन्स मधल्या कर्मचाऱ्यांनी व नातलगांनी उचलून ॲम्बुलन्स मध्ये ठेवले. मुलींचा आक्रोश चालूच होता. क्षणात ॲम्बुलन्स मावशीला घेऊन गेली.

काही कळायला मार्ग नव्हता आम्हाला कळलेच नाही सहज विचारणा केली कुठे नेले मावशीला? उत्तर आले मावशीने देहदानाचा निर्णय घेतला होता.का घेतला असेल हा निर्णय? उगीच मनात शंका येत होत्या एवढं सगळं चांगलं असल्यावर का केले असेल देहदान? क्षणात विचार आला मावशी उच्च विचारसरनीच्या होत्या. डॉक्टरांनी काहीतरी शिकावं आपला देह मरणानंतर शिक्षित मुलांच्या कामी यावा.मुलांनी आपल्या शरीराच्या विवीध भागांवर शिकावं. म्हणून त्यांनी देहदान केले असेच मुले सांगत होती आणि ते सर्वांना पटलेही.आमचे अगदी घरगुती संमध होते.हे बहिण मानत मावशीच्या मुलीला ती जातांना आमच्याकडे आली आणि घायमोकळ होवून रडू लागली वाटण्या केल्या वआई बाबांना चारही भावांनी सांभाळण्यास नकार दिला. आश्चर्याचा धक्काच बसला आई करारी होती निर्णय क्षमता तिच्यात होती स्वाभीमानी होती आईने तेव्हाच ठरविले देहदान करावे एकाही मुलाचा मला हात लागता कामा नये.असे ती म्हणत होती.काही दिवस खेड्यावर रहायला गेली कुणालाच काही सांगीतले नाही मुलाचे सुनांचे कौतुकच. कसा येईल कोणाला संशय. माझ्या नवऱ्याला देहदानाचा फार्म आणायला लावला आणि देहदानाचा निर्णय घेतला. मुलांनी जरी वरवर सर्व घटना इतरांपासून लपवून ठेवली पण मनात रोज सकाळ संध्याकाळ आईवर केलेला अन्याय आठवत असेल शिक्षाच ती .मरेपर्यंत आठवणीत राहिल अशी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy