Varsha Pannase

Others

4.6  

Varsha Pannase

Others

नाऱ्याचा झाला नारायण

नाऱ्याचा झाला नारायण

6 mins
313


इ.स. 1920

पूर्णा नदीकाठचं एक गावं. गावात जुन्या पद्धतीचे मोठे शेणा मातीचे घर,भलं मोठ अंगण अंगणात तुळशी वृंदावन बाजूला प्राजक्त पिवळ्या बिट्टिचं झाड. दारात बैलबंडी, गाईचा गोठा आणि गाय वासरू मनमोहक वातावरण आणि त्या घरात रहाणारा आनंदी परीवार.घरात गणोजी त्यांची पत्नी दोन मुले,एक मुलगी एवढा परिवार परिस्थिती नाजूक होती शेतीत पोटापाण्याचा पुरतं पिकवत .

कुटुंब स्वाभिमानी होतं.नारायण सर्वात मोठा, दुसरा मुलगा हरी, मुलगी कामिनी मुले मोठी झाली नारायण समजदार होता बाबांना हातभार लागावा म्हणून त्याने काहीतरी उद्योग करण्याचे ठरविले. नारायणा चे राहणीमान एकदम चांगले होते उंच धिप्पाड शरीरयष्टी, गौरवर्णीय,रांगडा, जणू भीमच. देखणा राजबिंडा कोणाशीही आदरपूर्वक बोली. नारायणाला पाहताक्षणी वाटणारही नाही हे गरिबाचं पोरं आहे म्हणून पण परिस्थितीने हतबल झाला होता. गावात त्याला नाऱ्या या नावाने बोलवत वडिलांना हातभार लागावा म्हणून तो काहीही करायला तयार होता. पूर्वी डोक्यावर पेटी घेऊन बांगड्या पीना, गळ्यातले,कानातले, मनी डोरले भांगटिवा, बेसर विकायला गावोगावी जात. हाच व्यवसाय करण्याचे नारायणाने ठरवले नारायण गावोगावी डोक्यावर पेटीत सर्व वस्तू घेऊन पायीच विकायला जात होता. घनदाट झाडी वळणाचा रस्ता शेती आणि जंगलच नाऱ्या तसा धाडसी होता. रोज सात-आठ किलोमीटर पायी चालून नाऱ्या आपला व्यवसाय करायचा. रोजच नवीन नवीन गावी वस्तू विकायचा.सारे गाव नाऱ्याला ओळखी मुली बायका तर त्याच्या भोवती गराडा घालत.बांगडी,पिना,भांगटिवाssssमनी डोरले...... घ्या वं बाई ssssअसा त्याचा आवाज आला की बायका जमा होत नाऱ्याsss नाऱ्या ss करुन त्याला आवाज देत असेच एक गाव होते त्या गावी पाण्याची टंचाई असे नारायण मूळचा पुर्णाकाठचा पाण्याची टंचाई त्याला माहीतच नव्हती त्या गावी पाण्याची टंचाई असल्यामुळे कितीही दुरून येणाऱ्या अनोळखी व्यक्तीला पाणी देण्यास कोणीच तयार होत नसे. नाऱ्या चा व्यवसाय त्याच गावी जास्त चालत होता.नाऱ्याला खूप तहान लागायची पण कासाविस होऊन मन मारी त्या गावी एक कुणब्याचे श्रीमंत घर होते गावातले साधन कास्तकार कुटुंबच होते श्रीमंती सोन लानं सर्व काही त्या घरात होतं .म्हणतात त्या कुटुंबाच्या घरी सोन्याचे कांब होते त्या कुणब्याचा दरारा दबदबा होता

त्या कुनब्याला (शेती करणारा)दोन सुस्वरूप सुंदर देखण्या अशा दोन मुली होत्या व एक वेडसर मुलगा. दोन्ही मुलींची सोनकांती मुद्रा हसतमुख, सौंदर्याची खानच आणि कमालीच्या धिट एकीचे नाव मनकरना आणि दुसरी लक्ष्मी राजकन्याच जणू ,फुलासारख सुंदर जीवन होतं त्यांचं नाऱ्या आवर्जून त्यांच्या कडे जायचा सर्व वैभव आपल्या डोळ्यात सामावून विचारात मग्न होई .देवाने आपल्यालाच का असे जीवन दिले असेल असा विचार त्याच्या मनात घोळत राहि.कधी स्वप्नांत गढून जाई, हे वैभव आपल्या जवळ असते तर आपल्यावर ही दारोदारी हिंडण्याची पाळी आली नसती, तो दुःखी होई, मन खिन्न होई मोठे स्वप्न होतें नाऱ्याचे.नारायणाला जवळपासची लोक नाऱ्या म्हणून बोलवत कास्तकाराच्या मुली नारायण जवळून पीना, भांग टिवा,गळ्यातले ,कानातले, बेसर ई.वस्तु घेत मोबदल्यात भाव कमी करून नारायण त्यांना पाण्याची मागणी करीत असे.आई बाबांच्या चोरून मुली नारायणला पाणी पाजत व त्याचा आत्मा शांत करत. चांगली ओळख झाली होती असेच दिवस लोटले गेले.नारायणाच्या बाबांनी गणोजीराव ने नाऱ्याला जिल्ह्याच्या ठिकाणी ( अकोला) येथे जोडी विकायला पाठवले व येताना काही वस्तू घेऊन यायला सांगितल्या टोपले,भरणे,किराणा,शेवचिवडा,खाऊ इत्यदी. नारायणाने त्या वस्तू वाटेतच हरवल्या नारायणाला वाटले आता आपले बाबा आपल्याला रागावतील खुप दहशत होती त्यांची. त्याचे बाबा संतापी होते आपल्या बाबांना खूप भीत होता बाबा आता घर डोक्यावर घेणार हे नाऱ्याला माहीत होतेत्याचे धाबे दणाणले. मनातून त्याला भीती वाटली नाऱ्या धाकाने परत गावी गेलाच नाही.अकोला येथे छोटी-मोठी कामे करू लागला कोणाच्या दुकानावर नोकर किंवा इतर छोटी-मोठी कामे करून त्याने कसेबसे दिवस काढले मित्र दोस्त मिळाले म्हणायला बोलायला कोणीच नव्हते वळनातलं पोर होतं पण वाईट संगत लागली काय होते लाव सट्टा ,एकदिवस तू श्रीमंत होशील असे अमीश मिञ दाखवत होते नाऱ्या वाहवत गेला मित्रांच्या संगतीत त्याला सट्ट्याचा नाद लागला. कमावलेला पैसा सट्यात घालत होता असे करता करता सट्टयाच्या धंद्यात तो पैसा जिंकू लागला पैसे जिंकून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आयुष्य बदलून गेले त्याने मोठे घर खरेदी केले आपले एक दुकान टाकले धंद्याला सुरुवात केली त्याला माहित होते आपण जे केले ते योग्य नाही आणि पुन्हा तो साधेपणाने आपले जीवन जगू लागला भरभराट लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरू लागली परत गावी आला आज तो नाऱ्याचा नारायण झाला होता. आई-बाबा म्हातारी खूप आनंद झाला सर्व सुख दुःख त्याने आई वडिलांना सांगितली माफी मागितली नारायण गावी गेला तेव्हा त्या मातापित्यांनी त्याला माफ केले.नारायणाला नाटक,पद, काव्य,रंगमंच याची खुप आवड होती नारायण हृदयनाथ मंगेशकरांचे नाटक,गायन ऐकायला जात असे आता त्याचा राजेशाही थाट होता वाईट मार्ग त्याने सोडला होता माणूसकी कमालीची होती एवढेच नाहीतर स्वत: गणपतीत किंवा इतर कार्यक्रमात भुमीका वठवायचा 'महाराणा प्रताप,झाशीची राणी ह्या भुमीका तो वखुबी वठवायचा.

आता गणोजीरावने नारायणाचे लग्न करण्याचे ठरविले विषय निघाला नारायणासाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला नारायणाला एकही मुलगी पसंत येई ना त्याला त्या श्रीमंत कष्टकऱ्यांच्या मुलींसारखी सुंदर,सुशील मुलगी पाहिजे होती. त्याच्या मनात विचार तरळून गेला आता आपल्या जवळ दुकान पैसा अडका सर्व काही आहे त्या गावची कास्तकाराची मुलगी सुंदर देखणी आहे मुलगी नाऱ्या च्या मनात होतीच नार्‍याने बाबांजवळ त्या मुली विषयी विचार मांडले.मुलगी समाजाचीच होती गणोजी तडक मुलीच्या मामाकडे मागणी घालायला गेला गणोजी ची परिस्थिती मुलीच्या मामाला माहीत होती सट्टा आणि जिंकलेले साम्राज्य कसे उभे झाले हेही त्या मामाला माहीत होते म्हणुन मामाने आपली भाची देण्यास नकार दिला नारायणानाला ते अपमानास्पद वाटले. नारायण तेथेच थांबला नाही त्याने आपल्या बाबांना मुलीच्या कास्तकर बापाकडे पाठवले आणि खुद्द बापाशीच बोलून मागणी घातली कास्तकारांच्या मुलगा वेड सर असल्यामुळे मुलींचे लग्न रखडले होते बाप थोडा चिंतेतच होता भाऊ वेडसर असल्यामुळे मुलींचे लग्न रखडले होते

आठवडा गेला काही दिवसांनी कास्तकाराचा लग्नासाठी होकार आला नारायण ला खूप आनंद झाला नारायणाच्या मनासारखे झाले होते सत्तर तोळे सोने नारायणाने मनकरणे साठी आणले होते.लग्न अगदी थाटामाटात झाले नारायणाने मनकरणेला एकाद्या राणीला ठेवावे तसेच सुखात ठेवले .त्या काळी बायका बाहेर निघत नव्हत्या पण नारायण मनकरणेला नाटक पाहायला बग्गीत घेवून जाई. प्रगल्भ विचार होते नारायणाचे.नारायणाचा व्यापार वाढला

सोन्या-चांदीचे मोठे व्यापारी म्हणून नारायण ओळखला जायचा.धनाठ्यच.मुले चांदीच्या ताटात जेवत चांदीचे गंगाळ आंघोळीसाठी होते असे वैभव .

काळ इंग्रजांचा होता स्वातंत्र्य चळवळीचा काळ चळवळीत नारायणाचा सक्रिय सहभाग होता.तेव्हा परिस्थीती बिकट होती. राजराजेश्वराजवळ चळवळीची खलबते होत ते धडाडीचे कार्यकर्ते होते.स्वातंञ्या विषयी त्यांच्या मनात तळमळ होती इंग्रजांनी त्यांना पकडले त्यांना तुरुंगवास झाला.

एक मुलगा होता दुसरा मनकरणेच्या पोटात होता पत्नी हदरली पोटातला मुलगा सातव्या महिन्यात झाला.व ती वेड्या सारखी करू लागली वेडीच झाली. बाळंत रोगाने तिची तब्येत खालवत गेली शेजाऱ्यांनी तिला सरकारी दवाखान्यात भरती केले काही दिवसांनी तिला मृत घोषीत केले.नारायणाला तुरुंगात पत्नी वारल्याची बातमी कळली त्याला काही दिवस बेलवर सुटका झाली.नारायण दवाखाण्यात मनकरणेला पाहण्यास गेला शवगृहात तिला टाकले होते नारायण तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ घेवून हृदयाला कवटाळून घायमोकळून रडू लागला तेच मनकरणेचा श्र्वास चालू असल्याचा भास नारायणाला झाला डॉ.बोलावले डॉ... डॉ.....करत नारायण ओरडत होता.मनकरणा जीवंत होती.नारायण डॉक्टरावर चिडला त्याचा संयम तुटला तो डॉक्टरांच्या अंगावर गेला त्या कारणाने परत त्याला तुरुंगवास भोगावा लागला.इंग्रजांना कारणच झाले.काही दिवस तुरुंगवास भोगला परत सुटका झाली

दुकान बसले सोने गेले नातलगांनी नेले.घर तेवढे शाबुत होते सुटका झाल्यावर नारायण घरी आला त्याच्या डोक्यावर पहाडच कोसळला.

मुले चांदीच्या ताटासाठी हट्ट करुन लागली बायकोची दयनिय अवस्था पाहून नारायण खचून गेला.त्याच्या मनात आत्महत्येचा विचार राहून राहून येई त्याने आपल्या डोक्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्याचा प्रयत्नही केला पण नियतीचा ते मान्य नव्हते.बायका मुलांचं प्रेम त्याची साथ तो सोडू शकत नव्हता.घरात चिमणीने घरटे केले होते त्या घरट्यांकडे बघून पिल्लांकडे बघून तो दिवस काढत होता आपण ह्यांच्यापेक्षाहि हतबल आहोत का ?असा विचार नारायणाच्या मनात येत होता तेव्हाच त्याने ठरविले आयुष्य एकदाच मिळते आपण ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीत आज आहोत आपण अजुन कमवू कष्ट करु आणि सुखी होवू नव्याने जिवन जगण्याची उमेद नारायणा त होती जिद्द होती.

डॉक्टरी उपाय झाले पत्नी वेड्यातून थोडी बरी झाली पण परिस्थिती जैसे थे पण नारायणाने पत्नीला दुखवले नाही स्वयंपाका पासून तर घर कामा पर्यंत तिला मदत केली व तिला परिस्थिती जाणवू दिली नाही मेहनत केली काळ गेला, त्यावर दोन मुली एक मुलगा झाला परत गाडी थोडी रुळावर आली. मोठा मुलगा हाताखाली आला मुलांनी व नारायणाने परत मोठ्या कष्टाने साम्राज्य उभे केले.

नातवंड,सुना,जावंई, सुखावला होता नारायण. सुखीसंसाराचे स्वप्न उराशी कवटाळून त्याने अखेरचा श्वास घेतला.वयाच्या सत्तरीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले नारायणाचे.माणूस चांगला असुन चालत नाही परिस्थीती तशी असावी लागते (परिस्थितीची साथ असावी लागते)


Rate this content
Log in