कुमुदिनी 🌺
कुमुदिनी 🌺
गोड सरोवर नाजूक,इवले, कौमुदशुभ्र हिंदोळ्यावर झुलत, विहरत, वाहत नदीच्या गेले तीरावर अलगद. वारा आला पाऊस आला, विजांचा तो गडगडाट झाला इवल्या , नाजूक कौमुदीला वाहत वारा घेऊन गेला.अथांग सागर, भरती ,ओहोटी अफाट लाटा कौमुद पेलती.लाटांचा तो अतूट मारा,इवल्या फुलाने सहन केला.
दोन कळ्या उदरी आल्या, इंद्र, ऐश्वर्य फुला लाभले. फुलाला तर उभारीच आली. लाटा झेलत डूबत, उभारत , पडत, विस्कटत किनारी आले स्व तलावात फुल ते विसावले
चिखलात त्याने मूळ रोवले, दोन्ही कळ्यांना जरा कुरवाळले. दोन पाने छोटी मोठी कळ्यांना रक्षण्या झटत होती. पानांनी मग चौफेर, मजबूत गुंफन केले.
चिखल, पाणी, पायी तूडवले. हिरवे हिरवे तलाव सजले कौतुक एक एका पाना आले, कवच झाले पानांचे. काळोख संपून पहाट झाली, कळ्या उमलल्या राजहंस आली. पराग पिवळे , शुभ्र पाकळ्या, कळ्यांना ती निरखू लागली.राजहंस ते इथेच हरले . हंसाला त्या गुपीत कळले. पानांनी स्वयंवर इद्र कळीचे रचले. हंसाची ती हंसीनी झाले.हंस कळीला घेवून गेला.कौमुद मनी ते हर्षित झाले. डोळा त्याच्या पाणी आले.दवबिंदू ते इतरांना दिसले, मन त्यांचे प्रफुल्लित झाले.दवबिंदू नव्हे ते अश्रू फुलांचे, कळ्यांना नी पानांना कळले.
कौमुद दुःखी, शांत, स्तब्ध, हिरवी पाने घेती डोईवर, सहानुभूतीचे तुषार त्यावर अश्रूंची त्या फुले झाली. काळोख संपून पहाट आली. काळोख संपून पहाट आली.....
