The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

vinit Dhanawade

Fantasy

2.5  

vinit Dhanawade

Fantasy

चांदण्यात फिरताना ( भाग १ )

चांदण्यात फिरताना ( भाग १ )

13 mins
1.1K


" आज उशीर केलास तू ...... कूठे होतास... कधीची वाट बघते आहे तुझी.... " स्मिताने यशला आल्याआल्याच विचारलं. थोडीशी रागावलीच ती.

" अगं..... काम होता थोडं .... बॉसनी सोडायला नको ... म्हणून थोडासा उशीर झाला " तरीही ती रुसलेलीच होती.

यश सुद्धा मग तसाच बसून राहिला तिच्या शेजारी. थोडावेळ असाच गेला. " बोल ना काहीतरी ... गप्प का झालास ? " ,

" तू बोलतच नाही आहेस आणि मी एकटाच बडबड करत आहे. लोकांना वाटेल मी वेडा आहे. " तशी स्मिता हसली.

" काय छान सुगंध येतो आहे ? " स्मिता म्हणाली ,

" मोगऱ्याची फुलं आणली होती, आता तू रागावली आहेस ,मग यांचा काय उपयोग .... देतो टाकून... " ,

"नको ... नको ... वेडा आहेस का ? .... मला आवडतात ती ." असं म्हणत तिने स्वतः हूनच फुलं घेतली.

" काय रे ... तुझ्या ऑफिस मधे मोगऱ्याचं झाडं - बीड आहे वाटते ." ,

" हो गं ... ऑफिसच्या बाहेर एक झाड आहे मोगऱ्याचं . कोणी हात लावत नाही त्याला. मग मीच ती फुल घेऊन येतो तुझ्यासाठी." ,

" अरे ... पण फुलं तर सकाळचीच फुलतात ना....मग तुला कुठून भेटतात हि फुलं... जादूचं झाड आहे वाटते.... बघितलं पाहिजे एकदा ." ,

" तसं काहीनाही गं जादू-बिदू ... कळ्यांना सांगतो मी ... आपल्याला स्मिताला भेटायला जायचे आहे कि फुलतात ती आपोआप." तशी स्मिता लाजली. ,

" मुलींना इम्प्रेस कसं करावं हे तुझ्याकडून शिकावं .... ना." स्मिता म्हणाली,तसं यशला हसायला आलं.

त्याचबरोबर छान थंड हवेची झुळूक आली. " मघापासून किती उकडत होतं.... तू आलास आणि सगळ कसं छान थंड थंड झालं.

मी observe केलं आहे खूपदा कि तू आलास कि छान गार गार वारा सुटतो, आजुबाजूच शांत शांत होते.. कसं काय रे... ",

" त्याचं काय आहे ... निसर्ग जरा जास्तच खुश असतो नेहमी माझ्यावर आणि तू असल्यावर तर असं होणारच ना जादू केल्यासारखं... " ,

" मी काय जादुगार आहे ? " ,

" मग .... माझ्यावर नाही केली आहेस का जादू .... " ,

"गप्प रे काहीही बोलतोस.... " तिला हसायला आलं ,

" अजून एक गोष्ट ... आज सुद्धा मोगऱ्याचा सुगंध आला.. तू येण्याआधी....मोगऱ्याचं अत्तर लावतोस वाटते..... हो ना.. " तो नुसताच हसत होता...

" आणि तुला गेल्यावेळेस विचारलं होतं ,त्याच उत्तर अजूनही नाही दिलंस मला... " ,

" कोणता प्रश्न ? ",

" दर पोर्णिमेला तू गायब असतोस आणि अमावस्या असली कि तुझा चेहरा जास्तच उजळत असतो, मेकअप वगैरे करतोस का अमावस्येला ? " ,

" चंद्राला लाज वाटू नये म्हणून मी पोर्णिमेला बाहेर पडत नाही आणि अमावस्या असली कि मी जास्त उजळत असतो ना म्हणून चंद्र येत नाही," ,

" सांग ना रे... " ,स्मिता लाडातच म्हणाली,

" खर तर आमचा बॉस आहे ना तो जरा भित्रा आहे आणि अंधश्रदाळू पण... त्याला कोणीतरी सांगितलं आहे कि पोर्णिमेला केलेली काम फायदा करून देतात म्हणून तो सगळ्यांना थांबवतो रात्रभर. आणि अमावस्या आली कि तो दुपारीच पळतो घरी. त्यामुळे आम्ही सगळे मोकळे असतो. त्यादिवशी काहीच tension नसते म्हणून तुला माझा चेहरा उजळतो आहे असं वाटत असेल. " ,

" असेल ... असेल तसच काहीतरी." स्मिता म्हणाली ,

" अरेच्या... बोलता बोलता कधी आपल्या वाटेवर आलो ते कळलंच नाही." यशच्या बोलण्याने स्मिता जागी झाली ,

" हो रे .... कळलंच नाही ",

" चल बाय .... उद्या भेटू संद्याकाळी , "

" आणि हो.... उद्या लवकर ये .... फुलं घेऊन ये... " ,

" रोज तर आणतो... उद्या सुद्धा आणीन... बाय.... " असं म्हणत यश आणि स्मिता आपापल्या वाटेने घरी जाण्यास निघाले.

स्मिता आणि यशची ओळख तशी ६ महिन्यांपूर्वीची. स्मिता Actually मुंबईत राहणारी, डॉक्टर होती ती. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई मध्येच एखाद्या मोठया आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळेल असं तिला वाटत होतं आणि तसं झालं ही. मुंबईत मोठया हॉस्पिटलमध्ये तिला job मिळाला पण तो आनंद फक्त तीन महिनेच टिकला. कारण त्या हॉस्पिटल मधून कोल्हापूरला गेलेली एक महिला डॉक्टर आजारी पडली म्हणून तिची जागा भरून काढण्यासाठी स्मिताला तिकडे पाठवलं गेलं.

" काय वैताग आहे ..... मला कशाला पाठवत आहेत ? " स्मिता रागातच तिच्या मैत्रिणीशी बोलत होती,

" अगं.... त्यात काय रागवायचे. तू नवीन आहेस म्हणून तुझं नाव पुढे केलं आणि तुला चांगला अनुभव मिळेल ना गावात सुद्धा. " ,

" ठीक आहे गं. पण तिला काय झालं नक्की ? " ,

" माहित नाही .... कोणालाच माहित नाही .....आणि कोणी सांगतही नाही बरोबर .....सरांकडून ऐकलं जरासं.... कि ती वेडी झाली . "

" वेडी ? " ,

" अगं... म्हणजे तशी वेडी नाही.... मानसिक धक्का बसला आहे असं म्हणतात.",

" म्हणजे मी पण वेडी होणार .... " आणि दोघीही हसायला लागल्या. आठवड्याने तिला कोल्हापूरला जायचं होतं. जरा वाईटच वाटत होतं तिला.

गावात कधीच गेली नव्हती ती,अगदी लहानपणापासून. लहानाची मोठी ती शहरातच झाली होती." पण ठीक आहे " अस म्हणत ती कोल्हापूरला दाखल झाली.

तिकडे तिची राहण्याची व्यवस्था सरकरी क्वाटर्स मध्ये केली होती. प्रोब्लेम तर वेगळाच होता. हॉस्पिटल आणि तिची रूम यामध्ये खूप अंतर होतं. हॉस्पिटलच्या आजूबाजूस कोणतीच व्यवस्था नव्हती. तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. जशी तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुरुवात केली तसे वेगवेगळे प्रश्न समोर यावयास लागले. गावातली वस्ती तेवढी सुधारलेली नव्हती. एकच शाळा होती तीसुद्धा मोडकळीस आलेली होती. कच्चे रस्ते.... वाहन जवळपास नाहीच. प्रवास चालायचा तो बैलगाडीतून. एकदोघांकडे सायकल होत्या. सरपंचाकडे तेवढी गाडी होती, तीसुद्धा कधी कधीच घराबाहेर यायची. S.T. च्या बसेस यायच्या गावात.... ठरलेल्या वेळेत. सकाळी ६.३० ला आणि संद्याकाळी ५ ला., काळोख होण्याच्या आत. गावात वीज तर नुकतीच आली होती, तीपण लोड-शेडींग असलं कि रोज ५ तास जायची. फक्त स्मिताच्या रूमची वीज असायची कारण ती सरकारी घरात रहायची म्हणून. रस्त्यावरती दिवे होते पण दिव्यांची संख्या खूप कमी होती.

एक दिवा इथे तर दुसरा खूप लांब असायचा. त्यामुळे रस्त्यावर प्रकाश तसा नाहीच. बर..... हॉस्पिटल जवळ घर बघावं तर तिथे सगळे रूम अगोदर पासूनच बुक झालेले. त्याहून तिकडे पैसे जास्त. मग तिने तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. रोज ती लवकर निघायची घरी जाण्यासाठी. बस सुद्धा वेळेवर असायची ना. एका दिवशी मात्र तिला निघायला वेळ झाला. धावतच ती बाहेर आली. तर तिला तिची बस जाताना दिसली.

" आता काय करायचं ? " ,

" पुन्हा हॉस्पिटल मध्ये जाऊया का ? " हॉस्पिटल मध्ये कोणीच थांबत नव्हतं. त्यामुळे तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नव्हता. तसंच तिने पायी पायी जाण्याचा निर्णय घेतला. स्मिताला रस्ता माहित होता. परंतु तोच रस्ता बरोबर आहे कि नाही याची शंका होती.

तेवढयात एक बैलगाडी येताना दिसली," काय व्हो.... कोनीकड चालता आहात वो बाई.... " ,

" अहो मला गावात जायचे आहे ... बस सुटली माझी." ,

" मंग .... एकटया जावू नका.... बसा .... म्या सोडतो तुमाला.. " तिला बर वाटल. हळूहळू करत बैलगाडी एका ठिकाणी येउन थांबली.

" बाई.... इकडून तुमाला एकटीला जावं लागेल .... माजी वाट दुसरी हाय... " नाईलास्तव तिला उतरावं लागलं.

" मी कुठून जाऊ आता ? " ,

"दोन वाटा हायत .... हि एक सरल वाट हाय .... पन तिकडून कोनी जात नाय ...... दुसरी वाट हाय ती मोठी हाय ..... तिकड असत्यात लोक .... तिकडून जावा ...

बरा ... म्या निगतो हा... सांभाळून जावा " अस म्हणत तो निघून गेला. दोन रस्ते होते ... एक मोठा आणि दुसरा short -cut ... खूप वेळ सुद्धा झालेला ...

" काय करूया.... short -cut घेऊया." असा विचार करून स्मिता short -cut ने निघाली.

बैलगाडी वाला च्या बोलण्याप्रमाणे कोणीच नव्हते तिथे एकटीच चाललेली होती. दिवे होते लांब लांब. .... नशीब तिच्याकडे torch होता. मिट्ट काळोख. त्यात भर पडली ती अमावस्येचि. चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता ...त्यातून कसले कसले आवाज येत होते. गावात पहिली कधीही न आलेली आज एकटी चालत होती काळोखातून. प्रचंड घाबरलेली. अचानक कुठून तरी एक कुत्रा भुंकत आला. तशी ती धावतच सुटली. आणि रस्ता चुकली. कुत्रा तर गेला कुठेतरी.

" आता कुठे जायचे..... ? " विसरलीच ती. आजूबाजूला कोणीच नाही. काळोख सगळीकडे, mobile ला रेंज नाही. तिला रडूच आलं. दिव्याखाली ती रडत बसली. ५-१० मिनिटं झाली असतील. एकदम थंड हवेची झुळूक आली. हवेच्या झोताबरोबर मोगऱ्याचा सुगंध आला. छान वाटलं तिला..... आणि मागून आवाज आला .. ,

" Excuse me.... , मी काही मदत करू का तुम्हाला....... "

स्मिताने मागे वळून बघितलं. एक मुलगा उभा होता. उंच, गोरापान,मजबूत शरीरयष्ठी,पाणीदार डोळे आणि तेजस्वी चेहरा. वय असेल २७-२८ च्या आसपास. अगदी राजबिंड व्यक्तिमत्व. " Hello..... madam ... काय झालं तुम्हाला? कशाला रडत आहात.... काही मदत करू का... " आणि स्मिता भानावर आली.

" हं... हो.. मी रस्ता चुकले आहे..... इकडे नवीन आहे मी आणि इकडे कोणीच नव्हते ..... घाबरले मी आणि रडायला आलं मला. " ,

" घाबरू नका तुम्ही... कुठे राहता तुम्ही... " ,

" तिथे कुंभार गाव आहे ना... तिथे सरकारी क्वाटर्स मध्ये राहते मी.. " ,

" ठीक आहे... तिकडे, मी पण तिकडूनच जात आहे..... पाहिजे तर तुम्ही येऊ शकता माझ्या बरोबर... " स्मिताने त्याला निरखून पाहिलं.... छान असा कडक इत्री केलेला निळ्या रंगाचा शर्ट, त्यावर लाल रंगाची टाय, पांढऱ्या रंगाची trouser, polish केलेले शूज आणि खांद्यावर Laptop ची मोठी bag.....

" चांगला माणूस वाटतो, निदान सोडेल तरी घरी आपल्याला. असा विचार करून ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली,

" तुम्ही नवीन असूनही या वाटेवर कशाला आलात ? इथून कोणी जात नाही सहसा. सकाळी वेगळी गोष्ट आहे. पण रात्री कोणी नसते इथे.

Actually.. माझी बस miss झाली आणि बैलगाडीतून इकडे आले. लवकर पोहोचण्यासाठी short-cut घेतला आणि वाट चुकले......

पण तुम्ही कसे या वाटेवर .... कोणी येत नाही अस म्हणता तुम्ही ... मग तुम्ही कसे "स्मिताने उलट प्रश्न केला.

त्यावर तो हसला," माझी हीच वाट आहे. मला short-cut घ्यावाच लागतो. माझ गाव तुमच्या गावापेक्षा अजून खूप लांब आहे आणि मला भीती वाटत नाही त्यामुळे मी इथूनच जातो नेहमी. ",

" त्यात आज अमावस्याही आहे ना.... चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता वाटेवर. " स्मिता चालता चालता म्हणाली,

" नाही ... तिकडे तरीही काळोख असतोच...... पण अमावस्येचा एक फायदा असतो. " ,

"कोणता ?"," वर आकाशात बघा जरा…" तिने चालता चालताच वर पाहिलं. असंख्य तारे लुकलुक करत होते. अस द्रुश्य ती पहिल्यांदाच बघत होती. शहरात सगळीकडेच प्रकाश पसरलेला असतो. चंद्रच असतो फक्त आभाळात. पण गावात तसं नसत ना. ती बघतच राहिली आभाळाकडे.

" किती चांदण्या-तारे आहेत बापरे.... " आश्चर्याने बोलली स्मिता. तशीच चालत होती ती.

"चला madam .... तुमचं गाव आलं ",

" अरे हो ... कळलंच नाही.... चांदण्यांकडे पाहता पाहता... आणि तुम्ही कुठे चाललात?",

" माझा हा रस्ता ..... तुमचा तो ... मी जातो या रस्त्याने..... सांभाळून जावा घरी. " ,

" ok ... thanks " म्हणत तिने त्याचे आभार मानले आणि एकदाची घरी पोहोचली ती.

"किती बर झालं ना ... तो भेटला ते नाहीतर कशी आले असते घरी मी.. "मनातल्या मनात स्मिता बोलली , चालून चालून दमलेली स्मिता लगेचच झोपी गेली.

पुढच्या दिवशी, हॉस्पिटल मध्ये कामात गढून गेली. संध्याकाळी तेच झालं, उशीर. पुन्हा धावाधाव ... पुन्हा बस सुटली. यावेळी कालचा बैलगाडीवाला देखील नव्हता. पायी पायी ... चालत चालत थोडयावेळाने ती त्या ठिकाणी येऊन पोहोचली. दोन वाटा ... कोणती निवडू ...... वेळ पण खूप झालेला. स्मिता त्याच वाटेने निघाली पुन्हा...कालचीच वेळ.... वाट निर्मनुष्य.... आभाळात चांदण्या-तारे.... , बस .. बाकी कोणी नाही. कसलेसे आवाज येत होते. मधेच एक कुत्रा कुठेतरी लांब ओरडायचा. घुबड काळोखातून आवाज करायचा. भीतीदायक वातावरण अगदी. काय करावं सुचेना. पुन्हा ती दिव्याखाली जाऊन उभी राहिली. थोडयावेळाने थंड हवेची झुळूक आली,सोबत मोगऱ्याचा छान सुगंध.... लगेच तिने त्या दिशेने पाहिलं. पुन्हा तोच कालचा ओळखीचा चेहरा..

" काय madam .... आज पण रस्ता चुकलात वाटते... दुसऱ्या वाटेने जायचे ना घरी... " त्याने येतायेताच सांगितले.

" रस्ता नाही चुकले पण जराशी भीती वाटली म्हणून इकडे उभी राहिले ." ,

" चला मग ... जास्त थांबू नका इथे. " तसे ते दोघे निघाले.

" तुमची काय हीच वेळ आहे का घरी जाण्याची ? " ,

" तस काही नाही पण बहुतेक याच वेळेस जातो मी घरी. तिने लगेच घड्याळ बघितलं , संध्याकाळचे ७.३० वाजले होते.

" तुमचं गाव येवढ्या लांब आहे मग एखादी गाडी वगैरे नाही आहे का ? " ,

" नाही आणि गावात कुठे इंधन मिळते गाडीसाठी.... त्यापेक्षा चालल्याने व्यायाम सुद्धा होतो ना... मग गाडीची काय गरज ? " चालता चालता असे वेगवेगळे विषय निघत होते. वेळ कधी गेला ते कळलच नाही." चला.... तुमची वाट आली समोर... बाय .... " अस म्हणून तो निघून गेला.

आता स्मिताला रोजच उशीर व्हायचा.... मुद्दाम नाही. निघायच्या वेळेसच काहीतरी काम यायचं आणि रोज तिला चालतच जावं लागायचं. रोज ती त्या दिव्याखाली थांबायची, मग " तो " यायचा आणि दोघे गप्पा मारत मारत आपापल्या घरी जायचे. अस जवळपास महिनाभर चालू होतं... मधेच ती लवकर घरी गेल्याने त्यांची भेट झाली नव्हती. चांगली ओळख झाली होती त्यांची.

" अगं.... हल्ली तू रोज उशिरा जातेस घरी... भीती नाही वाटत का तुला ? " , स्मिताच्या हॉस्पिटल मधल्या मैत्रिणीने तिला विचारलं.

" भीती कसली ... आणि मला एक मित्र सुद्धा भेटला आहे." ,

" कोण गं ? " ,

" अगं त्याचा आणि माझा एकच रस्ता आहे. फक्त माझं गाव आधी येत... त्याचं जरा पुढे आहे.... ",

" ok... नाव काय .... विचारलं नाहीस का ? " ,

" हो ... सांगते थांब... यश नाव आहे त्याच ... इकडेच पुढे ऑफिस आहे त्याचं… engineer आहे… तिकडे मोठ्या पोस्ट वर आहे." ,

" हं... हुशार आहे वाटते." ,

" हो... छान आहे दिसायला... आणि स्वभाव सुद्धा छान आहे ." ,

" मी कुठे विचारलं तुला ... कसा दिसतो ते ... प्रेमात पडल्या वाटते madam.",

" चल गं.... काहीतरी काय ... " लाजली स्मिता. खरच तिला आवडायला लागला होता तो. यश सुद्धा तसाच होता, कोणालाही आवडेल असा. स्मिता आता काम नसेल तरीही उशीरच निघायची आणि त्याची वाट पाहत थांबायची. यश येतो आहे हे तिला लांबूनच कळायचे... त्यादिवशी सुद्धा ती उशीरच निघाली. त्याचं ठिकाणी येऊन पोहोचली. त्या वाटेकडे जाणार इतक्यात...

" ये बाय .... थांब . " असा आवाज आला मागून... मागे बघते तर एक म्हातारी होती.

" काय झालं आजी ? " तिने विचारलं,

" अगं बाय .... तिकडून कुठं चालली व्हतीस.... या इकडाना जा... " ,

" आजी माझी रोजची वाट आहे ती.",

"गे बाय .... नग जावू तिकडन ... भूत हाय तिकड... " असं म्हणत ती गेली भरभर निघून. स्मिताही थांबली नाही मग. दिव्याजवळ येऊन यशची वाट बघत राहिली..... यश आल्याबरोबर ती त्याच्याबरोबर चालू लागली.

" काय आज गप्प गप्प…?" यशने स्मिताला विचारले,

" नाही रे असंच.. " ,

" काहीतरी आहे... मला सांग काय झालं.. " ,

" तुझा भूत... आत्मा .. यांवर विश्वास आहे का ? " तसा यश थांबला.

" वेडीच आहेस गं तू ... " आणि मोठयाने हसायला लागला. " हसायला काय झालं तुला ? " ,

" अगं .... तू डॉक्टर आहेस ना .... मी engineer.... आणि भुतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस तू .. म्हणून हसायला आलं मला.. पण मधेच कुठे आलं भूत ? "

यशने स्मिताला विचारलं.

" नाही रे ... तिकडे एक म्हातारी भेटली होती... ती बोलली... इकडून जाऊ नकोस... भूत आहे तिकडे." यशला पुन्हा हसायला आलं,

" वेडी गं वेडी... भूत असता तर त्याने मलाच पकडलं असताना पहिलं... कारण तुझा अगोदर पासून मी प्रवास करतो इकडून... काही नाही गं.... गावातली माणस जरा अंधश्रदाळू असतात.... त्यांना काही भास झाला तरी भूत आहे अस म्हणतात............. बाकी काही नाही... भूत वगैरे काही नसत ... ते त्यांच्या मानण्यावर असतं सगळ... " तशी स्मिता शांत झाली. अचानक कुठूनतरी एक घुबड तिच्या डोक्यावरून उडत गेलं. स्मिताने यशचा हात घट्ट पकडला.

" एक सांगू का तुला..... " ,

" सांग ना." ,

" मला एक मराठी गाण आठवलं लगेच." ,

" कोणतं ... " स्मिताने विचारलं.

" चांदण्यात फिरताना ... माझा धरलास हात ... " आणि यश पुन्हा हसायला लागला.

" गप रे " ,

" काय गप्प... आज अमावस्या आहे...... वर आभाळात चांदण्या आहेत आणि तू माझा हात पकडला आहेस ... मग तेच गाण आठवणार ना... " तशी स्मिता हसली. बोलता बोलता आपापल्या घरी कधी आले ते कळलंच नाही स्मिताला.

अश्याप्रकारे त्या दोघांची चांगली friendship झाली होती. ६ महिने झाले त्यांच्या friendship ला. स्मिता त्याच्या प्रेमात पडली होती. पण ती , यश कधी विचारतो आहे याची वाट पाहत होती. मग तिनेच ठरवलं कि आपल्या आई-वडिलांना यश बद्दल सांगायचे. तसं तिने सांगितलं ही. तिच्या आई-वडिलांना काहीच हरकत नव्हती. यश काही विचारात नाही ... मग आपणच त्याला विचारूया लग्नाचं, असं तिने ठरवलं.

त्यादिवशी ती ठरवूनच गेली हॉस्पिटल मधे. संध्याकाळ कधी होते आहे याची वाट पाहू लागली. झाली एकदाची संध्याकाळ आणि निघाली ती यशला भेटायला.

थोडयाच वेळात यशही आला, " तुला एक गोष्ट आज मला सांगावीच लागेल ." ,

" कोणती गं ? " ,

" तू येण्याअगोदर मोगऱ्याचा छान सुगंध येतो. नक्कीच तो फुलांचा नसावा. कारण एवढया लांबून सुद्धा फुलांचा सुगंध नाही येणार. " ,

" ते एक सिक्रेट आहे ." ,

" सांग ना रे " ,

" अगं सिक्रेट वगैरे काही नाही. ..... आमच्या गावात कपडे धुण्यासाठी साबण मिळतो ना, त्याचा वास मोगऱ्याचा आहे , इतका strong आहे कि तो सुवास दिवसभर राहतो. त्यामुळे अत्तर लावायची गरजच नाही." स्मिताने पुढे येउन त्याच्या शर्टचा वास घेतला.

" हो रे... मला पण घेतला पाहिजे तो साबण... " ,

" चल .. पहिल घरी तर जाऊ.. " असं बोलून त्याने चालण्यास सुरुवात केली.

" तुला एक विचारू का यश ? " ,

"विचार ना... " ,

" लग्न करशील माझ्याशी ? " तिच्या प्रश्नाने यश जागीच थांबला.

" बोल ना काहीतरी... उत्तर हव आहे मला. " स्मिता एकटीच बोलत होती.

" चल ... आपल्याला उशीर होतो आहे.. " ,

" थांब ना.... उत्तर दे ना मला,"

" काय उत्तर हवं आहे तुला... आपल्याला अजून एकमेकांना समजायला पाहिजे ना.. लगेच लग्न कुठे काढलसं तू ... आणि मी तुला चांगली मैत्रीण मानतो.... माझ्या मनात तसं काहीच नव्हतं....शिवाय माझ्या आणि तुझ्या घरी पण सांगावं लागेल ना… " ,

" माझ्या घरी सांगितलं आहे मी . तू तुझ्या घरी जाऊन विचार....... नाहीतर मी माझ्या पप्पांना बोलावू का.... बोलणी करायला ... ",

" नको ... थांब जरा . घाई नको... मलाही विचार करू दे जरा... " तोपर्यंत त्याची वाट आली होती...

" चल bye " ,

" मला promise कर ... उद्या मला उत्तर देशील ... नाहीतर मी जाणारच नाही घरी... " ,

" हो बाबा ... तुला उद्या नक्की सांगतो हा ... आता घरी जा.. " आनंदातच स्मिता घरी पोहोचली.

पूर्ण दिवस ती हवेतच होती...... संध्याकाळची वाट पाहत होती ती . आणि यशचा होकार कधी ऐकते आहे अस तिला झालं होतं. संध्याकाळी वेळेत पोहोचली ती.

यशची वाट बघत उभी होती कधीची.

" आज खूप वेळ झाला यशला." रोज ७.३० ला येणारा ... ८ वाजले तरी आला नाही.

" काम असेल बहुतेक त्याला " घड्याळात ९ वाजले तेव्हा ती निघाली...... पुढच्या दिवशीहि तेच झाले.... यश काही आला नाही... असच आठवडा गेला. यशचा काहीच पत्ता नाही.

" कुठे गेलास रे मला सोडून.... काय चूक केली मी …" एकटीच बसून स्मिता रडत बसली होती. त्याच दिव्याखाली... ५ - १० मिनिटं गेली... थंड हवेची झुळूक आली ... पण .... मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला .... तशीच रडत होती ती ...... अचानक कुठे गेला यश ..........Rate this content
Log in

More marathi story from vinit Dhanawade

Similar marathi story from Fantasy