भूतदया
भूतदया
विराज हा एक अतिशय हुशार विद्यार्थी होता.त्याच्या अभ्यासातील अलौकिक प्रगतीमुळे तर तो संपूर्ण शिक्षकवृंदानचा प्रिय होताच परंतु त्याचे खेळातील तरबेज चिकाटीच्या गुणांवर तर सारे लहान थोर विद्यार्थीही फिदा होते.शाळेचे मुख्याध्यापक साने सरांचा तट हा अतिशय प्रिय विद्यार्थी. विद्यामंदिर शाळेचा हिरा असलेला असा हा विराज लहानपणापासूनच चिकित्सक वृत्तीचा आणि विशेषतः विज्ञानाच्या प्रयोगात रमणारा.एकदा भोळे गुरुजींचा तास सुरू होता परंतु गणित सोडविण्याऐवजी विराजचे लक्ष वेगळ्याच गोष्टीत होते.शाळेच्या भव्य पटांगणात नेहमी दिसणाऱ्या चिमण्या आताशा कमी झालाय होत्या.याबद्दल विराज ला दुःख वाटू लागले.त्याने या गोष्टीचा खूप विचार केला अंक त्याने एक युक्ती शोधल
ी.त्याने एक मोठा लाकडाचा डबा तयार केला.तो साने सरांना विचारून शाळेचं गच्चीवर ठेवला आणि त्यात रोज थोडे थोडे धान्य टाकायला सुरुवात केली.हळू हळू त्याच्या लक्षात आले की टाकलेले धान्य रोज संपते आहे म्हणजेच रोज पक्षी ते खात आहेत.त्याने साऱ्या विद्यार्थ्यांना आव्हान करायला सुरुवात केली की त्यानंही थोडं थोडं धान्य पक्षांसाठी आणावं.हळू हळू पक्षांची संख्या वाढू लागली.फक्त चिमण्यांचा नाही तर काबूत घार पोपट सारेच पक्षी तेथे जमू लागले.अजून एक असाच लाकडी डबा मग पटांगणात ठेवला गेला.विद्यार्थी तेथे आपले उरलेले अन्न ठेवत असे.आणि रस्त्यावरील उपाशी प्राणी ते अन्न खात. अशाप्रकारे विराजचे एक युक्तिवादामुळे प्राणी आणि पक्षी दोघांना अन्न मिळू लागले.