टाईमपास नुसता..
टाईमपास नुसता..


अचानक येणार पाऊस ना खूप साऱ्या गुजगोष्टी सांगून जातो....पण दुःखाच्या विचारात बधिर झालेले आपले काम कधी तो नाद ऐकण्याच्या भानगडीत पडतच नाही.आपण नेहमीच आपल्या घाईगडबडीत असतो.उलट त्याचे गुज ऐकण्यापेक्षा आपणच आपले असुविधांचे पारायण सुरू करतो आणि आनंद द्यायला बरसलेला पाऊस मात्र देऊन जातो ती आपल्या कपाळावरून न ढळणारी चिंतेची आठी.अस नसतंच मनात अगदी की पावसात चिंब चिंब भिजाव पण हातावर दोन सरि झेलण्याचा मोह मात्र होतोच.मग माझ्यासारख्या कवी मनाची होणारी तगमग..पण ती सावरायला वेळ कुठे. कारण घाईच तितकी आहे,ऑफिस ला वेळेत पोहचण्याची ,ट्रेन पकडण्याची,रिक्षा धरण्याची,यंत्रवत जीवनामध्ये या मनाचा मानवी रोबोटिक्स सावरण्याची.