manasvi poyamkar

Tragedy Others


5.0  

manasvi poyamkar

Tragedy Others


अग्नीदिव्य....

अग्नीदिव्य....

5 mins 678 5 mins 678

मुंबई म्हणजे स्वप्न नगरी.अस म्हणतात इथे प्रत्येक जण खुप सारे स्वप्न घेवुन जगतो. इथे नशीब चमकले तर रन्काचा राजा होतो..तर एका क्षणात कोणी राजाचा रन्क होतो. नशीब बलवत्तर तर तुम्ही या शहराची शान..आणी ज्याची इथे शान तोच इथे सगळ्यांची जान.

तर अश्या या स्वप्ननगरित मी अपेक्षा नसताना वावरत होते. त्या सगळ्या नशीबवान मन्डळीतील एक..सगळ्यांची जान बनून. पण माझी जान फक्त माझ्या लेखनित होती....कारण तिच्यातून उमटलेल्या शब्दांची किमयाच माझ नशीब घडवत होती..मी एक यशस्वी लेखिका होते ...एका प्रसिद्ध मालिकेच लेखन करत होते...मालिका नावारुपाला होती म्हणुन ओळखीही तितक्याच होत्या. रोज मालिकेच लिखाण..माझा युटूब ब्लॉग...समुद्रावर सैर...जमलच तर एखादी पार्टी..आयुष्य कस स्वप्नवत होत..

खरतर बाबा पण एक लेखक त्यामूळे लेखनाचे काही नव्याने संस्कार नाही घ्यावे लगले मला...फक्त बाबांची एकच तक्रार होती की मी कधी माझ्या माझ्या लेखनावर प्रेम करत नाही,अस त्यांना वाटायच.आणी काही अंशी ते खर पण होत...

त्यानी संपुर्ण आयुष्य लिखाणासाठी अर्पण केल..तरिही त्यांना भेटलली प्रसिद्धी हवी तितकी साजेशी नव्हती. एक दोन पुरस्कार आणी ढिगभर पुस्तक..एवढीच काय ती त्यांची कमाई. ह्या उलट मी...छंद म्हणुन कविता लिहू लागले..नंतर ब्लॉग्स बनवू लागले..यू ट्यूब वर स्वताच्या कवितांचा ब्लॉग बनवला...नाव झाल...लाइक्स..कमेंट..शेयर..सब्सक्राइसचा भरभरुन प्रतिसाद..आणी यूट्यूब सेलेब्रीटी झाले.. पुढे बाबांच्या ओळखीने एका मालिकेच लिखाण करण्याची संधी मिळाली. देव कृपेने मालिकापण यशस्वी झाली...

पण ह्या सर्व प्रवासात मी अजुनही तितकिशी सिरीयस नव्हते..काही लिहायच म्हणजे नूसते तर्क साधून लिहिने हेच करत होते मी....कारण पदद्यामागे एखाद पात्र रेखाटताणा कितिही केल तरी ते लेखकासाठी खोटच असत...मग ह्या खोट्या पात्रांसाठी खराखुरा जीव का ओतायचा? ह्या विचार सरणीची मी झाले होते..

त्या दिवसात मी एका नव्या प्रोजेक्ट मधे गुंतले होते...सिरियलच नाव होत अग्नीदिव्य. त्यातील पात्र म्हणजे स्वप्ना...नावाप्रमाणेच एक स्वप्न बघणारी मुलगी. फक्त स्वप्न बघायचे नाही तर ते खरे करण्याची तिच्यात धमक होती. .घरच्या बिकट परिस्थितीवर मात करुन ती एक ऑफिसर बनते. मग आयुष्यात येणारा शशांक...प्रेम..सगळ्यांचा विरोध..मग लग्न..लग्नानंतरचा संघर्ष...अशी एकंदर स्टोरी होती.

खरतर मी त्या मालिकेत स्वप्नाला एक खंबीर आणी तितकीच हळवी मुलगी म्हणुन रंगवले होते...कधी कधी मलाच हसू यायच की ही स्वप्ना अशी हळवी आणी खंबीर कशी होऊ शकते...पण शेवटी ते एक पात्र होत..दैटस इट.

सीरियल मधे शशांक ची भुमिका करणारा व्यक्ती मात्र खुप मेहनती होता...त्याच नाव अक्षय बर्वे...मला त्याच भूमिकेवरच प्रेम पाहुन मनोमन कौतुक वाटायच...

पण हळुहळू मला कळून चुकल की अक्षयला मात्र माझ कौतुक वाटायच...त्याला मी आवडत होते. मी तसा कधी विचार नाही केला पण एक दोन भेटींनंतर मला पण त्याच्यात इंटरेस्ट येवू लागला. मग कधी एखादा सीन डिस्कस करायला भेटण.कधी ड्रॉप करण..

ह्याच भेटी दरम्यान मला एकदा अक्षयणे माझ्या कवितेच कौतुक केल...खरतर त्याला ती पुर्ण लक्षात होती..मी मात्र नावाव्यतिरीक्त सगळ विसरले होते...मी जेव्हा स्वप्नाच पात्र लिहायचे तेव्हा तो मला नेहमी म्हणायचा की तू तिच पात्र मनापासून लिह..तुझ्या कविता मनापासून लिह...एक दिवशी मी त्याला सांगून दिल की, " अक्षय, मी केवळ कविता लिह्ते..मी त्या जगत नाही...म्हणुन माझ्यासाठी ते केवळ शब्दांच्या यमक जुळवण्याचा खेळ आहे...तू मला त्या बाबत सल्ले नाही दिलेस तेच योग्य होइल"

खरतर मी त्याच्या वर चिडले होते. बाबां नंतर मला अस त्यानेच टोकल होत...

पण मी अक्षयवर मनापासून प्रेम करत होते..आणी तोही..म्हणुन त्याच बोलन मी नेहमी टाळयचे..

पुढे मी अक्षयबद्द्ल घरी सांगितल..साहजिक घरच्यांचा विरोध झाला..मी मात्र माझ आयुष्य त्याच्याच सोबत रंगवत होते..म्हणुन त्याच्याशिवाय जगन शक्य नव्हत.

दरम्यानच्या काळात मालिकेत स्वप्नाच पण लग्न झाल..सगळ्यांच्या मनाविरुद्ध थाटलेला तिचा संसार सुरु झाला...पण सीरियलचा ट्विस्ट आणी शशांकचा पुढे अपघात होतो..तो कोमा मध्ये जातो अस काही कथानक मी रंगवत होते...

येत्या एक दोन महिन्यात मालिका संपणार होती...पण मी मात्र आनंदातच होते..कारण ह्या शुटनंतर मला आणी अक्षयला दोघांनाही प्रोजेक्ट मिळाले होते...आणी त्याहुनही महत्वाच म्हणजे ही सीरियल संपल्यानंतर आम्ही लग्न करनार होतो.. आम्ही दोघही खुप आनंदात होतो...निश्चितच अग्नीदिव्य चा शेवट पण तसाच आनंदी होता..शशांकच्या अपघातानंतर स्वप्ना खंबीर होते..तो कोमात असताना सुद्धा ती एक ऑफिसर ची जबाबदारी योग्य रितींने पार पाडते...एक महिन्याच्या शेवटी शशांक कोमातून बाहेर येतो...आणी सगळा आनंदी आनंद......

अक्षय सोबत त्या संध्याकाळी मी डिनरला गेले होते...आजकल आमचे डिनर थोडे जास्त लांबत होते...नेहमी प्रमाणे त्याने मला ड्रॉप केल..

दुसरया दिवशी सकाळी माझा फोन वाजला.. अर्धवट झोपेत असल्यामुळे मी तो इग्नॉर केला..पण नंतर फोनवर जे मी ऐकल ते ऐकुन माझ्या पायाखालची जमीनच निसटली. दुसर्या दिवशी शूटिंगवर येत असताना अक्षयचा अपघात झाला होता..परिस्तिती नाजुक होती...मी मात्र अजुनही आमच बोलन आठ्वत होते...आणी अचानक हे अस होण....

संध्याकाळी 9 वाजता त्याची शस्त्रक्रिया पुर्ण झाली...पण अजुनही आमच जग अंधारात होत..कारण अक्षय कोमात गेला होता...मी मात्र खुळयासारखी आशा धरुन होते की अक्षय एक दोन दिवसात कोमातून बाहेर येइल आणी आम्ही पुन्हा सोबत राहू...पण एक दोन दिवसाच रूपांतर एक दोन आठ्वड्यात आणी मग महिन्यात झाल...दरम्यानच्या काळात अग्नीदिव्यच शुट संपल होत...पण मला मात्र माझ्या आयुष्यातल अग्नीदिव्य आता जाणवत होत...मी स्वप्नाच पात्र रंगवताना तीला शशांक कोमात असताना सुद्धा एक खंबीर ऑफिसर म्हणुन रेखाटल होत. पण खरया आयुष्यात अक्षय कोमात गेल्यापासुन मी तुटले होते. जगण्याची आशा हरवून बसले होते...अस खुप वाटायच की जस मी शशांकला कथेच्या शेवटी कोमातून जाग झालेल दाखवल तस मी अक्षयसाठी का नाही करु शकत...जे अग्नीदिव्य मी रेखाटल होत आज तेच आयुष्यात घड्त होत...पण मी हतबल होते....मला अक्षयचे शब्द आठ्वत होते..तुझ्या पात्रांवर..तुझ्या लिखाणावर प्रेम कर...त्याना जगुन बघ..आणी मग रेखाटत जा....

अक्षय पुन्हा ठिक होइल ही आशा सगळ्यांनी सोडली होती..मी मात्र रोज त्याची वाट पहात होते..

माझ सगळ काम सोडून मी फक्त त्याच्या बेड जवळ बसुन असायचे की कधी तरी अक्षय डोळे उघडेल....

एके संध्याकाळी अक्षयने डोळे उघडले होते..तो साक्षात माझ्या पुढे उभा राहुन माझ्याशी बोलत होता..माझी समजुत घालत होता..मला माझ्या लिखाणावर प्रेम करायला शिकवत होता..मी त्याला मिठी मारुन रड्त होते..त्याने माझ्याकडून एक वचन घेतल की पुढे काहीही झाल तरी तू मनापासून लिह्शील आणी आनंदी राहशील.... खुप दिवसानी मला इतक बर वाटत होत........

अचानक मशीनचा आवाज येवू लागला आणी माझी तन्द्री तुटली...मला लक्षात आल ते एक स्वप्न होत...अक्षयचा तो केवळ भास होता...खरया जगात अक्षय मात्र खुप दुर गेला होता माझ्यापासुन...मला कायमच एकटं सोडून..परत न येण्यासाठी.....

अक्षय आयुष्यातून गेला आणी मी तुटून गेले... पण शेवटच्या भेटीत त्याला दिलेल वचन मला पुर्ण करायच होत..माझ्या लिखाणावर प्रेम करायच होत...मनापासुन लिहायच होत...म्हणुन मी पुन्हा लेखणी हातात घेतली आणी खंबीर मनाने लिखाणाची परत सुरवात केली...ती आयुष्यात कधी न थांबण्यासाठी...

आज वीस वर्ष लोटले..मी एक लेखिका म्हणुन पुन्हा नावारुपास आले..भरपुर काही लिहल आणी जे लिहल मनापासून लिहल..पण अक्षयची शिकवण मी कायम स्मरणात ठेवली.माझ सार लिखाण मी त्याला समर्पित करते....आणी आयुष्याच अग्नीदिव्य मी प्रत्येक क्षणाला पार पाडल..

आपल्या आयुष्यात काय घड्त हे आपल्या हातात नसत..पण जे काही घडेल ते कार्य मनापासून पुर्ण करण्यात एक वेगळच समाधान असत...आणी ते समाधान म्हणजेच खर यश असत.


Rate this content
Log in

More marathi story from manasvi poyamkar

Similar marathi story from Tragedy