भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
9सकाळचे ७ वाजले होते कोवळं ऊन पडलं होत.आज फायनल इयर BSC च फेअरवेल होत.सर्व फायनल इयर चे मूल मुली छान छान ड्रेस करून आले होते त्या सर्वांन मध्ये एक नाजूकशी गोड हसणारी गोरीशी आरोही उठून दिसत होती तिने गुलाबी रंगाचा सिम्पल असा अनारकली घातला होता..तर मुलांनमध्ये आशुतोष खूप मस्त दिसत होता... किती मुली त्याच्या कडेच पाहत होत्या...आशुतोष साधारण घरातून आलेला बोलका पण तेवढाच समंजस आपल्या आई बाबांची स्वपन पुर्ण कारण्यासाठी मेहनत करणार मुलगा..
कॉलेच्या फेअरवेलला सुरवात झाली.डान्स ,मज्जा मस्ती चालू झाली.सर्व आपल्या ग्रुप ने मज्जा मस्ती करत होते...तेवढ्यात अशुतोषची नजर कोणाला तरी शोधत होती आणि एकाएकी त्याची नजर स्थिरावली तो आरोहीलाच शोधत होता ती दिसताच त्याचा चेहरा खुलला ..आशुतोषला आरोही बघता क्षणी आवडलेली त्यांच्या कॉलेच्या पहिल्या वर्षापासून पण तो कधी तिला बोलला नव्हता...तसेही आरोहीला नवं नवीन मित्र मैत्रिणी बनवायला खूप आवडायचे..ती खूप बडबडी होती.पण कोणाला काहीही मदत लागली तर ती लगेच धावून जाणारी मुलगी होती....त्याला तिचा हा गुण खूप आवडायचा.ते दोघे चांगले मित्र मैत्रीण सुद्धा होते ,पण त्याला आरोहिला काहीही करून आज सांगायचे होते की ती त्याला खूप आवडते...त्याच तिच्यावर प्रेम आहे असं पण आशुतोषला भीती वाटत होती असे सांगितल्या नंतर आरोही आपली चांगली मैत्रीण राहील न ??आपण तिच्या मैत्रीला तर मुकणार नाही न????...तेवढ्यात आरोहिने आशुतोषला बघितलं व ती त्याच्या जवळ आली व म्हणाली ''काय हिरो आज एकदम झक्कास दिसतोय"
आशुतोष तिच्याकडे पाहतच होता तेवढ्यात ती बोलली"आज आपलं लक्ष नाही आहे वाटते"तेव्हा आशुतोष भानावर आला आणि म्हणाला"अ ग नाही ग स्वर्गातली परी जमिनीवर आली तिला बघण्यात गुंग झालो" त्यावर आरोही गालातल्या गालात हसून म्हणाली "कुठे आहे ती परी मला पण दाखव."
"हि काय माझ्या समोर " आशुतोष म्हणाला.
"काहीही हा आशुतोष मी आणि परी वैगरे काही नाही ह" आरोही हसत हसत म्हणाली...
मग आरोही व आशुतोष आपण तीन वर्षात किती काय काय मज्जा केली त्या गप्पात रंगले त्यांचा ग्रुप हि त्या मध्ये सामील झाला...आशुतोष विचारात होताच कि आरोहिला कधी व कस सांगायचं आज सांगितलं नाही तर परत कधी अशी संधी मिळणार नाही हे तो जाणून होताच.........
सर्व मित्र मैत्रिणी आणि आरोही व आशुतोष आठवणीत रमलेले तेवढ्यात आशुतोष पटकन म्हणाला "खायला काही तरी आणायला हवं ...आरोही तू येतेस का माझ्या जोडीला पटकन काही तरी आणुया सर्वांनसाठी बाहेरू"न.. आरोही ला सुद्धा भूक लागलीच होती ती म्हणाली " हा चल जाऊन येऊ"...तसेच ते निघाले कॉलेच्या गेट मधून बाहेर निघताच आशुतोष म्हणाला "आरोहि मला तुला काही तरी सांगायचं आहे ..खूप दिवसा पासून प्रयन्त करतोय सांगायचा पण हिम्मत होत नाही आहे बोलायची." ,"आज काय वेडा वैगरे झाला का तू आशु बोलण्या आधी कधी पासून विचारायला लागला तू मला आणि माझ्या पुढे बोलायला कसली भीती वाटते रे..बोल काय बोलायचं ते" आरोही बोलली.
आशुतोषने आरोहिचा हात पकडला व कॉलेच्या बाजूला असलेल्या गार्डन मध्ये घेऊन आला व एका बाकावर तिला बसवले आणि तो खाली मांडीवर वर बसला तिचा हात हातात घेवुन बोलणार तेवढ्यात आरोही बोलली "काय चाललाय आशु तुझं ???"तेवढयात आशुतोषने व तिची नजरा नजर झाली आणि एका मिनिटं करता दोघांनाही वेगळं काही तरी जाणवलं आणि आरोहिने नजर बाजूला केली.तेवढ्यात आशुतोष बोलला"आरोही मला तू खूप आवडतेस लग्न करशील माझ्याशी" व तो आरोही कडे पाहतच राहिला...आरोहिला काय बोलावे ते कळेना पण आरोहिला आशुतोष पहिल्या पासूनच आवडत होताच कारण त्याचा समजुदारपणा ..आरोही प्रॉब्लेम मध्ये असताना त्याने सोल्युशन सांगणं खूप आवडायचं.. ती दोन मिनीट शांतच होती..."आरोही तुझ्या उत्
तराची वाट बघतोय मी U love me" आशुतोष म्हणाला. आरोही ने थोडीशी लाजतच मान हलवली...ते बघताच आशुतोषने तिला घट्ट मिठी मारली..
आशुतोषला आरोही कडूनही प्रेमाची कबुली मिळल्यामुळे तो खुपच खुष झाला व आरोहिला हि खूप बरं वाटलं व तिच्या आनंदाला पारावार उरला नाही...५-१० मिनिटं ते दोघे एकमेकांनच्या मिठीतच होते ...एकाकी दोघे हि भानावर आले व बाजूला झाले व एकमेकान कडे बघायला लागले ...त्या दोघांची नजरा नजर झाली....तेवढ्यात आरोही बोलली"आशु असा बघू नकोस रे मला लाज वाटते" त्यावर आशुतोष हसायला लागला व बोलला "तुला लाजता पण येते का आरोही???" ती ही हसत म्हणाली चल काही तरी खायला घेऊया सर्वजाण आपली वाट बघत असतील....त्या दोघांनी खायला घेतलं व ते निघाले व कॉलेज मध्ये येईपर्यंत त्याच्या गप्पा काही संपत नव्हत्या तेवढ्यात ते त्यांच्या ग्रुप जवळ आले सर्वांनी खाऊ एका फटक्यात संपवला व सर्व परत डान्स मध्ये गुंग झाले मात्र अधून मधून आरोही व आशुतोष ची नजरा नजर होत होती...आणि सरते शेवटी फेयरवेल संपला सर्व आपल्या घरी जायला निघाले ...आरोही व आशुतोषनेही एकमेकांचा निरोप घेतला व परीक्षेच्या पेपरच्या वेळी भेटूया हे अश्वास एकमेकांना दिल....बघता बघता परीक्षेचा दिवास आला आरोही व आशुतोष एकमेकांना भेटले पण आपण पेपर संपला की बोलू ऑल द बेस्ट बोलून आशुतोष त्याच्या वर्गात गेला व आरोही पण तिच्या वर्गात गेला...प्रत्येक पेपर नंतर तर दोघे ५-१० मिनटं भेटायचे व मग घरी जायचे ...आणि पाहता पाहता परीक्षेच्या लास्टच्या पेपरचा दिवस उजाडला ....आणि सर्वांना पेपर चांगले गेले म्हणून सर्व जण खुष होते ....मग आरोहि व आशुतोषचा गृप त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी एकत्र बसले...मज्जा मस्ती करत करत कोण कोण सुट्टीत कुठे कुठे जाणार हे सांगायला लागले ....आरोही पण बोलली मी माझ्या फॅमिली बरोबर फिरायला जाणार आहोत कुठे तरी... आशुतोष बोलला मी या सुट्टी कुठे तरी जॉब बघणार आहे...मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आशुतोष आरोहिला बोलला "खूप मज्जा कर सुट्टीत आणि घरी आली का आपण भेटूच काळजी घे स्वतःची चल बाय " तीही त्याला म्हणाली "तुही तुझी काळजी घे बाय आशु"
आज ती त्याला भेटणार होती
ती जरा लवकरच उठली.
आजची सकाळ तिला रोजच्या पेक्षा वेगळी वाटत होती...
पटापट आवरत छानसा ड्रेस घालून मस्त अशी तयारी करून ती घरा बाहेर पडली...भेटीची वेळ सकाळी 9 ची ठरली होती...उगीच लेट नको व्हायला, त्याला वाट नको बघायला म्हणून ती जरा लवकरच निघाली...
ठरलेल्या ठिकाणी ती वेळेच्या आधीच पोहचली..
तीची नजर त्याला शोधत होती...
पण तिला काही तो दिसत नव्हता
मनात थोडी भीती जाणवली पण घड्याळ्या कडे नजर गेल्यावर कळालं कि अजून 15 मिनीट बाकी आहेत 9 वाजायला. ती वाट बघत एका बाकावर बसली...आज खूप दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती म्हूणन भेटीची व एकमेकांना बघण्याची आतुरता खूप वाढली होती..वाट बघता बघता ती आपल्या विचारांच्या स्वप्ननगरीत बुडाली...ती त्याचाच विचार करत होती आल्यावर एकमेकांनशी कसे व काय बोलू ...एवढे दिवसांनी एकमेकांना भेटणार.....
अचानक तिच्या कानावर "आरोही आरोही" अशी प्रेमळ हाक पडली...आणि ती स्वपनातून भानावर आली तर तीची नजर त्याच्यावर खिळली....त्याची व तिची नजरा नजर झाली... थोड्याच वेळात त्याने तिला घट्ट मिठी मारली...ती त्याला विचारू लागली "माझी आठवण आली की नाही"..त्यावेळी तो बोलला "अ ग वेडे तुझी आठवण काढायला तुला मी विसरलोय कधी तू तर माझा श्वास आहेस " त्याचे हे शब्द ऐकून तिचे डोळे भरून आले..त्याने अलगदच तिचे डोळे पुसले आणि म्हणाला आता मी आलोय न मग रडायचं नाही...त्यावर ती म्हणाली मी रडत नाही आहे ते आनंदाअश्रू आहेत..आता मला सोडून कुठे नको जाऊस आणि ती त्याला पुन्हा बिलगली....