Prafulla Mukkawar

Inspirational

2  

Prafulla Mukkawar

Inspirational

बाबा : एक वादळवाट

बाबा : एक वादळवाट

3 mins
87


जन्माला आल्या आल्या मुले जर कोणाला बघत असेल तर त्याचे आई-बाबा. त्या दिवसापासून तो प्रत्येक क्षण त्यांच्यासोबतच जगतो. आई हि नेहमी प्रेमाची सावली देते तर बाबा प्रत्येक वादळात वाट दाखवतात. आई जितकी प्रेमळ असते तेवढेच बाबा कठोर असतात हा विधिलिखित नियमच आहे जणु. पण त्या कणखर अश्या चेहऱ्या मागेही दडलेला असतो तो तुमच्यावर अतोनात प्रेम करणारा तुमचा बाबा.


खर तर बाबांचा जन्मच मुळी होतो तो तुमच्या या जगात येण्याने. त्या दिवसापासून त्याच्यावर एक जबाबदारी येउन पडते ती म्हणजे तुम्हाला घडवण्याची चांगले संस्कार आणि शिक्षण देउन. तुम्ही तर नुकताच जन्माला आले असता पण तो तुमचे पुढचे आयुष्य कसे असेल या स्वप्नामध्ये रंगून जातो. त्याचे कान आतुरलेले असतात ते तुम्ही त्याला बाबा म्हणून हाक मारण्यासाठी. ज्या क्षणी तुम्ही त्याला बाबा म्हणून संबोधतात, तो दिवस त्याच्या आयुष्यातला सुखाचा दिवस असतो.


जस जसे तुम्ही पाळण्यातून जमिनीवर चालण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळेस तुमचे नाजूक हात तोच बाबा आपल्या हातात घेतो आणि तुम्हाला चालायला शिकवतो. खूळखुळा पासून ते बाबागाडी पर्यंत सर्व खेळण्या तो घरी घेऊन येतो. रोज संध्याकाळी ऑफिस मधून लवकर घरी येणे, तुम्हाला कडेवर घेऊन व्हरांडा पिंजून काढणे हा तर त्याचा नित्यनेमच होऊन बसतो. बाळाच्या त्या निरागस हसण्याने दिवसभराचा त्राण कमी होऊन जातो. बाळ जसा मोठा होत जातो तसं बाबांची त्याला प्रत्येक वस्तू पुरवण्यासाठीची मेहनत आणखीनच वाढत जाते. हळू हळू तुम्ही चालायला लागतात, बोलायला लागतात, नर्सरी, मग बालवाडी आणि नंतर शाळेत जायला लागतात. तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी जशी आई घेते तशीच ते नीट नेटके चालावे ह्याची तयारी बाबा करतो. अभ्यासापासून तर शिकवणी पर्यंत सारे काही ते दोघे मनापासून करत असतात. तुमच्या निकालाची वाट ते आतुरतेने बघत असतात. जेवढी भीती दहावी आणी बारावीच्या निकालाची तुम्हाला असेल त्याही पेक्षा खूप काळजी त्या दिवशी त्याला असते.


आता तुम्ही थोडे मोठे झालात, कॉलेज मध्ये जायला निघालात. स्वत: बस ने प्रवास करणारा बाबा आज तुम्हाला नवी कोरी स्कुटर घेऊन देतो ते फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणुनच ना!! स्मार्ट फोन, नवीन शर्ट, कोरी जीन्स इत्यादि वस्तू तो तुमच्यासाठी घेऊन येतो शिवाय पोकेट मनी वेगळाच!!

शिक्षण पूर्ण होऊन तुम्ही नौकरीला लागता तेव्हा त्याला आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.


रोज संध्याकाळी बागेतल्या मित्र मंडळी मध्ये तुमची स्तुती करताना त्याचे डोळे भरून येतात. माझा मुलगा/मुलगी इतरापेक्षा हुशार कसा आहे हे सांगताना त्याचा आनंद गगनात ही मावत नाही. मुले वयात आले कि त्यांचे लग्न लावून देण्याची धडपड पण बाबाच करतो. तुमचा जोडीदार अनुरूप असावा, तुमचे जीवन सुख आणि समाधाने जावे हीच छोटीशी अपेक्षा तो बाळगतो. तुमचे लग्न झाल्यावर काही वर्षाने तुम्ही संसारात रूळले कि कधी तो रिटायर होतो हे कळत पण नाही. एव्हाना संसाराचे सर्व कार्य पूर्ण करून बाबा पुरता थकलेला असतो. असा हा बाबा शेवट पर्यंत तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी अथक पर्यंत करत असतो.


ज्या कष्टाने बाबाने तुम्हाला वाढवले असते, स्वतः झिजून तुमचे संगोपन केले असते, त्यांना तुम्ही विसरू नका. त्यांचा आदर करा आणि शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करा. लक्ष्यात असू दया जो सन्मान तुम्ही तुमच्या बाबा ना द्याल तोच सन्मान तुमची मुले पण तुम्हाला देईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational