Neeraj Shelke

Romance Tragedy

4.1  

Neeraj Shelke

Romance Tragedy

अव्यक्त प्रेम

अव्यक्त प्रेम

5 mins
430


आज घरातून निघायला थोडासा उशीरच झाला, तरी मी आईला सांगत होतो सकाळी लवकर उठव म्हणून ...(अनिकेत स्वतः शीच बोलत-बोलत घरातून निघाला होता). आज तरी ट्रेन वेळेवर येते की नाही काय माहीत? (पुन्हा स्वतः शीच पुटपुटला).. ७:४७ ची लोकल आली आणि त्या गर्दीतून जागा मिळवत तो कसाबसा आत शिरला. (अनिकेत हा एम.बी.ए. डिस्टींकशन मध्ये पास झालेला मुलगा, लहानपणा पासूनच खूप हुशार आणि मेहनती. कॉलेजमध्येही सगळ्याच गोष्टींमध्ये अनिकेतचा पहिला नंबर असायचा. आज तो एका नामांकित फर्म मध्ये काम करतोय) इकडे अंजलीचे २० मिसकॉल येऊन गेले, पण घाईगडबडीत त्याने फोन केलाही नाही आणि उचललापण नाही शेवटी वैतागून तिने मेसेज टाकला " मी पुढे जाते मला खूप उशीर होतोय , तुला मेसेज वाचायला किंवा कॉल करायला वेळ मिळाला तर बघ आणि कॉल कर ,मला तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे " बाय !!!! (अंजली आणि अनिकेतची ओळख अगदी नुकतीच झालेली ,तीही हुशार , मनमिळावू, दिसायला सुंदर आणि लाजाळू स्वभावाची होती.)(तसे दोघेही एकाच ऑफिस मध्ये कामाला होते पण त्यान्ची भेट फक्त सकाळी ट्रेनमधे , नाश्ता आणि लंच-ब्रेकला व्हायची म्हणून जे काही बोलायचं असायचं ते तेव्हाच).अंजली ऑफिसला पोहोचली तरी देखील अनिकेत अजून पोहोचला नव्हता, तिला काळजी वाटायला लागली म्हणून फोन करायला गेली तेव्हा तिला लक्षात आलं अरे याने तर अजून मेसेज पण वाचला नाहीये , म्हणून कॉल करून काही उपयोग नाही असं म्हणून हातात घेतलेला फोन तसाच टेबलवर सरकवला. इकडे अनिकेत अजूनही ट्रेनमधेच होता. फोन बघावं म्हणलं तर खिशात हात घालायला जागा नाही ,जवळजवळ पाऊण तासानंतर तो ट्रेनमधून बाहेर पडला आणि सुटकेचा निश्वास टाकला.जसा बाहेर पडला तसा त्याने पहिले अंजलीला फोन केला , आणि म्हणाला पाच मिनिटात आलो.(तसं त्याचं ऑफिस स्टेशनवरून जवळच होत.) तो ऑफिस मध्ये पोहोचला तोच गणू (हा गणू म्हणजे अनिकेतच्या ऑफिस मधला पियुन )मोठ्या साहेबांचा निरोप घेऊन आला , ते ऐकून अनिकेत ला आणखी घाम फुटला आता काय घोळ झाला देवास ठाऊक असं म्हणत तो साहेबांकडे गेला ...


अनिकेत : सर , मे आय कमींन ???

साहेब : अरे ..अनिकेत राव ..या या या ....

अनिकेत : काही काम होत का???साहेब : अरे...बस तरी आधी...आज मी तुमची एका विशेष व्यक्ती सोबत ओळख करून देणार आहे..तर या मिस रुपाली...

रुपाली: हॅलो ...अनिकेत


(रुपाली म्हणजे साहेबांची नवीन असिस्टंट ...तिचं सौन्दर्य तिच्या चेहऱ्यावरून नुसतं ओघळत होतं. रंग गोरा पान, घारे डोळे ,लांबसडक केस ,कपाळावर छोटीशी चंद्रकोरीची टिकली, लाललाल ओठ.....तिच्याकडे बघणाऱ्याने फक्त तिच्याकडेच बघत राहाव अशी ती ची मूर्ती...त्यात ती फाडफाड इंग्रजी बोलणारी आणि साहेबांच्या जवळ असणारी)


अनिकेत : आ वासून तिच्याकडे बघत ...हे.......लो ...मिस रुपाली.

साहेब : अनिकेत, आजपासून रुपाली माझी असिस्टंट आहे काही काम असल्यास तिला सांगत जा मग ती मला सांगेल ..ओके ..

अनिकेत: ओके..सर...

साहेब : यू मे गो नाऊ...(पण अनिकेत तिच्याकडं बघतच बसला होता,इतक्यात साहेब जोरात ओरडले तसा तो भानावर आला आणि बाहेर निघून गेला)

बाहेर आल्यावर अनिकेत गाणं गुणगुणू लागला "ये चांद सा रोशन चेहरा ,जुल्फो का रंग सुनेहरा ..तारीफ करू क्या उसकी जिसने रुपाली को बनाया".

त्याला लव्ह अट फर्स्ट साईट झालं होत, पण पुढे काय होणार आहे हे कुठे माहिती होत.

बऱ्याचदा काही ना काही कारण काढून तो रुपालीला भेटायला जायचा, पण ती त्याला टाळून साहेबांसोबत मग्न असायची ,खरंतर तिला साहेब आवडत होते आणि साहेबांची बायको पण त्यांना सोडून गेली होती म्हणून तेही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या रुपालीच्या प्रेमात अडकत चालले होते.हल्ली रोज साहेब आणि रुपाली ऑफिसला एकत्र येतजात असत पण हे पाहून अनिकेत ला कसबसं वाटत असे.शेवटी एक दिवस न राहून त्याने रुपाली ला विचारलं का आहे गं त्या म्हाताऱ्यात जे माझ्याकडे नाही..त्यावर ती उत्तरली तुला काय करायचं आहे रे माझं मी बघून घेईन तसा तो हताश झाला ,त्याला तिला हे सांगायचं होत कि त्याच तिच्यावर किती प्रेम आहे ते पण साहेब आणि रुपालीला रोज रोज एकत्र बघून त्याच मन त्याला खायला उठत होत.अंजलीला अनिकेत आवडायचा पण तिनेही कधी त्याला सांगायचा साधा प्रयत्नही केला नव्हता. पण ती या गोष्टींपासून बेसावध होती कि अनिकेतला रुपाली आवडते म्हणून.


साहेबाच आणि रुपालीचं एकत्र येणजाणं राजरोसपणे चालू होतं , ऑफिस सुटलं कि साहेब तिला घेऊन जवळच्याच मॉलमधे फिरायला जात असत. एके दिवशी अनिकेतन ठरवलं कि रुपालीला मनातलं सगळं सांगून टाकावं म्हणून ऑफिस सुटल्यावर तो तिच्या मागेमागे जायला निघाला.आज रुपाली साहेबासोबत न जाता एकटीच निघाली होती त्यानं मनात ठरवलं होतच कि आजच बोलून टाकूया आणि तशी संधी हि समोरून चालू आली.खूप वेळ चालत राहिल्यानंतर रुपाली एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये शिरली, इकडे याच्या मनात ना-ना विचार घोळू लागले ,तरी तो तसाच तिच्या मागे मागे जात राहिला....पुढं रुपाली आतमध्ये गेल्यावर अनिकेत हि तिच्या मागू आत शिरला...समोर पाहतो तर एक व्यक्ती आय.सी.सी.यु मध्ये पडून होती आणि रुपाली त्या व्यक्तीच्या शेजारी बसून रडत होती...ते बघून त्याला समजतच नव्हत कि हे नक्की काय चालू आहे..त्याने तेथेच सलेल्या डॉक्टला विचार कि व्यक्ती कोण आहे? आणि डॉक्टर म्हणाले ते रुपालीचे मिस्टर आहे,त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता त्यातच त्यांच्या मेंदूला दुखापत होवून ते कोमात गेले आहेत, त्यांच्यमागे फक्त रुपाली एकटीच आहे आणि आता हॉस्पिटलच्या खर्चाचा सर्व भार ती एकटी घेत आहे....हे सर्व ऐकून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग त्याला आठवायला लागलं की ती का साहेबांसोबत जात होती, फिरत होती..कारण हॉस्पिटलला लागणारा सारा खर्च साहेबांकडून तिला मिळणार होता, त्यामुळे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ती हे सर्व करत होती... आणि हे सर्व आठवून त्यानं ठरवलं की आता रुपालीला आपण काहीच सांगायचं नाही की बोलायचं नाही..आणि तो तसाच तिथून निघून जातो...


इकडे अंजलीला अनिकेतच्या एका मित्राकडून समजत कि अनिकेतला रुपाली खूप आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायच आहे ...हे ऐकून ती खूप रडायला लागते आणि कसबस स्वतः ला सावरत म्हणते,"जाऊ दे , मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण अनिकेतला त्याच प्रेम मिळालंच पाहिजे" आणि तीही त्याला कधीच काही सांगत नाहि .......अशा प्रकारे कोणीच कोणाला काहीच सांगत नाही आणि


"ते जे अव्यक्त प्रेम होतं ते शेवटपर्यंत अव्यक्तचं रहातं".......

"नाही कळल्या कधी कुणा या अंतरीच्या भावना, 

पळत्यामागे धावत जाई कुणी काही ऐकेना ...

बोलवेना कुणा काही शब्द अंतरी थांबली ,

भेट होता होता आपली भेट आपली लांबली "..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance