अंतरिक्ष मधील दोन दिवस
अंतरिक्ष मधील दोन दिवस
आज 7 सप्टेंबर 2050 मी आणि माझा मित्र आज अंतरिक्ष मध्ये जाणार आहे. मी गाडी चालवत माझ्या मित्राच्या घरी गेलो, त्याला घेतले व आम्ही नासा स्पेस स्टेशनला गेलो. आजुन पाच मिनिटांनी रॉकेट लॉन्च होणार होते. तेव्हा माझा मित्र घाबरला मी म्हणले तू घाबरू नको मग आम्ही स्पेस मध्ये पोहोचलो मग आम्ही चंद्रावर गेलो रॉकेट मधून उतरलो उतरल्यानंतर आम्ही पृथ्वीकडे बघत होतो तेव्हाच एक दगड चंद्राच्या बाजूने गेला मी आणि माझा मित्र घाबरलो व रॉकेट मध्ये जाऊन बसलो. त्यानंतर कसाबसा दिवस गेला व रात्र झाली पण मला पृथ्वीची आठवण येत होती. माझा मित्र म्हणाला तू घाबरू नको. मग मी आणि माझा मित्र झोपलो व सकाळ झाली. मग मी आणि माझ्या मित्राने सर्व ग्रहांचे दर्शन घेतले व रॉकेटमध्ये जाऊन बसलो व संध्याकाळ झाली व मी आणि माझा मित्र पृथ्वीवर आलो व आम्ही खुश झालो व आम्ही आमच्या आमच्या घरी गेलो.
