Aaryan Mane

Children Stories

4.0  

Aaryan Mane

Children Stories

शिक्षक दिवस

शिक्षक दिवस

1 min
117


3 जी, 4 जी, आता 5 जी आणि 6 जी पण येइल पण समाजात सुजाण नागरिक होण्याकरिता गुरुजींची जागा कोणीच घेऊ शकत नाही काय बरोबर ना विनोदाचा भाग सोडा पण या कोविडच्या काळात विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे किती अनन्यसाधारण महत्व आहे हे अधोरेखित झाले. या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आणि मोबाईलने आपली स्वतंत्र जागा मिळवली आहे. त्यामुळेच प्रत्येकाचा गुरू आता बदलताना दिसत आहे पूर्वी आपल्याला काही अडचण आल्यास वडीलधाऱ्या किंवा मोठ्या व्यक्तींना सल्ला विचारला जाई पण आता तिथेही संगणक किंवा मोबाईलवरून सल्ला घेतला जातो.


पण दरवेळी योग्य सल्ला मिळेलच असं नाही याकरिता आपल्याला गुरूच उपयोगी पडतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे महत्व अनन्यसाधारण आहे भारतीय संस्कृती आईनंतर सर्वांत महवाचे स्थान आहे ते गुरूला आई जशी मुलावर संस्कार करते तसे शिक्षक हे मुलांना घडविण्याचे व सक्षम बनिवण्याचे काम करतो. जिथे शिक्षण आहे तिथे विकास आहे म्हणूनच‌ शिक्षणतून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाप्रती आदर व्यक्त करण्याकरिता आपण शिक्षक दिवस साजरा करतो.


Rate this content
Log in