STORYMIRROR

Rucha Mahabal

Romance

2  

Rucha Mahabal

Romance

अनपेक्षित

अनपेक्षित

3 mins
127

     लग्न हा साऱ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय . लग्न म्हटल की घरात असते उत्साही वातावरण , खरेदीची गडबड , गृह सजावटी पासून अनेक कामांची जंत्री, नवऱ्या मुलीची मेहंदी, शालूपासून बॅग खरेदी ते चपला पर्यंत खरेदी तिच्या मनाप्रमाणे मग तिथे कितीही खर्च झाला तरी विचारणे नाही , मित्र परिवार नातलग यांची घरामध्ये सतत वर्दळ , प्रत्येकाचे सल्ले त्यावर चर्चा, प्रत्येक कामाचे वाटप त्यावरील खर्च एखाद्या कामात तरबेज असलेली व्यक्ती त्या कामासाठी निवडणे असे एक ना अनेक पैलू या लग्न संज्ञेशी जोडलेले असतात. रजिस्टर लग्नात मात्र ही मज्जा नसते ही झाली आमच्या पिढीची 'लग्न संज्ञा' आम्ही काय बुरसटलेल्या विचारांचे अस तुम्ही म्हणू शकता बर का? 


     सध्या समाजात शिक्षण व नोकरीच्या जोरावर अनेक तरूण तरुणी घरात न सांगता लग्न करतात , दोघांचे सूर जुळले की झाले जसे म्हणतात ना 'झट मंगनी पट शादी' अस काहीसं म्हणा ना किंवा सुशिक्षित वर्गात सध्या लग्न न करता एकत्र राहणे (live in relationship) पसंत करतात. दोघांचे नोकरीचे ठिकाण बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी असते किंवा कामानिमित्त त्यांची ओळख होते ओळखीचे रूपांतर प्रेमात मग लग्नातही होते. याला म्हणावं लागेल की 'जमाना बहोत ही बदल गया है'.


     नव्या पिढीचे विचार जुन्या पिढीला पटत नाहीत व त्यांच्या विरुद्ध काही कुरघोडी केली तर त्यांचा अहंकार दुखवतो व बऱ्याच वेळा तरूण तरुणी रागाने आत्महत्या देखील करतात . समाजातील परिस्थिती पाहून घरातील मंडळी मनाविरुद्ध सार सहन करत असतात व तरुण पिढी म्हणते की यातून काही वाईटच झालं तर आमचं आम्ही निस्तरू तुमच्या पर्यंत काहीही येणार नाही . " let me correct my mistake if any" अस म्हणत घरच्यांची तोंड बंद करतात . जुनी पिढी पहाते आणि म्हणते 'आलीय भोगासी असावे सादर'. म्हातारपणी त्यांचे होणारे हाल व तरुण पिढीचे विचार हे दोन्हीही त्रासदायकच .


     या साऱ्या लिखाणाच कारण म्हणजे माझ्या शेजारी पाहिलेली मी घटना ,लता 24 वर्षांची तरुणी आम्हा साऱ्यांना तिचा खूप अभिमान वाटायचा . खेडेगावात शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधेमुळे मुंबईत राहून post graduation पूर्ण केले व बँकेत नोकरी करून घरी पैसे पाठवू लागली आई- वडील खूप आनंदात होते . लताच्याच कॉलेज मध्ये दीपक होता . कॉलेज मध्येच मैत्री झाली मैत्रीच रूपांतर प्रेमात झाले दोघेही हुशार व तडफदार . दीपकला रेल्वे मध्ये सरकारी नोकरी होती दोघेही फावल्या वेळात भेटायचे यातूनच त्यांची मनजुळली. दोघेही भविष्यात रममाण झाली . मग एके दिवशीया दोघांनी ठरवले की रूम घेऊन एकत्र राहायचं लता लेडीज हॉस्टेल मधून बाहेर पडली व दीपक बरोबर राहू लागली. लग्न आगोदरच एकत्रराहणे त्यांनी पसंत केले होते दोन महिने झाले असतील एके दिवशी अचानक लताच्या गावी असणारा तुषार तिला भेटला लता ने दीपकशी त्याची ओळख करून दिली. तुषार लता चा बालमित्र होता तोही बँकेत नोकरी करत होता. एके दिवशी तो रूम वर दोघांना जाऊन भेटला पण ही गोष्ट तो पचवू शकला नाही. लताच्या वडिलांच्या कानांवर ही गोष्ट घातली . लता च्या घरात गोंधळ उडाला मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी मुंबई चा रस्ता धरला रुम वर अचानक वडील आल्याने लता व दीपक घाबरले दोघांशी वडिलांची खडाजंगी झाली. लता व दीपक ने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, लता ला घेऊन वडील घरी आले पण लता ने निक्षून सांगितले की लग्न करेन तर दीपकशीच घरातील वातावरण तंग झाले होते. साऱ्यांनीच मनस्थिती बिघडली.


     वडिलांनी व काकांनी चर्चा मसलत करून दीपकच्या घरी जाण्याचे ठरवले . जेव्हा त्यांनी दीपकच्या घरी ही गोष्ट सांगितली तेव्हा तेथे देखील गहजब झाला. त्यांनी दीपकलाही घरी बोलावले. लता व दीपक यांचे मनोगत ऐकले , दोघेही लग्नाला तयार होती हे ऐकून साऱ्यांना हुश्श झालं. पण हे सारे घडेपर्यंत दोन्ही घरात होणार मनस्ताप काय वर्णावा!


     आज लता व दीपक खुशीत आहेत दोघांचे लग्न झाले आहे ,त्यांचे प्रेम यशस्वी झाले आहे पणप्रत्येक वेळी असे होतेच असे नाही बऱ्याच वेळा तारुण्याचा उपभोग घेऊन तरुणीची फसगत केली जाते मग ती तरुणी आत्महत्या हा एकच पर्याय निवडते, जखम देणारे मग ओळख देखील दाखवत नाहीत यासाठीच तरुणींनी एखाद्यावर विश्वास टाकताना हजार वेळा विचार करायला हवा लग्न हा व्यक्तिपरत्वे विषय बदलत असतो, लग्ना अगोदर जर एकत्र राहायचाच असेल तर दोन्हीघरामध्ये हा विषय सांगणे महत्वाचे आहे नाहीतर अनपेक्षित पणे होत्याचे नव्हते होते तेव्हा लग्न हा विषय आयुष्यात महत्वाचा आहे तितकाच गंभीरही आहे होय ना !


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance