आजची स्त्री -स्वयंसिद्धा
आजची स्त्री -स्वयंसिद्धा
निसर्गाने स्त्री व पुरुष यांची निर्मिती केलेली आहे. नर व नारी म्हणजेच शिव व शक्ती यांची निर्मिती करून विश्वाला पूर्णत्व दिले.स्त्री व पुरुष एकमेकांचे पूरक आहेत एकमेकांशिवाय ते दोघे अपूर्ण आहेत. स्त्री ही कोमल , मृदू व माया देणारी तर पुरुष सशक्त, बलवान . निसर्गाने स्त्रियांना मातृत्वाची अनमोल देणगी दिलेली आहे संसार रथ चालवण्यासाठी दोघेही महत्वाचे आहेत स्त्रियांच्या मध्ये समर्पण भाव जन्मतः च असतो . ग्रहणशिलता, दुबळेपणा, असुरक्षितता मनात कायम दडलेली असते त्यामुळे तिला सुरक्षिततेची हमी हवी असते ही सुरक्षिततता तिला पती, नोकरी व कुटुंबयांच्याकडूनच मिळते.
आजची स्त्री कुशल , स्वयंसिद्ध , कर्तृत्ववान, आत्मविश्वासी, आत्मनिर्भर दिसून येते पण ज्यांच्या अंगी हे गुण नाहीत त्या स्त्रियांनी आपला आत्मविश्वास न ढळू देता करिअर किंवा नोकरीसाठी धाडसाने प्रयत्न करावेत ही काळाची गरज आहे. आजची स्त्री उच्चतम पदे भूषवित आहकुठलेही क्षेत्र तिच्यासारही नगण्यच ती आता उंच भरारी घेत आहे व अजूनही प्रगती करेलच .
आजच्या स्त्रीने कसे असायला हवे तर स्त्रीने निव्वळ उपभोगाची वस्तू बनू नये यासाठी ती अति सहनशील असू नये जागृतीच्या नावाने पुरुषांचा गैरफायदा घेऊ नये संसार मोडू नये इतपत तरी स्वातंत्र्याचा, कुटुंबाचा ,पतीचा तिने गैरफायदा घेऊ नये . स्वतः ची नीतिमूल्ये हरवून तिने जागृत होऊ नये पण शेजारी ,नातेवाइकात जर एखाद्या स्त्रीवर पती व घरातील लोकांनी अन्याय केले तर त्याला वाचा फोडावी.
अलीकडे स्त्रिया सुंदर कपडे , कॉस्मेटिक पासून तंग, तोकडे कपडे घालून देहाचे प्रदर्शन करीत असतात आपण फक्त मिरवण्याची सुंदर वस्तू नाही तर ध्येय वादी कर्तृत्ववान स्त्री आहोत हे बिजसमाजात स्त्रीनेच रोवले पाहिजे जर पुरुषाचीवाईट नजर तिच्यावर पडली काही गैरप्रकार केला तर त्याला आत्मविश्वासाने, धाडसाने उत्तर देण्याचेकाम स्त्रीने केले पाहिजे तेव्हाच ती खऱ्या अर्थाने जागृत व आत्मनिर्भर होईल . स्त्रीने तणावमुक्त राहणे गरजेचे आहे मनात शुभ विचार ठेवून जीवन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली योग्यता वाढवण्यासाठी अथकपरिश्रम केले पाहिजेत संधीचा योग्य वापर करून योग्यता सिद्ध केली पाहिजे . खूपशा स्त्रियाया चैनीच्या वस्तू व निव्वळ वेळ घालवण्यासाठी नोकरी करतात एखाद्या स्त्रीला मात्र खरोखरच नोकरीची गरज असते तेव्हा या साऱ्याचा विचार करून नोकरी किंवा करिअर केले पाहिजे . स्त्रियांनी तणावमुक्त रहाण्यासाठी प्रथम आपले आरोग्य जपले पाहिजे .मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, शुभ विचार , योगा करणे गरजेचे आहे . नारी जर स्वस्थ , चिंता मुक्त , तणावमुक्त असेल तरच प्रत्येक समस्येचा सामना करू शकते . यासाठी आरोग्य चांगले पाहिजे व आरोग्यासाठी योग्य पोषण आहार घेणे महत्वाचे असते. जर स्त्री आनंदी तरच घर आनंदी .
स्त्रीने स्वावलंबी बनावे स्वावलंबनाच्या पायावरच जीवनाचे ध्येय ठरते स्वयंशिस्त व आत्मनियंत्रण हे गुण स्त्रीने आत्मसात करावेत तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल. स्त्रीला मातृत्वाचे देणं परमेश्वराने दिले आहे. जेव्हा स्त्री नोकरी किंवा करिअर करते तेव्हा तीचे हे मातृत्व एक आव्हान ठरते अशावेळी बऱ्याचवेळा घरातून विरोध देखील होतो की स्त्रीने नोकरी करू नये होणाऱ्या अपत्याला कोण सांभाळेल? त्याचे पालन पोषण कोण करेल ? आशा वेळी मातृत्व त्रासदायक वाटते यासाठी स्त्रियांनी प्रथम आपत्य प्राप्ती करून घ्यावी . वय वर्ष 30 पर्यंत आपत्यास जन्म देऊन ती मुलं चार -पाच वर्षांची होतील तेव्हा तिशी नंतर घरातील सदस्यांचा विचार घेऊन नोकरीचा निर्णय घ्यावा करण तीस वर्षा नंतरचे आयुष्य हे किशोर अवस्था व प्रौढावस्था यांच्यामधला महत्वाचा टप्पा असतो . अल्लड किशोरी आता अनुभवाने , वयाने समजदार झालेली असते बहुतांश स्त्रिया तीस वर्षांपर्यंत लग्न करून एक किंवा दोन अपत्यांच्या माता झालेल्या असतात तेव्हा, नव्या जीवनाचा उंबरठा ओलांडण्यास त्या तयार असतात आशा स्त्रियांनी नोकरी करावी .प्रत्येक स्त्रीच्या मध्ये सृजनक्षमता ही असतेच त्या गुणांचा वापर करून आपल्या कार्यात वेगळाच रंग निर्माण करू शकते . गृहिणी घरात राहून देखील आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनू शकते जसे , गृहसजावट , beautician, डान्स क्लासेस, कूकिंग क्लासेस , गाण्याचे क्लासेस, शिवणकाम ,विणकाम , यातील पर्याय निवडून आपल्या वेळे नुसार काम करून त्या आर्थिक प्राप्ती मिळवू शकतात .म्हणजे घराकडे दुर्लक्षही होत नाही विकासाचा अर्थ असा नव्हे की बाहेर जाऊनच अर्थार्जन करावे आपल्यातील कला कौशल्ये ओळखून त्याचा व्यवसायासाठी निवड करू शकते . यासाठी तिने आत्मविश्वासाने व्यवसायात पाऊल टाकले पाहिजे व निर्णयक्षमताही दाखवली पाहिजे . कुठल्याही परिस्थितीत झटपट निर्णय घेऊन ती गोष्ट निकालात काढली पाहिजे . निडर, निर्भय , आत्मविश्वास हे गुण बाळगणे आजच्या स्त्रीची गरज आहे. त्याचबरोबर स्वतःला चांगल्या सवयी लावणे , कुटुंबालाही चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे . जसे सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे , योग्य वेळेत काम करणे, वेळेचे नियोजन करणे व आपल्या अंगी असलेल्या क्षमतेचा विचार करून आयुष्यात पुढे पुढे पाऊले टाकावीत .
आजच्या स्त्रीने माझ्या दृष्टीकोनातून स्त्रीने आत्मनिर्भर होण्यासाठी काही मुद्दे लक्षात घ्यावेत .
1. निडरता व आत्मविश्वास वाढवणे यासाठी स्वतः चे आत्मपरीक्षण करावे.
2. नोकरी किंवा व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी आपले चारित्र्य स्वछ ठेवावे .
3. कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता नोकरी करावी निव्वळ चैनीसाठी नोकरी करू नये गरज असेल तरच नोकरी करावी नाहीतर घरात बसूनही व्यवसाय करू शकता.
4. स्वतः चे व कुटुंबाचे निर्णय पतीसह घ्यावेत किंवा वेळप्रसंगी स्वतः निर्णय घ्यावेत.
5. पती बरोबर सुसंवाद वाढवावा, विश्वासाचे नाते जपावे.
6. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कार्यालयातील सहकारी यांच्याशी प्रेमाने बोलावे .
7. स्त्री आनंदी असेल तर घर आनंदी म्हणून तणावमुक्त स्वतः व कुटुंबाला ठेवण्याचा प्रयत्न करावा . व सकारात्मक विचार मनी बाळगावेत.
8. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिम्मत बाळगावी.
9. स्वतः चे आत्मनिरीक्षण करावे.
10. वेळेला महत्व द्यावे त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन, कामाची योग्य आखणी करावी.
11. कुटुंबात सुसंवाद स्थापित करावा व कुटुंब हसत खेळत राहण्यासाठी प्रयत्न करावेत .
12. कोणाशीही बोलताना तारतम्य ठेवावे.समोरच्याला दुखवू नये .
13. कार्यालयातील इतर स्त्रियांशी स्वतः ची तुलना करू नये .
14. द्वेष, मत्सर , हेवे दावे मनातून काढून टाका. आपुलकी व प्रेमाने साऱ्यांना जिंका.
15. बाह्य सौंदर्य ही दैवी देणगी आहे पण आंतरिक सौंदर्यासाठी स्वतःचा विकास करावा यासाठी विविध कोर्सेस ला जावे. उदा . योगा, ध्यान याचा फायदा घ्यावा.
16. मुलींच्या संगोपनात महत्वाचं योगदान द्यावं. त्यांना मार्गदर्शन द्यावे.
17. कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा .वयस्कर व्यक्तीचं आजारपण याला वेळ द्यावा.
18. डोळ्यासमोर ध्येय ठेवून ध्येय पूर्तीसाठी अथक प्रयत्न करावेत.
19. आपत्याना मार्गदर्शन, संस्कार द्यावेत नम्रपणा आदर राखणे शिकवावे.पॉकेट मनीचा योग्य वापर होतो की नाही हे पाहणे . तसेच त्यांचा मित्र परिवार कसा आहे ते पाहणे.
20. समाजातील यशस्वी महिलांचा आदर्श समोर ठेवून आपण पुढे वाटचाल करावी .
माझ्या मते या बारीकसारीक मुद्द्यांचा विचार केला तर स्त्रिया अधिकच सक्षम व स्वयंसिद्ध होतील यात शंकाच नाही . माझ्या मते आजची स्त्री अशी असावी.
