Nishigandha Kakade

Drama Romance Others

3.8  

Nishigandha Kakade

Drama Romance Others

अल्लड प्रेम - भाग 1

अल्लड प्रेम - भाग 1

6 mins
432


    माझे वय कॉलेज चे होते पुण्यात शिकत असताना मी हॉस्टेल मधे राहायची.हॉस्टेल मध्ये एकूण 500 अकडयाच्या आसपास मुली राहायच्या , प्रत्येक रूम मधे एकूण सहा बेड असायचे दोन डबल बेड आणि दोन सिंगल बेड.माझ्या रूम मधे महाराष्ट्राच्या हर एक कोपऱ्यातल्या मुली राहिल्या होत्या कारण मी तिथे तीन वर्ष शिक्षणासाठी स्थायिक होते.माझे बऱ्याच मुलींसोबत खुप चांगले नाते तयार झाले होते,तर काही मुलींसोबत खटके ही उडायचे.


              त्यावेळचा मला एक प्रसंग खूप चांगल्या पद्धतीने आठवतो आहे .आमच्या हॉस्टेल मधे पाहुणे येणार होते ते पण आमच्या हॉस्टेल चेच विद्यार्थी राहून गेले होते .ते आले होते आम्हाला स्मृती आयुर्वेदाची माहिती देण्यासाठी कारण ते एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कार्यरत होते. संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही सर्व मुली हॉस्टेलच्या हॉल मधे जमा झालो होतो.डॉक्टर आल्याचे समजले आम्ही सर्व जणी डोळे मोठे करून पाहू लागलो .मस्त कडक इस्त्रीचा व्हाईट शर्ट ,ब्ल्यू जीन्स,थोडे हिप्पी असलेले काळेभोर केस, डोळ्यात एक वेगळीच चमक,गोरेपान,सडपातळ पण पिळदार देह असलेले डॉक्टर खरंच मनाला भावून जाणारे होते . जर लग्न करण्याची वेळ आली तर आपल्याला हवा असलेला माणूस समोर उभा आहे असेच वाटले क्षणभर मला . पण हा आनंद थोडेच वेळासाठी होता माझ्या नशिबी , कारण मागोमाग त्यांची बायको देखील आली होती एका गोंडस बाळासोबत.त्यांचे सर्व भाषण मी नीरसतेने ऐकले नी पाय आपटत आपटत पायऱ्या चढून माझ्या दुसऱ्या मजल्यावर वरच्या कॉर्नर रूम मधे गेले. माझ्या रूममध्ये गेल्यावर माझा आविर्भाव पाहून रमाला सर्व समजले होते की नक्की मी दुःखी का वाटून घेत आहे.

तेव्हा तिने मला शांत केले समजावले ती खरंच माझ्या लहान बहिनिसारखी होती मला.खूप समजूतदार आणि मनमिळावू रूम मेट होती ती माझी.


           त्याच रात्री मला रामाने काहीतरी सांगितले जे मला अजून पण आठवत आहे .आज मी त्याच एका सुंदर रूममेट ची गोष्ट सांगणार आहे जिने मला ती अगदी रात्रीच्या तीन वाजेपर्यंत वर्णन करून सांगितली होती.ती मुलगी म्हणजे माझी प्रिय मैत्रीण कम बहीण "रमा".

        ही कथा लिहिताना मला फक्त प्रसंग माहीत आहेत त्यामुळे मी स्थान,वेळ माझ्या पध्दतीने लिहिले आहेत.चला तर वाचूया अल्लड प्रेमाची अवखळ कहाणी रमाच्या तोंडून!


प्रसंग 1 :-

         रोजचीच होती ती सकाळ , मी माझे सर्व शाळेचे दप्तर आवरून हॉल मधे बसले होते.अचानक मम्मीचा आवाज आला ,"अग ऐकतेस का रमा, घरामागे जा आणि थोडी फुले आन ग पूजेसाठी!" लगेच कंटाळवाण्या स्वरात मी उत्तर दिले, "काय ग मम्मी ? आधीच कित्ती उशीर झालाय मला प्लीज माझा डबा दे तू लवकर." मी तशीच पाय आपटत आपटत परसाकडे गेले आणि बघते तर काय ? मी गेल्या महिन्यात लावलेल्या बटण गुलाबाला खूप फुले आली होती. मी एकदम उडीच मारली आणि ओरडले,"अग मम्मी बघ बघ माझा केसरी गुलाब कसा फुलला आहे,आज मी पण माझ्या वेनिमधे फुलं लावून जाणार." तेवढ्यात मम्मी ओरडली व मला म्हणाली," अग बाई लवकर फुल आन आणि हवं ते कर ,जा बर निघ पटकन शाळेत.एवढी नववीला गेलीये पण अजून हीच लहानपण आहे तसच आहे" .मी लक्ष ना देता पटापट फुले तोडली.

           मी माझ्या घातलेल्या दोन वेन्यानपैकी उजव्या बाजूच्या वेणीत कानाजवळ एक छानसे गुलाब लावले. मग मी थोड स्कूटर च्या आरश्यात डोकावून पाहिलं आणि डबा घेवून शाळेत निघाले.जाता जाता मला पुनम भेटली ती मला पाहून हसली आणि म्हणाली ," रमा आज चक्क गुलाब लावलेत वेणी मधे, किसको मारणे का इरादा है?" मी हसले आणि डोळे मिचकावत म्हंटले ,"अग माहीत आहे की तुला, कुणाला मारायचेय आज ते!"

        "हो हो माहीत आहे, "पुनम ने मान डोलवत म्हंटले! पुढे चालत चालत पूनमला काय हुक्की आली कोणास ठावूक ती एकदम हळू आवाजात म्हटली,. "रमा तू इतकी सुंदर दिसतेस आणि काय ग त्या देसाई सरांवर इतकी मरतेस? ते खूप मोठे आहेत ग आणि त्यांच लग्न पण झालं असेन ! तुझ्या मागे कितीतरी मूल लागली आहेत ती पण मोठ्या घरची, देखणी,रुबाबदार तरी तुझ लक्ष फक्त त्या देसाई सरांनकडे जे सारखं तुला ओरडत असतात." रागाने तिने वाकडे तोंड दाखवले आणि पुन्हा चालू लागली.

         मी पण विचार करत बसले की अस पुनम का म्हणाली असेन.थोड्याच अंतरावर चालत असताना कानावर शाळेच्या घंटेचा आवाज आला आणि आम्ही पळतच सुटलो पटकन दप्तर वर्गात ठेवून बाहेरच्या वरांड्यात आलो.माझे डोळे तसे सतत देसाई सरांनाच शोधत असायचे आणि अचानक मी चमकले आणि खुश ही झाले कारण माझ्या समोर चक्क देसाई सर होते आज ते खरंच खूप शांत आणि स्तब्ध दिसत होते.

          वाऱ्याने उडणारे केस , अक्षय कुमार सारखे एकदम सरळ नाक, त्या नाकावर ब्लॅक अँड रेड फ्रेम चा नंबर असलेला चस्मा आणि पाणीदार डोळे क्या बात है....खरंच मला त्यांच्या चेहऱ्यावरून कधीच दुसरीकडे पाहूच वाटले नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक सुंदर स्मित असायचं.त्यांनी आज चेक्स असलेला ब्लू शर्ट तो पण इन केलेला त्यावर फॉर्मल पँट, कमरेला ब्राऊन लेदर बेल्ट,फॉर्मल ब्लॅक बुट घातलेले होते . त्यांचे बोलणे देखील खूप अदबशिर आणि नेमके असायचे.त्यांना गाणे गुणगुणनन्यांचा खूप छंद होता जे मला खूप आवडायचं .( त्या वयाच्या 15 .. 16 व्या वर्षी आणि इतकं कळत तरी काय ?? फक्त आकर्षण)

प्रसंग 2 :-

       आमची प्रार्थना पूर्ण झाली व आमचे टाइमटेबल प्रमाणे तास चालू झाले...आज पहिलाच तास मराठीचा म्हणजेच देसाई सरांचा होता .मी अगदी केस नीट करून ,गुलाब आहे का केसात ?हे पाहून बेंचवर स्मितहास्य करत बसले होते .. अचानक डस्टर चा टक टक आवाज आला आणि एक खडू माझ्याकडे भिरकवण्यात आला. आणि मी जाग्यावर खाडकन उभी राहिले कारण मी सरांच्या विचार चक्रात होते त्यामुळे सर आले तरी मला समजले नाही... हे सर्व काहीही समजण्याच्या आतच मला सर ओरडू लागले " दिवस असताना झोप काढता का रमा ? तेही डोळे उघडे ठेवून जरा पूर्ण वर्गाला देखील शिकवाल का ?" आणि सर्व वर्ग माझ्याकडे अक्षरशः मी खूनी असल्यासारखा पाहू लागला! मला खूप खजील झाल्यासारखे वाटले आणि मी बेंच मधे मान घालून बसले.

तास संपला तरी मी वर बघेना हे पाहून सर जवळ आले आणि मला म्हटले " रमा काही प्रोब्लेम आहे का ग? सकाळपासून तुझ लक्ष नाही अजिबात ?? मला सांग काय झाले ? " मी वेड्यासारखी फक्त त्यांच्या कडेच पाहत राहिले व ( मनात बोलले सर डोळ्यातून दिसत असेल की माझ्या मला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते ! ) मी नकारार्थी मान डोलावत पुन्हा खाली पाहिले.


                  बाकी तास देखील असेच संपले .पुनम माझ्याकडे सतत पाहू लागली ,नी तिला डोळ्याने शांत बस असे खुणावले आणि डबा खावून घरी जायला निघाले.तेवढ्यात मला पुनम म्हणाली "काय ग का चाललीस लगेच घरी अजून एक तास आहे आपला! " माझा चेहरा पाहून तिला समजले की देसाई सरांमुळे माझे मन लागत नाहीये ,पुढच्याच मिनिटाला तिने माझा कान जवळ ओढला आणि मला म्हटली " देसाई सर कुठे राहतात मला माहित आहे आपण त्यांच्या कडे जावून बोलुयात का ?? " मी एकदम ओरडले "काय?",अग वेडी आहेस का ते पून्हा ओरडत मला ,अजून ओरडा नाही खाऊ शकणार मी ,तरीही आपण सायकल वर जावून फक्त लांबून पाहून येवू."

प्रसंग 3:-

               

        दुसरा दिवस उगवला मी खूप खूष होते आज मला सुट्टी तर होतीच पण मला पूनम सोबत देसाई सरांना पाहायला जायचं होत. मनात भावना कल्लोळ झाला होता अगदी ! काय होतंय काही समजत नव्हते ! त्यांचं वय काय ?त्यांचं गाव कोणतं ?त्यांना मी आवडत असेन का ? त्यांना माझा राग का येतो ? ते एकटेच राहतात की आई वडीलपन सोबत असतात?.. आणि अगदी शेवटचा प्रश्न ....खूप मोठा .... ज्याचे उत्तर नाही असे असावे असच मला कायम वाटायचं.. तो म्हणजे त्यांचं लग्न तर झालं नसेन ना?? देवा मला एकवेळ तू परीक्षेत कमी मार्क पाड पण हे खोटं ठरु दे.! मी माझे कसे बसे आवरले याच विचारात की सरांच्या घरी जर बायकों दिसली त्यांची तर नक्की काय करायचं?माझा जीव कासावीस झाला होता.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama