STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy Others

3  

Aruna Garje

Tragedy Others

अलक जुनी चप्पल

अलक जुनी चप्पल

1 min
318

    "माय ए माय , बापू साठी चप्पल आणली म्या." हे ऐकताच... "चोरी करायला शिकला व्हय." असे म्हणून तिने त्याला पाठीवर वळ उठेपर्यंत मारले. रडतच तो म्हणाला.... "माय, चोरी नाय केली म्या. एका सायबाकडं आंगण साफसुफ केलं.

पैसं देत व्हतं. म्याच म्हणलो.. सायब पैसं नगं. तुमची जुनी चप्पल आसन तर द्या. तवा सायबानीच दिल्या चप्पल. बापू उन्हातान्हात अनवाणी राबतो. परवाच त्याच्या पायात खिळा बी घुसला." हे ऐकताच त्याला पोटाशी घेऊन ती खूप रडली. बाप दुरुनच बघत राहिला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy