अधुरी प्रेम कहाणी
अधुरी प्रेम कहाणी
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी
पहिलं प्रेम आणि सगळ्या जुन्या आठवणी जणू काजव्या सारख्या डोळ्यासमोर चमकू लागल्या , काही सुखद तर काही दुःखद.
प्रेम म्हणजे काय कदाचित हे तेव्हा एवढं कळत ही नव्हतं पण एक मुलगा आचनक माझ्या मनात घर करून गेला , अर्थात माझ्याच वर्गातला मुलगा होता पण त्याचा आणि माझा कधी मेळ लागेल असे वाटलेही नव्हते तो लास्ट बाकावरील खोडकर , वात्रट विद्यार्थी आणि मी पहिल्या बाकावरील हुशार , अभ्यासू विद्यार्थिनीं .
वर्गात असताना तो माझ्याकडे रोज बघायचा हे मला कळत होतं पण मी नजर चुकवत होती . कितीतरी महिने असच चालू होतं आणि एक दिवस अचानक माझ्या चुलत भावा सोबत मी त्याला पाहिलं आणि त्याची माझी ओळख त्याने करून दिली " अग हा माझा मित्र तुझ्याच वर्गात आहे " झालं मग काय ओळख झाली मैत्री झाली कदाचित माझ्याही मनात तेच होत .
मग अधून मधून हाय ,बाय अस थोडं बोलणं सुरू झालं .
एक दिवस त्याने मला प्रपोज केलं पण मी नकार दिला फक्त मैत्री पर्यंत ठिक आहे असं बोलून मी त्याची समजूत काढली की स्वतःची हेच कळलं नाही . पण त्या दिवसापासून दोघे खूप चांगले मित्र झालो , एकमेकांशिवाय न बोलता दोघांनाही करमत नसायचं , शेवटी मैत्री प्रेमात कधी बद्दलली कळलंच नाही.
दिवसा मागे दिवस सरत होते दोघांच्यातली ओढ ही वाढत होती भेटणं बोलणं रोज कॉलेज मध्ये चालूच होत . तेव्हा बाहेर जाण , दोघेच फिरणं हे तर दूरच साधं बोलायचं म्हंटल तरी मनात भीती असायची . कोण बघेल की काय , घरी सांगेन की काय ?
एकदिवस शिक्षण पूर्ण झालं मला बघायला स्थळ येऊ लागलं आमच्या प्रेमाला घरातुन परवानगी मिळणार नाही हे मला माहित होतं कारण दोघे वेगळ्या कास्ट चे मग काय नेहमीप्रमाणे च जात आडवी अली, परंतु त्याच्या घरातुन पूर्ण संमती होती.
मग काय नेहमीप्रमाणे प्रेमाचा त्याग आणि मुलगी म्हणून कर्तव्याचे पालन मी केले आणि माझ्यासाठी हे सगळे त्याने ही सहन केले.
त्यादिवशी दोघांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसला , दोघे भेटून खूप रडलो , एकमेकांची समजूत काढली , आणि एकमेकांची हिम्मत बनून पुढील निर्णय स्वीकारला तसही दुसरा पर्याय नव्हताच आणि असला तरी आम्हाला अवलंबायचा नव्हता.
माझ्या लग्नात तो माझ्यासाठी आहेर घेऊन आला होता अर्थात ती माझी शेवटची इच्छा होती म्हणून .
त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलच प्रेम ओसंडून वाहत होत , आणि डोळे पाण्याने गच्च भरले होते काहीशी ही अवस्था माझीही ही होतीच पण तेव्हा दोघांनीही स्वतःला सावरले ,
कदाचित माझी शेवटची भेट घेण्यासाठीच तो आला होता . त्या दिवशी तो तेथून निघून गेला ते कायमच माझ्या आयुष्यात परत कधी माघारी न परतण्यासाठी.
पण म्हणतात ना आठवणी विसरता येत नाहीत आणि पुसता ही येत नाहीत त्या कायम काळजात घर करून राहतात .
आजही त्या आठवणी आठवून माझे मन सुन्न सुन्न होते आणि मनात एक प्रशचिन्ह उभे राहते
त्याची आठवण मला आजही येते मग त्यालाही माझी आठवण येत असेल का ? जर येत असेल तर मग त्याने मला एक मित्र म्हणून भेटण्याचा किंवा माझी चौकशी करण्याचा प्रयत्न का नाही केला ? . की खरच तो मला विसरला असेल ?
असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर घरून आहेत पण अस म्हणतात काही प्रश्न हे प्रश्न च बरे वाटतात त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न कधी करू नये कारण यामुळे त्रास जास्त होतो , कदाचित सगळ्यांनाच.
आणि म्हणूनच मी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कधी केला नाही आणि करणार ही नाही.
पण त्याला विसरू ही शकत नाही हे ही तितकंच खरं आहे.
त्याच्या आठवणी कायम पिंपळाच्या पनासारख्या मनाच्या पुस्तकात जपून ठेवल्यात.

