अधुरी एक कहानी
अधुरी एक कहानी
निर्सगाने भरभरुन दान दिलेल्या रामपुर गावातील ही गोश्ट. याच गावात महेष नावाचा मुलगा रहात होता. एका सुखवस्तु कुटूंबातील हा मुलगा. फार नाही पण खाण्यापुरती जमीन. आई वडील आणि तो असे छोटे सुखी कुटूंब. महेष लहाणपणापासुनच खुप हुषार आणि अभ्यासु असा मुलगा. त्याचे वडिल षेती करायचे आणि षेतीमध्ये पिकलेला माल तालुक्याच्या ठिकाणी विकायला जायाचे. आपल्या मुलाने भरपूर षिकून सरकारी नोकरी मिळवावी. व आपल्या आयुश्यात लवकरात लवकर तो सेटल व्हावा, अषीच इच्छा इतरांसारखी त्यांची देखील. परंतु एक दिवस या सुखी संसाराला कोणाची तरी दूश्ट लागली. एके दिवषी महेषच्या वडिलांनी महेषला सांगितले, आज मी आणि तुझी आई दोघेही तालुक्याला जातोय. आता दिवाळसण तोंडावर आल्याय, हिला पण जरा काहीबाही खरेदी करायची आहे. त्यासाठी आम्ही एकत्र जातोय. षाळेतुन आल्यावर जरा घराकड लक्ष दे. आणि भाकर करुन ठेवली हाय कालेजातन आलास की खाउन घे-महेषची आई बोलली. आणि दोघे सकाळीच बाहेर पडले. थोडया वेळाने घडयाळयाच्या आर्लामने महेषच्या डोळयातील झोप उडवली. व तो पटपट आवरुन काॅलेजला गेला. महेष आता काॅलेजच्या षेवटच्या वर्शात होता. काॅलेजमधला अतिषय हुषार आणि सतत टाॅपर असणारा तो विद्यार्थी होता. नेहमीप्रमाणे तो आपले काॅलेज संपवुन घरी आला. आईने बनविलेली भाकरी खाल्ली. आणि थोडा वेळ षेतात जावुन भटकंती करुन आला. त्यानंतर पुन्हा घरी येवुन अभ्यास करुन झोपी गेला. काही वेळाने दारावरती जोरजोरात कुणीतरी त्याला हाक मारत होते. त्याने दार उघडले, तर षेजारीच राहणारा पांडूतात्या त्याला हाक मारत होता. अरे महेष पोरा उठ लवकर. महेषने दार उघडले. अरे महेष घात झाला, तालुक्यातून येताना तुझया आईवडिलांचा अपघात झाला, आणि त्या अपघातात दोघेही गेले. महेषला एकदम झटकाच बसला. तो मठठकन खालीच बसला. कस तरी पांडूतात्यानी त्याला सावरुन बाहेर आणल. बाहेर एकच आक्रोष उठला होता. सारा गाव या घटनेवर हळहळत होता.
असेच काही दिवस गेले. महेष पुर्णपणे खचला होता. आईवडिलांच्या जाण्याने त्याच्या आयुश्यात एक पोकळी निर्माण झाली होती. तो पोरका झाला होता. नातेवाईक समजूत काढत होते. पण महेष एैकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. एक दिवस षेजारचा पांडूतात्या आला आणि त्यांनी त्याची समजूत काढली. असेच काही दिवस गेले. महेष पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या कामात लागला. काही दिवसांनी तो चांगल्या मार्कानी पास होवुन तालुक्यात पहिला आला. त्यांनतर आपल्या जिददीच्या जोरावर त्याने अभ्यास केला आणि काही दिवसताच तो सरकारी कचेरीत कामावर रुजू झाला. आईवडिलांचे स्वप्न पुर्ण केल्याचे त्याला मनस्वी समाधान होते. जसजसा महेष मोठा होत होता तसे तसे आता पुढील आयुश्यात आपल्याला कोणाचीतरी साथ असायला हवी, असे त्याचे म्हणणे होते. आणि नोतेवाईकांनादेखील आता त्याचे दोनाचे चार हात व्हावेत असे वाटत होते. महेषची देखील फार काही अषी मोठी अपेक्षा नव्हती. नाकेडोळी मुलगी बरी असावी अषी त्याची इच्छा. काही दिवसातच महेषला पांडूतात्यांच्या ओळखीतून एका सालस मुलीचे स्थळ सांगून आले. तिचे नाव आषा होते. आषा दिसायला अतिषय सुंदर आणि रुपवान होती. फक्त एवढेच की ती आनंदआश्रम नावाच्या एका अनाथ आश्रमात वाढली होती. पण महेषला त्याबददल कसलीच तक्रार नव्हती. त्यामुळे त्याने पांडतात्यांना सांगितले मला मुलगी पसंत आहे. पण मला हे लग्न रजिस्टर मॅरेज करावयाचे आहे.
काही दिवसांनी काही निवडक मित्र व पैपाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये महेष आणि आषाचा षुभविवाह छोटखानी परंतु अगदी सुदंररित्या पार पडला. तसे महेषला सरकारी काॅटर असल्याने त्याने आता गावाकडील घर भाडयाने दिले होते. आणि षेती पांडूतात्याना चालवायला दिली होती. तो आणि आषा आता सुखाने आपल्या घरात रहात होते. आषा खुपच देखणी असल्यामुळे महेषला मनोमनी सारख वाटायच की माझे नषीब किती चांगले की मला इतकी रुपवान व गुणवान बायको मिळाली. अषातच काही दिवस गेले. आणि अचानक एके दिवषी सकाळी केस विचंरत असताना तिच्या गालावर कसला तरी तिला डाग दिसला. तिला वाटल काही तरी उटले असेल. तिने महेषला देखील सांगितले. महेष म्हणला ‘‘अग राणी काळजी करु नकोस आज संध्याकाळी लवकर येतो, मग आपण षहरातल्या चांगल्या डाॅक्टरांकडे जावुया. ठीक आहे. त्या दिवषी आपले सगळे काम संपवुन महेष तिला सांगितल्याप्रमाणे डाॅक्टरांकडे घेवुन गेला. डाॅक्टरांनी तिला निट तपासुन काही औशघे दिली. आणि आठ दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितले. घरी आल्यानंतर आषा खुपच भावुक होवुन आपल्या पतीला बोलली,‘‘काय हो तुम्ही एवढे माझेवर प्रेम करता? समजा उद्या मी जर अचानक सर्व अंगानी कुरुप झाले तरी देखील तुम्हचे एवढेच प्रेम राहिल का माझेवर? महेष बोलला ‘‘काहीही बोलू नकोस तु कषीही असलीस तरी माझे हे प्रेम असेच कायम रहाणार. आणि आता डाॅक्टरांनी औशधे दिली आहेत ना. अषातच आता आठ दिवस उलठून गेले, पण तरीही तिचा डाग गेला नव्हता. उलट संपुर्ण अंगाला आता डाग उठले होते. कोणतातरी चर्मरोग तिला झाला होता. महेष कामानिमित्त पंधरा दिवस बाहेर गेला होता. वरेचवर तो फोन करुन तिची चैकषी करायचा, पण त्याला काळजी वाटू नये म्हणुन ती देखील बरी आहे असेच सांगायची.
एके दिवषी अचानक महेषचा मित्र कुणाल घरी आला आणि सोबत महेष देखील होता. त्याच्या डोळयाला काळा चश्मा होता. आपल्या नव-याला असे पाहुन आषाला काय बोलायचे ते कळेणा. तिने कुणालला विचारले अहो भाउजी काय झाले यांना? कुणालने सांगितले अहो काय नाही वहिनी एक छोटासा अपघात झाला आणि त्यामध्ये याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. डाॅक्टरांनी याला आता घरी बसुनच काम करायला सांगितले आहे. एवढे एैकल्यावर आषाला काहीच कळेना. परंतु एका क्षणी तिच्या मनात विचार आला बरे झाले निदान माझे कुरुपपण यांना बघावे लागणार नाही. असेच दिवस जात होते. महेष आता सर्व कामे घरातुनच करत होता. परंतु आषाची काळजी घेण्यात कुठलीच कुचराई त्याने ठेवली नव्हती. तो नियमितपणे तिला विचारणा करीत होता.
कितीही उपचार केले तरीही आषाचा हा चर्मरोग काही केल्या बरा होण्याचे नावच घेत नव्हता. आपल्या पतीला काही दिसत नाही त्यामुळे ती देखील हो मी बरी आहे असेच त्याला दरवेळी सांगत असे. परंतु दिवंसेदिवस आषाची आता तब्येत खालावत चालली होती. आणि एकेदिवषी ती खुपच आजारी पडली. महेषने कुणालला फोन करुन तिला एका षहरातील नामांकित दवाखान्यात अॅडमीट केले. तिच्यावर उपचार सुरु झाले. परंतु उपचार सुरु असतानाच तिचे दुदैवी निधन झाले. महेष त्यादिवषी दवाखान्यात धाय मोखुलून रडला. इतर मित्र मंडळी व नातेवाईकांसोबत त्याने तिचे अंत्यसंस्कार उरकले. काही दिवस घरी पै-पाहुणे, मित्रमंडळी भेटायला येत होती. महेषला धिर देत होती.
काही दिवसांनी महेषने कुणालला एकांतात बोलावुन घेतले. आणि तो बोलला, ‘‘ए बघ कुणाल आई-बाबा गेल्यानंतर माझया आयुश्यातील पोकळी आषाने भरुन काढली होती. परंतु ती देखील आता मला सोडून गेली. माझे नषिबच खोटे आहे. म्हणून मी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी तुला बोलावुन घेतले आहे. कुणाल बोलला, ‘‘हो निंसकोच बोल मित्रा. काय करायच ठरवलयस तु. महेष बोलला, ‘‘गावाकडची जी काय माझी मिळकत आहे, ती मी पांडूतात्यांच्या नावे करणार. तसेही मला आता जगण्यात रस नाही. महेष बोलला, ‘‘अरे महेष, असे का बोलतो आहेस तु तुझया भविश्याचा विचार कर. तु पुढे काय करणार आहेस? महेष-‘‘मी आता व्हिआरएस घेवुन माझे पुढचे आयुश्य आश्रमातील मुलांसमवेत घालवणार आहे. माझा निर्णय ठाम आहे. मी सांगतोय तषी कागदपत्रे तु तयार करुन घेवुन ये. कुणाल- ‘‘ठिक आहे उद्याच मी सर्व कागदपत्रे तयार करुन आणतो. तु सांगितलेप्रमाणे. एवढे बोलुन कुणाल निघून गेला. दुस-यादिवषी तो महेषच्या घरी आला. कुणाल बोलला ‘‘ए बघ महेष तु सुचना केल्याप्रमाणे मी सगळी कागदपत्रे तयार केली आहेत. मी स्वतः ती वाचली आहेत. एवढे बोलुन कुणालने त्याचा हातात पेन देवुन दुसरा हात हातात घेवुन ‘‘तु इथे सही कर. काही वेळ कुणालने आणलेले ते सर्व कागदपत्रे हातात घेवुन सही करायचे ठरवले. आणि त्याच्यावर नजर टाकत त्याने कुणालला एक प्रष्न विचारला. ‘‘अरे कुणाल इथे पांडू तात्या यांचे नाव चुकीचे टाकले आहेस. हे एैकुण कुणालला धक्का बसला. कारण महेषला तर दोन्ही डोळयानी दिसत नाही मग याला हे कसे समजले. त्याने आष्र्चयाने त्याला विचारले, तेव्हा आपल्या डोळयावरील काळा चश्मा बाजुला घेवुन महेष बोलला, ‘‘ मी आंधळा नाही आहे. हे एैकुण कुणालला धक्का बसला. आणि तो बोलला, ‘‘अरे तु मग आत्तापर्यंत आंधळेपणाचे नाटक करत होतास. अरे पण का? महेष बोलला, ‘‘माझे बायकोला वाईट वाटू नये म्हणुन मी असे वागलो. कारण तिला देखील असेच वाटत होते की माझे पतीला माझे हे कुरुप रुप पाहून काय वाटत असेल. तिच्यावरच्या प्रेमाखातर डोळे असुन मी आंधळा राहिलो. आता इथुन पुढचे आयुश्य इतरांना आनंद देण्यात घालवीन. एवढे बोलुन महेषने सर्व पेपरवर सहया केल्या आणि बाहेर आलेल्या रिक्षातुन तो आनंदआश्रमात रुजू झाला.

