अबोला - 1
अबोला - 1
ती म्हणाली...
हे बरंय हां तुझं, म्हणे कोणीही कस्सही वागलं तरी आपण चांगलंच वागायचं...
आणि तुला सहन तरी कसं होतं हे सगळं, अपमानालासुद्धा हद्द असते अरे, मला कळत नाही, तुझ्या सहन करण्याला सीमा तरी कुठे....
हे बघ तुला होत असेल सहन पण माझी हिम्मत नाहीये आता प्रत्येक वेळी तुझा अपमान सहन करण्याची आणि ते आहेत तरी कोण प्रत्येक वेळेला तुला शिकवणारे, त्यांना नात्यांच्या मर्यादा पाळता येत नसतील तर आपणही का पाळावीत असली नाती...पाहुण्यांनी पहुण्यांसारखंच राहायचं असतं...
आणि ती कितीतरी वेळ तशीच बोलत राहिली...
तशी ती रागावली की मी कधीही बोलत नाही, तिच्या मनातली सगळी वादळं अगदी फायर करू देतो माझ्यावर, आणि ती मोकळी झाली की मग आपोआप शांत होते....
मात्र यावेळी मला काही तिचं पटलं नव्हतं, न राहवून तिचे शब्द खुडत मी बोललोच....
अगं!... बास्स हा आता मला नको शिकवू कसं वागायचं ते..आणि हो ते अपमान माझा करतात त्याचा मला त्रास होत नसेल तर तुलाही व्हायला नको...आणि मला या विषयावर आणखी चर्चा करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये...
(पुढील कथाभागात)

