यौवनाचा सोहळा
यौवनाचा सोहळा


अधीर मन या एकांती
आसपास गं नाही कुणी..
उबदार तुझ्या मिठीत
भाव वेगळा जागे मनी..
केला नजरेचा इशारा
मिठी आणखी झाली घट्ट..
ठेवले ओठ ओठांवर
दूर होण्याचा सोड हट्ट..
गुरफटून एकमेकास
पेटला देह उष्ण श्वास..
क्षण मिलनाचा समीप
देह एक होण्याची आस..
थरथरत्या या स्पर्शाने
यौवनाचा खेळ रंगला..
घे लुटून आनंद सारा
श्वास हा श्वासांत गुंतला..
गाठले शिखर खेळाचे
तरी का वाटते अतृप्त..
लपेटून अंग अंगास
होऊ दोघेही पूर्ण तृप्त..
शांत झाली तप्त शरीरे
मिठी जराशी सैल झाली..
हास्य उमटले गाली या
विस्कटली ओठांची लाली..
झाले सये पूर्ण मिलन
रम्य यौवनाचा सोहळा..
साठवू मनात कायम
एकांत आगळा वेगळा..