तू भेटली पुन्हा
तू भेटली पुन्हा
तू भेटावी मला या आयुष्याच्या रिंगणात
तुला भेटाव मी या आयुष्यात!
शब्द असावे माझे तुझे त्यांना करुनी कविता
तू लिहावं मला मी लिहावं तुला!
हे असच असावं आपल आयुष्य
तू माझ्या अवती मी तुझ्या भोवती!
तू रुसावस माझ्यावर गजऱ्याच्या बहाण्याने
मी माळवा गुलाब तुझ्या केसात!
तुला अर्थ असावा आपल्या नात्याचा
तू समजुन घ्यावं या नात्याला!

