Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SUNANDA VAIDYA

Romance

3  

SUNANDA VAIDYA

Romance

तू असल्यावर....

तू असल्यावर....

1 min
241

मनात जे जे, ते ते मिळते तू असल्यावर ‌

मला कशाची चिंता नसते तू असल्यावर ‌

बागेमधुनी विहरत असता तुझ्यासवे मी

फुले उधळती सुगंध सुंदर तू असल्यावर

आकाशातील चंद्र चांदण्या किती दूर पण

उतरुन येती जणू भुईवर तू असल्यावर

रोज अकारण नटताथटता कधी न खुलते

ना नटताही रूप खुले ते तू असल्यावर

फिरावयाला जाता आपण सांज-सकाळी ‌

रस्ते हिरव्या पायघड्या रे तू असल्यावर 

सांध्यरंग हे नभांगणी या खुलती जेव्हा 

प्रतिमा त्यांची गालावरती तू असल्यावर 

पायी सुखाच्या राशी मिळती तुला 'सुनंदा'

उणिवा सा-या संपुन जाती तू असल्यावर

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance