तुझ्यावर मरतं...
तुझ्यावर मरतं...
दूर जावं तितकं प्रेम होतं...
तुला पाहताच माझं भान विसरून जातं
तुझ्यापासून जितकं दूर जावं तितकं प्रेम होतं...
मुली तर नजरेसमोर खूप आहेत
माझं मन तुझ्यावर मरतं तुझ्यावर मरतं...
तुझं हे साधं भोळं रूप माझा जीव घेईल
जीव गेला तरी तुझ्याविना माझं कुठं सरतं...
मी पाहतो रोज सखे तुझ्या प्रेमाचं स्वप्न
तुझं माझं स्वप्न कुठं रोज सत्यात उतरतं...
एक तुझ्या प्रेमासाठी मी सार जग विसरलं
तुला किती पाहावं माझं मन ना कधी भरतं...
तुझी तिरकी नजर करे मला का इशारा
तुला मिळवण्यासाठी संगमचं मन झुरतं...

