STORYMIRROR

Pratiksha Kulkarni

Romance

3  

Pratiksha Kulkarni

Romance

ती वेल..!

ती वेल..!

1 min
351

सध्या जाणवतंय मला 

मी तुझ्यात नाही, तर आपल्या 

अंगणाच्या कडेला अगदी 

पन्हाळाखाली कसबस वाढणाऱ्या 

 वेलीप्रमाणेच जगतेय. 

असंच जाणवतेय... 

स्वतःच स्वतःचा मार्ग शोधत, भिंतीचा 

आधार घेत आणि ठेचं जरी लागली तरी 

त्याच मार्गानं 

कारण इथे कुठलं दिसत नाहीये ऑपशन 

इकडचंची मान तिकडे नाही, 

कारण तीच वेल, तीच मी, तेच अंगण 

अगदी सारं बंदिस्त बघ.. 

मग येतंय तरी काय माझ्या नशिबाला, 

कधी पावसाचे झिरपणारे पाणी तर 

कधी कडाक्याची थंडी 

नाहीतर तो उन्हाचा कडाका 

यातच सगळं जीवन 

नाहीतरी एखाद्या स्त्रीला इतकं कणखर,सहनशील तर राहवं लागतंच 

तू म्हणतोस कि नाही, हे माहित नाही पण 

जग तरी असंच म्हणत 

म्हणूनच मी तो मनाचा हळवा कोपरा, खोलवर रुजलेल्या जाणीवा 

साऱ्या बंद कुलुपात ठेवल्यात बघ.. 

पण या अंगणातील वेलीच काय, 

किती दिवस अस्तित्व 

जेंव्हा हे सर्व काही सहन

 करायची हिम्मत 

संपेल.. 

तेंव्हा 

सर्वच संपेल अशी भीती वाटतेय रे... 


आणि 

नंतरच एकच चित्र डोळ्यासमोर दिसतंय 

 संपत आलेली ती वेल, तिचा बनलेला पालापाचोळा, सुसाट वारा आणि ते मोकळ अवकाश 

व दूरवर थांबलेला तू..!


Rate this content
Log in

More marathi poem from Pratiksha Kulkarni

Similar marathi poem from Romance