सूर्य मावळेल
सूर्य मावळेल


तो आणि ती
ती लैला हीर ती
तो मजनू रांझा तो
ती ज्युलिएट रोमिओ तो १
बिछडले ते खूप दूर गेले
पण तरी एकनिष्ठ राहिले
अनंत काळापासून प्रेमबंधन
नेत्र सदैव बघे छबी निरंतर २
तो गावी कदा येतसे
निमित्ते लग्ना चिंगी चे
कळलं तीही आहे गावात
फिरला गावभर भिरभिरत ३
एक दुर्मिळ ध्वनी कानी येई
नि: शब्द क्षणानंतर काही
"सूर्य मावळेल" परवली शब्द
संध्याकाळी संकेतस्थळावर ४
तो पोचला संकेतस्थळावर
तासभर घालमेल प्रतीक्षेत
ढापणी एक होती तिथे
पण ती काही आलीच नाही ५
संकेतस्थळावर तीही प्रहरभर
कपाळीं झेपावणारे केश स्मरत
एक टकल्या तिथे घुटमळत होता
पण तो काही आलाच नाही ६
नदीच्या पाण्यात गहिरे डोळे शोधत
"सूर्य मावळला रे" ती उद्गारली
झर्रकन वळला नसलेले केस मागे घेत
नि म्हणाला "मावळेल" परवली आहे ७
सूर्य मावळेल तेव्हा तू माझेपासून
दूर नाही मम मिठीत तृप्त असशील
मी धुंदीत स्वप्नात तरंगत राहीन तेव्हा
आज टकल्या नि ढापणी झालो तरी ८